शं नो वरुणः (समुद्र योद्धा)

(1)
  • 5.4k
  • 0
  • 2.4k

दाभोळी नेव्ही पोर्ट, गोवा आज गोवा मधील समुद्रात नौसेनाने लाल बावटा लावला होता. लाल बावटा लागला म्हणजे समुद्रातील मासेमारी, वॉटर गेम्स ,पर्यटन या सगळ्यांना बंदी केली जाते. लाल बावटा ज्या दिवशी असतो, तेव्हा इंडियन कोस्टल गार्ड आणि स्थानिक पोलीस यांची गस्त समुद्रात चालू असते. इतर सर्व जहाजे समुद्राच्या किनारपट्टीवर उभे केले जातात. जो पर्यंत स्थानिक पोलीस त्यांना पुढील आदेश देत नाही? तो पर्यंत सगळ बंद असते. हा लाल बावटा गोवा मध्ये लावला गेला होता. कारण नौसेनाची एक मोठी युद्ध नौका आपल्या सैनिकांना घेऊन आय एन एस हंसा जवळच्या समुद्रात येणार होती. त्या युद्ध नौकातील गोवा आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर, कोकण या जवळच्या ठिकाणचे नौसैनिक सुट्टी घेऊन काही दिवसांसाठी त्यांच्या घरी येणार होते. तर त्यांच्या बदल्यात इतर सैनिक त्या युद्ध नौकेवर आपली ड्युटी करण्यासाठी जाणार होते. त्यासाठी ते या पोर्टवर आपल्या फॅमिलीला घेऊन आले होते. पुन्हा किती तरी महिने त्यांना आपल्या परिवाराला भेटता येणार नव्हते. सुरक्षितता म्हणून गोवा पोलीस तिथं पोर्ट वर हजर होते. या सगळ्यासाठी जवळच्या किनारपट्टीवर लाल बावटा लावण्यात आला होता.

New Episodes : : Every Tuesday, Thursday & Saturday

1

शं नो वरुणः (समुद्र योद्धा) - भाग १

कथा आहे समुद्र योद्धाची. त्याच्या संघर्षाची. त्याच्या पराक्रमाची. कथा आहे खऱ्या हिरोंची.चला तर जाऊ आपल्या कथेकडे.___________भाग १दाभोळी नेव्ही पोर्ट, गोवा मधील समुद्रात नौसेनाने लाल बावटा लावला होता. लाल बावटा लागला म्हणजे समुद्रातील मासेमारी, वॉटर गेम्स ,पर्यटन या सगळ्यांना बंदी केली जाते. लाल बावटा ज्या दिवशी असतो, तेव्हा इंडियन कोस्टल गार्ड आणि स्थानिक पोलीस यांची गस्त समुद्रात चालू असते. इतर सर्व जहाजे समुद्राच्या किनारपट्टीवर उभे केले जातात. जो पर्यंत स्थानिक पोलीस त्यांना पुढील आदेश देत नाही? तो पर्यंत सगळ बंद असते. हा लाल बावटा गोवा मध्ये लावला गेला होता. कारण नौसेनाची एक मोठी युद्ध नौका आपल्या सैनिकांना घेऊन आयएन एस ...Read More

2

शं नो वरुणः (समुद्र योद्धा) - भाग २

भाग २."मी तर सांगितले आहे सगळ्यांना माझा होणारा नवरा इंडियन नेव्ही मध्ये आहे ते. आता तू बघ तुला कधी जमत? माझ्या आई बाबांनी तर परमिशन दिली आहे. पण तुझ्यामुळे सगळ रखडलं आहे.",ती कॉलवर बोलत असते. आताच समुद्राच्या किनाऱ्यावर आलेला तो रेंज मिळाली म्हणून तिला कॉल करतो. पण आता मात्र तिचं बोलणे ऐकून तो "नाही" मध्ये मान हलवतो. "ओके. मी सध्या बिझी आहे. इंडियन नेव्ही मध्ये मी आहे. हे जरी तू सांगत असली तरीही काम काय कमी नसतात. अजून काम संपली नाही माझी!",तो अगदी शांतपणे म्हणाला. "सॉरी सॉरी. मी जास्तच रूडली बोलली राजीव त्याबद्दल. मला तुझी कमी जाणवली. त्यामुळे तो ...Read More