Sha no Varun - 2 books and stories free download online pdf in Marathi

शं नो वरुणः (समुद्र योद्धा) - भाग २

भाग २.


"मी तर सांगितले आहे सगळ्यांना माझा होणारा नवरा इंडियन नेव्ही मध्ये आहे ते. आता तू बघ तुला कधी यायला जमत? माझ्या आई बाबांनी तर परमिशन दिली आहे. पण तुझ्यामुळे सगळ रखडलं आहे.",ती कॉलवर बोलत असते.आताच समुद्राच्या किनाऱ्यावर आलेला तो रेंज मिळाली म्हणून तिला कॉल करतो. पण आता मात्र तिचं बोलणे ऐकून तो "नाही" मध्ये मान हलवतो.


"ओके. मी सध्या बिझी आहे. इंडियन नेव्ही मध्ये मी आहे. हे जरी तू सांगत असली तरीही काम काय कमी नसतात. अजून काम संपली नाही माझी!",तो अगदी शांतपणे म्हणाला."सॉरी सॉरी. मी जास्तच रूडली बोलली राजीव त्याबद्दल. मला तुझी कमी जाणवली. त्यामुळे तो राग तुझ्यावर निघाला.",ती आता हळू आवाजात म्हणाली.


"इट्स ओके डिअर. बर तुझे आई बाबा कसे आहेत? त्यांना सांग काही घाई नका करू! मी लवकर येईन परत. सिया आय लव्ह यू",राजीव हळू आवाजात म्हणाला.


"ते बरे आहेत. मला सांग ना तुझं नेमके काय काम असते तिथे? तू जास्त दिवस समुद्रात असतो आणि असा फोन देखील तीन दोन महिन्यातून एकदा करतो ना? त्यामुळे सांग ना?",सिया उत्सुकता दाखवत म्हणाली.


"तू कॉम्प्युटर साईडला काम करत आहेस ना? त्यावर गुगल असत. तिथं जाऊन शोध.",राजीव हसून म्हणाला. सध्या तो आपल्या टीम मेट पासून दूर उभा राहिला होता. तसे, बरेच जण दूर राहून आपल्या लोकांना कॉल करून त्यांच्याशी संवाद साधत होते. पुढे कधी त्यांच्यासोबत बोलणे होईल? हे त्यांना माहीत नव्हते."राजीवऽऽऽ",ती तोंड बारीक करून म्हणाली. तिचा चेहरा आठवून तो गालातच हसत असतो."ओके. मी एक एसएसआर म्हणून नेव्ही मध्ये जॉब करत आहे. एसएसआर म्हणजे सिनियर सेकंडरी रिक्रूट. नाविक (सेलर) मध्ये हे मोठे पद मानले जाते. सगळ्यात महत्त्वाचे आणि जबाबदारी वाले पद असते. आमची काम टेक्निक वाली असतात. सगळ्या प्रकारची कामं आमच्यावर सोपवली जातात. युद्ध नौका, हेव्हियर्स, एअरक्राफ्ट मेंटेनन्स , पाणबुडी , मिसायल या सगळ्यामध्ये आम्ही काम करतो. मी कधी दोन अडीच महिन्यासाठी मिशनसाठी म्हणून पाणबुडीमध्ये असतो. तर कधी युद्ध नौका वर असतो.",राजीव तिला समजावत म्हणाला.


"तुमच्या कडे कसे क्राफ्ट असतात? ते तर वायुसेनाकडे असले पाहिजे ना? युद्ध नौका म्हणजे काय असते? पाणबुडी तर छोटी असते आणि त्यात दोन अडीच महिने राहणे? साधारण माणसांसाठी शक्य नसत!",सिया सिया आता गहन विचार करत म्हणाली. मात्र, तिचे बोलणे ऐकून तो कपाळ खाजवतो. आता तिला कशाप्रकारे समजवावे? हे सध्या त्याला कळत नाही."राजीव, आता सांगा ना तुम्ही! एकतर या बद्दल काहीच माहीत नसत. त्यात तुम्ही एवढ सारे सांगितल की, माझ्या मेंदूच्या बाहेर जात आहे",सिया त्याचा आवाज येत नाही म्हणून पुन्हा विचारते.


"सिया, जे शक्य वाटत नाही सामान्य लोकांना ते शक्य करते इंडियन नेव्ही. युद्ध नौका मध्ये प्रकार भरपूर असतात. काही नौका असतात त्या व्यापार यासाठी असतात. इंडियन नेव्हीचे राशन, संपत्ती काही नौकांवर असते! संपत्ती म्हणजे पैसे नाही हां. संपत्ती म्हणजे गोळा, बारुद, हत्यार अस असत. तर काही युद्ध नौकांवर एअर क्राफ्ट असतात. त्यांच्यासाठी लागणारी धावपट्टी देखील मोठ्या अश्या नौका वर तयार केलेली असते. क्षणात ते एअर क्राफ्ट हवेत उडू शकतात. पाणबुडी हा प्रकार युद्ध नौका मध्ये येतो. साधारण या पाणबुडी मध्ये ७० ते ८० नौसैनिक राहू शकतात. पाणबुडी मध्ये गोळा, बारुद , मिसाईल यासाठी एक रूम असते. राशन आणि जेवण बनवण्यासाठी एक असते आणि नौसैनिक साठी देखील व्यवस्था केलेली असते झोपायला.",राजीव तिला समजावत म्हणाला.


"अरे, बापरे! एवढे सारे असत? तुम्हाला तर बर आहे मग. समुद्रात विहार.", सिया हसून म्हणाली.


"सिरीयसली विहार? नाही गं बाई! अस काही नसते. ३०० ते ४०० फूट समुद्राच्या तळाशी राहणे. ते देखील सूर्य प्रकाशाशिवाय? सोप्प नसत. आमच्या काही सैनिकांना कधी कधी आजार देखील होतात. जेवण बिना फोडणीच थोड थोड खावे लागते. कारण फोडणीमुळे पाणबुडीला काही होऊ नये यासाठी! खाली जरी आम्ही समुद्रात असलो? तरीही पाणबुडी मध्ये असलेल्या मशीन, बॅटरी मुळे गरमी आतमध्ये जाणवते. त्यामुळे कधी कधी तर आमच्या सैनिकांना मिसाईल, हत्यार असलेल्या ठिकाणी झोपावे लागते. कारण तिथं थंडावा असतो. पण ते खूप रिस्की असते. आता तूच विचार कर!",राजीव हळू आवाजात म्हणाला. पण त्याचं बोलणे ऐकून आता ती अस्वस्थ होते."तुम्ही.. तुम्ही... पण झोपता का कधी तिथे?", सिया अडखळत विचारते.


"हो!",राजीव एक सुस्कारा सोडत म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून ती शांत होते.


"भीती वाटली सिया? हेच आयुष्य आहे आमचे. बघ अजूनही विचार कर.",राजीव काहीसा शांत होऊन बोलतो.


"विचार? कसला बर? मला नाही वाटत भीती. मला फक्त तुम्ही हवे आहात! किती ही वर्ष वाट पाहावी लागली? तरीही मी पाहणार आहे!", सिया काहीशी ओरडुन म्हणाली. तिच्या या बोलण्यावर तो समाधानी होतो.


"ओके बाबा. या वर्षी नक्कीच येईन हां! तुला कायमच मग माझ्यासोबत ठेवेन. कधी गोवा,कधी विशाखापट्टणम, तर कधी ओडिसा.",राजीव हसून म्हणाला.


"तुम्ही पण ना! मी नाही येणार. तुम्ही जाणार बाहेर मग मी काय करू ना? तिथं येऊन?",सिया नाराज होत म्हणाली.


"ओह सिया ,तू खरचं इम्पॉसिबल आहेस! बट मी काय करणार ना? हे तुला कळेल लवकर. बट आता कुठे जॉब करते तू?",राजीव विषय बदलत विचारतो.


"मी दिल्लीमध्ये सायबर सिक्युरीटी ऑफिसमध्ये कामाला लागली आहे. माझ्यावर इथे बरेच पंजाबी, दिल्लीवाले मुलं लाईन मारत असतात. जस कधी मुलगी पाहिली नाही, असे पाहत असतात. कधी कधी वाटत ना? तोंड फोडावे!",सिया काहीशी तोंड वाकड करत म्हणाली.


"मग फोड ना? दिल्ली, पंजाबी का नको?ते चांगले हँडसम असतात",राजीव तिला डिवचत म्हणाला.


"काय करणार ना? या डोळ्यांना तर आस एका माणसाची लागली असल्याने, त्याच्याशिवाय इतर कोणाकडेच पाहायला जात नाही ते. कसा ही असला तरी माझी प्रॉपर्टी आहे स्वतःची ती! त्यामुळे मी तर त्यालाच दिवस रात्र स्वप्नांत पाहत असते. भेटला तर पाठवून द्या लवकर! खूप मिस करत आहे मी.",सिया शेवटची ओळ भरल्या डोळ्यांनी बोलते. त्याला कळू नये! यामुळे ती लगेच फोन कट करते. पण इकडे मात्र, त्याचे ही डोळे यावेळी भरले होते.


सिया एक अशी होती. जिला खूप त्याने वाट पाहायला लावून देखील? तिने आशा मात्र सोडली नव्हती. एक एक दिवस ती मोजत बसत असायची. पण तिचे दिवस मोजून काही संपत नव्हते. अचानक त्याला कुठे ना कुठे तरी बोलावले जात असायचे. त्यामुळे सुट्टी कॅन्सल होत असायच्या त्याच्या.


"सिया, यावेळी नक्कीच येईन!",राजीव स्वतःशी बोलून डोळे पुसून पुन्हा आपल्या कामाला निघून जातो.

***********

स्थळ:- गोवा

प्रलय आल्याने पृथाने आज रात्री त्याच्या आवडीच जेवण बनवले होते. सर्वजण बऱ्या पैकी हसून खेळून जेवण जेवतात आणि आपल्या आपल्या रूम मध्ये झोपायला निघून जातात. पृथा आपल आवरून प्रलयच्या शेजारी जाऊन पडते. तो झोपलेला आहे. असे समजून ती हळूच त्याच्या गालावर ओठ टेकवते. कितीतरी महिन्यांनी ती त्याला पाहत होती. यामुळे ती त्याच्या चेहऱ्यावर स्वतःचे ओठ फिरवत असते. तिच्या अश्या वागण्याने तो पटकन डोळे उघडतो आणि तिला पाहतो. त्याला असे अचानक जाग पाहून ती गोंधळून बाजूला जात असते की, तेवढ्यात तो हसूनच तिच्याभोवती हातांचा विळखा घालतो.


"नो नो जान. आता नाही पळू शकत तू.", प्रलय हसून म्हणाला.


"प्रलय सोडा मला. मी नाराज आहे ना तुमच्यावर.", पृथा खोटं खोटं राग दाखवत म्हणाली.


"एवढ सगळ करायला शिकली तू? मला कळल देखील नाही. थॅन्क्स पृथा.", प्रलय तिला बेडवर एका साईडला ठेवत तिच्या भोवती हातांचा विळखा घालत म्हणाला."तुमच्या मुळे शिकली. तुम्ही मला बोलला ना? ते मनाला लागले होते माझ्या.", पृथा आता बारीक आवाजात म्हणाली.


"ते लागण्यासाठीच बोललो होतो. नाहीतर आता पण मला फेल वाली पृथा पाहायला मिळाली असती. कधी कधी लाडीगोडी अजिबात काम करत नाही. तिथे कडक बोलणे काम करत असते.", प्रलय तिच्या मानेवर ओठ टेकवत म्हणाला. त्याच्या अश्या कृतीने ती डोळे बंद करते.


"प्रलय प्लीज!"पृथा हळू आवाजात पुटपुटत असते. तसा तो हसून तिला स्वतःकडे वळवतो आणि एकदम घट्ट पकडुन मिठीत घेतो. त्याच्या अश्या घेण्याने ती अंग चोरते.

"कधीच वाटल नव्हत मला. तू आणि मी कधी एकत्रित येऊ. पण आज ना तुझं कौतुक ऐकून तुला खूप प्रेम करावे वाटत आहे मला. तू खूप वेगळी आहेस आणि अशीच रहा! कस सगळ सांभाळले असेल? याचा अंदाज मी नाही लावू शकत. पण तू खूप ग्रेट आहेस!", प्रलय तिला मिठीत घेऊन म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून ती देखील आपले नाजूक हात त्याच्या पाठीवर ठेवते.


"तुम्ही नसता? तर शक्य नव्हते ते? त्यामुळे तुम्हाला पण थँक्यू. तुम्ही मला माझ्यातील स्वतःची ओळख करून दिली आहे. मी तिला ओळखून इथे पोहचली आहे. आता ना काहीही झालं तरीही मी घाबरत नाही. मला आता जॉब देखील चांगला लागला आहे. हां पैसे कमी असतात. पण इट्स ओके ना! कुठून तरी सुरुवात करायची होती. म्हणून छोट्याश्या शाळेतून करत आहे.", पृथा हळूहळू त्याला सांगत असते. तो मात्र तिला मिठीत ठेवून तिचं सगळ ऐकत असतो.


"पैश्याच काही नाही वाटत मला. तू स्वतः काहीतरी करत आहेस ना? हे पाहून बर वाटल बघ. पैसा काय? तसाही आहे आपल्याकडे. हे तुझे पैसे जे असतील ना? ते तुझ्या अकाऊंट मध्ये तसेच ठेवून टाक थोडे थोडे.", प्रलय तिला बाजूला करून म्हणाला.


"का बरे?",ती विचारते.


"कळेल लवकर तुला.", प्रलय अस बोलून तिच्या डोक्यावर ओठ टेकवून तिला जवळ घेतो. ती देखील आता जास्त त्याला काही न विचारता त्याच्या कुशीत शिरून झोपून जाते.


क्रमशः
___________________