द्वितिय महायुद्ध - भाग 6

  • 405
  • 165

१९३२ सालचा शेवटचा काळ. जर्मनीची राजधानी बर्लिनमधील राजकीय वातावरण अतिशय तणावपूर्ण झाले होते. देशाची अर्थव्यवस्था आधीच 'ग्रेट डिप्रेशन'मुळे रसातळाला गेली होती आणि त्यात आता एक मोठे राजकीय संकट उभे राहिले होते. जुलै १९३२ च्या निवडणुकांमध्ये ३७% मते मिळवून हिटलरचा नाझी पक्ष संसदेतील (राईशस्टॅग) सर्वात मोठा पक्ष बनला होता. लोकशाहीच्या नियमानुसार संसदेत ज्या पक्षाचे बहुमत असते, त्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान म्हणजेच 'चान्सलर' (Chancellor) बनवले जाते. पण जर्मनीचा ८४ वर्षांचा राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिंडनबर्ग (Paul von Hindenburg) याला हिटलरचा प्रचंड तिरस्कार होता. हिंडनबर्गने स्पष्ट सांगितले होते, "मी या रस्त्यावरच्या बडबड्या ऑस्ट्रियन सैनिकाच्या हाती जर्मनीची सत्ता कधीही देणार नाही!" पण हिंडनबर्गची अडचण अशी