द्वितिय महायुद्ध - भाग 7

  • 258
  • 81

१९३४ सालची सुरुवात. अ‍ॅडॉल्फ हिटलर जर्मनीचा चान्सलर बनला होता. 'राईशस्टॅग' (संसद भवन) जळाल्यानंतर त्याने विरोधकांना तुरुंगात डांबून लोकशाहीला कायमचे मूठमाती दिली होती. पण तरीही, सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी त्याच्या मार्गात अजूनही एक मोठा आणि सर्वात भयंकर अडथळा होता. हा अडथळा दुसरा कोणी विरोधी पक्ष किंवा कम्युनिस्ट नेते नव्हते... तर हा अडथळा होता त्याचा स्वतःचा सर्वात जवळचा मित्र आणि त्याचेच खाजगी सैन्य! हिटलरच्या या खाजगी सैन्याला 'ब्राउनशर्ट्स' (SA - Sturmabteilung) म्हटले जायचे आणि त्यांचा प्रमुख होता—अर्न्स्ट रोहम (Ernst Röhm). अर्न्स्ट रोहम हा हिटलरचा त्या मोजक्या मित्रांपैकी एक होता, जो त्याला एकेरी नावाने 'अ‍ॅडॉल्फ' अशी हाक मारायचा. म्युनिकच्या रस्त्यांवर जेव्हा हिटलर शून्यातून