परवड.

(160)
  • 148.3k
  • 21
  • 77.9k

आश्रमाकडे... अरविंदाला आज पहाटेच जाग आली.तो रात्रभर तसा तळमळतच होता.पहाटे थोडाफार डोळा लागला तेव्हढाच, नाहीतर तो रात्रभर जागाच होता. “श्रीहरी विठ्ठला पांडुरंगा!” नेहमीप्रमाणे पांडुरंगाच्या नावाचा गजर करत त्याने आकाशाकडे पाहून हात जोडले. आजचा दिवस त्याच्यासाठी फार मोठ्या परीक्षेचा होता.आज खूप घाई करावी लागणार होती.आश्रमातल्या लोकांनी सकाळी दहाची वेळ दिलेली होती. वसंताला घेऊन दिलेल्या वेळेत आश्रमात पोहोचा असे आवटे साहेबांनी-आश्रम चालकांनी, चार चार वेळा बजावले होते. अजून स्वत:च सगळ उरकून वसंताला उठवायचं होत, त्याचं उरकून द्यायचं!"बापरे, हात उचलायला हवा...खूपच घाई करावी लागणार..."त्याने भराभर दात घासले,आंघोळ उरकली, देवपूजा उरकून घेतली आणि वसंताकडे वळला.... वसंता अजून शांतपणे झोपला होता.त्याला हलवून उठवायचं खर तर अरविंदाच्या जीवावर आलं

Full Novel

1

परवड भाग 1

आश्रमाकडे... अरविंदाला आज पहाटेच जाग आली.तो रात्रभर तसा तळमळतच होता.पहाटे थोडाफार डोळा लागला तेव्हढाच, नाहीतर तो रात्रभर जागाच होता. विठ्ठला पांडुरंगा!” नेहमीप्रमाणे पांडुरंगाच्या नावाचा गजर करत त्याने आकाशाकडे पाहून हात जोडले. आजचा दिवस त्याच्यासाठी फार मोठ्या परीक्षेचा होता.आज खूप घाई करावी लागणार होती.आश्रमातल्या लोकांनी सकाळी दहाची वेळ दिलेली होती. वसंताला घेऊन दिलेल्या वेळेत आश्रमात पोहोचा असे आवटे साहेबांनी-आश्रम चालकांनी, चार चार वेळा बजावले होते. अजून स्वत:च सगळ उरकून वसंताला उठ ...Read More

2

परवड भाग 2

परवड भाग-२ (अनर्थ) “आजपासून या आंधळ्याला मी बिलकूल सांभाळणार नाही. सोडून या कुठंही! यापुढे याच तोंडही बघायचं नाही! जोपर्यंत हा आंधळा घरात आहे तोपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही!” भरपूर आकांडतांडव करत सुनंदा राहुलला-तिच्या सख्ख्या मुलाला घेवून घर सोडून गेली होती.... त्यावेळी अरविंदा आणि सुनंदा यांच्यात चाललेला वाद बघायला सगळे शेजारी जमले होते;पण एकानेही सुनंदाला समजावून सांगायचा प्रयत्न केला नाही.अरविंदाने तिची खूप मनधरणी करायचा प्रयत्न केला.राहुलची शपथ घातली;पण त्यालाही ती बधली नाही. तिचा वसंताला घरातून घालवून द्यायचा हट्ट कायमच होता.शेवटी तर अरविंदाने सुनंदाच्या पायावर लोळण घेतले,तिची माफी मागितली.काकुळतीला येवून आपल्या अंध लेकरासाठी दयेची भीक मागितली;पण सुनंदावर काडीचाही फरक ...Read More

3

परवड भाग 3

भाग तीन... वसंता आता ठार आंधळा झाला होता.....एका सख्ख्या जुळ्या भावाच्या अविवेकी दुसऱ्या भावाचे जीवन बरबाद होऊ घातले होते! आपल्यामुळे आपल्या भावाच्या- वसंताच्या डोळ्याची झालेली ती अवस्था बघून बिनधास्त असलेल्या गुणवंताला आता थोडफार भान आल होते.आपल्या आक्रस्ताळी वागण्याने आपल्या भावाचे डोळे गेले या जाणीवेने त्यालाही खूप वाईट वाटायला लागलं होत.लोकांच्या नजरेत आता आपण गुन्हेगार आहोत हा विचार सारखा त्याच्या डोक्यात फिरत होता.त्याला आता पश्चाताप झाला होता;पण आता वेळ निघून गेली होती.व्हायचं ते नुकसान भरून येणार नव्हत! अरविंदा अक्षरशः हताश झाला होता तर सीता मनाने पार खचून गेली होती.शेवटी काळ हेच सर्व घावांवरचे जालीम औषध असते! दिवस जात ...Read More

4

परवड भाग 4

भाग 4.... आपली प्रिय पत्नी सीता हे जग सोडून गेल्यानंतर अरविंदावरची जबाबदारी अजुनच वाढली. आईच्या अकाली मृत्यूनंतर वांड गुणवंताही थोडा सुधारल्यासारखा वागत होता. आजकाल स्वत:हून तो घरातली जमतील ती कामे करायला लागला होता.एकामागोमाग एक संकटे येत होती अशा परिस्थितीतही गुणवंतामधे झालेला हा सकारात्मक बदल ही अरविंदासाठी त्यातल्या त्यात समाधानाची बाजू होती. गुणवंता आता शहाण्यासारखा वागायला लागलाय या विचाराने सीतेच्या जाण्याचं दु:ख नाही म्हटलं तरी थोडंस बोथट झालं होत. हल्ली दोघे मिळून सकाळी लवकर उठून घरातली कामे भराभर उरकत होते. वसंताचं सगळ उरकेपर्यंत कामावर जायची वेळ व्हायची.अरविंदा एकदा कामावर गेला की दिवसभर वसंताबरोबर गुणवंताच थांबायचा.त्याला हवं नको ...Read More

5

परवड भाग ५

भाग ५ . आपल्या लग्नानंतरच्या रम्य जीवनाची स्वप्ने गुणवंता दिवसाउजेडीही बघायला लागला.आतापर्यंत आजूबाजूला दिसणाऱ्या मुलींच्याकडे तो पहात नसायचा;पण आता समोर येणारी प्रत्येक मुलगी वा तरुण स्री दिसली की, “आपली होणारी बायको अशी असली तर....?” नकळत त्याच्या कल्पनेतल्या बायकोच्या प्रतिमेशी तो समोरच्या मुलीची तुलना करू लागला,रात्रंदिवस आपल्या वैवाहिक जीवनाबद्दलची दिवास्वप्ने त्याला पडायला लागली. झोपेत त्याला शृंगारिक चावट स्वप्नेही पडायला लागली! दुसऱ्या दिवशी गुणवंताचा उजळलेला चेहरा पाहून अरविंदाला बरे वाटले. त्याने खात्रीदाखल त्याला विचारले...“ काय मग गुणवंता, करायची का पोरी बघायला सुरुवात?” त्याने हळूच होकारार्थी मान हलवली. गुणवंताच्या लग्नासाठीच्या होकाराने अरविंदामधे एक वेगळाच उत्साह संचारला. आता तो आपल्या घरासाठी योग्य अशी सून शोधण्यासाठी ...Read More

6

परवड भाग ६.

भाग ६. वधूवर मंडळाकडून गुणवंताची माहिती व फोटो मिळाल्यावर शालूचे बाबा-संपतराव चांगलेच खूश झाले होते.अगदी त्यांच्या हे स्थळ चालून आलं होत. महत्वाचं म्हणजे हे स्थळ बऱ्यापैकी लांब गावातलं होत, त्यामुळे शालूच्या पूर्वायुष्याबद्दल तिकड कुणाला काही माहिती असायची मुळीच शक्यता नव्हती. आधी तमासगीर असलेल्या आईचा चवचालपणा हिच्यात पुरेपूर उतरला होता.आपल्या पदरात ही सहा वर्षाची पोरगी टाकून तिने हे जग सोडले आणि हा फास कायमचा आपल्या गळ्यात अडकला होता.ही कारटी वयात आली आणि आपल्या बापाला लक्ष द्यायला वेळ नाही याचा तिने चांगलाच फायदा घेतला.तारुण्याचा कैफात तिने काय काय उद्योग केले ते समजले की याचा तिळपापड व्हायचा पण काय करणार? “ गरीबाला का कुठे ...Read More

7

परवड भाग ७.

भाग ७. गुणवंता आणि शालूची जोडी छानच दिसत होती.अगदी एकमेकांसाठीच ते दोघे बनले आहेत असचं सगळेजण दोघांचा नवा संसार आता सुरू झाला होता. आपल्या बायकोसाठी काय करू आणि काय नको असं गुणवंताला झालं होत.त्यांनी एकमेकांशी छान जुळवून घेतल्याचं बघून अरविंदालाही खूप समाधान वाटत होत.सीतेच्या जाण्यानंतर या घरात कोणा बाईमाणसाचा वावर नव्हता.शालूच्या रूपाने या घराला खूप दिवसांनी हक्काची गृहिणी लाभली होती. लग्न पार पडल्यानंतर गुणवंताच्या शेठने या दोघांच्या हातावर महाबळेश्वरची तिकिटे ठेवली आणि शालू आणि गुणवंता महाबळेश्वरला हनिमूनला गेले.चांगले चार दिवस गुणवंता शालूला घेवून महाबळेश्वरात उत्तम हॉटेलात राहिला. दोघांनी मस्त एन्जॉय केलं..... ते आता परत घरी आले ...Read More

8

परवड भाग ८.

भाग ८.रात्रभर अरविंदा जागाच होता.नक्की काय चाललय घरात?सुनबाईला नक्की कसला त्रास आहे?गुणवंताही गप्प गप्प का आहे ?विचार करून करून डोक्याला मुंग्या आल्या.रात्रभर जागरण झाल्यामुळे त्याचं डोकं चांगलंच ठणकायला लागलं होत! “आज या दोघांना सकाळी सकाळीच नक्की काय झालय ते विचारायचं! “अरविंदाने निश्चय केला आणि सकाळी आन्हिके उरकून तो त्या दोघांची वाट पहात बसला.प्रथम सुनबाई आली आणि अरविंदाला चहा दिला. अरविंदाने सुनबाईला हाक मारून समोर बसवलं. गुणवंतालाही बाजूला बसायला सांगितले.दोघेही मान खाली घालून त्याच्या समोर बसले.अत्यंत हळू शांत आवाजात तो बोलायला लागला.....“गुणवंता व सुनबाई मी दोन तीन दिवस बघतोय की तुमच्या दोघांच काहीतरी बिनसलंय.सुनबाईला बर नाही का? काही त्रास आहे का?”त्याने सुनबाईकडे उत्तराच्या अपेक्षेने ...Read More

9

परवड भाग ९

भाग ९ सुटला सुटला म्हणता म्हणता अरविंदाच्या आयुष्यात हा एक नवा गुंता सुरू झाला होता.पुन्हा नवा पेच उभा ठाकला होता.जणू संकटामागून संकटे त्याचा पाठलाग करत होती......तो रात्रंदिवस आपल्या आयुष्याबद्दल विचार करत होता....“या नियतीच्या मनात नक्की काय आहे? मी जीवनात कधी कुणाचे वाईट करणे सोडाच; पण कधी कुणाचे वाईट व्हावे असा विचारही केलेला नाही, असे असताना माझ्याच मागे अशी संकटे का?” आता त्याचे वय पंचावन्नवय वर्षे झाले होते.अगदी मोजकी काही वर्षे सोडली तर कायमच दुर्दैवाचे दशावतार त्याच्या वाट्याला आले होते! मनाची अस्वस्थता त्याला चैन पडू देत नव्हती!ऑफिसातून बाहेर पडल्यावर आज त्याने पांडूरंगाचे मंदिर गाठले.विठ्ठलासमोर साष्टांग नमस्कार घालून त्याने देवाला साकडे घातले.” हे विठ्ठला,या भक्ताची अजून ...Read More

10

परवड भाग १०

भाग १०अरविंदा रात्री घरी आला आणि दररोजची कामे सुरू केली.काम करता करता त्याला आज चहाला गेल्यानंतर देशमानेने केलेली त्याची आठवली....देशमाने अरविंदाला म्हणत होता ....“ एखादी बाईच ठेव ना घरकामाला...!”“ नाहीतर, अरविंदा, तू अजून एक गोष्ट करू शकतोस....दुसर लग्नच करून टाक ना! सगळेच प्रश्न मिटतील तुमचे!” “काय म्हणाला तो?”“दुसर लग्न...?”नकळत देशमानेनी अरविंदाच्या मनात एक वेगळाच विचार पेरला होता! लग्न करायच्या त्या विचाराभोवती त्याचं मन आता नको नको म्हणत असतानासुध्दा पिंगा घालायला लागलं होत. देशमानेनी खरंच एक वेगळा मार्ग अरविंदाला दिला होता... त्याने स्वतःच दुसरं लग्न करायचं! तो आता त्याच विचारांच्या द्वंद्वात फसला होता... त्याचं एक मन म्हणत होते....”खरच काय हरकत आहे?”“लग्न ?” “आता या वयात?” “लोक काय म्हणतील?” “वसंता काय विचार ...Read More

11

परवड भाग ११

भाग ११“आजच देशमानेशी आपल्या लग्नाबद्दल चर्चा करायची.थट्टा करता करता आपल्याला त्यांनी आपल्या सुखी भविष्याचा मार्ग दाखवला आहे!” विचारांच्या तंद्रीतच ऑफिसला पोहोचला.त्याने देशामानेना ताबडतोब भेटायला बोलावले. काल ज्या हॉटेलात त्यांनी चहा घेतला होता तेथेच देशमाने अरविंदाला भेटायला आले.अरविंदा आज भलताच खूष होता ....खूप दिवसानंतर आज अरविंदांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होते.अरविंदाचा तो खुललेला चेहरा बघून देशमानेना खूप बरं वाटलं." काय अरविंदा काय विशेष? आज आनंदात दिसताय? "देशमाने अरविंदाकडे बघत मस्करीच्या मूडमध्ये बोलले..." काही नाही असंच!"" अरविंदा मी आज ओळखतो का तुला? तुझा चेहरा वाचायची मला एवढी सवय झालीय की न बोलताच तुझे मन मला वाचता येते! नक्कीच काहीतरी छान घडलं आहे किंवा ...Read More

12

परवड भाग १२

भाग १२.सुनंदा आपली जीवनकथा अरविंदाला सांगत होती......“माझ्या मालकाची डेड बॉडी समोर आली आणि मला भोवळच आली.आता पुढे काय? हा प्रश्न समोर आ वासून उभा होता. कंपनीतून काही पैसे मिळाले होते;पण सहा महिन्यातच ते संपले.आता स्वत: कमावल्याशिवाय पोटाला खायला मिळणार नव्हते. हातपाय गाळून उपयोग नव्हता.राहुलच्या भविष्याचा विचार करून कंबर कसली व् चार घरी मोलमजूरीची कामे धरली.मुलाचे शिक्षण चालू ठेवले. आधीच्या घराचे भाड़े परवडत नव्हते त्यामुळे झोपडपट्टीत कमी भाड्याची खोली घेतली.परिस्थिती माणसाला घडवते असे म्हणतात ते खरे आहे!;पण एका तरुण विधवेकडे पहाण्याचा लोकांचा दृष्टीकोन काय असतो याचा समाजात वागताना घडोघडी अनुभव यायला लागला. कुंकवाच्या धन्याशिवाय जगत असलेली बाई म्हणजे समाजातल्या गिधाडांना सहज उपलब्ध असलेले ...Read More

13

परवड भाग १३

भाग १३ सुनंदा आणि अरविंदाचा नवा संसार सुखासमाधानाने चालू झाला होता.संपूर्ण विचारांती दोघांनी लग्नाचा निर्णय होता.अशा लग्नांमध्ये ज्या तडजोडी कराव्या लागणार होत्या त्याची दोघांनीही आधीच मानसिक तयारी केलेली असल्यामुळे दोघांचेही छान टयूनिंग जमले होते.सुखाचा नवा अध्याय सुरू झालेला होता. दिवस पुढे पुढे जात होते.अरविंदा आता पूर्वीपेक्षा खूपच निवांत झाला होता.महिन्याच्या महिन्याला येणारी पगाराची रक्कम तो सुनंदाच्या हवाली करू लागला.घरातले सर्व दैनंदिन व्यवहार आता सुनंदाच्या हवाली केलेले होते आणि ती आपल्या नव्या संसारात मनापासून लक्ष देत होती. सीतेची जागा घेवून घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या घेणारी कामसू बायको आपल्याला मिळाली याचे अरविंदाला मनापासून समाधान होते.समाधानी आनंदी जीवनामुळे अरविंदाच्या वागण्याबोलण्यात एक वेगळाच ...Read More

14

परवड भाग १४

भाग १४ आपला पद्धतशीरपणे छळ होतो आहे हे लक्षात येताच वसंताच्या खूप दिवस साठवलेल्या रागाचा प्रचंड झाला! त्याचे कारणही तसेच होते,सलग दोन दिवस त्याला खायला काहीच मिळाले नव्हते! त्याने सुनंदाचा कानोसा घेत दोन तीन वेळा तिला खायला मागितले पण तिने सरळ दुर्लक्ष केले.आपल्याच घरात आपल्याला साधे जेवणही मिळू नये म्हणजे काय? अंदाज घेत तो स्वयंपाकघरात आला.अनेक दिवस त्याला हाताने काही घेऊन खायची वेळच आली नव्हती.पूर्वीच्या अंदाजाने जेथे स्वयंपाक करून ठेवलेला असायचा तेथे त्याने चाचपडत राहिला;पण त्याच्या हाताला काहीच लागले नाही.घरात सुनंदाने बरेच बदल केले होते,ते वसंताला माहीत असणे शक्यच नव्हते.अचानक तो भांडी ठेवण्याच्या फडताळावर जोरात आदळला.फडताळातली भांडी आवाज करून ...Read More

15

परवड भाग १५

भाग १५ अशी नाटके करण्यात मुळातच पटाईत असलेल्या सुनंदाने आपल्या आवाजाची पट्टी अशी काही वाढवली होती वसंता रडणे थांबवून एकदम चिडीचूप बसला. त्याला आता वाटायला लागले की आपलीच चूक झालीये ! तो निपचित पडून विचार करू लागला.... तसंही नियतीने आपल्याला जन्माला घालूनच खूप मोठी चूक केल्याची भावना त्याच्या मनात वाढू लागलेली होती."आपण या जन्मात तरी कुणाचे काही वाईट केलेले नाही;पण नक्कीच आपल्या पूर्वजन्मात आपल्या हातून काही तरी महापातक घडलेलं असणार आहे त्याचे फळ म्हणूनच आपल्या आयुष्यात एकापाठोपाठ एक अशा विचित्र गोष्टी घडत आहेत.माझ्या बरोबर माझ्या वडिलांनाही खूप काही भोगावे लागते आहे.त्यांनी नेहमी माझ्या हितासाठीच निर्णय घेतले;पण नियतीने टाकलेला ...Read More

16

परवड भाग १६ - अंतिम भाग

परवड भाग १६ त्या दिवशी अरविंदा सुनंदाच्या जुन्या झोपडीकड़े गेला,त्याचा अंदाज बरोबर ठरला. तिच्या आधीच्या झोपडीत येऊन राहिली होती.अरविंदाला बघताच सुनंदाने तोंड फिरवले. तिच्या त्या वागण्याकडे दुर्लक्ष करून तो तिची समजूत काढू लागला, तिची विनवणी केली,तिला अक्षरश: हात जोडले;पण सुनंदा काहीएक ऐकायला तयार नव्हती! तिचा एकच हेका चालू होता...“वसंता त्या घरात असेपर्यंत मी त्या घरात पाय ठेवणार नाही!”अरविंदा हताश होऊन घरी परतला. लग्न ठरवताना “आंधळ्या वसंताचे पालनपोषण मी स्वत:च्या मुलासारखे करीन.” असे सुनंदाने अरविंदाला वचन दिले होते;पण तो दिलेला शब्द तिने आता मोडला होता! अरविंदाचे मित्र-देशमाने लग्न ठरवताना बरोबर होते किंबहुना त्या दोघांचा हा नवा डाव सुरू करण्यात देशामानेंनी महत्वाची ...Read More