टर्म्स अॅन्ड कंडीशन्स... - १

(29)
  • 6.4k
  • 5
  • 1.6k

काय ग आई..किती वेळ लावलास फोन उचलायला लगेच उचलता येत नाही का फोन अग नेहा, काम करत होते.. मग हात धुवून येईपर्यंत थोडा वेळ गेला तर इतकी का चिडतेस आणि तुझ्यावर मी चिडायला पाहिजे! किती उशिरा फोन केलास.. मी किती वेळ तुझ्या फोन ची वाट पाहत होते पण तू फोन नाही केलास.. मी तुला फोन करणार होते पण तुझी उगाच चीड चीड नको म्हणून मी तुला फोन नाही केला.