द्वितिय महायुद्ध - भाग 22

स्टालिनग्राडच्या महाभयंकर पराभवानंतर दुसऱ्या महायुद्धाचे पारडे पूर्णपणे फिरले होते. आतापर्यंत संपूर्ण युरोपला आपल्या टाचेखाली चिरडणारा हिटलरचा अजेय लष्करी रथ आता रशियाच्या चिखलात आणि बर्फात कायमचा रुतून बसला होता. पूर्वेकडून रशियाचे लाल सैन्य आता अत्यंत वेगाने आणि क्रूरपणे जर्मन लष्कराला मागे ढकलत युरोपच्या दिशेने येत होते. हिटलरला आता समजून चुकले होते की युद्ध आपल्या हातातून निसटत चालले आहे. पण जसा जसा हिटलरचा पराभव जवळ येऊ लागला, तसतसा त्याचा राक्षसी आणि क्रूर चेहरा अधिकच भयंकर होऊ लागला. याच काळात हिटलरने आणि त्याच्या नाझी अधिकाऱ्यांनी एक असा निर्णय घेतला, ज्याने मानवी इतिहासाला कायमचा काळा फासला. या भयंकर घटनेला इतिहासात 'होलोकॉस्ट' म्हटले जाते. होलोकॉस्ट: