ताटातील विश्वासघात

  • 1.2k
  • 408

शाळेच्या दुपारच्या सुट्टीत हातात ताट घेऊन उभे असलेले मूल जेव्हा गरम जेवणाची वाट पाहत असते, तेव्हा ते फक्त भूक भागवण्यासाठी रांगेत उभे नसते. त्या ताटात त्याच्या शरीराची वाढ, मेंदूचा विकास आणि उद्याच्या आयुष्याची शक्यता वाढत असते. देशातील लाखो गरीब मुलांसाठी शाळेत मिळणारे दुपारचे जेवण हे दिवसातील सर्वांत पौष्टिक भोजन असते. म्हणूनच त्या ताटात निकृष्ट धान्य, अळ्या पडलेली डाळ, सडलेला भाजीपाला किंवा विषबाधेच्या बातम्या समोर येतात, तेव्हा प्रश्न केवळ अन्नाचा राहत नाही; तो राज्याच्या संवेदनशीलतेचा, प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा आणि समाजाच्या नैतिकतेचा बनतो.महाराष्ट्रात शालेय पोषण आहार निकृष्ट असल्याच्या तक्रारी नव्या नाहीत. त्या वारंवार समोर येतात. प्रत्येक वेळी चौकशीची घोषणा होते, समित्या नेमल्या जातात,