द्वितिय महायुद्ध - भाग 2

रुग्णालयाच्या त्या अंधाऱ्या खोलीतून जेव्हा अ‍ॅडॉल्फ हिटलर बाहेर पडला, तेव्हा त्याच्यासमोर एक भकास जर्मनी उभा होता. ज्या देशासाठी त्याने पहिल्या महायुद्धात आपल्या प्राणाची बाजी लावली, तो देश आता आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. हिटलरच्या मनात सूडाची आग तर धगधगत होती, पण त्याच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न हा होता की—बदला घ्यायचा कसा? एक सामान्य सैनिक, ज्याला म्युनिकच्या रस्त्यांवर कोणी ओळखतही नव्हते, तो संपूर्ण जर्मनीचे नशीब कसे बदलणार? सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता कोणता होता? हिटलर जेव्हा म्युनिकच्या गल्ल्यांमध्ये स्वतःचे अस्तित्व शोधण्यासाठी धडपडत होता, अगदी त्याच वेळी जर्मनीच्या सीमेपलीकडे, इटली देशामध्ये एका अशा वादळाचा जन्म होत होता, ज्याने हिटलरला त्याच्या सर्व