पेरणी नावाची माझी ही पुस्तक वाचकांपुढे ठेवतांना आनंद होत आहे. तशी ही पुस्तक लिहायला फार कस लागला व बरेच दिवसही लागले. पेरणी...... पेरणी या शब्दावरुन कथानक सहज लक्षात येतं. शेतात जे धान्य रोवलं जातं, त्याला पेरणी म्हटलं जातं. असा सोपा अर्थ. परंतु या पुस्तकात पेरणी ता शब्दाचा एक गहण अर्थ आहे. तो वाचतांना कळतो. श्यामल या पुस्तकातील कथानकाची नायिका. तिची दोन मुलं. दिपक व राज. नेमकं काय होणार? उलगडा नाहीच. त्यासाठी वाचावं लागेल संपुर्ण कथानक. थोडाफार बोध आहे. जो थोडासा कंटाळवाणा वाटतो. परंतु वाचला की त्या गोष्टीवर आपल्या मनात विचारही येतात. याचाच अर्थ परिवर्तनवादी विचारांना कथानकाची जोड देवून ही भावात्मक कादंबरी साकार झालेली आहे. अशा प्रकारचंच माझ्या बऱ्याच कादंबरीचं लेखन असून त्यातून कोणतातरी बोध नक्कीच होत असतो. या कादंबरीत कुठे कुठे अश्रूही येतील तर कुठं भयही वाटेल. शेती, शेतकरी आत्महत्या, भूत, प्रेत, अंधश्रद्धा, धर्म, बेरोजगारी. असे सर्वच विषय यात गुंडाळले आहेत. काही वाक्याची पुनरावृत्ती आहे. ते गरजेची वाटली. सुरुवात व शेवट वाचण्यालायक. सुशिक्षीत असलेली श्यामल, जेव्हा पती मरण पावतो. तेव्हा आयुष्यात काबाडकष्ट करावे लागतात. परंतु त्या काबाडकष्टाचं चीज होतंय का? हा सुद्धा भाग यात आहे. शिवाय टेट परिक्षा चवीला आहेच. टेट परिक्षा ही शिक्षकांसाठी घातकच. कारण त्यातून नोकरी जावू शकते. त्याच लेटेस्ट विषयाला धरुन टि ई टी चा परिणाम सादर केला आहे, या कादंबरी रुपानं. आपण नक्कीच वाचा व प्रतिक्रिया कळवा. ही विनंती.

1

पेरणी - भाग 1

पेरणी या पुस्तकाविषयी पेरणी नावाची माझी ही पुस्तक वाचकांपुढे ठेवतांना आनंद होत आहे. तशी ही पुस्तक फार कस लागला व बरेच दिवसही लागले. पेरणी...... पेरणी या शब्दावरुन कथानक सहज लक्षात येतं. शेतात जे धान्य रोवलं जातं, त्याला पेरणी म्हटलं जातं. असा सोपा अर्थ. परंतु या पुस्तकात पेरणी ता शब्दाचा एक गहण अर्थ आहे. तो वाचतांना कळतो. श्यामल या पुस्तकातील कथानकाची नायिका. तिची दोन मुलं. दिपक व राज. नेमकं काय होणार? उलगडा नाहीच. त्यासाठी वाचावं लागेल संपुर्ण कथानक. थोडाफार बोध आहे. जो थोडासा कंटाळवाणा वाटतो. परंतु वाचला की त्या गोष्टीवर ...Read More