पेरणी या पुस्तकाविषयी
पेरणी नावाची माझी ही पुस्तक वाचकांपुढे ठेवतांना आनंद होत आहे. तशी ही पुस्तक लिहायला फार कस लागला व बरेच दिवसही लागले.
पेरणी...... पेरणी या शब्दावरुन कथानक सहज लक्षात येतं. शेतात जे धान्य रोवलं जातं, त्याला पेरणी म्हटलं जातं. असा सोपा अर्थ. परंतु या पुस्तकात पेरणी ता शब्दाचा एक गहण अर्थ आहे. तो वाचतांना कळतो.
श्यामल या पुस्तकातील कथानकाची नायिका. तिची दोन मुलं. दिपक व राज. नेमकं काय होणार? उलगडा नाहीच. त्यासाठी वाचावं लागेल संपुर्ण कथानक. थोडाफार बोध आहे. जो थोडासा कंटाळवाणा वाटतो. परंतु वाचला की त्या गोष्टीवर आपल्या मनात विचारही येतात. याचाच अर्थ परिवर्तनवादी विचारांना कथानकाची जोड देवून ही भावात्मक कादंबरी साकार झालेली आहे. अशा प्रकारचंच माझ्या बऱ्याच कादंबरीचं लेखन असून त्यातून कोणतातरी बोध नक्कीच होत असतो. या कादंबरीत कुठे कुठे अश्रूही येतील तर कुठं भयही वाटेल. शेती, शेतकरी आत्महत्या, भूत, प्रेत, अंधश्रद्धा, धर्म, बेरोजगारी. असे सर्वच विषय यात गुंडाळले आहेत. काही वाक्याची पुनरावृत्ती आहे. ते गरजेची वाटली. सुरुवात व शेवट वाचण्यालायक. सुशिक्षीत असलेली श्यामल, जेव्हा पती मरण पावतो. तेव्हा आयुष्यात काबाडकष्ट करावे लागतात. परंतु त्या काबाडकष्टाचं चीज होतंय का? हा सुद्धा भाग यात आहे. शिवाय टेट परिक्षा चवीला आहेच.
टेट परिक्षा ही शिक्षकांसाठी घातकच. कारण त्यातून नोकरी जावू शकते. त्याच लेटेस्ट विषयाला धरुन टि ई टी चा परिणाम सादर केला आहे, या कादंबरी रुपानं. आपण नक्कीच वाचा व प्रतिक्रिया कळवा. ही विनंती.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
**************************१******************
पेरणी (कादंबरी)
अंकुश शिंगाडे
शेती...... शेताला पाण्याची गरज होती पीक वाढवतांना. त्यातच त्याच शेतातील पिकांना जपतांना काळजी घ्यावी लागायची. कारण शेतात रानडुक्कर, रानरेडे, रानगवे यायचे. ते शेताचं नुकसान करायचे. असं नुकसान की जे नुकसान भरुन निघायचं नाही. कधी हंगामात धान्य झालंच तर ते चोरीलाही जायचं. तेही पाहावं लागायचं. यासाठी शेतात जागलीला जाण्याची पद्धती रुढ झाली होती. प्रत्येक घरचे शेतकरी जागलीला शेतात जात असत. ज्यातून शेतातील धान्य चोरांना चोरुन नेता येत नसे.
काही दिवस बरे गेले. जेव्हापर्यंत त्या गावात देवबाबा नावाचा व्यक्ती राहायला आला नाही. देवबाबा नावाचा व्यक्ती हा तंत्र मंत्र करणारा होता. तो लोकांचं कधी बरंवाईट करत असे. शिवाय लोकांना भुतबाधा झाली आहे. अशाही प्रकारची अंधश्रद्धा पसरवीत असे. अशातच रमाकांत हार्टअटॅकनं मरण पावला. ज्याच्यावर कोणीतरी करणी केली असं त्यानं जाहिरपणे सांगीतलं होतं.
देवबाबा जसा तंत्रविद्येत पारंगत होता. तसाच तो चोरही होता. तो शेतातील धान्य चोरत असे व आपल्या घरात नेवून ठेवत असे. तसं धान्य त्याला चोरता यावं म्हणून त्यानं गावाला भुतानं छळलं आहे. अशी अंधश्रद्धा पसरवली होती. ज्यातून गाव तणावात आलं होतं. आता गावातील लोकं भुताच्या धाकानं जागलीला जात नव्हते. ज्यातून देवबाबाची चोरी साधत होती. तो धान्य चोरत होता व ते धान्य भूतच गायब करतो. असंही सांगत होता. तसं गाव म्हटलं तर त्या गावात जास्त शिकलेले लोकं नव्हतेच. तेही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असत.
गावात आता आत्महत्या होत चालल्या होत्या. शेत पिकत नसल्यानं गावातील लोकं आत्महत्या करीत असत. त्याचाच फायदा देवबाबाही घेत होताच. तोही लोकांना सांगत असे की ज्यांनी आत्महत्या केल्या. ती मंडळी अकाली मरण पावली. त्यांच्या इच्छा पुर्ण झाल्या नाहीत. तीच मंडळी भूत बनून लोकांना छळतात. त्यातच कधी एखाद्यावेळेस एखाद्या रात्री गावातून शेताच्या रस्त्यानं नकळत कोणी गेल्यास त्याच्याच पाळतीवर राहून देवबाबा स्वतः भुताचा वेष धारण करुन त्याला घाबरवीत असे. ज्यातून भुताबाबत गावात अंधश्रद्धा व भीती निर्माण झाली होती.
रमाकांत त्या एका शेतकऱ्याचं नाव होतं. रमाकांतलाही अंधश्रद्धेनं छळलं होतं नव्हे तर त्याच्यात अंधश्रद्धा कुटकूट भरली होती. त्याचा विवाह शहरातील एका सुशिक्षीत मुलीसोबत झाला होता. श्यामल तिचं नाव होतं. ती शिकली होती व शिकता शिकता तिचं वय वाढल्यानं तिचा विवाह जुळत नव्हता. म्हणूनच तिला विवाह ग्रामीण भागात करावा लागला होता.
रमाकांतच्या मनात जशी अंधश्रद्धा भरली होती. तशीच अंधश्रद्धा श्यामल शिकली असल्यानं तिच्या मनात भरली नव्हती. ती भूतबाधा, अंधश्रद्धा मानत नव्हती.
रमाकांत मरण पावला होता. तसा तो मरण पावताच त्याच्या मरणानंतर घराची व शेताची सर्व जबाबदारी तिच्यावर आली होती. अशातच अंधश्रद्धाळू नसलेली श्यामल शेती करीत असतांना शेती कशी करावी? हे तंत्र आत्मसात करण्यासाठी काही अनैतिक कल्पना आत्मसात करु लागली होती. ज्याला अंधश्रद्धाच म्हणत असत वा अंधश्रद्धा मानत असत. ज्यात कावळा आपल्या तोंडानं फांदी पकडणे, घुबडांचे ओरडणे, मांजर वा कुत्रा आडवा जाणे, रात्रीला कुत्रा ओरडणे, पक्ष्यांचे झाडावर कमी अधिक उंचीवर घरटे बांधणे. या गोष्टी येत होत्या. ज्या अंधश्रद्धा पसरविणाऱ्या गोष्टी असल्या तरी त्याचा वापर श्यामल पावसाचा अंदाज बांधण्यासाठी करीत असे. कारण आजपर्यंत तिला शेती करावी लागली नव्हती पती जीवंत असतांना. परंतु आता तिच्यावर शेतीची जबाबदारी आली होती. ज्यातून ती अंधश्रद्धा पाळू लागली होती.
पावसाळा नुकताच सुरु झाला होता. नुकतीच सर येवून गेली होती. बाहेरचं वातावरण थंड झालं होतं. तरीही अंगात उष्मा जाणवतच होता. पाऊस जरी आला होता तरीही त्यानंतर निघालेला सुर्य आग ओकतच होता.
आतापर्यंत सुर्यानं आगच ओकली होती. यावर्षी रेकॉर्ड ब्रेक केला होता सुर्यानं. त्यातच एवढं ऊन्हं तापलं होतं की जमीनीला भेगा पडल्या होत्या.
रोहिणी कोरड्याच गेल्या होत्या. मृगही निघून गेला होता. तोही कोरडाच गेला होता. त्यातच आता आद्रा लागल्या होत्या. शेतकरी आकाशाकडं डोळे वटारून वाट पाहात होते पावसाची. एवढ्यात एक कावळा तोंडात फांदी धरुन आला. त्यानं तोंडात फांदी धरताच तोच संकेत दिसला श्यामलला. तशी स्वगत बोलली. यावर्षी पावसाचा जोर सुरुवातीला नसेलच.
ते श्यामलचं म्हणणं. तोच तिच्याच शेजारी बसलेला तिचा एक बाळबोध मुलगा म्हणाला,
"आई, यावर्षी पाऊस सुरुवातीला नसेल, याचा अर्थ काय?"
श्यामलचा तो मुलगा. त्याचं नाव दिपक होतं. ज्याला ती अंधश्रद्धाच वाटली आपल्या आईची. कारण अंधश्रद्धा म्हणजे काय असते. तो ते शाळेत शिकला होता. अंधश्रद्धा नसतेच असं त्याला शाळेत बाईंनी शिकवलं होतं.
दिपकचं ते म्हणणं ऐकून त्याची आई म्हणाली,
"बाळ, जर कावळ्यानं एखादी काडी मधात धरली असेल पावसाळ्याच्या तोंडावर तर पावसाळा मधात सुरु होतो व मधातच संपतो. त्यानं जर तीच काडी सुरुवातीला धरली असेल तर पावसाचा जोर सुरुवातीलाच असतो."
"आणि शेवटी जर पकडली असेल तर शेवटी का?"
दिपक मधातच बोलला. तशी त्याची आई म्हणाली,
"होय बाळ. अगदी तसंच."
बाळबोध दिपक चूप बसला. तशी आईही गप्प झाली.
राज व दिपक श्यामलचे दोन मुलं. लहान राज व मोठा दिपक. ते दोन तारेच होते तिच्या जीवनातील. आज तिचा पती जीवंत नव्हताच. तो कितीतरी दिवसापुर्वीच मरण पावला होता हार्ट अटॅकनं. परंतु त्यानं आत्महत्या केली होती कर्जाला कंटाळून. कर्ज फार वाढलं होतं पावसाच्याच दगाबाजीनं. सततची नापिकी व त्यात होणाऱ्या नुकसानानं घरी कर्जाचं डोंगर उभं ठाकलं होतं. रोजच घरी कर्जवाले येवून तकादा लावून जात असत. अशातच पती गेला असा दिखावा करुन श्यामलनं सरकारकडून भावनेनं पैसे मिळवले होते. गावानंही तिची लहान लहान मुलं पाहून साक्षही दिली होती आणि पती ज्यावेळेस गेला. त्यावेळेस तिनं हिंमत हारली नाही.
शेती पिको की न पिको. पती जीवंत असो की नसो. मुलं लहान असो की नसो. श्यामल हुशार होती व तेवढीच हिंमतवान. तिनं कंबर कसली व ती पुरुषी थाटानं कामाला लागली. स्वतः आपल्या शेतात खपू लागली. धान्य लावून त्या बदल्यात पीकं घेवू लागली. त्यातच आपल्या मुलांना शिक्षणही शिकवू लागली.
श्यामल शिकली होती भरपूरच वर्ग. मात्र ती आजही अडाण्यासारखंच वागत होती. ती फारशी सुशिक्षीत वाटत नव्हती. तिच्यावर अंधश्रद्धेचा प्रभाव पडला होता. भरपूर शिकत असल्यानं व तिच्या वडिलांनी शिक्षणालाच वाव दिल्यानं ती शिकत राहिली व अशातच तिचं वय वाढून गेलं. मग विवाहाचा प्रश्न उभा राहिला. विवाह करायचा तर करायचा कोणाशी?
विवाहाचा विचार करताच तिचा विवाह एका शिकलेल्याच परंतु नोकरी न लागलेल्या तरुणाशी झाला. जो नोकरी न लागल्यानं शेती करीत होता. मात्र ती त्याचेशी विवाह करुन खुशच होती.
श्यामलनं आपल्या पतीशी विवाह केला खरा. परंतु तिला विवाहानंतर कोणत्याच अडचणींना सामोरे जावे लागले नाही. सगळं काही तिचा पतीच पाहात होता. शेतीत पेरणी कशी करावी? कोणतं धान्य पेरावं? केव्हा पेरावं? पावसाचा अंदाज कसा बांधावा? धान्य केव्हा कापावं? धान्य चांगलं पिकावं म्हणून त्या धान्यात काय टाकावं म्हणजे पीक चांगलं येईल? या सर्व गोष्टी तिचा पतीच पाहात असल्यानं तिला आता कोणत्याच समस्येला सामोरे जावे लागत नव्हते. परंतु घात झाला. अचानक पती गेला. आता प्रश्न निर्माण झाला की धान्य पेरावं कसं? त्यावर कोणीतरी उपाय सांगीतला. पावसाचा अंदाज बांधल्यावर. परंतु ती माहिती मिळताच दुसरा प्रश्न उभा झाला. पावसाचा अंदाजही बांधायचा कसा? त्याही बाबतीत ती इतरांना विचारु लागली. तोच उत्तर सापडलं. आपण पावसाचा अंदाज बांधतांना कावळ्याला पाहायचं. त्याच्या तोंडात काठी पाहायची. ती काठी कुठे पकडली आहे. ते पाहायचं व अंदाज बांधायचा. मग काय, ती कावळ्याला पाहात असे दरवर्षीच. कावळा येवून ओरडतो काय? तो तोंडात फांदी कशी धरतो. कोणता पक्षी झाडावर किती उंचीवर बसून ओरडतो. कोणते पक्षी झाडावर किती उंचीवर घरटं बांधतात. या सर्व अंधश्रद्धेच्या पद्धतीनं ती शेती करीत होती. शेतात बी पेरायचा अंदाजही बांधत होती व ती आतापर्यंत त्यात फसलीही नव्हतीच. यातूनच तिच्या मनात अंधश्रद्धेनं जन्म घेतला व तीच अंधश्रद्धा तिच्या मनात वाढू लागली होती. ज्यातून तिला उत्पन्नही चांगलंच येत होतं. त्यातच जेव्हा तिचा पती मरण पावला होता. तेव्हा तर कोणी आपल्या घरावर करणी केली आहे. असं तिला वाटत होतं व ती देवाजवळ नवशही कबूल झाली होती की जर तिचं सगळं सुरळीत होईल. तेव्हा ती त्याला काहीतरी नक्कीच देईल.
गावात असाच एक देवबाबा नावाचा व्यक्ती होता. जो व्यक्ती जादूटोणा करतो. असं गावाचं म्हणणं होतं. त्यानंच श्यामलच्या पतीलाही मारलं असं गाव म्हणत होतं. अन् देवबाबाही तशाच पद्धतीनं वर्तन करीत असायचा.
गावाच्या एका कडेला स्मशान होतं. तिथं भूतं नाचतात. असंही गावाचं म्हणणं होतं. रात्रीच्या वेळेस कोणीच त्या स्मशानाकडं फिरकत नव्हते. अशातच जेव्हा गहू किंवा एखाद्यावेळेस धान्य काढण्याचा हंगाम सुरु व्हायचा. तेव्हा रात्रीच्या वेळेस कोणीच शेतात फिरकत नसत. तसं पाहिल्यास गावात शेतकरी आत्महत्याही घडायच्या आणि लोकं म्हणायचे की अमूक अमूक माणसाची इच्छा पुर्ण झाली नाही. तो रस्त्यानं फिरतोय. कोणी रात्रीच्या वेळेस फिरायला जावू नये शेतात. ज्यातून ती आत्मा झोंबते.
गावातील ही भुताची अंधश्रद्धा. ती अंधश्रद्धा जोरदारच होती. त्यातच कोणी गावात मानसिकता ढासळल्यानं घुमायला लागलाच तर लोकं त्याच्या अंगात शिरलंय असंच म्हणायचे. ज्याचा फायदा देवबाला होत असे.
पावसाळा सुरु झाला होता. त्यातच श्यामलनं आपल्या शेतात ज्वारी पेरली होती. शेतात पीक तसं जोरदारच होतं. तोच तिनं अतिशय मेहनतीनं आपल्या शेतातील ज्वारीची कणसं कापली आणि त्याचा शेतात ढीग लावला. त्यानंतर ती घरी आली.
रात्र झाली होती. मध्यरात्र ओलांडली होती. कणसं खळ्यात उघड्यावरच होती. दिवसभर कोरडेपणा होता सर्वत्र. अशातच मध्यरात्री ढगाळ वातावरण तयार झालं. पाऊस येणार याची चिन्हं दिसायला लागली. आता थेंब थेंब पाऊस सुरु होणार व तो कणसावर पडणार आणि कणसं करपणार. याचा विचार श्यामलला आला. आता तिला वाटलं की आपलं यावर्षी नुकसानच होणार. अख्खी ज्वारी करपणार. ती तोच विचार करुन उठली. तिनं मुलांकडे पाहिलं. मुलं झोपली होती. तसा तिनं आपल्या लुगड्याचा पदर कंबरेला गुंडाळला. त्यानंतर तिनं प्लॉस्टीक घेतलं व ते कणसं झाकून घेवून कणसाचा बचाव करण्याचा विचार केला. तिनं एक लांब काठी हातात घेतली व ती आपल्या शेताची वाट चालू लागली. मात्र तसं शेतात जातांना तिलाही भीती वाटतच होती भुताची.
ती तिची सत्वपरिक्षाच होती. ती झपाझप पावलं टाकत होती. अशातच ते स्मशान आलं. तशी तिला भीती वाटली. वाटलं की आता आपल्याला एखादं भूत दिसणार. आपल्याला झोंबणार. आपलंही आपल्याच पतीसारखं बरंवाईट करणार. आपल्या लेकरांचं वाईट होणार. परंतु ते तिचे विचार होते. एक मन म्हणत होतं भुतं असतात तर दुसरं मन म्हणत होतं कई भुतं नसतात आणि असतीलही तर ती नशिबात जे असेल तेच घडवतील. त्यापेक्षा जास्त काहीच घडविणार नाहीत.
स्मशान थोडं दूरच होतं. अंगात भीतीचे कापरे भरले होते. मनात विचारांचं वादळ तयार झालं. त्यानं काहूर माजवायला सुरुवात केली होती. वाटलं आता सगळंच संपलं. तोच एक विचार. विचार होता मागं फिरायचं व आपल्या घराला जायचं. परंतु जाणार कसं? जर ते भूत मागं लागून इथंपर्यंत आलं तर...... विचारांचा अवकाश. तोच एक पक्षी तिच्या अंगाला स्पर्शून गेला. त्यातच तिच्या तोंडून शब्द फुटले. 'वटवाघूळ होय की' आता परत कसं फिरावं? ती विचार करु लागली. तोच दुसरा विचार आला. आता मरण आलं तरी चालेल. आपल्या मुलाचं बरंवाईट झालं तरी चालेल. परंतु आपण शेतात जायचंच. कणसं झाकायचीच. नुकसान टाळायचंच. हं, विधात्यानं आपलं मरण लिहिलंच असेल तर आपण नक्कीच मरणार आणि नसेल लिहिलं तर........ तर ही भूतंही आपल्याला काहीच करु शकणार नाहीत.
श्यामलचा तो विचार. तोच ती परत फिरली व आपल्या शेताचा रस्ता चालू लागली. तसं थोड्याच वेळात स्मशान आलं.
भीती..... भीती ही श्यामलच्या मनात होतीच. तशी अंधश्रद्धाही श्यामलच्या मनात होतीच. परंतु ती घाबरली नाही. ती स्मशानाची वाट चालू लागली. तोच तिला समाध्या दिसल्या. तसा तिला इतिहास आठवला. हा गोविंदा. गावच्या देवबाबाचा बाप. तसं तिला आठवलं. देवबाबाचा बाप हा गाडी अपघातात मरण पावला. त्याची इच्छा पुर्ण झाली नव्हती. तो फिरतोय, आपली इच्छा पुर्ण करण्यासाठी.
क्षणातच तिला ते आठवताच तिच्या मनात कापरं भरलं. तशी ती त्या समाधीकडं निरखून पाहू लागली. तिचे डोळे विस्फारलेले होते.
काही वेळाचा अवकाश. त्या समाधीकडे निरखून डोळे विस्फारुन पाहताच तिच्या मनातील भय हळूहळू दूर व्हायला लागलं. वाटलं की ह्या समाधीतून तर काहीच हालचाल वा आवाज प्रतिवादीत होत नाही. तोच तिला आठवल्या तिनं ऐकलेल्या काही समाध्या. ज्यांच्या कथा पुस्तकात होत्या. संत ज्ञानेश्वर व मुकूंदराज महाराज. आख्यायिका होती की मुकूंदराज स्वामी व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीतून आवाज येतो. वाटलं की इथंही तसंच असू शकते. मग काय, थोडी भीती दूर होताच आणखी थोडं कुतूहल जागं झालं. ज्यात ती अतिशय निर्भीडतेनं समाधीजवळ गेली. वाकली व तिनं आपले कान समाधीला लावले. तोच एक अस्पष्ट आवाज तिला ऐकायला आला. तशी ती घाबरली. वाटलं की या समाधीतील व्यक्ती जागाच आहे. तसं पुन्हा तिच्या लक्षात आलं. हा समाधीतील आवाज नाही. आवाज आहे, पृथ्वी गर्भात घडणाऱ्या घटनांचा. ते ती भूगोलात शिकली होती. त्यामुळंच ती थोडी निश्चिंत झाली.
ती समाधी. त्यातच शेजारीच तिला आणखी एक समाधी दिसली. समाधी होती, ज्यानं आत्महत्या केली होती झाडावर, पीक न आल्यानं त्याची. त्या समाधीकडं तिचं लक्ष गेलं. त्या व्यक्तीला मरुन आज जवळपास एकच महिना झाला होता. त्या समाधीवरचे हार तेवढे वाळलेले होते. परंतु हाराला लावलेल्या चमक्या तेवढ्या ताज्या होत्या. त्या अंधाऱ्या रात्री त्या चमक्या तेवढ्या चमकत होत्या. ज्यावर चंद्राचा तेवढा प्रकाश पडलेला होता.
श्यामलनं समाधीकडे पाहिलं. तशी ती आपल्याला आपल्याच शेतात जायचं आहे. हे विसरुन गेली. ती त्या समाध्यांच्या विचारातच गुरफटून गेली. अशातच चिमण्यांचा आवाज आला. सर्वप्रथम एक घुबड ओरडायला लागला. तोच ती भानावर आली.
तो घुबड. तो ओरडायला लागताच तिच्या मनात धस्सं झालं. वाटलं की तो घुबड जणू रात्रीच्या अंधारात दडलेल्या संकटांची चाहूल देत असावा. परंतु तसं नव्हतंच. तिनं आकाशात पाहिलं. डोक्यावरचा चंद्र आपली जागा बदलवून थोडा मावळतीला कललेला होता. तिनं त्याचा अंदाज घेतला. तसा पक्षांचा किलबील आवाजही कानी पडला. मग आठवलं शेत आणि शेतावर येणाऱ्या पावसाचा अंदाज. त्या अंदाजानं तिनं शेताकडे जाण्याचं पाऊल उचललं होतं. शेवटी अंदाज चुकलाच व ती परत माघारी फिरली. आता ती भानावर आली होती व तेवढ्याच भयाण रात्री त्या स्मशानातूनच ती घरी परत आली.
सकाळ झाली होती. नेहमीप्रमाणेच जबाबदारी डोक्यावर असल्यानं ती गाढ झोपेतून उठली. तसा आज तिला झोपेतून उठण्याचा कंटाळाच आला होता. परंतु तो कंटाळा घालवून ती उठली. मनाची ताळमेळ बरोबर जरी नसली तरी बरोबर करुन.
श्यामल उठली. तशी तिनं लगबगीनं आपल्या दोन्ही बाळाची शाळेत जाण्यासाठी तयारी केली व ती एकटीच शेतावर जाण्यासाठी लगबगीनं निघाली.
श्यामल शेतात पोहोचली. तिनं कणसं पाहिली. तशी ती कणसंही तिच्याकडे पाहात आहेत. याचा भास तिला झाला. तोच तिनं ती कणसं उखरली व आपल्याच खळ्यात वाळू टाकली. कारण काल पाऊस आणि पाखरांच्याच भीतीनं तिनं कणसं कापून गोळा केली होती. दुपार होत आली होती. तसा थंडीचाच हंगाम होता. ऊन तेवढं वाटत नव्हतंच. परंतु भूक फारच लागली होती. आतापर्यंत तिनं कणसं गोळा केली होतीच.
दुपार झाली. तसं काम आटोपवून ती जेवायला बसली. मात्र तिच्या मनात काळजी होती. तोच तिला आठवला तिचा पती. जो पती तिच्यासोबत याच दुपारी जेवत होता. आज सोबतीला मुलं नव्हतीच. शिक्षणाचं महत्व वाटत असल्यानं ती मुलं शाळेत गेली होती.
श्यामलला तिचा पती आठवला होता. उंच धिप्पाड देहाचा. पीळदार शरीरयष्टी. मोठ्याशाच असलेल्या लांबसडक मिश्या. परंतु स्वभाव नरम. तो तिच्यावर फारच प्रेम करायचा. विवाह झाल्यापासून आतापर्यंतचा संसार त्यानं चांगलाच केला होता. तिला त्यानं काहीही पडू दिलं नव्हतं. तिला ना जेवन वेळेवर शेतात आणण्याचा त्रास होता, ना ही ती कोणत्या प्रकारची चिंता करायची त्याच्या राज्यात. तसं तिचं जीवन त्याचे काळात चांगले गेले होते. त्यानंतर आबाळ झाली. पती निधन पावताच शेत कसं जोतायचं? त्यात दाणे कसे टाकायचे? पेरणी कशी करायची? सारेच प्रश्न. मुख्य प्रश्न होता पेरणीचा. तो प्रश्न स्वतः सोडवायचा होता. परंतु सोडवायचा कसा? ते काही कसब तिनं शाळेमध्ये हस्तगत केलं नव्हतंच.
श्यामल शिकली होती. ती उच्चशिक्षण शिकली होती. उच्चशिक्षीत झाली होती. परंतु पेरणीचं कसब नव्हतंच तिच्यात. अशातच तिला कोणीतरी सांगीतल्यानं तिनं पेरणी केली होती व आज तिनं, तिनं पेरलेल्या धान्याची कणसं खळ्यात लावली होती.
दुपार झाली. तसं तिनं जेवन केलं व ती झाडाच्या गर्दगार सावलीत पहुडली. त्यातच सायंकाळचे चार वाजले होते. तशी जाग आली. त्यानंतर ती उठली व तिनं ती कणसं गोळा केली. त्या कणसाचा ढीग लावला. तशी पावसाची भीती वाटली. तोच तिनं ती कणसं एका ताळपत्रीनं झाकून घेतली आणि ती घराकडे वळली. मात्र कालसारखं घराकडं वळतांना तिचं मन निश्चींत होतं. तिच्या मनात आज कोणत्याच पावसाची भीती नव्हतीच.
************************२***************
देवबाबा...... गावातील एक सुज्ञ माणूस. ज्याला जादूटोणा करता येतो. असा गावाचा समज होता. त्याला लोकं घाबरत होते व त्याच घाबरण्यातून कोणी त्याच्या वाट्याला जात नसत.
रात्री गावात भुतं नाचतात. हा त्याचाही कयास. त्यातच भीती वाटत असल्यानं लोकांचाही कयास. मग काय, लोकं दहा वाजेपर्यंत घराच्या बाहेरच पडायचे नाहीत. याचाच फायदा देवबाबा घेत असे. तो रात्री उठत असे. त्यातच आपली बैलगाडी घेवून तो गावातील शिवारात जात असे. ज्यातून प्रत्येक शेतात असलेले धान्याचे पोते तो चोरुन आपल्या शेतात नेवून ठेवत असे. समजा सकाळी माहीत झालंच आणि चोरी झालेली आहे असं वाटल्यास तोच लोकांना सांगत असे की ती पोती भुतानंच गायब केलेली असावी. तुमच्या शेतात भुतं वावरतात. भुतांचा बंदोबस्त करता येतो.
दोनतीन दिवस झाले होते. देवबाबाला वाटत होतं. श्यामल एक बाई आहे. शिवाय गावात भुतांची भीतीही आहे. शिवारात जातांना स्मशान लागतंच. कोणीही शिवारात भुताच्या भीतीनं भटकणार नाही. तसं त्यानं गावात आपल्या अक्कल हुशारीनं स्मशानात भूत असतात व ती भूतं माणसाच्या अंगात येवून नाचत असतात. असंही सांगीतलं होतं. ज्यातून अख्खं गाव भुतांना घाबरत होतं. दहा वाजल्यापासून तर कोणीच घराच्या बाहेर निघत नव्हतं. त्यातच एखाद्यावेळेस एखाद्याला शौचाला लागल्यास किंवा कुणाची प्रकृती खराब झाल्यास त्याला रुग्णालयात नेता येत नव्हतं. त्याला तसंच स्वतः कुढत कुढत मरावं लागायचं.
श्यामलला आठवत होतं तिच्या पतीचं मरण. ज्यावेळेस त्याला अटॅक आला. तेव्हा ती रात्र असल्यानं व गावात भुतांचाच वावर आहे. अशी भीती असल्यानं त्याला रुग्णालयात नेता आलं नाही. ज्याची परियंती त्याच्या मृत्यूत झाली.
आईवडीलच घडवू शकतात आपल्या मुलांचं भविष्य? श्यामलला आठवत होता तो काळ. ज्यावेळेस तिचा पती मरण पावला होता. त्यावेळेस तिची मुलं लहानच होती. त्यातच त्या मुलांवर कसा संस्कार करायचा. याचा विचार तिला येत होता. मुलांवर संस्कार करतांना जोडीदाराचीही अतिशय फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. असं तिला वाटत होतं. तसं पाहिल्यास आईवडीलच करु शकतात आपल्या मुलांवर संस्कार. असं तिला वाटत होतं.
आईवडीलच घडवू शकतात आपल्या मुलांचं भविष्य. असं म्हटल्यास आतिशयोक्ती वाटणार नाही. कारण ते जसे वागतात. त्याचं अनुकरण त्यांची मुलं करीत असतात. जर ते दारु पित असतील तर मुलंही दारु पित असतात आणि ते जर व्याभिचार करीत असतील तर....... मुलंही व्याभिचारी निघतात. म्हणूनच खुद्द आईवडीलांनी चांगले वागण्याची गरज आहे. जेणेकरुन मुलांमध्येही चांगले संस्कार रुजतील व मुलांचं भविष्य उज्ज्वल बनेल.
'झोपले का बाळांनो, उठा लवकर. आज शाळेत जायचंय.' एका शिक्षीत आईचे उद्गार. ती शिक्षीत होती. परंतु तिला आपल्या बाळाची काळजी होती. तिला वाटत होतं की ते बाळ. ते आपलं आहे व शिकायला हवं. तो शिकून मोठा व्हायला हवा. त्याला आपल्यासारखं उन्हात राबावं लागू नये.
ती आई शिक्षीत असल्यानं तिला शिक्षणाचं महत्व कळलं होतं. आज त्याच आईनं आपल्या बाळाच्या मागं लागून लागून त्यांना उच्च शिक्षण शिकवलं होतं. तिला नोकरी लागतांना वशिला हवा वा ओळखपारख हवी हेही माहीत नव्हतं. आज तिची मुलं उच्चशिक्षित झाली होती व चांगल्या हुद्यावर नोकरीलाही लागली होती.
काळ असाच मागं सरकला. तसा तिला आठवला तो काळ. ज्या काळात मुलं किती शिकतील. उच्च शिक्षण घेतील की नाही. हा प्रश्नच होता. परंतु आज तिला हायसं वाटत होतं. कारण तिची मुलं शिकली होती. उच्चशिक्षीत झाली होती.
आईवडील...... सर्वांचेच आईवडील शिकवतात आपल्या बाळाला. आपल्या बाळाचं भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना उन्हातून सावलीत नेतात. त्यांच्या पुस्तकांची इच्छा पुरवतात. वाटतं की ते मुल उच्चशिक्षण शिकावं. परंतु सर्वच आईवडीलांची मुलं उच्चशिक्षीत होतात का? याचं उत्तर नाही असंच येतं. काहींची मुलं उच्चशिक्षीत होतात आणि काहींची. अजिबात शिकत नाहीत. त्याचं कारण काय?
मुलांचं उच्चशिक्षित होणं न होणं. यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात. त्यातील मुख्य एक कारण असतं, त्या मुलांचेच आईवडील. मुलांच्या आईवडीलांच्या सवयी जर वाईट असतील, तर ती मुलं देखील वाईट मार्गाकडं नकळत जातच असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास आजच्या काळातील मोबाईलचं देता येईल. आजचे आईवडील मुलांकडून अपेक्षा करतात की त्यांनी जास्त मोबाईल पाहू नये आणि स्वतःच मुलांसमक्ष मोबाईल पाहात बसतात. तेच पाहातं मुल व तेही मोबाईल पाहायला बसतं आणि मोबाईल हिरावल्यास जोरजोरानं रडतं. मग ते मुल रडू नये म्हणून खुद्द आईवडील त्याला मोबाईल देतात व ते चूप बसतं.
मोबाईल पाहण्याची ही आईवडीलांची सवय. तीच सवय बाळांना लागते. आज अगदी लहान बाळ, मग ते एक वर्षाचं का असेना, ते आपल्याला त्रास देतं म्हणून वा त्यानं आपल्याला त्रास देवू नये म्हणून खुद्द आईवडीलच त्याच्या हातात मोबाईल देतात. तो चूप, मग आपलंही काम सुकर. अशी अपेक्षा. परंतु त्यातून आपलं मूल बिघडतं. याचा विचार कोणीच करीत नाही. ही झाली मोबाईलपुराणाची गोष्ट. दुसरी महत्वपुर्ण गोष्ट आहे, आईवडीलांच्या सवयी. त्या सवयीही वाईटच असतात आणि त्याच सवयी बाळांना अगदी ते एकदोन वर्षाचे असतात. तेव्हापासूनच लागत असतात.
मुख्यतः श्रीमंत असो की गरीब असो. आईवडीलांना खर्रा खाण्याची सवय असते. अशावेळेस ते आईवडील स्वतः दुकानात न जाता आपल्या मुलांना पाठवतात. ज्यातून खर्रा खाण्याची सवय मुलांमध्ये लागू शकते. काही घरी वडील हे आपल्याच मुलांसमोर दारु पितात. अशावेळेस मुलांना दारुची सवय लागू शकते. काही स्रिया आपली मुलं लहान असतांनाच आपल्या पतीला कामावर जावू देतात व परपुरुषांसोबत व्याभिचार करतात. अशावेळेस मुलांमध्ये व्याभिचाराची सवय लागू शकते. अशी मुलं लहानपणापासूनच त्यांचे आईवडील करीत असलेल्या काही वेगवेगळ्या अनैतिक गोष्टी पाहात असतात. ज्यातून वाईट सवयीचं बिजारोपण होतं. मग मुलं वाईट मार्गावर लागली आणि त्यांनी वाईट कृत्य केलं तर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. ही सत्य बाब आहे. परंतु पश्चाताप होण्यापुर्वी जर मुलांची घडणी चांगल्या स्वरुपाची व्हावी असं जर वाटत असेल पालकांना तर त्यांनी त्यांना आपल्या कोणत्याही वाईट सवयी न दाखवता जर चांगल्या गोष्टी सांगीतल्या तर मुलांमध्ये चांगल्या गोष्टी टाकता येतील. चांगल्या मुल्य वा संस्कारांचे त्यांच्यात बिजारोपण करता तरी येवू शकेल. यात आणखी एक उदाहरण. एक व्यक्ती दारु प्राशन करायचा. त्याला रोज सायंकाळी दारु प्यायल्याशिवाय झोपच येत नव्हती. परंतु एक दिवस त्यानं आपल्या तरुण व नुकत्याच वयात आलेल्या मुलाला पाहिलं. त्याला कळलं की दारु वाईट. आपण जशी पितो. तसा मुलगाही प्यायला लागला. ज्यातून मुलाचं भविष्य खराब होणारच. त्यानंतर त्यांना परमात्मा एक. ज्यात दारु अजिबात चालत नाही. हा धर्म घेतला. ज्यातून स्वतः दारु सोडली. ते पाहून मुलालाही नाईलाजास्तव दारु सोडावी लागली. कारण धर्माचं वलय देवून व त्याला संकटाची जोड देवून दारु पिवून घरी आल्यास संकट उद्भवतं. अशी आख्यायिका त्या धर्मात असल्यानं दारुला अजिबात तो मुलगा स्पर्श करीत नव्हता. अशानं त्या मुलात संस्कार वाढीस लागले. दुसरं उदाहरण बाबासाहेबांचं. त्यांचे वडील रामजी सपकाळ कसेही असोत. त्यांनी आपल्या मुलाला घडवीत असतांना चांगली वागणूक ठेवली. ज्यातून डॉ. बाबासाहेब घडले.
आईवडील हेच आपल्या बाळांमध्ये जास्त प्रमाणात संस्कार रुजवू शकतात. जर त्यांनी चांगलं वर्तन घरी ठेवलं तर...... कारण आपल्याच वागण्यातून मुलं घडत असतात. आपण कसे वागतो? काय खातो? काय पितो? हे पाहात असतात मुलं. ते पाहून एखाद्या दिवशी त्याचप्रमाणे करुन पाहतात. ज्यातून संस्कार बिघडतोच. याचाच अर्थ असा की आईवडीलांच्याच विकृत वागण्यातून मुलं बिघडतात. ते जर सुसंस्कारी असतील तर मुलंही सुसंस्कारी निघतात. त्यासाठी आईवडीलांनी खुद्द स्वतःला चांगल्या सवयी लावाव्यात. जेणेकरुन त्यांचंच अनूकरण करुन मुलंही चांगली संस्कारी निघतील. जे संस्कार त्यांच्या पश्चात मुलांच्याच कामात येतील. जसे थॉमस अल्वा एडीसन. त्यांच्या आईनं त्याला शास्रज्ञ बनवून दाखवलं. ज्याचं इवलसंही कसब थॉमसच्या आईमध्ये नव्हतं. दुसरं उदाहरण शिवाजी महाराजांचं देता येईल की ज्यांच्या आईनं बाल शिवबाला शिकवलं. ज्यातून स्वराज्याची नीव बांधली गेली. अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलांना घडवलं आहे.
संस्कार हे मुल्य काही बाजारात मिळत नाहीत. ते घरातच मिळतात, आपल्या आईवडीलांच्या वागण्यातून. आईवडील हेच आपल्या बाळात संस्कार टाकू शकतात. परंतु ते टाकण्यासाठी खुद्द आईवडीलांना आपल्या वाईट सवयीवर बंधन घालावं लागतं. अशी बंधनं जे आईवडील घालू शकतात. त्यांचीच मुलं चांगली सुसंस्कारी बनू शकतात. इतरांची नाही. म्हणूनच खुद्द आईवडीलांनीच संस्कारी राहावे. दारुची सवय असेल तर दारु सोडून द्यावी किंवा मुलांसमोर पिवू नये. व्याभिचाराची सवय असेल तर तिही गोष्ट सोडून द्यावी. कारण तशा वाईट सवयी या आनुवांशिकतेच्या तत्त्वानुसार गुणसुत्राच्या रुपाने तरी आपल्या येणाऱ्या पिढीत उतरत असतात. म्हणूनच आईवडीलांनी सावधानता बाळगावी. निदान संस्कारासाठी. जर आपली येणारी पिढी चांगली निपजावी, असं वाटत असेल तर......
आईवडीलच घडवू शकतात आपल्या मुलांचं भविष्य. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण ते जसे वागतात. त्याचं अनुकरण त्यांची मुलं करीत असतात. जर ते दारु पित असतील तर मुलंही दारु पित असतात आणि ते व्याभिचार करीत असतील तर....... मुलंही व्याभिचारी निघतात. म्हणूनच खुद्द आईवडीलांनी चांगले वागण्याची गरज आहे. जेणेकरुन मुलांमध्येही चांगले संस्कार रुजतील व मुलांचं भविष्य उज्ज्वल बनेल. हे तेवढंच खरं.
श्यामलला आठवत होतं आपल्या पतीचं निधन. पती जेव्हा मरण पावला. तेव्हा ती तरुणच होती. तिची मुलं लहान लहान होती. कोणी म्हणत होतं की तुझं वय जास्त नाही. तुझी मुलंही लहान लहान आहेत. तू विवाह कर. परंतु ती लोकांची सूचना तिला पटत नव्हती. तिचा त्याबाबतीत विचार वेगळाच होता. शिवाय विवाह न करता आपल्या लैंगिक भावनेच्या तृप्ततेसाठी कोणाशी व्याभिचार केल्यास त्याचा भविष्यात आपल्याच मुलांवर व आपल्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होवू शकेल. असं तिलाही वाटत होतं. म्हणूनच तिनं आपल्या संपुर्ण लैंगिक भावना मनात दडवून आपली कामं केली कष्टाची. त्यातूनच मुलं शिकत गेली व आज ती उच्चशिक्षीत झाली होती.
श्यामलनं मुलं शिकवली. त्यासाठी फार मोठा त्रास सहन केला. त्यांचेवर संस्कार केले. त्यासाठी स्वतःच्या भावना दाबल्या. पती मरण पावल्यावर तिलाही वाटत होतं की आपण विवाह करावा. आपल्या लैंगिक इच्छा पुर्ण कराव्यात. परंतु विचार यायचा की आपली मुलं लहान. अशा काळात आपण दुसरा विवाह केल्यास येणारा पती आपल्या या मुलांवर संस्कार होवू देणार नाही. तसाच त्याचा तो परिणाम मुलांवर होईल व आपलीच मुलं आपलीच राहून आपलाच राग करायला लागतील. असंच तिला वाटत असल्यानं तिनं पती निधनानंतर होणारा आपला विवाह टाळला. ती सात्विक राहिली, कुठल्याही प्रकारचा व्याभिचार न करता. आज त्याचाच परिपाक म्हणजे तिची मुलं त्यांच्या पायावर उभी राहिली होती. ती संस्कारी बनली होती.
************************३********************
गुरुही करु शकतात आपल्या मुलांवर संस्कार? असं तिलाही वाटत होतं. त्याच विश्वासावर तिनं आपल्या मुलांना शाळेत टाकलं. तशी दुपारची वेळ होती व तिची मुलं दुपारी शाळेत जात असत. मुलं दिवसभर शाळेतच राहायची आणि ती शेतावर. कधीकधी तिला वाटायचं की आपण उच्चशिक्षीत. आपण उच्चशिक्षीत असल्यानं उन्हातान्हात काम करु नये. आपण एखाद्या कार्यालयात नोकरी पत्करावी. परंतु तो ग्रामीण भाग होता व त्या ग्रामीण भागात कार्यालये नव्हती. शिवाय शहरात नोकरी करायला जातो म्हटल्यास तिला ते झेपणारं नव्हतं. त्यातच कामाचा मुख्य असलेला स्रोत शेती हा ग्रामीण भागात होता. ती तिला विकावी लागणार होती. मगच शहरात जावं लागणार होतं. त्यातही शहरात राहायला गेल्यावर हाताला काम लागेलच. असं काही सांगता येत नव्हतं.
श्यामलनं विचार केला. विचार केला की आपण शहरात जावून राहू नये. आपण आपल्या गावातच राहावं. गावात असलेली आपली शेती करावी. त्या शेतीतून उत्पन्न घ्यावं. तेच आपल्याला सोयीस्कर ठरेल.
तिनं तोच विचार केला व शेती करायला सुरुवात केली. ज्यात एक प्रकारची कसरतच होती. परंतु ती विचलीत झाली नाही. घाबरली नाही. शेती करीत राहिली व आपलं जीवन जगत राहिली.
श्यामलला वाटत होतं की आईवडील आपल्या मुलांवर संस्कार करु शकतात. परंतु आपण एकाकी. आपण दिवसभर कामातच व्यस्त राहू. तसं पाहिल्यास तिला तिच्या मुलांचं नाव शाळेत टाकायचंच होतं. तिला वाटत होतं की गुरु....... गुरुही करु शकतात आपल्या मुलांवर संस्कार. होय, तीचं म्हणणं बरोबर होतं. गुरुच करु शकत होते तिच्या मुलांवर संस्कार. तसं पाहिल्यास गुरुही करु शकतात आपल्या मुलांवर संस्कार. परंतु ही संकल्पना आजच्या काळात पुर्ण रुपास जात नाही. कारण अलिकडील काळात गुरु हे व्याभिचारी स्वरुपाचे आहेत. आजच्या काळात ते शिकवीत असलेल्या व वयानं अल्प असलेल्या मुलींवर बलात्कार करतात नव्हे तर काही गुरु हे मादक पदार्थ, खर्रा, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ खावून नशेत धृत असतात. ते दारुही प्राशन करीत असतात. ज्यातून ते खुन करायलाही मागेपुढे पाहात नाहीत. असे गुरु काय विद्यार्थ्यांवर संस्कार करु शकतील? हा प्रश्नच आहे आजचा व भविष्यातील. आज गुरु असा हवा की जो आपल्या संस्कारानं देशात अब्दुल कलाम वा जार्ज ग्रेगर मेंडेल बनवू शकेल. ज्यातून देशाचाच विकास होईल. वर्गात शिकणाऱ्या एखाद्या मुलांतून समजा सानेगुरुजी घडलाच तर त्या शिक्षकांच्या शिकविण्याचंच नाही तर संपूर्ण आयुष्याचं सार्थक झालं. असा त्याचा अर्थ होवू शकतो.
म्हटलं जातं की आई माझा गुरु, आई कल्पतरु. आई बाळाला सर्वतोपरीनं शिकवीत असे. ती बाळाला सर्वात प्रथम आई म्हणायला लावते. ती सतत तकादा लावते त्याच्या मागे. मग एक दिवस ते बाळ सर्वप्रथम आई जेव्हा म्हणतो. तेव्हा तिच्या आनंदाला पारावार नसतोच.
बाळ सर्वप्रथम आई हाच शब्द उच्चारतो. कारण त्याची आई, ही सर्वात प्रथम बाळाला आईच शब्द शिकवते. त्यानंतर त्यानं आई म्हटल्यानंतर ती बाबा शब्द शिकवते व ते बाळ बाबा म्हणतं. त्यानंतर ती मम शिकवते. अर्थात बाळाला पाणी हवं असतं. ते त्याला मागता यावं. अशी ती सांगते.
आई आपल्या बाळाला सर्वच गोष्टी शिकवते. ज्यात तो स्वतः सक्षम होवून शाळेची वाट धरतो. त्याला शाळेत बोलता यावं. बसता यावं. त्याला शौच धुता यावी. इथपर्यंत त्याची आई त्याला शिकवते. परंतु एवढंच पुरेसं नसतं.
पहिली गुरु ही त्याची आई. त्यानंतर तो शाळेत जातो. मग त्याची गुरु बनते त्याची शिक्षिका. ती शिक्षिका, जी त्याच्या जीवनातील चैतन्य असते. जी त्याला सर्वच गोष्टी शिकवते. ज्या गोष्टी त्याची आई शिकवीत नाही. बरीचशी मुलं अशी असतात की त्या मुलांना नीट बसण्याची सवय नसते. नीट शौच धुण्याचीही सवय नसतेच. त्यातच शौच करण्याचे वेळापत्रक नसतं आणि जेवण्याचंही वेळापत्रक नसतं. ती मुलं शाळेत असतांना केव्हाही शौच करतात आणि केव्हाही जेवन करायला पाहतात. त्यातच त्यांचं झोपण्याचंही वेळापत्रक नसतं. ती वर्गातच झोपतात. तशीच ती मुलं सतत दंगामस्ती करीत असतात. प्रसंगी त्याही बालवयात ती मुलं कोणालाही पेन टोचत असतात. कोणाच्याही नाकातोंडात पेन, पेन्सिल व लेखन वा खडू टाकत असतात. एवढंच नाही तर त्या वस्तू खातही असतात. बरीचशी बालकं अशी असतात की ती बालकं पोटात पैशाचे शिक्के प्राशन करतात. अशावेळेस त्या मुलांची आई त्यांचेजवळ नसते. जवळ असतात शिक्षक. ज्याला आपण गुरु म्हणतो. हा गुरु आपलीच मुलं असल्यागत समजून बालकांना त्यांच्या अगदी लहानग्या वयापासून घडवतात. त्यांची शौच धुवून देतात. त्याला शौच धुण्याची सवय लावतात. त्यांना पेनाचा वापर करणे. खडूचा वापर करणे, नखे काढणे, शरीर स्वच्छ करणे. सौजन्यानं बोलणे, खेळणे, वागणे, एवढंच नाही तर समाजात कसं वागायचं? कसं जगायचं? या सर्व गोष्टी शिक्षक शिकवतो व त्याच लहानग्या मुलांना मोठं करुन तेच शिक्षक एक जबाबदार नागरीक बनवितात. याचाच अर्थ गुरु हा चांगला असायला हवा.
गुरुंचे दोन प्रकार आहेत. एक गुरु असाही असतो की जो चांगले संस्कार देत नाही. वाईटच संस्कार रुजवीत असतो मुलांत. ज्यातून मुलं वाईट गोष्टी शिकतात. ती घाणेरड्या शिव्या द्यायला लागतात. मारपीट करणे शिकतात. त्यातूनच खुन वैगेरे गोष्टी शिकत असतात ते. शिवाय दारु पिणे, खर्रा खाणे, व्याभिचारीपणा. याही गोष्टी शिकण्यास ते कतरत नाहीत. ज्यातून शाळेतच अलिकडील काळात मारामाऱ्या, खुन, बलात्कार, प्रेमप्रकरणं व लव्ह जिहादची प्रकरणं घडत आहेत.
दुसरा प्रकार असतो तो चांगल्या संस्कारी गुरुचा. जो गुरु चांगल्या गोष्टी शिकवतो. ज्या चांगल्या संस्कारानं मुलं उच्च स्थानावर जातात. संस्कारी बनू शकतात.
एक गुरु असा असतो की जो गुरु मुलांना त्याच्या लहानग्या वयापासून तर तो मोठा होईपर्यंत चांगलं शिकवीत असतो. त्याच्यात चांगले संस्कार रुजवीत असतो. त्यांचं भवितव्य घडवीत असतो. यासाठी गुरु हा तेवढाच प्रतिभासंपन्न व प्रतिभावान असावा.
गुरु हा व्याभिचारी नसावाच. जेणेकरुन त्याच्या हातून घडणारी मुलं ही वाईट कृत्य करतील. तसाच तो गुणसंपन्नही असावा तेवढाच. परंतु अलिकडील काळात गुरु हे व्याभिचारी पद्धतीचे आढळतात. ते शाळेतीलच विद्यार्थिनीवर बलात्कार करीत सुटतात. ज्या त्यांच्या हातून शिकणाऱ्या विद्यार्थिनी या अल्प वयातील असतात. तसेच बरेचसे गुरु हे खर्रा खाणारे व दारु पिणारेही आढळतात. त्यांना बरेचसे शौकही असतात.
गुरु हा पारदर्शी असावा. तो इमानदार असावा. तो संस्कारीही असावा. त्याच्यात संस्कार हे कुटकूट भरलेले असावेच. जेणेकरुन तो विद्यार्थ्यांवर संस्कार करु शकेल. ज्या विद्यार्थ्यांमधून कधी जार्ज ग्रेगर मेंडेल तर कधी अब्दूल कलाम बनू शकेल. तसाच तो व्याभिचारी नसावाच. त्याला कोणते व्यसन नसावेत. अर्थातच त्यानं खर्रा खावू नये. तंबाखूजन्य पदार्थांचंही सेवन करु नये. त्यातच कोणी दारुही प्राशन करु नये म्हणजे झालं. जेणेकरुन देशाला ज्या नागरिकांची गरज आहे. तसे नागरीक देशासाठी तरी तयार होवू शकतील.
श्यामलनं आपल्या मुलांना शाळेत टाकलं होतं. ते दिवसभर शिकत होते शाळेत व ती दिवसभर काबाडकष्ट करीत होती घरी.
आजचा दिवस तिच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस होता. ज्यात त्याच दिवशी तिनं खळ्यातील ज्वारी काढून ते पोत्यात भरुन त्याची रास लावली होती. त्या कणसातील ज्वारी दिवसभर काढता काढता रात्र झाली होती. तिला त्या ज्वारीचे पोते बाजारपेठेत पोहोचवायचे होते. तशी रात्र झाली. तोच तिनं ते पोते खळ्यातच ठेवून त्याला व्यवस्थीत प्लॉस्टीकनं झाकून ती घराकडे गेली.
श्यामल घराकडं गेली होती. परंतु ती निश्चिंत मनानं घराकडं गेली नव्हती. तिच्या मनात भीती होती धान्य चोरीला जाण्याची. कारण गतकाळातील अनेक वर्षांपासून लोकांच्या शेतातील धान्य चोरीला जात असे. जर शेतात धान्य ठेवलं तर..... लोकं दिवसभर मेहनत करुन मशीनीतून धान्य काढत व रात्रीला शेतात धान्य न ठेवता घरी आणत असत किंवा एखादा व्यक्ती धान्य चोरीला जावू नये म्हणून जागलीला राहात असे. शिवाय धान्य चोरीला गेल्यास बोलताही येत नसे. कारण जो तशा स्वरुपासाठी बोलेल, त्याला भूत छळतो. अशी अफवाच प्रसिद्ध होती.
शेतात खळ्यात असलेलं धान्य. श्यामल घरी तर आली होती. परंतु तिला भीती होती. कदाचित रात्रीचा आधार घेवून धान्य चोरीला तर जाणार नाही. मग रात्र झाली. रात्रीला जेवन खावण केलं तिनं व ती लेकरांसमवेत अंथरुणात पहुडली.
श्यामल अंथरुणावर पहुडली खरी. परंतु तिच्या मनात एकच चिंता लागून होती. ती चिंता होती, शेतातील धान्य आणि ते चोरीला जाणं. तशी ती अंथरुणावर पहुडली. परंतु त्या अंथरुणावर तिला पुरेशी झोपही येत नव्हती. तिला सारखी या कडावरुन त्या कडावर कुस बदलवावी लागत होती.
रात्र सरत चालली होती. मध्यरात्र उलटली होती. मध्यरात्र उलटली असली तरी तिला झोप आली नव्हती. सारखी चिंता, तिही शेताचीच असलेली जाणवत होती. तोच ती उठली. तिनं आपल्या बाळाकडं कटाक्ष टाकला व ती आपल्या शेताच्या दिशेनं निघाली. मुलांची चिंता न करता. तोच स्मशान लागलं.
ते स्मशान. अचानक तिथंच अधिवाश करणारं रात्रीचं उल्लू ओरडायला लागलं. त्याचबरोबर झाडावर बसलेले पक्षी. थोडीफार भीतीही वाटली. परंतु आज तेवढी भीती वाटत नव्हती. कारण मागे एकदा ती ऐन भर मध्यरात्री याच स्मशानात येवून गेली होती.
ती स्मशानात आली. परंतु मागील वेळेसारखी ती स्मशानात थांबली नाही. ती तेथून परत पुढील रस्ता धरत लगबगीनं निघाली, थेट आपल्या शेतापर्यंत. आता शेत आलं होतं. ज्या शेतात ज्वारीचे पोते एकमेकांवर एक रचले होते.
श्यामल शेताजवळ पोहोचली. ज्या शिवधुऱ्यावर एक बारांतीण नुकतीच गाडलेली होती. ते दृश्य तिनं पाहिलं. परंतु ती तेथेही थांबली नाही. ती परत आपल्या शेतात गेली, जिथं धान्याची रास होती.
श्यामल शेतात अगदी धान्याच्या राशीजवळ पोहोचली होती. तर पाहते काय, त्याच रस्त्यानं एक व्यक्ती आपल्या पाठीवर धान्याचं पोतं घेवून जात असलेला तिला दिसला. अंधार होता व अंधाऱ्या रात्री तिनंही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. वाटलं की अख्खं गाव भुताचं असल्यानं आपल्याला पोतं पाठीवर धरुन एखादा भूतंच दिसला असावा.
तो माणूस पुढं गेला. परंतु तो कोण आहे, कोण नाही, हे पडताळून पाहण्यासाठी ती पुरेशी वळलीही नाही मागं. त्यातच तो व्यक्ती पुढे गेला. तसं त्याही व्यक्तीनं ती श्यामल आहे. असं जाणलं नसेलच. कारण आजुबाजूला अंधारच होता. दिसत काहीच नव्हतं आणि कुणाची ओळखही पटवता येत नव्हती.
तो व्यक्ती लगबगीनं निघून गेला. कुठे गेला, ते कळलंच नाही. कोणत्या भागाकडे वळला. तेही दिसलंच नाही. तशी श्यामल शेतात पोहोचली, अगदी खळ्याच्या जवळ, जिथं ज्वारीच्या धान्याचे पोते रचून घेतले होते.
श्यामलनं पाहिलं. पाहिलं की त्याच अंधाऱ्या रात्री जिथं ज्वारीचे पोते रचून ठेवले होते. जे तिनं मोजून ठेवले होते, जे एका प्लॉस्टीकनं झाकून ठेवले होते. ते प्लॉस्टीक तिला उकरल्यासारखं वाटलं. त्यातच त्या प्लॉस्टीकमधून धान्याचं पोतं काढल्यासारखं वाटलं. कदाचित धान्य चोरीला गेलं असावं असं तिला वाटलं. परंतु ही अंधारी रात्र. एवढ्या रात्री धान्याचे पोते कसे मोजता येतील? ती विचारात पडली. भुतानं तर धान्य गायब केलं नसेल? कदाचित आता आपल्याला झळकलेला माणूस. त्यानं तर धान्य गायब केलं नसेल? कदाचित तो भूत तर नाही? परंतु भूत नसावंच. ही माणसाचीच करामत असावी. कारण भूत असताही. परंतु भूत अशा फालतू गोष्टीच्या फंदात पडणारच नाही. तो कशाला धान्य नेण्याचा धंदा करेल?
तिची चोराबद्दलची तसदी. चोर माणूस की भूत, हे ओळखणं कठीण झालं होतं. तसा नेमका चोर कोण? हे समजणं कठीण होतं. परंतु धान्य चोरलं गेलं व ते चोरानंच नेलं. हे खरं होतं. तसं खरंच धान्य चोरीला गेलं असावं काय, याची शहानिशा व्हायची होती.
श्यामलनं तिथंच राहण्याचा निर्णय घेतला. कारण अधिकचं धान्य चोरीला जावू नये. हा तिचा विचार. परंतु दुसरा विचार तिच्या मनात होता, तो म्हणजे लेकरांचा. लेकरं उठतील व आई कुठं गेली असावी, याचा शोध घेतील. रडतील ओक्साबोक्सी. तिनं विचार केला. तसा नशिबालाच दोष देवून ती तेवढ्याच रात्री माघारी फिरली. परंतु माघारी फिरत असतांना पुन्हा तिनं प्लॉस्टीकनं धान्य झाकलं होतं.
ती घरी आली. तशी ती फार थकलीच होती. विचारानं आणि चालण्यानं. आताही तिच्या मनात चिंताच होती. धान्य चोरीला जाईल याची. परंतु त्याचा विचार सोडून केवळ नशीबाला दोष देत देत ती झोपली, ते सकाळ केव्हा झाली हे तिलाही कळलंच नाही.
सकाळ झाली होती. तशी ती उठली व लगबगीनं मुलांना सांगून शेताकडं निघाली. तिनं धान्यावर झाकलेलं प्लॉस्टीक काढलं. त्याच्या आत दडलेले पोते मोजले. त्यातील चार पोते गायब झाले होते. तसा तिला भास झालाच. हे पोते भुतानं नाही तर माणसानंच नेले असावेत. तिनं विचार केला विचार केला की चोर पकडायचा. परंतु चोर पकडण्यासाठी आपल्याला ही सर्व गोणी दावणीला लावावी लागतील. परंतु काही हरकत नाही. आपण आज रात्री चोर पकडावाच. चोर आजही येणारच. पोती घेवून जाईलच.
तिनं परत धान्य झाकलं व ती परत घराकडे आली. त्यानंतर तिनं आपल्या मुलांना शाळेत पाठवलं व ती परत शेतातच गेली. दुपार झाली होती. रातच्याला पुरेशी झोप न आल्यानं ती आज भर दुपारी झाडाच्या थंडगार सावलीत पहुडली. त्यानंतर झोप उघडताच ती लवकर घरी गेली.
सायंकाळ झाली होती. तशी ती मोठ्या मुलाला म्हणाली,
"बेटा, काल आपल्या शेतातून चार पोती चोरीला गेलीय. मला चोर पकडायचाय. आजही चोर येईलच. तेव्हा मी शेतात जाईल रातच्याला. तू आपल्या भावाला सांभाळायचं."
तो श्यामलचा मुलगा. तो काय समजायचं ते समजला. तशी रातच्याला श्यामल परत शेतावर गेली होती व तिनं संपुर्ण रात्र शेतात काढून ज्वारीच्या पोती चोरीला आळा घातला होता.
आज ती शेतावर गेली होती रातच्याला. तिनं तिच्याच शेतातील ज्वारीचं पोतं चोरणाऱ्या देवबाबाला रंगेहाथ पकडलं होतं. त्यातच त्याचा डावही श्यामलला लक्षात आला होता. मग काय? भोंदूबाबा बनून भुताची भीती दाखविणाऱ्या व शेतकऱ्यांच्या शेतातील धान्य चोरणाऱ्या देवबाबाची करतूत उघड करण्यासाठी ती लोकांना सांगत असे. देवबाबा काय करतो? काय नाही? या सर्व गोष्टी ती लोकांना समजावून सांगत होती. परंतु तिच्या त्या बोलण्यावर व सांगण्यावर कोणताच व्यक्ती विश्वास ठेवत नव्हता. कारण अख्खं गावच आज अंधश्रद्धेच्या आहारी गेलं होतं.
सकाळ झाली होती व सकाळी तिनं शेतातील धान्याची पोती बाजारपेठेत पाठवली होती. कोण रोज रोज ज्वारीच्या पोत्यांना सांभाळेल असं वाटून गेलं होतं. त्यातच चोर जरी तिनं पकडला असला तरी त्याची करतूत उजागर झाली नव्हती.
आता श्यामलची भुताबाबत वाटत असलेली भीती नष्ट झाली होती. त्यातच दर हंगामात जेव्हा जेव्हा धान्य शेतावर निघत असे. तेव्हा तेव्हा ती शेतावर जात असे. कारण आता तिचा देवबाबावर विश्वास नव्हता. तशीच ती कधी पिकांना विहिरीचं पाणी द्यायला जात असे. तेव्हाही ती रात्रीच जात असे. कधी शेतावर पाळीव प्राणी जसे की रानडुक्कर, रानरेडे, रानगवे यायचे. शेताचं नुकसान करुन जायचे. तेव्हाही ती जागलीलाच जायची. ज्यातून तिच्या शेतातील पिकांचं उत्पादन वाढलं होतं. आता तर तिला हिंमतही आली होती.
श्यामलला भुताची वाटणारी भीती नष्ट झाली होती. परंतु शिवारात भीती होतीच. ज्यातून इतर शेतकरी शेतात जात नव्हते रात्रीला. श्यामल मात्र शेतात जात होती, भुतांना न घाबरता.
श्यामलचा मुलगा हा थोडा मोठाच होता. त्याला समजायला वेळ लागला नाही. ती रात्र....... त्या रात्रीत रात्रभर शेतात राहिलेली आई. तशी ती व्याभिचारी नव्हतीच. परंतु तिच्या मुलाला वाटत होतं की त्याची आई व्याभिचारीच असावी की जी रात्रभर एखाद्या पुरुषासोबत आपल्या भावना तृप्त करायला गेलेली असावी. त्या भावनांबाबत शंका आज राजच्या मनात वृद्धींगत होत चालल्या होत्या.
*********************४*********************
श्यामल देवबाबाला भोंदूबाबा समजत असे. तिला वाटत असे की आजच्या काळात भोंदूबाबा अब्रू लुटतात. ते त्यासाठी अंधश्रद्धेचं भय दाखवतात. तेव्हा अशा प्रकारच्या भोंदूबाबाच्या जाळ्यात पडून स्वतःची अब्रू लुटणार नाही, अशा प्रकारचं वर्तन माणसानं करावं. असं तिला वाटत होतं.
श्यामलचं म्हणणं बरोबर होतं. कारण आज देवबाबासारखे असे बरेच भोंदूबाबा होते की जे आज आपल्याला अंधश्रद्धेचे भय दाखवून आपल्या इज्जती लुटत होते. त्यामूळं तिच लोकांना सांगत होती की आपल्या इज्जती काही रस्त्यावर पडलेल्या नाहीत. तरीही भोंदूबाबा ते कृत्य करतात. परंतु यावर उपाय एकच. जो केल्यानं भोंदूबाबा आपल्यावर अत्याचार करणार नाहीत व आपली अब्रूही लुटणार नाहीत. ज्यातून आपली अब्रू सुरक्षीत असेल यात शंका नाही.
काल अंधश्रद्धेनं लोकं वागत होते. कारण देशात विज्ञानानं प्रगती केली नव्हती. नवनवीन शोध लागले नव्हते. देशांतर्गत संबंध निर्माण झाले नव्हते व देश इतर पाश्चिमात्य देशाच्या संपर्कात आला नव्हता. परंतु आज तसं नाही. आज देशात नवनवीन शोध लागले आहेत. आजचा मानव चंद्रावर गेलेला आहे नव्हे तर तो अंतरिक्षातही गेलेला असून चंद्र आणि सुर्य काय? हेही त्याला माहीत झालेले आहे.
काल तसं नव्हतं. काल पृथ्वी सपाट आहे, असं मानणारा वर्ग होता. त्यातच पृथ्वी गोल आहे, असे म्हणणाऱ्या गॅलिलिओचच विधान लोकांना पटलं नाही व त्याची लोकांनी हत्या केली. पुढं वास्को दी गामा जेव्हा आफ्रिकेच्या केपटाऊनला वळसा देवून भारतात आला. त्यातच मॅगेलाननं पृथ्वी प्रदक्षिणा घातली. तेव्हा कळलं की पृथ्वी गोल आहे. समजा ती सपाट असती तर आपण पडलोच असतो. असा हा नवनवीन शोध लावण्याचा प्रकार. कालांतरानं समजायला लागलं की जगात वादळ, वारे, झाडं, पशूपक्षी, मानव हे कसे जन्मतात. कालांतरानं माहीत झालं की या पृथ्वीवर मांजर आडवी गेल्यास काहीही होत नाही. कालांतरानं माहीत झालं की कुत्रा भुंकल्यास अपशकुन होत नाही. कावळ्याच्या ओरडण्यानं पाहूणे येत नाही आणि घुबड दिवसा दिसण्यानंही कोणत्याच समस्या येत नाहीत. मग असे असतांना आजही काही लोकं अंधश्रद्धा मानतांना दिसतात. अंधश्रद्धा पाळतांना दिसतात. अंधश्रद्धेत गुरफटतांना दिसतात. त्यांना सर्वात मोठी शक्ती अंधश्रद्धेची वाटते. ते देव, दानव, भूत, प्रेत सारंच काही मानतात. आपल्यावर वा आपल्या घरावर कोणी करणी केली आहे. असेही ते मानतात व भोंदू बाबांवर विश्वास ठेवून स्वतःच्या संसाराचा चुराडा करुन टाकतात. शिवाय या प्रकारावर केवळ अडाणी लोकंच विश्वास ठेवतात असे नाही तर चांगले उच्च शिकलेले लोकंही विश्वास ठेवत असतात. याबाबतीत अनेक लोकांनी लेख लिहिलेत. परंतु कोणी वाचले नसावेत. अनेक लोकांनी प्रवचनं दिली. ती कोणी ऐकली नसावीत. तसेच अनेक लोकांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करुन त्यावर प्रमाण दिलं. परंतु तेही लक्षात ठेवलं नसावंच. साधी रस्त्यावर गारुड्याचा खेळ दाखविणारी मंडळी, जी हातचलाखी करुन रुपये निर्माण करतात. ती मंडळी लोकांनी पैसे का मागतात? या साध्या गोष्टीवर लोकं विचार करुन ही हातचलाखी आहे. असा साधा विचार करीत नाहीत. अन् त्याच्या भीतीत गुरफटून जातात व आपल्या खिशातील पैसे त्याला काढून देतात. एवढे आपण मुर्ख आहोत. यात जो फसतो. त्याला मुर्खच म्हणावं लागेल की नाही?
भोंदू बाबा........ काय करतो भोंदू बाबा? तो त्याच्या बोलण्यानं आधी आपल्या मनाचा ताबा घेतो. म्हणतो की मी देव आहे. मला ब्रम्हांडाचं सगळं कळतं. तुम्ही अमुक करा, तमुक करा. तुमच्या घरात भुतबाधा लावली आहे. अमुक तमुक लागला आहे तुमच्या घरावर. तुम्ही अमुक अमुक करा. नाहीतर तुम्ही उध्वस्त होवून जाल.
तीच भीती. तो भोंदूबाबा घालून देतो. मग काय, आपल्याला एवढी भीती वाटते की आपण चक्कं भोंदूबाबांच्या शब्दांच्या आहारी जातो. मग काय, तो जे जे बोलेल. ते ते सर्व करीत असतो आपण. ज्याचे पैसे जरी लागत नसले तरी भोंदूबाबा त्याचे लाखोच्या घरात पैसे उधळत असतो.
देवबाबा असाच व्यक्ती. त्यानं सुरुवातीला गावात अंधश्रद्धा पसरवून चोऱ्या केल्या. त्यानंतर त्यानं आपला मार्ग बदलला. आता तो सुंदर सुंदर महिलांना फसवू लागला होता. त्यांच्यावर बळजबरीनं लैंगिक अत्याचारही करु लागला होता.
सेक्समध्ये कितीतरी महिलांना फसविणारा हा देवबाबा अर्थात भोंदूबाबा. त्यानं नकली सापाच्या रुपानं लोकांना भीतीच दाखवली. खास करुन महिलांना. ज्यातून महिला त्याचेकडे आकर्षीत झाल्या. मग त्यानं डाव फेकला. विचार केला की लोकं अंधश्रद्धेला मानतात. जर या अंधश्रद्धेचा वापर करुन आपली कामवासना पुर्ण केली तर...... बस, विचारांचाच अवकाश. लागला तो ती कामवासना पुर्ण करायला. आता तो त्याच्याकडे येणाऱ्या महिला वर्गाला सांगू लागला की जर मुलं होत नसेल तर मी मुलंही करुन देतो. ज्यात महिला विश्वास ठेवायच्या. मग बाबा जे जे सांगेल. त्या ते ते करायच्या. काही महिला त्याच्या कामवासनेला विरोध करीत असत. तेव्हा तो म्हणायचा की मी तुझा देव आहे. जर तू माझ्या इच्छेसमोर नकार देशील तर तुझा पती मरुन जाईल. तुझं बाळ मरुन जाईल. तुझा गर्भपात होईल. सगळं चालाखीनं सांगत होता भोंदूबाबा त्यांना आणि पुरेपूर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या महिला त्याच्या त्या बोलण्यावर विश्वास ठेवायच्या. मग नकळतच त्याच्या कोणत्याही गोष्टीला विरोध न करता, इच्छा नसतांनाही सगळ्या गोष्टी नाईलाजास्तव करण्यासाठी सर्व महिला तयार व्हायच्या. एकीनंही त्याच्या दुष्कृत्यांना विरोध केला नाही. साधं चिंचोकं त्यानं लाख लाख रुपयाला विकलेलं होतं. अन् आपलं मुत्र सुद्धा महिलांना औषध म्हणून पाजलेलं होतं. शिवाय पैसा वेगळाच घेतलेला होता. तो कामवासनेसाठी स्री तयार व्हावी. म्हणून गोळ्याही वापरायचा. त्यातच आपली कामवासनाही त्यानं पुर्ण केलेली होती. खरं तर तो माफिच्या लायक नव्हता. अशा व्यक्तीला भरचौकात बेदम मारण्याची गरज होती की जेणेकरुन दुसरा त्याच्याचसारखा भोंदूबाबा तयार होणार नाही.
तो भोंदूबाबा होता गावचा. एखाद्या चित्रपटाला शोभेल, असं हे कथानक. परंतु ही वास्तविकता होती. अशा वास्तविकता केवळ त्या गावातच नाही, तर इतर सर्वच ठिकाणी घडत असत.
कधीकधी श्यामल सांगत असे लोकांना. जे लोकांना पटत नसे.
"एकदा असे दोन प्रसंग मी अनुभवले. एक असाच बैरागी भीक मागत मागत आला. म्हटलं, 'जरा पाणी पाजता काय?' मी त्याला पाणी दिलं. त्यानंतर त्यानं लगेच म्हटलं, 'सकाळपासून मी चहा घेतला नाही. जरा चहा पाजता काय?' मी त्याला चहा दिला. तसा चहा पिता पिता तो म्हणाला, 'आपल्या घरावर पंधरा दिवसात संकट येणार आहे.'
ते त्याचं बोलणं. त्यावर मी म्हटलं, 'ठीक आहे, संकट येणार आहे. परंतु यावर काही उपाय?'
त्यावर तो म्हणाला,
'माझ्याकडे एक जडीबुटी आहे. जी आसामला मिळते. चार हजाराची मिळते. जी आपल्या दरवाजात लावल्यानं संकट फक्त दरवाजापर्यंतच येईल व ही जडीबुटी पाहून निघून जाईल. जर तुम्हाला हवी असेल तर देतो. आपण चांगली माणसं दिसताय. चहा पाजला ओळख पारख नसतांना म्हणून देतोय. नाही तर मी कोणाला देत नाही. आपणाकडून फक्त हजार रुपये घेईल.'
ते त्याचं बोलणं. त्यावर त्याचा मला राग येत होता. परंतु त्यात राग कसला? तो त्याचा धंदाच. तो राग मी आवळला व म्हटलं,
'बाबा, चहा पिवून झाला असेल तर लगेच उठा व निघायला लागा.'
ते माझं बोलणं. त्यावर तो म्हणाला,
'काय झालं बेटा ?'
'काही नाही. तुम्ही निघाच लवकर.'
'तो निघून गेला. त्यानंतर पंधरा दिवस का कितीतरी दिवसं झाले. संकट दिसलंच नाही. हं, सुखदुःखाचे प्रसंग नक्कीच आले. संकटं येतही असतील. परंतु ते संकट म्हणजे काही मानव नाही की जो दरवाजावर बांधलेली जडीबुटी पाहिल व तेथूनच निघून जाईल. जर मी त्याचं ऐकलं असतं तर मला नक्कीच हजार रुपयाचा चुना लागला असता. दुसरा एक प्रसंग. ज्यावेळेस माझे पती मरण पावले. तेव्हाही एक भोंदूबाबा आला. त्या भोंदूबाबाला जवळच्याच एका नातेवाईकानं आणलं होतं. तो म्हणाला, 'तुमच्या घराला नजर लागलेली आहे. नजर जोरदार आहे. तुम्ही अमुक अमुक नदीवर त्याबाबत पुजा करा. म्हणजे तुमच्यावर लागलेली नजर नक्कीच निघून जाईल. तसं जर केलं नाही तर अजिबात बरं होणार नाही. आपले पतीही यामुळंच मरण पावले. आता यात माझ्या पती मरणाचा व नजरेचा कोणता संबंध? परंतु त्याची मजा घेत मी म्हणाले, 'किती रुपये लागणार या प्रक्रियेला?' त्यावर तो म्हणाला, 'सहा हजार.' मी ठीक आहे म्हटलं. त्यानंतर मला त्याचे बरेच फोन आलेत. परंतु मी काही त्याचे फंदात पडलो नाही. शिवाय ठासून सांगीतलं की माझं बरं नाही झालं तरी चालेल. परंतु मी त्याच्या फंदात पडणार नाही. पडले असते तर माझे सहा हजार रुपये गेले असते व माझं बरंही झालं नसतं. मी फक्त एकच मार्ग स्विकारला, संविधानाचा. न्यायालयात जाणे व न्यायालयीन आदेशानुसार आपलं बरं करुन घेणे. शिवाय ज्या महिलेनं माझ्याकडे भोंदूबाबाला आणलं होतं. ती त्याला सात हजार रुपये महिना देत होती. कशासाठी देत होती? हे कळायला मार्ग नाही. परंतु ते नंतर कळलं.'
तिनं आवंढा गिळला. तशी ती पुन्हा सांगू लागली.
'भोंदूबाबा असेच असतात आणि ते आपल्या मनावर राज्य करतात. ते आपल्याला भीती दाखवतात. अमुक तमुक होईल. तसं नाही केलं तर...... मग आपण घाबरतो व त्यानं जे जे मागीतलं, ते ते सर्व देत असतोच. महत्वपुर्ण बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे की भोंदूबाबा हा अज्ञानी असतो. परंतु तो आपल्यासारख्या सुशिक्षीत लोकांच्या मनावर राज्य करतो आणि आपण सुशिक्षीत असूनही स्वतःच्या मनानं विचार न करता फसतो. कारण आपण संविधानावर विश्वास करीत नाही. स्वतः इतके संकटाला घाबरतो की बस, आपली बोबडीच वळते. मग तेच पाहात असलेला भोंदूबाबा त्याचा फायदा घेतो. आपणही विचार न करता भुत प्रेत करणीवर विश्वास करुन भोंदूबाबानं सांगीतलेल्या युक्त्यांवर प्रयोग करीत असतो. ज्यातून आपलं मानसिकच नाही तर शारीरिक आणि आर्थिकही नुकसान होत असते. विशेष सांगायचं झाल्यास अज्ञानी लोकांचं ठीक आहे. त्यांना तेवढं कळत नसल्यानं ते भोंदूबाबांच्या आहारी जातात. परंतु आपण सुशिक्षीत आहोत ना. स्वतःला सुशिक्षीत समजतो ना. मग आपण सुशिक्षीत असतांना असल्या अंधश्रद्धेच्या का आहारी जावं? का भीती बाळगावी अशा अंधश्रद्धेची की ज्यातून आपल्याला भोंदूबाबाचं मुत्र प्राशन करावं लागेल. एवढंच नाही तर त्याच्या कामवासनेचे शिकार बनावे लागेल? यानंतर आपण अशा कोणत्याच भोंदूबाबाच्या चक्करमध्ये पडू नये. तशी शपथ आपण घ्यावी. जेणेकरुन आपल्याला कोणी फसवणार नाही. आपली इज्जत कुणी लुटणार नाही. आपल्या असहायतेचा फायदा घेवून कोणी आपल्यावर बलात्कार करणार नाही आणि पडलोच त्यात आणि जर कोणता भोंदूबाबा आपल्या मानसिकतेचा शारीरिक दृष्टीकोनातून गैरफायदा घेत असतील तर त्याचं लिंगच कापून फेकण्याची ताकद आपल्यात निर्माण व्हावी. ती करावी. एवढंच याप्रसंगी मांडणं आहे. जेणेकरुन कोणताच भोंदूबाबा आपलीच नाही तर आपल्यासारख्या कोणत्याच स्रीची अब्रू लुटणार नाहीत. अब्रू सुरक्षीत राहील. यात शंका नाही.
जर आपण असेच भोंदूबाबाचे ऐकून करत गेलो तर उद्या नक्कीच आपलं बरं होण्याऐवजी नुकसानच होईल यात शंका नाही."
श्यामलनं मांडलेली भुमिका. ती भुमिका स्पष्टपणे मांडून लोकांची भीती घालविणारी श्यामल. आज सुशिक्षीत वर्गाची धात्री बनली होती. तिनं अंधश्रद्धा जणू सोडली होती. आता शेतात धान्य पेरतांनाही ती अंधश्रद्धा पाळत नव्हती तर ती विज्ञानाचा वापर करुन शेती करीत असे.
'सावध व्हा, फसवणूकी वाढल्या आहेत.' श्यामलचं गावकऱ्यांना म्हणणं. ती गावाला सुधरंवायला लागली होती.
देवबाबा करीत असलेल्या चोरीवरुन व त्याच्या अंधश्रद्धेवरुन ती गावकऱ्यांचे डोळे उघडतांना म्हणत असे,
'आजचा काळ पाहता आज फसवणूकीचे प्रकार वाढलेले आहेत. लोकं कोणता ना कोणता फ्राॅड करुन फसवणूक करीत असतात. साधं किराणा दुकानदाराचं उदाहरण घेतलं तर दुकानदारही कमी साखर देवून ग्राहकांची फसवणूक करीतच असतो. बाजारात साधा भाजीपाला जरी विकत घ्यायला गेलो तर लोकं वजनमापाच्या यंत्रातच सेटींग करुन ठेवतात. बाजारातील एक किलो टमाटर घरी आणल्यानंतर ते नक्कीच घरी मोजले असता पाऊण किलो भरतात. नक्कीच पाव भाग टमाटर भाजीपाला विक्रेता खातो. शिवाय समोसे वा नाश्त्याच्या दुकानात गेल्यास तिथं पैशानं तर फसवणूक होते. शिवाय त्यात असलेले साहित्यही मूळ रुपातील वापरले जात नाहीत. भेसळ केलेली असते. बऱ्याचशा पदार्थात बेसनाऐवजी मैदाच वापरला जातो. आता तर साध्या सांभारवडीतही सांभार टाकण्याऐवजी बेसनच वापरलं जातं. तेही वाटाण्याचं पीठ बेसन म्हणून. वाटाणे स्वस्त आहे, त्याचं बेसन स्वस्त आहे यासाठी तसंच वड्यामध्ये व भज्यामध्ये बेसनाऐवजी काही प्रमाणात मैदा वापरला जातो. कारण मैदा हा बेसनापेक्षा स्वस्त आहे.
अलिकडील काळात साधं तांदूळ आणि गहू घेतो जरी म्हटलं तरी दुकानातून जो तांदूळ घेतो. त्या तांदळात इतर खालच्या दर्जाचा तांदूळ मिसळून उच्च प्रतीच्या तांदळाचा भाव ठेवून तांदूळ विकला जातो. तसंच गव्हाचंही करतात. इथे तर परिस्थिती अशी आहे की भेसळ केल्याशिवाय लोकांना पैसाच कमविता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालीय. जी भेसळ करणं म्हणजे एक प्रकारची लोकांची फसवणूकच आहे.
फसवणूक जशी पदार्थात भेसळयुक्त पदार्थ मिसळून केली जाते. तशीच फसवणूक वस्तूचे दाम जास्त सांगून केली जाते. दरवाजावर सिलेंडर आणून विकणारा व्यक्ती ग्राहकांकडून वीस पंचवीस रुपये वरचे घेतोच. शिवाय सिलेंडरच्या डब्यातही सिलेंडर कमी मिळत असते. ही फसवणूकच असते आणि ती आपल्याला माहीतही असते. परंतु आपण त्यावर काहीच करु शकत नाही. तेच घडतं बाजारातून आणत असलेल्या भाजीपाल्याबद्दलही. आपल्याला माहीत असतं की हे वजनकाटे खोटे आहेत. परंतु त्यावरही आपण काहीच न बोलता गुपचूप त्या वस्तू घेवून परत येतो.
पैसे कमविणे हा आजच्या काळातील लोकांचा एकमेव उद्देश. तो पैसा कसा कमवायचा हे त्यांचं त्यांनाच माहीत असते. कुणी हातचलाखी करुन पैसे कमवितात तर कुणी बुआबाजी करुन. गावामधील देवबाबाचं प्रकरण असंच. तिही शुद्ध फसवणूकच. तो दोषीच आहे. परंतु त्याच्या बाजूनं बोलतांना एक महिला म्हणाली की त्यानं काही महिलांना आमंत्रण दिलं नव्हतं की त्यांनी त्यांच्याकडे जावं व उपचार करुन घ्यावा. तसं पाहिल्यास आजची मंडळी ही सुशिक्षीत आहेत. त्यांनी त्याच्याकडे जायलाच नको होतं. डॉक्टरकडेच जायला हवं होतं. हेही खरं. परंतु लोकं गेले. त्याचं कारण आहे विश्वास. लोकांवर जेव्हा एखादं संकट येतं. तेव्हा ते पहिला मार्ग डॉक्टरचा उपचार करणे पसंत करतात. परंतु जेव्हा डॉक्टरी उपायानं एखाद्या रोगाचं निदान होत नाही. तेव्हा साहजिकच भोंदूबाबाकडील मार्ग धरतात. ज्यातून लोकं देवबाबाकडे गेली. जी सुशिक्षीत होती तरी गेली. कारण संकटानं त्यांना त्याकडे वळवलं. तसंच त्याचेकडील मार्ग सांगणारे काही सुज्ञ लोकही असू शकतील. ज्यांना देवबाबासारख्या भोंदूबाबाच्या भोंदूगिरीपणाची कल्पना नसेलच. तो चांगलंच करतो. अशी कल्पना असेल. त्यावर उत्तर म्हणून त्यानं उपचार करायला हवं होतं. परंतु त्यानं तसं न करता त्याच गोष्टीचा गैरफायदा घेत कितीतरी लोकांना लुबाडलं. त्यांना आर्थिक परिस्थितीनं बरबाद केलं नव्हे तर कंगाल केलं. एक एक चिंचोका एक एक लाख रुपये. कोणाला नऊ लाखानंही विकला. त्यातच त्यानं कितीतरी महिलांना देवत्वाच्या नावावर छळलं. त्यांचेवर लैंगिक अत्याचार केले. त्यांचं शोषण केलं. त्यांना भुलथाटा देवून फसवलं नव्हे तर भीती दाखवून बलात्कार केलेत. संकट दूर करण्याच्या नादात त्यानं महिलांचं केलेलं शोषण म्हणजे एक प्रकारची गुन्हेगारीच आहे. तसेच पैसे कमविण्याच्या नादात त्यानं केलेलं गैरकृत्य असहनीय आहे. शिवाय पैसे कमविण्याच्या नादात त्यानं विकलेले चिंचोके लोकांनी मजबुरीनं विश्वास करुन घेतले, जरी त्यांना फायदा झालेला नसेल तरीही. खरंच मृत्यूनंतर ही अवैध मार्गानं गोळा केलेली संपत्ती तो स्वतःसोबत घेवून जाईल काय? नाही. कधीच नाही. कारण मृत्यूनंतर कोणी काहीच घेवून जात नाही. मस्तकाला लावलेला एक रुपयादेखील नाही. तरीही पैसे कमविण्याचा नाद. आज त्याची संपत्ती ही करोडोत आहे. अन् एवढे दुष्कर्म केलेल्या व्यक्तीची ती संपत्ती सील व्हायला हवी. परंतु ती होणार नसल्यानं त्यांच्या येणाऱ्या वंशंजांना त्याचा फायदा. कोणी म्हणतात की तो जर स्रियांच्या इज्जतीशी खेळत होता, तर त्याला त्याच्या पत्नीनं विरोध का केला नाही? कदाचित त्याचे दुष्कर्म त्याच्या पत्नीला माहीत नसतील. अन् माहीतही असतील तरी संपत्तीच्या हव्यासानं तिनं विरोध केला नसेलच.'
श्यामलनं लोकांना सांगत असे व चूप बसत असे. लोकंही तिचं ऐकत असत. टरंतु ते ऐकून त्यावर कानाडोळा करीत. तरीही तिनं सांगणं बंद केलं नव्हतं. ती म्हणत असे.
'देवबाबा नावाच्या भोंदूबाबांनी जो व्यापार मांडला आहे अंधश्रद्धेचा. त्यात त्याचं चुकतंच. कारण तो त्यांच्याकडे चिंता घेवून येणाऱ्यांचा गैरफायदा घेतो. तसं पाहिल्यास डॉक्टर वर्गही लुटतोच, त्यांचेकडे जाणाऱ्या रुग्णांना. साधी खुन तपासणी करतांना कितीतरी पैसे मोजावे लागतात रुग्णांना. त्याच्याही तपासणीचे दर वेगवेगळ्या रुग्णालयात वेगवेगळे आहेतच. तेही लुटतात. तसाच लुटतो देवबाबा नावाच्या भोंदूबाबा. तो राहात असलेल्या गावातच. जर डॉक्टर असं रुग्णांना लुटत असतांना रुग्णांच्या असहायतेचा फायदा घेवून त्याच्या किडन्या काढून विकत असतील तर तो गुन्हाच. तसाच गुन्हा देवबाबांचा आहे व तो माफ करण्यासारखा गुन्हा नाही.
फसवणूक करणे. हातचलाखी हा यातीलच एक प्रकार. आजची मंडळी असंच खोटंनाटं बोलून पैसे कमविण्याच्या नादात लागलेले आहेत. कुणी बुआबाजी करुनही पैसे कमवीत आहेत. जे देवबाबानं केलं. असं श्यामलचं म्हणणं. तसे बरेचसे भोंदूबाबा करतात. हा प्रकार देशाच्या बऱ्याचशा भागात चालतो. लोकांना आजच्या काळात भुतंच जास्त दिसायला लागलेले आहेत. अन् हीच भुतं सुशिक्षीतांना जास्त दिसायला लागलेली आहेत. मग ती भुतं अशिक्षितांना तर दिसणारच. कोकणात हा प्रकार जास्त प्रचलीत आहे. भीती आणि हातचलाखीच्या जोरावर भोंदूबाबा खेळतो. आज आपल्या गावागावात केवळ देवबाबाच नाही तर असे बरेचसे भोंदूबाबा आहेत की जे लोकांना फसवतात. त्यातच लोकांना लुबाडतात. शिवाय प्रकरण जेव्हा हाताच्या बाहेर जातं. तेव्हा पश्चाताप होतो. त्यातच चीड येते अशा प्रकाराची. परंतु ती चीड येण्यापुर्वीच जर माणसानं हा भोंदूबाबाचा मार्ग अनुसरला नाही तर नाही चालत काय? परंतु लोकं ऐकत नाहीत. कारण भूतगिरी लोकांमध्ये जास्त शिरलेली आहे. मग अंधश्रद्धा निघणारच मनात. ज्यातून भोंदूबाबाचा जन्म होतो. मग फसतो माणूस. लोकांना फक्त माणसं मेल्यावरच भूत दिसतात. त्यांना कित्येक पशूपक्षांची हत्या करतांना व त्यांचे मांस प्राशन करतांना भूतंच दिसत नाही. कितीतरी झाडांची विनाकारण हत्या करतांनाही भूतंच दिसत नाही. हेच आपलं दुष्कर्म. आपल्या हातून घडत असलेलं. त्याच दुष्कर्माची शिक्षा म्हणून आपल्याला भोगमान येतं. कारण त्या पशुपक्षांच्या व झाडांच्या हत्या करणं पापच असतं. मग ते भोगमान आलं की बस, आपल्याला भूत लागलं ही आपली भावना. मग अंधश्रद्धा, बुवाबाजी सारंच काही. त्यापेक्षा प्राणीमात्रा व झाडांची कत्तल न करणं बरं नाही काय? विशेष सांगायचं म्हणजे जर आपण आपल्या मनात सकारात्मक विचार केले तर आपल्याला कोणतेच भोगमान येणार नाही. तसंच निसर्गातील प्राणीमात्रा व जीवसृष्टीची हत्या केली नाही तरही आपल्याला कोणतेच संकट येणार नाही. संकट सतावणार नाही. भूतं दिसणार नाही. अन् असं संकट नाही आलं तर कोणत्याच बुवांकडे बाजी करायला आपण जाणार नाही. त्यातच आपण आपलं जीवन सुखासमाधानात जगू शकू यात शंका नाही.
महत्वपुर्ण बाब ही की आज देवबाबाचाच बुवाबाजीचा फसवणूकीबाबत प्रकार नाही तर असे कितीतरी प्रकार अस्तित्वात आहेत फसवणूकीचे की ज्यातून लोकं फसवणूक करुन पैसे कमवीत असतात. कोणी सरळ मोबाईल स्कॅम करीत असतात तर कोणी भर बाजारातून जीनस विकून फसवणूक करुन पैसे कमवीत असतात. अशा सर्वच समाज घटकांकडून माणसानं सावध व्हायला हवं. इतरांनाही सावध करायला हवं. जेणेकरुन आपलीच नाही तर इतरांचीही फसवणूक होणार नाही. हे तेवढंच खरं.'
**************************५******************
लोकं भुलथाप देतात व देवाला बदनाम करतात. परंतु तसं करु नये. तसं करणं म्हणजे आपलीच स्वतःची फसवणूक आहे. असं श्यामल सांगत असे लोकांना. ती म्हणत असे.
'देवाची मुर्ती...... म्हणतात की एका घटनेतील भोंदूबाबाच्या कार्यालयात स्वामी समर्थांची मुर्ती होती. यावरुन काही लोकं देवांना देवबाबापाठोपाठ बदनाम करीत आहेत. देवाला बदनाम करण्याची काही लोकांनी चांगली युक्तीच काढली आहे. तसेही काही अंधश्रद्धाळू लोकं देवाच्या नावावर कोंबड्या, बकऱ्यांचा नाहकच बळी देत असतात. तसाच नरबळीही देतात. म्हणतात की असा बळी दिल्यानं देव प्रसन्न होतो. परंतु ज्या पाषाणात देव वसलेला असतो मुर्ती स्वरुपात. ती मुर्ती खरं तर ना कोंबड्या, बकऱ्याचं मांस खात असते, ना त्यांचं रक्त पीत असते. परंतु ही कृती देवाला बदनाम करणारी कृती असते. भुलथाप, ही अशी महत्वपुर्ण बाब आहे की त्या गोष्टीवर लोकं अति प्रमाणात विश्वास ठेवत असतात. त्याचं कारण आहे, अलिकडील काळात वाढलेला स्वार्थ व अंधविश्वास. याच स्वार्थातून व अंधविश्वासातून अलिकडील काळात संकटं निर्माण झाली. ज्याला विनाकारणची संकटं म्हणता येतील. मग साधारण इच्छा का असेना, त्यातही भुलथाप आहेच. देवबाबा असाच भुलथाप द्यायचा लोकांना. म्हणायचा की मीच क्रिष्ण आहे व तू माझी राधा आहे. मीच देव आहे व या देवाला प्रसन्न करण्यासाठी तू आपलं शरीर द्यायला हवं. असल्या अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मनात टाकून त्यानं लोकांना फसवलं नव्हे तर अशा प्रकारची भुलथाप देवून त्यानं प्रत्यक्ष देवालाच बदनाम केलं. जो देव एका पाषाणीय मुर्तीत निस्तब्ध स्वरुपात तटस्थ असतो. तो काहीही बोलत नाही. काहीही खात नाही आणि काहीही करीत नाही. हे जरी खरं असलं तरी बरंच काही करतो देव.
पुर्वी असं नव्हतं. पुर्वी अशा भुलथापांना अर्थही नव्हता आणि तेवढं महत्वही नव्हतं. लोकं जे बोलत, त्याला वचन समजलं जाई. शब्दाला विशेष असं महत्व होतं. शब्द हाच बाण असायचा, एखाद्या धनुष्यातून निघाल्यासारखा. साधू, ऋषिमुनी, एखाद्यावेळेस एखाद्यानं त्यांची चेष्टा केल्यास ते चेष्टा करणाऱ्याविरुद्ध शब्द काढत. जे शब्द म्हणजेच शाप ठरायचे. त्याचं परिमार्जन नसायचं. कारण ते जे बोलत, तसंच घडायचं. जो शब्द आपल्या तोंडातून निघाला की बस. त्या शब्दाला विशेष महत्व निर्माण व्हायचं. आज तसं नाही. आज सर्रास खोटं बोललं जातं. खोटं खोटं आश्वासन दिलं जातं. जे बोललं जातं. त्याप्रमाणे वागणूक दिसत नाही. ज्यातून माणसं परागंदा होतात व अंधविश्वास वाढतो.
अलिकडील काळात भूलथापांना अधिक महत्व आलेले आहे. राजकारणातील नेते लोकांना भुलथापा देवूनच निवडून येत असतात. मात्र नंतर त्या भुलथापांची परिपुर्ती करतीलच याची शाश्वती नसते. प्रेमातही तेच हाल असतात. प्रेमात पडलेले प्रेमवीर एकमेकांना भुलथापाच देतात. म्हणतात की आपलं प्रेम अमर आहे व आपण विवाह केल्यानंतर एकमेकांना सोडून जाणार नाही. मग विवाह होतो, ज्याला आईवडीलांची मर्जी नसते. त्यातच काही दिवस बरे जातात. काही दिवसानंतर त्यांचे वाद होतात. ज्यातून घटस्फोट होत असतात.
हे झालं विवाहानंतरचं आयुष्य. विवाहापुर्वीचं आयुष्य यापेक्षा वेगळंच आहे. त्याला विदारक सत्य म्हणता येईल. प्रेमवीर विवाह करण्याच्या भुलथापा देतात आणि त्याच भुलथापा देवून लैंगिकतेची परिपुर्ती करुन घेतात. ज्यातून मुली गरोदर राहतात. परंतु हे जेव्हा कळतं. ते कळल्यावर भुलथापा देणारे तरुण मुलींना अकाली सोडून जातात. ज्यातून एकतर तिचा जीव जातो किंवा तिच्या गर्भातील बाळाचा. ज्याचा काहीही दोष नसतोच.
अलिकडील तांत्रिक व मांत्रिकही भुलथापा देवू लागले आहेत. असं जाणवत आहे. गुप्तधन मिळवून देण्याच्या नादात इथं नरबळी मागणारे मांत्रिक काही कमी नाहीत. त्यातच स्वतः आपलं मंगल पाहू इच्छिणारे आईबाप नरबळीच्या नावावर स्व लेकरांचा बळीही घेत असतात. हे सांगायला नकोच. हे सगळं भुलथापातूनच घडतं. ज्यानं कधीच देव पाहिलेला नसतो. त्या माणसालाही देवाच्या गाभाऱ्यात देव वसतो. अशी भुलथाप देवून कित्येक पुजारी लुटत असतांना आपण पाहिले. एवढंच नाही भूत कधीच न बघितलेल्या माणसांना मेलेली माणसं भूत बनतात. ते आपल्याला छळतात. हे प्रकर्षानंच सांगीतलं जातं. अशावेळेस भुलथाप ही गोष्ट श्रेष्ठ गोष्ट ठरते. या भुतप्रेतातून कितीतरी पैसा कमवला जातो नव्हे तर अशाच प्रकारच्या भूलथापा देवून काही तांत्रिक मंडळीही महिलांच्या इज्जतीशी खेळतात. देवबाबानं लोकांना भुलथापा देवूनच भूरळ घातली. अशी भूरळ घातली की त्या भुरळमधून काही महिलांनी आपलं शरीरच तांत्रिक बाबाला समर्पीत केलं. त्यातच काही लोकांनीही अशाच भुलथापांवर विश्वास ठेवून आपल्याजवळील प्रचंड प्रमाणातील पैसे पाणी त्या तांत्रिक बाबाला देवून त्याच्याकडून बदल्यात फक्त चिंचोके विकत घेतले. आता लोकं म्हणतात की त्यांना तांत्रिक बाबानं छळलं. त्यानं लुटलं तर महिला म्हणतात की तो तांत्रिक बाबा त्यांच्या इज्जतीशी खेळतो.'
श्यामल विचार करीत होती. 'लोकांनी तरी का बरं जावं त्या तांत्रिक बाबांकडे, विज्ञान प्रगतीपथावर असतांना. आज सुर्य, चंद्र, त्यांचं ग्रहण कसं होतं. हे शाळेत शिकलेले असतांनाही केवळ भुलथापांच्या वा अंधश्रद्धेच्या आधारावर त्याचा संबंध आपल्या जीवनाशी लावून घरातील शिजलं असलेलं अन्न हे फेकून द्या वा एखाद्या भिकाऱ्यांना दान द्या म्हणून भुलथाप देणारी मंडळी या जगात काही कमी नाहीत. तसेच ग्रहणात वस्र खराब झाले म्हणून गरिबांना दान द्या म्हणणारेही जगात काही कमी नाहीत. इथं कोंबड्या बकऱ्यांचे वा पशुपक्षांचे मांस खाणारेही काही कमी नाहीत. त्यांची भूतं कोणालाच दिसत नाहीत. दिसतात फक्त माणसांची भुतं. अशातच ज्या गरीबांना आपण भुलथापांचे बळी पडून अन्नधान्य देतो, वस्र देतो. खरंच हे ग्रहण त्यांचेवर परिणाम करतात का? आजच्या विज्ञानवादी युगात याच चंद्र आणि सुर्याच्या ग्रहणाचा संबंध गाभाऱ्यातील मुर्तीशी लावून त्या दिवशी संबंधीत मुर्ती कडेकोट बंदोबस्तात ठेवतात. तेव्हा देवाची मुर्ती बाटते आणि ज्यावेळेस देवाचेच पुजारी असलेली मंडळी भर मंदिरातच देवांच्याच मुर्तीसमोर महिलेच्या अशिलेच्या चिंधड्या उडवतात. तेव्हा या विदारक गोष्टीला काय म्हणावे? देवबाबा नावाचा भोंदूबाबा आपल्या कार्यालयात स्वामी समर्थांची मुर्ती लावून बसतो आणि त्याच मुर्तीसमोर महिलांची इज्जत लुटतो. ही श्रेष्ठ बाब नाही. अशी बरीच तांत्रिक मंडळी आहेत की जी देवालाच साक्षी ठेवतात, असे घिनौने कृत्य करीत असतांना. काही तर चक्कं देवालाच साक्षी ठेवून कोंबड्या, बकऱ्याचा बळी देतात नव्हे तर नरबळीही देतात. हा व्यापार चालतो आज देवांच्याच नावावर. देवाच्या नावावर भुलथापा देवून लोकांना लुटणं. त्यातच देवाच्याच नावानं अश्लिलतेचा व्यापार करुन देवांनाच बदनाम करणं. या कृतींना काय म्हणावं? खरं तर देव जाग्यावरच असतो. परंतु स्वार्थी असलेली मानवजात देवांच्या नावानं व्यापार करुन त्याला बदनाम करीत असते. स्वतः वाईट कृत्य करते आणि देवांना वाईट ठरवत असते. ती स्वतःच मदिरा व मांसाचं सेवन करते व देव कोंबडू बकरु मागते, असं म्हणून त्यांचा बळी घेत असते.
आता पुरं झालं देवांना बदनाम करणं आणि देवांच्या नावानं इतरांना भुलथापा देणं. हे एकच पापच आहे. परंतु देव असल्या प्रकारच्या पापाचे शंभर गुन्हे माफ करीत असतो. जेव्हा त्या गुन्ह्यात वाढ होते. जो एकशे एकवा गुन्हा असतो. तेव्हाच बींग फुटतं. त्याचा स्फोट होतो व त्या स्फोटाचं रुपांतरण आपली गुन्हेगारी प्रकाशित होण्यात होते. म्हणूनच माणसानं चांगलं वागावं. चांगलं वर्तन करावं. चांगलं वर्तन ठेवावं. भुलथापांना बळी पडू नये. ज्यातून आपलंच आयुष्य चांगलं जाईल. घरात सुखशांती लाभेल व घर घरासारखं वाटेल. यात शंका नाही.'
'जोडीदारही करु शकतो आपल्या बाळांवर संस्कार' श्यामलचं म्हणणं. तिला वाटत होतं की जोडीदार आपल्या बाळावर संस्कार करु शकतो. परंतु जोडीदार तसाच हवा. तो जर दारु पित असेल, व्याभिचारात लिप्त असेल तर त्याची मुलं अवश्य बिघडतात. ती एवढी बिघडतात की नशेच्या आहारी जातात व आपल्याच जीवनाचं बरंवाईट करुन टाकतात.
श्यामलचा मुलगा मोठा झाला होता. ज्याचं नाव राज होतं. त्याला इंजिनियरींग महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यानं इंजिनियरींग प्रवेशासंबंधी जेईई च्या परिक्षेचा फॉम भरला होता. आज पेपर होता. त्यानिमित्तानं तिचं जाणं झालं होतं महाविद्यालयात.
ते एक इंजिनियरींग कॉलेज. ज्या कॉलेजमध्ये प्रसन्नवर्धक जागा. मुलांच्या तासिका होत होत्या का तर माहीत नाही. सर्व मुलं मैदानावर बसली होती झाडाच्या खाली. तसा उन्हाळा व कडक उन्हं.
मुलांचं झाडाखाली बसणं. कडक उन्हाळ्यामुळे झाडाचा आसरा. मग तिनं परिस्थिती विचारात न घेता त्या मुलांना विचारलं,
"आपण असे झाडाखाली बसले आहात. तासिका नाही का आपल्या?"
तो तिचा प्रश्न. त्यावर एक मुलगा म्हणाला,
"सर, शिकवीतच नाहीत वर्गात."
"का बरं?"
"पंखेच आहेत. किती उकडतंय वर्गात. या झाडाखाली तरी बरं वाटतंय. तसंच शिक्षकांनाही वाटत असेलच."
त्या मुलांची उत्तरं. तशी शिक्षकांची बरीच कारणं असतील व पहिलं कारण असेल, विद्यावेतन. जे अतिशय अल्प असेल. मग जॉब करणारी मुलं संसाराला लागणारी मिळकत कमविण्यासाठी कुठेही खाजगी ठिकाणी कामे करतात व पैसे कमवितात. मग ते अशा ठिकाणी पार्ट टाईम जॉब करतांना कधी उशिरा पाशिरा येतात तर कधी येतच नाही. त्यांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काही घेणंदेणं नाही आणि इंजिनियरींग महाविद्यालय का असेना. परंतु त्यांनाही केवळ पैसेच कमविण्याशी मतलब असतो. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी नाही. राहिला निकाल. तर निकालात गुण चांगलेच मिळतात. ते कॉलेजवर अवलंबून असतं. कारण परिक्षा कॉलेजच्याच असतात. गुण टाकणारेही कॉलेजचेच. आता राहिला नोकरीचा प्रश्न. तर काही मुलं आजच्या काळात मोबाईलमधून अभ्यास करतात. काही वेगळी शिकवणीही लावतात. ज्यातून त्यांना गुण जास्त मिळतात. अशा होतकरु मुलांसाठी खाजगी कंपन्या येतात. ज्या कंपन्यांना मुलांची गरज असते. ज्यांची महाविद्यालयाशी साठगाठ असते. परंतु बाकी विद्यार्थ्यांचं काय? त्यांना तर प्रात्यक्षिक स्वरुपाचा अनुभवच नसतो. मग अशी मुलं इंजिनियरींगची पदवी तर कमवतात. परंतु ते जागतिक स्तरावर स्पर्धेत प्रात्यक्षिक ज्ञान नसल्यानं टिकू शकतात का? याचंही उत्तर नाही असंच आहे.
परीसराचं निरीक्षण करतांना तिनं पाहिलं की चार पाच मुलांमध्ये एक मुलगी होती व ती मुलगी एक मुलाच्या मांडीवर झोपली होती अगदी निवांतपणे. कदाचीत तो तिचा प्रियकर असेल. मग तिच्या चर्चा सुरु झाल्या. हे असं का? त्यावर दुसऱ्यानं उत्तर दिलं. यात तिच्या आईवडिलांचा दोष? मुलगी पळून जाते, तेव्हा आईवडील ओरडतात. परंतु ती घरी उशिरा येत असेल तर आईवडीलानं विचारायला हवं की तिला का वेळ झाला. तसंच ती एखाद्यावेळेस एखाद्या दिवशी नेहमीच्या जेवनापेक्षा कमी जेवत असेल, तर तिला विचारायला हवं की तू नेहमीच्या जेवनापेक्षा आजच का कमी जेवली. हे तेच मायबाप विचारु शकतात. जे त्यालायक असतात. जे दारु पिवून घरी येत असतील. जी बाई आपला पती असतांना दुसऱ्याच पराया माणसांसोबत आपल्या मुलांसमोर रंगरलिया साजऱ्या करायला जात असेल किंवा त्यांची किरकोळ कारणांवरून सतत भांडणं होत असतील तर ती आई वा ते वडील आपल्या मुलांना, ती कुठं गेली होती. ती का कमी जेवली. हे विचारुच शकत नाही. विचारण्याचा त्यांना हक्कं नसतोच. अन् समजा एखाद्यावेळेस एखाद्यानं विचारलंच तर मुलांचं त्यांना उलट उत्तर असतं, 'आपलंच पाहा ' मग मुलांसमोर आईवडिलांना चक्कं चूप बसावं लागतं. आता ही मुलगी त्या सर्व मुलांमध्ये एकटीच असून तिचं त्या मुलाच्या मांडीवर झोपणं. असं दर्शवते की त्या व्यक्तीचं बरोबर होतं. कदाचीत तिच्या आईवडिलांचं तिच्याकडं लक्ष नव्हतं. कारण तो व्यक्ती जर तसं बोलला तर तो अनुभवावरुन बोलला असावा. महत्वाचं सांगायचं झाल्यास अनुभव हाच गुरु. त्यानुसार आजच्या काळात मुलं घडत असतात. परंतु घरी जर आपण भांडणं होत असतील, आईवडील भांडत असतील, वडील दारुडे असतील. तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर किंवा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो. असं होवू नये म्हणून घरी वडिलांनी सुधरावं. दारु पिवू नये. त्यातच भांडणं करु नये म्हणजे झालं. शिवाय आई व वडिलांनीही अनैतिक कामेही करु नये. तसंच कुटुंब म्हटलं तर भांडणं आलीच. परंतु अशी भांडणं करायची झाल्यास तिही आपल्या पाल्यांच्या समक्ष करु नये की ज्याचा परिणाम भविष्यात त्यांच्याच मुलांवरच होईल. मुलं बिघडतील. ती नशेच्या आहारी जातील. कोणी मांडीवर झोपतील. कोणी रेस्टॉरंटमध्ये जातील तर कोणी पळून. ज्यातून ती मुलं बलात्काराचे शिकार ठरतील. कोणाच्या किडन्या वा मानवी अवयव काढले जातील तर कुणाचा किरकोळ गोष्टीसाठी खुन केला जाईल तर कुणी खुनही करतील. प्रत्येक मुलगा हा आपल्या जीवनाची राखरांगोळी स्वतःच करतील, यात शंका नाही.
देवबाबा अंधश्रद्धाच प्रसवीत होता. कारण त्याला धान्य चोरता येत होतं लोकांच्या शेतातील. परंतु श्यामलमुळं त्याला शक्य होत नव्हतं.
श्यामलनं तेच संस्कार दिले होते आपल्या लेकरांना. तिची मुलंही संघर्ष करीत करीत शिकत होती. लहानाची मोठी होत होती. अशातच तिचा दुसरा मुलगा राज बारावीत असतांनाच त्यानं ज्याप्रमाणे जे ई ई च्या प्रवेश परिक्षेची प्रवेशपात्रता दिली. तशीच त्यानं बारावीत असतांनाच डॉक्टर पेशाकडे जाण्यासाठी नीट परिक्षेचाही फॉम भरला. परंतु दुर्दैव. दुर्दैव असं की जी त्यानं नीटची परिक्षा दिली. त्या परिक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्यानं व तो पेपर फुटल्यानं ती परिक्षाच रद्द झाली. ज्या परिक्षेचा त्यानं चांगला अभ्यास केला होता.
नीटचा पेपर रद्द. विद्यार्थ्यांचा दोष काय? श्यामलला तसं वाटणं साहजीकच होतं. कारण नीट परिक्षेचा जो पेपर फुटला. तो फुटलाच कसा? असं तिला वाटत होतं. तशी ती विचार करु लागली.
नीटचा पेपर फुटला. तो एवढ्या प्रमाणात फुटला की सरकारला नीटची झालेली परिक्षाच रद्दच करावी लागली. हे सगळं बरोबर असलं तरी पेपर फुटीचं राजकारण न समजलेलं कोडं आहे. असं तिला वाटत होतं. मग ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला आणि पेपर चांगला सोडवला. त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं व चांगला पेपर सोडविण्याचं काय? शिवाय हाच पेपर नव्याने पुढे घेतल्यानंतर आज ज्या विद्यार्थ्यांचा पेपर चांगला गेला होता. त्याचा पुढील पेपर चांगला न गेल्यास त्याच्या भवितव्याचं काय? हाही प्रश्न जनसामान्य लोकांना पडलेला होता व तो भेडसावत होता.
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या मेडीकल प्रवेशासाठी सक्षम ठरविणारी नीटची परिक्षा. ज्यातून ती रद्द करण्यात आली व नीटच नाही तर संपुर्ण परिक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्हं उभं राहिलं. तसं पाहिल्यास ह्या परिक्षा ज्या आताच्या काळात घेतल्या जातात. त्या परिक्षेचे पेपर फुटतातच कसे? हाही आणखी एक प्रश्न उभा राहतो.
तिचा तो विचार. तसा तो विचार येताच तिला आठवला, दहा वर्षापासूनचा काळ. ज्या काळापासून पेपर फुटणं सुरु झालं होतं. त्यावर तिला विचार आला.
पेपरफुटीची समस्या ही आजची नाही. ही दहा वर्षापासून सुरु आहे. सन २०१६ मध्ये रिव्यू ऑफिसर पदाच्या परिक्षेचा लखनौमध्ये पेपर फुटला. सन २०१७ मध्ये बारावीचा बूक किंपिंग आणि अकाउंटन्सीचा पेपर फुटला. याचवर्षी स्टॉप सिलेक्शन कमिशनचा टेपर फुटला. सन २०१८ मध्ये पेपर फुटण्याच्या चर्चेवरुन दहावी, बारावीच्या गणित व अर्थशास्राच्या परिक्षा पुन्हा घेण्यात आल्या. याचवर्षी गुजरातमध्ये पोलीस भर्तीचा पेपर फुटला. सन २०१९ मध्ये रेल्वे भर्तीचा पेपर फुटला. सन २०२० मध्ये विधी विभागाचा पेपर फुटला. याचवर्षी उत्तर प्रदेशात बारावीचा पेपर फुटला. सन २०२१ मध्ये उत्तर प्रदेशात टि ई टी चा पेपर फुटला. याचवर्षी नीटचाही पेपर फुटला. सन २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात लेखपाल भर्तीचा पेपर फुटला. याचवेळेस बिहारमध्ये लोकसेवा आयोगाचा पेपर फुटला. सन २०२४ मध्ये नीटचा पेपर फुटला. तसेच यावर्षी म्हणजेच २०२६ मध्ये बारावीचे काही पेपर फुटले आणि आता नीटचा पेपर फुटला.
तो दहा वर्षापुर्वीपासूनचा काळ. तो काळ तिला वर्षानुसार आठवत होता. तसं तिला आठवलं तिचं बालपण. ज्या बालपणात पेपर फुटतच नव्हते. तसेच पेपर हे कठीण स्वरुपाचे यायचे. त्या पेपरमध्ये पस्तीस गुण सुद्धा मिळविणे कठीण व्हायचे. एकेक गुणांसाठी फारच कष्ट करावं लागायचं. अलिकडील काळात असं नव्हतंच. अलिकडील काळात मुलांना चांगले गुण पडत होते. पेपरफुटीवरुन तिला तिचं बालपण आठवलं होतं व विचार आला होता.
पुर्वी असं नव्हतं. कोणतेच पेपर फुटत नव्हते. लोकं इमानदार होते व ते पेपर फोडण्याच्या भानगडीत नसायचे. शिवाय त्या काळात न्यायालयही सक्षमतेनं दोषींवर कडक कारवाई करायचं. परंतु आज तसं नाही. आज दहा निर्दोषांचं नुकसान झालं तरी चालेल. परंतु एका दोषी व्यक्तींवर कारवाई व्हायला नको. अशी अवस्था आहे. आज दोषींवर सरकारही जास्त कडक स्वरुपाची कारवाई करीत नाही आणि न्यायालयही नाही. दोषींना मिळते, अतिशय सौम्य स्वरुपाची शिक्षा. ज्यातून त्यांची हिंमत वाढते व पेपर फोडला जातो, फुटतो. ज्यातून अकार्यक्षम, सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांचा फायदा होतो. परंतु जे विद्यार्थी वर्षभर अगदी डोळे फोडून अभ्यास करतात. त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय? त्यांची क्रमवारी घसरत असल्यानं अशा विद्यार्थ्यांचा पुढील लायक असलेल्या शिक्षणासाठी वर्णी लागत नाही. ज्यातून त्यांचं भवितव्य अंधकारमय होतं.
सध्याच्या काळात प्रत्येक वर्षी कोणते ना कोणते पेपर फुटतच आहेत. ज्यातून विद्यार्थ्यांचा मानसिक ताण वाढत आहे. एवढंच नाही तर ज्या केंद्रावर पेपर फुटतो. त्या केंद्रावरील इतर विद्यार्थ्यांचा दोष नसतांना त्या केंद्रावरील सर्वच विद्यार्थ्यांनी कॉपी केलेली असेल. अशी शंका घेवून इतर विद्यार्थ्यांनी सोडविलेले पेपर अधिक काटकसरीनं तपासले जातात. ज्यातून इतर होतकरु विद्यार्थ्यांचं नुकसानच केलं जातं. यात त्यांचा दोष नसतोच. तरीही असं घडतंच. आज विद्यार्थ्यांचा जो पेपर फुटतो. तो पेपर का फुटू शकतो? त्याचं कारण आहे, विद्यार्थ्यांबाबत राबवली जात असलेली परिक्षा यंत्रणा. जी यंत्रणा गोपनीय स्वरुपाची असायला हवी. परंतु राहात नाही. शिवाय दोषींवर कारवाई होते. परंतु तात्पुरत्या स्वरुपाची. ठोस कारवाई होतच नाही. ना न्यायालय त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदेश देत. ना शासन कडक पावलं उचलत. ज्यातून अशा घटना दरवर्षी होत आहेत. व्यतिरिक्त शासन त्यांच्यावर कडक कारवाई न करता परिक्षा पद्धतच रद्द करुन टाकतात. ज्यातून नुकसान आपलं थोडंच झालं. विद्यार्थ्यांचं झालं ना. होवू दे. आपलं काय जातं? अशा प्रकारची उदासिनता घेवून सर्रास झालेली परिक्षाच रद्द केली जात आहे. ज्यातून विद्यार्थ्यांचे भवितव्य खराब होत आहे. महत्वपुर्ण बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे की शासनानं अशी परिक्षा रद्द करु नये. अशी परिक्षा रद्द न करता दोषींवर कडक कारवाई करावी. त्यातच शासनाला जमत नसेल तर न्यायालयानं तरी दोषींवर कडक कारवाई करावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांचं भवितव्य खराब होवू नये. राहिला प्रश्न पेपर फुटल्याचा. तर पेपर फोडून जेही विद्यार्थी पास होतात. ते सक्षम असतातच असे नाही. समजा ते सक्षम झालेही अभ्यासक्रमासाठी. तरी त्या विद्यार्थ्यात शैक्षणिक गुण नसल्यानं ते विद्यार्थी पुढील अभ्यासक्रम शिकतांना त्या अभ्यासक्रमातून कधीच पुढे जावू शकत नाही. कारण कावळ्याला कितीही साबन, पावडर वा पेंट लावून दिला. तरीही कावळा काळाच असेल. तो पांढरा बनणार नाही. तसंच परिक्षेचं आहे. कारण हिरा हा हिराच असतो. तो कोळशात जरी लपून बसला असला तरी. त्यामुळंच पेपर जरी फुटला असला तरी सरकारनं यापुढं परिक्षा रद्द करु नये. दोषींवर पाहिजे त्या प्रमाणात कडक कारवाई करावी. जेणेकरुन पुढील पेपर फोडतांना वारंवार विचार करावा लागेल.
श्यामल विचार करीत होती पेपरफुटीबद्दल. कारण तिच्या मुलाचं नुकसान झालं होतं. मुलानं नीटची परिक्षा दिली होती. तसं त्यानं सांगीतलंही होतं की त्याच्या नीट परिक्षेचे पेपर चांगले गेले. परंतु आज उपाय नव्हता त्यावर. कारण नीट परिक्षाच सरकारनं रद्द केली होती.
नीट परिक्षा रद्द झाली होती. तोच काही जणांनी आत्महत्याही केली होती. ज्यात सरकारच्या चुकीमुळं आईवडिलांचंच नुकसान झालं होतं.
**********************६*********************
चित्रपटंही करु शकतात आपल्यावर संस्कार. श्यामलचं तेच म्हणणं. संस्काराची परिभाषा तिच्या मनात कुटकूट भरली होती. ती आपल्या लेकरावर संस्कार करु पाहात होती. त्याच संस्कारांची पेरणी ती मुलांवर करु पाहात होती. आपल्या शेतात ज्याप्रमाणे धान्य पेरतो तसं. तसा विचार करता करता सहजच तिच्या मनात आले.
प्राचीन काळात होती काय सुसंस्कारीत पिढी? असा विचार केल्यास त्याचं उत्तर नाही असंच निघतं. खुद्द रामायणाचा काळ पाहिल्यास त्या काळात आपल्या मातेचं वचन पाळणारा राम आपल्याला दिसतो. परंतु आग लावणारी मंथरा पडद्याआड दिसते. तिची आग लावणं आपल्याला दिसत नाही. मग ज्या रामावर संस्कार केलेले दिसतात. त्यातच मंथरेवर संस्कार केलेले दिसत नाहीत. शिवाय ज्या कैकेयीला मंथरेकडून भडकवलं जातं. ती कैकेयीही संस्कारी दिसत नाही. तिची भावना ही लोप झालेली दिसते. तिनं पुत्रासमान असलेल्या आपल्या सवतीच्या बाळाला वनवास दिला, पुत्रलोभानं. शिवाय म्हणतात की रामानं राजसत्ता सांभाळल्यावर शंभूक ऋषींची हत्या केली. कारण तो शुद्र होता व शुद्रांना तपश्चर्या करण्याचा अधिकार नव्हता. शंभूक ऋषी तपश्चर्या करतांना दिसला. म्हणूनच त्याची हत्या. ज्याच्या हत्येत राम हा दोषी ठरतो. परंतु शंभूक ऋषींची हत्या करण्याची आग लावणारा व्यक्ती दोषी दिसत नाही. इथं जो राजसत्ता सांभाळतो. त्यालाच कळतं की राज्य कसं चालवावं ते.
राज्य चालवतांना चूक बरोबर न पाहता अधिभार पाहावा लागतो. जनमत जर हत्येच्या बाजूनं असेल, तर हत्या करावीच लागते मनात इच्छा नसतांनाही. तेच घडलं रामाच्याही बाबतीत. इच्छा नसतांना केवळ जनमताचा विचार करुन शंभूकांची हत्या केली गेली व स्वतःच्या माथ्यावर एका निरपराध माणसाच्या खुनाचा डाग लावण्यात आला. हीच स्थिती महाभारतकाळ अनुभवतांना दिसते. आईच्या आज्ञेत वागणारे नव्हे तर जेष्ठ भावाच्या आज्ञेत वागणारे वीर आणि बलदंड असणारे भाऊ, मोठा भाऊ द्युत खेळत असतांना त्याला विरोध करीत नाहीत. शिवाय तो आपल्या भावांना व आपल्या पत्नीलाही द्युतात डावावर लावतो. तरीही ते विरोध करीत नाही. हा संस्कार दिसतो आणि आपल्याच भावांना दास बनवून आपल्याच वहिणींनी अब्रू लुटणाऱ्या दुर्योधनावर झालेले संस्कार हे कुसंस्कार वाटतात आपल्याला.
संस्कार........ संस्कार दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे सुसंस्कार व दुसरा प्रकार आहे कुसंस्कार. संस्कार हे केले जात नाहीत. होत असतात. महाभारतात दाखवलं आहे की कौरव आणि पांडव द्रोणाचार्य ऋषीच्या आश्रमात शिकत असतांना द्रोणाचार्य दोघांवरही सुसंस्कारच करण्याचा प्रयत्न करतो. परंतु पांडवांवर सुसंस्कार होतात व कौरवांवर कुसंस्कार. असे का? त्याचं कारण आहे वातावरण आणि तुमचं मन. आपल्यात उपजत जे गुण असतात. ते गुण कोणत्याही पद्धतीनं बदलवता येत नाहीत. ते उपजत गुण आपल्या मनानुसार वृद्धींगत होत असतात. एव्हाना, भक्त प्रल्हादानं हिरण्यकक्षपूच्या पोटी जन्म जरी घेतला असेल तरी तो राक्षस बनत नाही. कारण त्याच्यामध्ये जन्मापासून असलेला सात्विक गुण. हा सात्विक गुण लोकांमध्ये जन्मापासूनच उपजत सारखा असतो. म्हणतात ना की कुत्र्याचं शेपूट कुठंही घातलं तरी वाकडंच राहणार. तसंच आहे संस्काराचं. संस्कार हे कोणत्याही प्रक्रियेनं बदलवता येत नाही. हं, संस्काराचा गुण तेवढा वाढवता येतो. जर एखाद्याच्या व्यवहारात जन्मापासून सात्विक गुण असेल तर तो वाढवता येवू शकतो. ज्याला संस्कार म्हणता येईल. तसेच कुसंस्कारही वाढवता येतात. काही संस्कार तर आईवडिलांच्या मार्फत होत असतात. जसे आईवडील तसेच संस्कार. जर आईवडील हे कुसंस्कारी असतील तर हमखास कुसंस्कार होतात मुलांवर आणि सुसंस्कारी असतील तर हमखास सुसंस्कार. परंतु हे जरी खरं असलं तरी बरेचदा उलट घडतं. सुसंस्कारी कुटुंबातील मुलं हे कुसंस्कारी बनू शकतात आणि कुसंस्कारी कुटुंबातील मुलं हे सुसंस्कारी. याचं कारण आहे परिसरातील घटना व दृश्य. त्या घटना जर सौजन्यशील असतील वा सोज्वळ आणि त्या विद्यार्थ्यांच्या मनाला अनुकूल असतील तर परिस्थितीनुसार माणूस बदलतोच. जसा वाल्याचा वाल्मिक बनतो. अंगुलीमालचा अहिंसक बनतो आणि आम्रपालीची भिक्षुणी आम्रपाली. हा बदल का होतो? हा बदल होतो, त्याच्यासमक्ष घडलेल्या घटनांनी. आजही तसा अपेक्षित वर्तनबदल आपल्या मुलात घडू शकतो. जर त्याच्यासमोर तशी परिस्थिती निर्माण केली तर....... तसे सुसंस्कार हे मोठेपणी न करता लहानपणापासूनच केले तर बरं. कारण मोठ्या झालेल्या झाडाची फांदी लवकर मोडते. तशी लहान रोपट्याची फांदी लवकर तुटत नाही. ती वाकते. असे का? तर मोठ्या झाडाच्या फांदीत ताठरपणा आलेला असतो. तसा ताठरपणा लहान फांदीत नसतो. लहान बाळाची हाडं ही लवचीक असतात. ती मोडली की लवकर जुळतात. तसं मोठ्या माणसाचं होत नाही. तसंच आहे सुसंस्काराचं. सुसंस्कार हे लहानपणी योग्य पद्धतीनं केले जावू शकतात. कारण त्यावेळेस बाळांचं मन तेवढ्या प्रमाणात विकसित झालेलं नसतं. त्याला योग्य अयोग्य काय असतं. ते कळत नाही. ते मूल लहानपणी फुलपाखरु, सरडे मारतात. सरड्यांना तंबाखू चारुन नाचवतात. कारण त्यांना मजा येते. त्यावेळेस त्यांना उपरोक्त प्राण्यांना वेदना होत असतात. ते मरत असतात. ते कळत नाही.
सुसंस्कार हे केले जावू शकतात योग्य अशा माध्यमांनी. ज्यात आजच्या काळात सशक्त माध्यमं आहेत चित्रपटं. अलिकडील काळात मुलांना कार्टून जास्त आवडतं. कार्टून चित्रपटंही जास्त आवडतात. तसेच एखाद्या चित्रपटात मारझोड असेल तर ते त्याला जास्त आवडतं. तशीच कृती ते मूल दिवसभर करीत असतं. आपण पाहिले आहे की लहानपणी टिव्हीवर रामायण सिरीयल लागायचं. मुलं ते सिरीयल आवडीनं पाहात व त्याची कृती करतांना धनुष्यबाण बनवत व खेळत असत. हा वर्तनबदल कशावरुन दिसायचा? तो दिसायचा, त्या बालवयात रामायण नावाची सिरीयल पाहिल्यानं. त्यात दाखविलेल्या रोमांचक घटनानं. त्या घटना बालवयात मनाला भावल्यानं. जे रामायण काल लहान मुलांवर योग्य ते संस्कार करीत होतं. आजच्या काळात तशाच प्रकारच्या सिरीयल वा चित्रपटं काढून ते चित्रपट लहान मुलांना दाखवले तर नक्कीच लहान लहान मुलांवर योग्य ते संस्कार नक्कीच करता येवू शकतील यात शंका नाही.
प्राचीन काळात लहान मुलांवर कसे संस्कार करायचे. यासाठी माध्यम नव्हते. म्हणूनच त्यावेळेस विचार यायचा. त्यामूळं शिक्षक नावाचा एक घटक निर्माण झाला की जो आपल्या लहान मुलांना योग्य काय आणि अयोग्य काय, ते समजावून सांगेल. तो सांगायचाही व त्यानुसार मुलं घडतंही. परंतु आज मात्र तसं नाही. आजचा शिक्षकच व्यसनाच्या आहारी गेलेला दिसतो. तो व्याभिचारात तल्लीन असलेला दिसतो. काही शिक्षक नावाचं व्यक्तीमत्व संस्थाचालक जेव्हा बनतो. तेव्हा तो पैसे खाण्यात लीन असतो. त्यामुळं शिक्षकांवर आजच्या काळात पाहिजे त्या प्रमाणात विश्वास ठेवता येत नाही. मग सुसंस्कार तर मुलांवर करायचे. त्याला मग नेमका मार्ग कोणता? आजच्या काळातील तो मार्ग आहे, चांगले चित्रपट दाखवणे. चांगले चित्रपट सतत दाखवल्यानं जे संस्कार विद्यार्थ्यांवर रुजू शकतील. ते संस्कार कधीच मिटणारे नसतील. परंतु आज ओबडधोबड चित्रपटं निर्माण केली जात आहेत. ज्यात मादकता व अश्लिलता असते. हा पैसे मिळविण्याचा खेळ असतो. परंतु याकडे न पाहता चित्रपट निर्मात्यानं वा दिग्दर्शकानं केवळ पैसा कमवता यावा म्हणून ओबडधोबड चित्रपटं काढू नयेत. कारण सुसंस्कारही महत्वपुर्ण असतात. त्यामुळं असेच चित्रपटं काढावेत की जे लहान लहान मुलांवर सुसंस्कार करतील. त्यांचं भवितव्य घडवतील. जेणेकरुन तेच भवितव्य त्यांच्या पुढील यशस्वी जीवनाच्या आणि देशाला योग्य आकार देण्याच्या कामी येतील. यात शंका नाही.
होय, अलिकडील काळात असे चित्रपट निघत नाहीत की जे चित्रपट लोकांवर संस्कार करतील. आताची मंडळी पती पत्नी बनतात. परंतु सुखासमाधानात जगत नाहीत. ती मंडळी मुलं पैदा करतात. परंतु भांडणं करतात. ज्याचा परिणाम मुलांवर होतो.
श्यामल जशी सुशिक्षीत होती. तशीच ती एक विचारी स्री सुद्धा होती. तिच्या मनात जे जे चांगले विचार यायचे. त्यावर ती विचार करायची. त्याचे निरीक्षण, बारकावे शोधायची. त्याचा सुक्ष्मतेनं अभ्यास करायची व तेच चिंतन ती लोकांना सांगायची. तिच्या डोक्यात केवळ देवबाबाच्याच अंधश्रद्धेचा मुद्दा नव्हता. तर असे बरेच मुद्दे होते. जे ती लोकांना अविरतपणे सांगत असे. संस्काराच्याही बाबतीत एक असाच मुद्दा आता तिच्या लक्षात आला होता. तो मुद्दा होता, मुल जन्मास घालण्याचा. कारण बरेचसे जोडीदार विवाह करीत. मुलं जन्मालाही टाकत असत आणि त्यानंतर भांडणं करीत असत. त्यातच एकमेकांपासून फारकत घेण्याच्या गोष्टी करीत असत. आपापसातील वादानं चांगला संसार उध्वस्त करुन निघून जात. ज्यातून मुलांचं भवितव्य, त्यांचं शिक्षण उध्वस्त होत असे.
श्यामल जेव्हा तशा स्वरुपाच्या गोष्टी ऐकत असे. तेव्हा तिचं मन विचलीत होत असे. त्यासाठी काहीतरी करावं असं तिला वाटत असे. त्यातच ती लोकं सुधरायला हवीत म्हणून लोकांना आपले विचार सांगत असे.
भांडणं पतीपत्नीचे, मुलं जन्मानंतर नकोच. असं तिला वाटत होतं. वाटत होतं की पती पत्नीनं भांडणं नक्कीच करावी. परंतु केव्हा? मुलं जन्मास घालण्यापुर्वी. जर मुलं जन्मास घातली व त्यानंतर जर पती पत्नीनं भांडणं केली. तर त्याचा परिणाम मुलांवर होतो. त्यांचा अभ्यास खुंटतो. एवढंच नाही तर सारं आयुष्य उध्वस्त होते.
पती पत्नी....... नेहमीच भांडणं करणारी जोडी. काही ना काही कारणानं दोघांमध्ये भांडणं होतातच. परंतु तेवढंच प्रेमही असतं त्यांचं. त्यामुळंच ती भांडणं विकोपाला जात नाहीत व घटस्फोट होण्याआधी बंद होतात. परंतु काही भांडणं अशीही असतात की जी भांडणं विकोपाला जातात. ज्यातून घटस्फोट नक्कीच होत असतो. ही क्रिया मुले जन्मास आल्यानंतर घडत असते.
विवाह...... विवाह हा एक संस्कार आहे व या विवाह संस्कारानुसार जेव्हा आपल्या आईवडीलांच्या मर्जीनं विवाह होतात. तेव्हा विवाह झाल्यानंतरचे वितुष्ट दूर केले जातात व संसार टिकवला जातो. परंतु काही विवाह जे पळून जावून केले जातात. त्यांच्यात समजा वितुष्ट आलंच, तर त्यांचा संसार टिकविणं ही तारेवरची कसरतच असते. अशा ठिकाणी हमखास घटस्फोट होतोच व घटस्फोटासारखे प्रकार घडतात.
अलिकडील काळात घटस्फोट होतांना नाव ठेवले जाते, पळून जावून लग्न करणाऱ्या प्रेमविरांना. म्हटलं जातं की त्यांचेच विवाह टिकत नाहीत. त्यांच्यातीलच विवाह हे तुटतात. कारण त्यांना परिवाराचा आशीर्वाद नसतोच. परंतु खरं सांगायचं झाल्यास त्यांचेच विवाह टिकत आहेत आज. कारण आजच्या काळात प्रेमाला अतिशय महत्व आलेलं आहे. एकमेकांवर प्रेम करणारे आजचे तरुण जे आपल्या मनानं विवाह करतात. त्यांचं आपापसात एकमेकांवर प्रेम असल्यानं ते एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. ज्यातून विवाह हे तुटण्याचा संभव कमी असतो. तसा विचार केल्यास आज एकमेकांच्या संमतीनंच होणारे विवाह तुटू लागले आहेत. त्यातच प्रश्न निर्माण झालेला आहे, घटस्फोटाचा.
आजच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले असून न्यायालयात कितीतरी यावर आधारीत खटले उभे राहतांना दिसत आहेत. ज्याचे प्रमाण मोजले असता चिंताजनक आहे. कारण प्रत्येकाला आपलं मत हे प्रिय वाटत असतं व ते आपल्या आपल्या मतांचा आदर करतात. ज्यातून त्यांचा एखाद्यावेळेसही सन्मान दुखवता येत नाही. असा सन्मान दुखवल्यास बस, भांडण, ताटातूट व घटस्फोटाचे खटले. त्यावेळेस लोकं आपण जन्मास घातलेली मुलं. त्यांचं होणारं अतोनात नुकसान. हेही विचारात घेत नाहीत.
अलिकडील काळात प्रेमविवाह करणाऱ्यांपेक्षा संमतीनंच विवाह करणाऱ्यांच्या विवाहात वितुष्ट निर्माण होतांना दिसत आहे. म्हणतात की मुलं ही राष्ट्राची संपत्ती. तसं पाहिल्यास मुलं ही परिवाराचीही संपत्ती. पुर्वी तसंच मानलं जायचं. ज्यातून विवाह व्हायचा व विवाहानंतर प्रजोत्पादन. मग मुलं झालीच की संयुक्त कुटुंब पद्धती असल्यानं त्या मुलांना त्यांचे आजी आजोबा सांभाळायचे व त्याचे आईवडील शेतावर वा कुठेही मोलमजूरी करायला जायचे. परंतु कालांतरानं काळ बदलला. ज्यातून संयुक्त कुटुंब पद्धती लयास गेली व विभक्त कुटुंबपद्धतीनं जोर पकडला. त्यातच आता घटस्फोटासारखे प्रकार. मग मुलं असलीच तर त्या मुलांचाही विचार केल्या जात नाही. होणारं नुकसान तर दूरच.
घटस्फोट वा कौटुंबिक विवादातून कुटुंब विस्कळीत होतं. त्याचा विचार ना त्या मुलांची आई करीत ना त्याचे वडील. तसं पाहिल्यास प्रत्येकच मुलाला आई व वडील, या दोघांचंही प्रेम हवं असतं. परंतु पतीपत्नींचे वाद हे सतत सुरु असतात. ज्यातून ते विलग होण्याचा विचार करतात व विलगही होतात. त्यानंतर मलं मुली हे कधी आपल्या आईकडे तर कधी आपल्या वडीलांकडे राहतात. ज्यातून ती मुलं आईकडे असल्यास आणि आईनं दुसरा विवाह केल्यास आपल्या सख्ख्या वडीलांच्या प्रेमाला पारखी होतात. कधीकधी तर हेच वडील, अर्थात सावत्र वडील हे त्या स्रीची मुलगी जर असेल तर ती वयात आल्यावर तिच्यावर कुनजर ठेवतात. ज्यातून तेच सावत्र वडील तिच्या आईला माहीत होवू न देता मुलीला चक्कं विकून टाकतात. जिथे सख्खेच आईवडील आपल्या गरीबीला कंटाळून आपल्या बाळाला विकून टाकतात. तिथं सावत्र वडिलांचा काय नेम? हेच घडत आहे आज. काही ठिकाणी हीच वास्तविकता आहे आजची. काही ठिकाणचं वेगळं आहे. काही ठिकाणी घटस्फोटानंतर मुलं वडिलांकडे राहतात. ती मुलं सोडून जाते. मग काय, ते वडीलही जास्त दिवस विना पत्नीनं राहू शकत नाही. मग तोही दुसरा विवाह करतो. ज्यातून येणारी दुसरी पत्नी ही चांगली निघेलच. याचा नेम नसतो. ती पत्नी ही तिच्या पतीच्या मुलांना मोलकरच समजते. ती त्यांना घरातील सर्व काम करायला लावते. मारते, पिटते, सर्वकाही करते. मुली जर असतील तर त्या वयात आल्यावर ती त्यांना वाईट धंद्यातही लावते नव्हे तर प्रसंगी त्या मुलींना विकूनही टाकते व सांगते की ती पळून गेली. ती जेव्हा मुलांना मारत असते. तेव्हाही ती त्यांनाच बराच धाक देते. एवढा धाक देते की ती मुलं अंगावरचे वळ सुद्धा वडीलांना दाखवू शकत नाहीत.
घटस्फोट का घ्यावा? हो, ठीक आहे, आपला पती चांगला निघाला नाही. तो मारतो. तो दुसऱ्याच मुलीसोबत संग करतो. तो दारु पितो. तशी घटस्फोटाची बरीच कारणं आहेतच. हे झालं मुलींच्याबाबतीत. मुलं घटस्फोट देतांना, ती मुलगी स्वयंपाक करीत नाही. तिची लैंगिकता बरोबर नाही. ती शक करते. ती कामं करीत नाही. तिची पावलं बरोबर नाहीत. अशी अनेक कारणं. परंतु ही कारणं केव्हा ग्राह्यं धरावी. जेव्हापर्यंत आपल्याला मुलं होत नाहीत. हं, मुलं झालीच तर अशी कारण नकोच संसारात वितुष्ट निर्माण होण्यास. तरीही आपण सांगतोच, अशी अनेक कारणं आणि एकमेकांपासून विलग होतोच.
घटस्फोट घ्यायचा असेल तर मुलं जन्मास घालण्यापुर्वीच घ्यावा. मुलं जन्माला टाकूच नये. परंतु मुलं जर जन्मास घातलीच तर आपसातील सर्व हेवेदावे बंद करावे. लेकरांच्या भवितव्याकडं पाहावे. त्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे पाहावे. जेणेकरुन माणसानं विवाह केल्यानंतर जेव्हा आपण मुलं जन्मास टाकतो. त्यानंतर मुलांचं नुकसान होणारच नाही. ज्यातून मुलांचं होणारं नुकसान टळेल. कोणी त्यांना नोकर बनविणार नाही. परंतु आपण तीच बाब लक्षात घेत नाही व मुलं जन्मास घालण्याआधी घटस्फोटाचा विचार न करता मुलं जन्मास आल्यानंतर घटस्फोटाचा विचार करतो व विलग होतो. हे काही बरोबर नाही. न्यायालयानंही मुलं असल्यास अजिबात घटस्फोट देवू नये.
मुलं जन्मास आल्यानंतर त्यांचं शिक्षण सुरु होतं. त्यांचं शिक्षण होत असतांना त्याचं करीअरही घडत असतं. ज्यातून घटस्फोटासारख्या प्रक्रिया सुरु होताच किंवा घरात भांडणतंटे सुरु होताच, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, त्याच्या शिकण्यावर व त्याच्या करीअरवर परिणाम होतो. पर्यायानं सांगायचं झाल्यास त्याचा अभ्यास खुंटतो. त्याचं शिकणं तुटतं. त्याचं अभ्यासात मन लागत नाही. विशेष म्हणजे मायबापांनी नक्कीच भांडणं करावं. भांडण करायला मनाई नाही. परंतु केव्हा? मुलं जन्मास घालण्यापुर्वी. मुलं जन्मास घातल्यानंतर भांडणं केली तर अभ्यासच नाही तर सारं बुडतं. म्हणूनच त्यांनी मुलं जन्मास घातल्यानंतर भांडण करु नये म्हणजे झालं.
श्यामलचा विचार रास्त होता. कारण त्यातून जे नुकसान होत असे. ते नुकसान कधीच भरुन काढण्यालायक नसे.
***********************७*********************
श्यामल समाजाचं निरीक्षण करीत होती. ती धर्माचंही निरीक्षण करीत होती. तिला समाजातील लोकं धर्माच्या नावानं रक्त सांडवतांना दिसत होते. त्यातूनच ती विचार करीत होती की धर्माच्या नावानं कुणीही रक्त सांडवू नये याचा. कारण लोकं धर्मात वाहवत जावून धर्माच्या नावाखाली भांडणं करीत होते. ते रक्तही सांडवत होते, धर्माच्याच नावाखाली. धर्माबाबत तिचे विचार उच्च होते.
धर्म....... आज सर्वच लोकं मी अमुक धर्माचा, तो अमूक धर्माचा. असं म्हणून समाजात धार्मिक तेढ निर्माण करतात. त्याच आधारावर भांडतात. एकमेकांची कत्तल करतात. पर्यायानं सांगायचं झाल्यास धर्माच्या नावावर अशी मंडळी आपल्याच भावा बहिणींचं रक्त सांडवतात. जे इतिहासात घडलेलं दिसलं. इतिहासात धर्माच्या नावावर अनेक युद्ध झालीत. काहींच्या माना कापल्या गेल्यात. अनन्वीत हाल हाल झालेत आणि ज्यांनी ज्यांनी हाल केलेत. ती मंडळी हेही विसरली होती की मी याच देशाचा रहिवाशी असून माझा धर्म नेमका कोणता होता? कोणता असू शकतो? अन् माझ्या शरीरात कोणाचे रक्त असू शकते? महत्वपुर्ण बाब ही की जर धर्माचा हाच इतिहास लक्षात घेतल्यास आता या देशात राहणारे सर्व वेगवेगळ्या धर्माचे लोक हे एकाच आईची लेकरं असून ते आजही एकाच धर्माचे आहेत. आज जरी ते वेगवेगळ्या धर्माचे असले तरी. मग मी अमुक धर्माचा व मी तमुक धर्माचा. अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये का यावेत? का येवू द्यावेत आपण? ही विचारात घेण्यालायक वस्तूस्थिती आहे. याचा सर्वांनी विचार करावा यात शंका नाही.
धर्म...... धर्म कोणताही का असेना, धर्माबाबत लोकं आगपाखड करीत असतात. ही आगपाखड असते, आपल्या धर्माला श्रेष्ठ समजण्यासाठी. परंतु तसं श्रेष्ठ समजत असतांना हाताची चार बोटं आपल्याकडे असतात. ही गोष्ट विसरली जाते.
धर्माबाबत सांगायचं झाल्यास काही धर्म असेही आहेत की त्या धर्माला आजची मंडळी ही नेहमीच दुषणं लावत असतात. त्या धर्माला काहीबाही बोलत असतात आणि त्याही धर्मातील लोकं न चिडता, न रागवता आपल्याच धर्माला काहीबाही म्हणणाऱ्या लोकांचे वाईट बोल न रागवता गुपचूपपणे ऐकत असतात. कारण त्यांच्यात सहनशिलता ही कुटकूट भरलेली असते. परंतु काही धर्म असेही आहेत की त्या धर्माबाबत साधा ब्र देखील उल्लेखला गेला तर दंगे होतात. ज्याला धार्मिक दंगे असंही नाव आहे.
आज धर्माच्याच नावानं दंगे उसळत आहेत. मुख्य म्हणजे देशातील लोकं इतरांच्या धर्माला तुच्छ लेखून त्याच्यावर आगपाखड करणारे आहेत व असे केल्यानं त्यांना जो असूरी आनंद प्राप्त होतो. तो आनंद त्यांच्यासाठी उल्लेखनीय असतो.
धर्मवाढ....... धर्मवाढीबाबत सांगायचं झाल्यास प्राचीन काळात आपलाच धर्म श्रेष्ठ मानून धर्मवाढीच्या दृष्टीनं प्रयत्न झालेत. ज्यातून कत्तली झाल्या. युद्ध झालीत. तसा प्राचीन काळाचा इतिहास पाहिल्यास प्राचीन काळात पहिलं धार्मिक युद्ध मुख्यतः येथील द्रविड अर्थात आदिवासी आणि आर्य यांच्यात झालं. ज्यात द्रविडांचा कोणताच धर्म नव्हता व धर्म म्हणजे काय असतं? तेही त्यांना माहीत नव्हतं. पुढं त्यांच्यात जे युद्ध झालं. ज्यात आर्य विजयी झाले व त्यांनी आपला वैदिक धर्म प्रसारीत केला. त्यातच त्यांना धर्म म्हणजे काय? हेही समजावून सांगीतलं. त्यांनीच देव दगडात असतो. प्राणीमात्रात असतो. हेही समजावून सांगीतलं. अन् हा वैदिक धर्म येथील अस्तित्वात असलेल्या द्रविड अर्थात आदिवासींनीही पसंत केला, स्विकारला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी धार्मिक अतिक्रमण गौतम बुद्धाच्या काळात झालं. ज्यात गौतम बुद्धांनी जेव्हा आपला बुद्ध धम्म सांगीतला. तेव्हा ज्या कोणत्या वैदिक धर्मातील लोकांना बुद्ध धम्म सांगीतला. ती मंडळी बौद्धधर्मीय झाली. तसंच त्याच काळात अस्तित्वात आलेला जैन धर्म. त्याही धर्मांनी वैदिक धर्मावरच अतिक्रमण केलं व आपला धर्म वाढवला. ज्यात मुळचेच द्रविड असलेले व आता धर्मपरीवर्तनानं वैदिक झालेली मंडळी नव्या धर्माच्या तत्वानं आकर्षीत झाली व ती पुढं बौद्ध व जैन बनली. आता देशात तीन धर्म अस्तित्वात आले होते. पहिला वैदिक की जो येथील तमाम द्रविड अर्थात आदिवासींनी स्विकारला होता. दुसरा धर्म बुद्ध की ज्यात मुळचे द्रविड असलेले व आता वैदिक बनलेले लोकं होते. जे आता बौद्ध बनले होते. तसाच तिसरा धर्म जैन की ज्यातही मूळचेच द्रविड असलेले व आता वैदिक बनलेले लोकं होते. तेही नव्याने जैन बनले होते. तसेच जे जैन आणि बौद्ध बनले होते. त्यांच्यात द्रविडांचंच रक्त होतं. जे द्रविड मूळातच सहनशील होते.
जैन आणि बुद्ध धम्म. या दोन धर्माचा जन्म हा भारतातीलच. सध्या भारतात अनेक धर्म आहेत. वैदिक धर्मही आर्यांनीच आणलेला असून जर आर्यांना परकीय मानल्यास तोही धर्म बाहेरीलच. तसा बौद्ध व जैन धर्म येथील असंतुष्ट असलेल्याच घटकांनी स्विकारला असेल त्या काळात. ज्यात द्रविड अर्थात आदिवासीही असू शकतात आणि मुळातील आर्य अर्थात वैदिक धर्माचे लोकंही असू शकतात की जे इतर देशातून आले. परंतु ते इथंच बऱ्याच वर्षांपासून राहात असल्यानं भारतीयच झाले. पुढं भारतात तीन धर्म अस्तित्वात आल्यानंतर त्या तीनही धर्मांना राजाश्रय प्राप्त झाला. येथूनच निर्माण झाला खरा संघर्ष. धर्माबाबत आगपाखड आणि आपला धर्म वाढविण्यासाठी केलेला सत्तासंघर्ष. ज्यात राग येवून एकमेकांच्या धर्मातील लोकांना कापणं. त्यांची बेवारस विनाकारण हत्या करणं. हे चालत राहिलं, अरब भारतात येईपर्यंत. तसं पाहिल्यास प्रत्येक राज्यांनी एकमेकांना जिंकल्यावर आपली राजेशाही निर्माण केली व या भारतात आपलाच धर्म टिकून राहावा म्हणून स्थापत्य कलेला भरपूर वाव दिला. अनेक बांधकामं केली. त्यानंतर उजळला अर्वाचीन काळ. अर्वाचीन काळात मुस्लिम आणि त्याकाळचे देशातील सर्व धर्मीय अर्थात बौद्ध, जैन व वैदिक लोकांचे युद्ध झाले. आपला अरबी धर्म वाढवीत असतांना अल्लाउद्दीन खिलजींनी नालंदा व तक्षशिला ही दोन्ही विद्यापीठं नष्ट केलीत असं म्हटलं जातं व मानलंही जातं. त्यांनी अनेक स्तूपंही पाडली असावीत. काही लोकांचं म्हणणं तसंच आहे व काहींचं म्हणणं वेगळंच आहे.
खिलजी वंश तसा शुरवीर वंशच. म्हटलं जातं की त्याला काहीतरी आजार झालेला होता. ज्याचेवर उच्चपदस्थ हकिमांनी उपचार केला. परंतु त्याला झालेला असाध्य आजार दूर झाला नाही. अशातच त्याला एका हकिमानं सांगीतलं की अशा आजारावर औषध हे नालंदाच्या ग्रंथालयातच मिळू शकते. मग काय, तो नालंदात गेला. जिथं भव्यदिव्य ग्रंथालय होतं. त्यानं प्रश्न मांडला. उत्तरार्थी तेथील महंतानं तेथीलच ग्रंथालयात अस्तित्वात असलेली औषधीची पुस्तके चाळली व उपाय शोधून काढला. जो उपाय केल्यानं खिलजीला झालेला असाध्य आजार बरा झाला. परंतु खिलजी हा उदारमतवादी स्वभावाचा नव्हताच. त्यानं नकारात्मक विचार केला. विचार केला की आपल्याला ज्या पुस्तकातून फायदा झाला. तशा स्वरुपाचे आजार जर भविष्यात कोणाला झाले. तर त्यावर उपाय सापडू नयेत. त्यामुळं अशी तत्वज्ञानाची पुस्तकच अस्तित्वात असू नयेत. म्हणूनच त्यानं नालंदा व तक्षशिलेची ग्रंथालयं जाळलीत. कोणी लोकं यापाठीमागं दुसरंच कारण देतात. म्हणतात की खिलजीच्या असाध्य आजारावर नालंदाच्या ग्रंथालयात उपचारच न सापडल्यानं राग येवून त्यानं संपूर्ण ग्रंथालय जाळून टाकलं. आता यात काय सत्य व काय असत्य ते जरी माहीत नसलं तरी आताचा समाज खिलजीच्या त्या कृत्यावर धार्मिक रंग चढवितात व नालंदा जाळण्याचं कारण धर्मवाढ सांगून समाजात धार्मिक तेढ निर्माण करतात व धार्मिक युद्ध घडवून आणतात.
अर्वाचीन काळातही अनेक धर्मयुद्ध झालीत. म्हटलं जातं की शिवाजी महाराजांचा अतिशय राग आल्यानं दक्षिणेत आलेला अफजलखान वाईला तुळजापूर, पंढरपूर मार्गे निघाला. रस्त्यात त्यानं अनेक गाई, पशू मारले. त्यानंतर त्यानं अनेक देवळंही पाडली. ज्यात स्तूप व काही प्राचीन जैन मंदिरंही असतीलच. ज्यातून तमाम, वैदिक, तमाम बौद्ध व तमाम जैन धर्मीय लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली. तरीही धार्मिक स्तरावर कोणाचंच रक्त खवळलं नाही. कारण त्यावेळचा इतिहास हा धर्म पाहात नव्हता तर तो एक माणूसकी पाहात होता. ज्यात शिवरायांनी अफजलखानाच्या कृत्यांकडं एक माणूस म्हणून पाहिलं. ज्यात त्यांना त्याच्यात एक अविवेकी माणूस सापडला. शिवरायांनी अफजलखानाच्या प्रार्थनास्थळे पाडणे, मुर्त्या खंडीत करणे, तोडणे व पशूधन कापण्याच्या कृतीला धार्मिक रंग चढविला नाही. त्याचं कारण होतं, त्यांच्यात असलेली सहिष्णूता. ज्या सहिष्णूतेतून त्यांच्या सैन्यात उच्च पदावर मुस्लिम मंडळीही बसली होती. जी इमानदार होती. ती शिवरायांना जीव की प्राण मानत होती. अन् शिवरायही त्यांच्यावर जीव की प्राण ओवाळून टाकत असत. हीच माणसं शिवरायांना माणूसकीच्या नात्यानं मदत करीत असत. हाच विचार तमाम कितीतरी काळापासून चालत आला होता.
मुळच्या वैदिक असलेल्या धर्मातील काही लोकं हे सहिष्णू होते. त्यांचं शक्यतोवर धर्मासाठी रक्त खवळत नव्हतंच. हं, पुष्पमित्र शृंगानं राजा बनताच अनेक बौद्धांची हत्या केली. त्यांना हाकलून लावले. अनेक स्तूपं पाडली. ज्यात त्या राजांची अमानुषता व अविवेकीपणा. असंच घडलं इब्राहिम खान लोदींच्या शासनकाळात. त्यानंही तमाम अस्तित्वात असलेल्या वैदिक लोकांना हिंदू म्हटलं. हिंदूचा अर्थ हा हिन आणि दुबळे. यावरुन खरंच वैदिक संस्कृतीत वाढलेली ही मंडळी हिन व दुबळी होती काय? याचं उत्तर नाही असंच येतं. येथील मूळ असलेले द्रविड, ज्यातून पुढे चालून वैदिक, जैन व बौद्ध बनले. त्यांचं रक्त हे दुबळं व हिन जाणवणारं नव्हतंच. मग ते इब्राहिम खान लोदीला हिन आणि दुबळं कसं दिसलं? त्याचं कारण आहे, येथील लोकांमध्ये असलेली सहनशिलता. येथील मुळातील द्रविड वंशातील लोकांचं रक्त हे सहनशील आहे. त्यामुळं साहजीकच येथूनच अस्तित्वात आलेल्या जैन व बौद्ध धम्मातील लोकांचं रक्तही सहनशील आहे. ते स्वतः कटतात. परंतु कोणाला कापत नाहीत. वैदिक धर्मातील लोकांनीही तशीच कृती केली. जी इब्राहिम खान लोदीला दिसली. म्हणूनच येथील वैदिक मंडळी ही हिंदू अर्थात हिन दुबळी ठरली. परंतु ती हिन व दुबळी नव्हतीच.
भारत हा आमचा देश आहे व येथील लोकांचं रक्त सहजासहजी खवळत नाही आणि खवळलं तर ते रक्त कोणाला सोडतही नाही. माणसाच्या अविवेकीपणाला दोष देणारे आमचे तमाम थोर पुढारी. ज्यात संभाजी महाराजच नाही तर आमचे पुर्वज असलेले पृथ्वीराज चव्हाण, राजा दाहिर होवून गेलेत की ज्यांनी शत्रूंना सतरा वेळेस हारवलं व मोठ्या मनानं माफ केलं. परंतु शत्रूंनी त्यांना कपटानं हारवलं. पकडलं व हालहाल करुन मारलं. त्यानंतर तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर आणि इतर सर्व तमाम थोर पुण्यात्म्ये. त्यांचेही परकीय समजणाऱ्या आपल्याच लोकांनी हालहाल केले. त्यांनी केवळ माणसांच्या अविवेकीपणाला दोष दिला. धर्माला नाही. मात्र काही लोकांनी माणसांचा अविवेकीपणा जबाबदार धरला नाही. त्यांनी धर्मालाच जबाबदार धरले व धर्मालाच दोषी धरले. ज्यातून धार्मिक युद्ध झालीत. धार्मिक युद्ध होत गेली. अन् आजही त्याच धर्तीवर धार्मिक वाद होतात. समाजात धार्मिक तेढी निर्माण होतात व धार्मिक दंगेही पसरतात. या भारतात राहणाऱ्या तमाम लोकांनी आजच्या काळात धार्मिक युद्ध घडवावीत काय? माझा धर्मच श्रेष्ठ आहे. इतरांचा धर्म श्रेष्ठ नाही. असं मानावं काय? याचा अर्थ नाही असा आहे. त्याचं कारण आहे आपण भारतात राहणारे भारतवाशी. आपण जरी या भारतात हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई, पारशी, बौद्ध, जैन म्हणून राहात असलो तरी आपण सर्व त्याआधी भारतीय आहोत व द्रविड आहोत. अन् जे कोणी द्रविड मानत नसतील. त्यांनी नक्कीच स्वतःला विदेशीच समजावं. कारण येथील मुळचा व्यक्ती हा द्रविडच आहे. ज्याला त्याचा धर्मही कोणता ते माहीत नव्हतं. ते येथेच बाहेरुन आलेल्या आर्यांनी शिकवलं, ज्यातून ते वैदिक ठरले. पुढे याच द्रविडांचे बुद्ध, जैन झाले. पुढे याच तीन धर्माचे आणखी तुकडे झाले व काही मुस्लिम झाले. हे विसरता कामा नये. म्हणजेच सर्वच धर्माचे लोकं हे द्रविडांपासून अस्तित्वात आले. हे नाकारता येत नाही. कारण मुळच्या द्रविडांचं धर्मपरीवर्तन हे कधी जोर जबरदस्तीनं झालं तर कधी महत्व समजून आल्यानं. आपण मुळच्या जुन्याच द्रविडांचे वंशंज आहोत. त्याचं द्रविडांचं रक्त अंश प्रमाणात का असेना, आपल्यात आहे. अन् ते अनुवंशशास्त्रानुसार थोडं थोडं आलेलं आहे. जे रक्त सहिष्णू आहे. ते रक्त लवकर खवळूच शकत नाही आणि खवळूही नये. तसंच ते रक्त आपल्याच पुर्वजांचं आहे. जे रक्त आपल्याच नात्यातील आहे. असं जर आहे तर मग ते रक्त का खवळावं आज धर्माच्या नावावर? ते रक्त का खवळू द्यावं आपण आज कोणत्याही धर्माच्या नावावर? तसेच आपण आज जरी वेगवेगळ्या धर्मातील असलो तरी आपण आज मुळच्या द्रविडांचे रुपांतर असल्यानं व सहिष्णू असल्यानं आपण आपल्यात धार्मिक तेढ निर्माण न होवू देता तमाम भारतात राहणारे आम्ही सर्व भारतीय आहोत. हीच भावना सर्वांनी मनात बाळगावी. जरी आज आपण इतर धर्मात अधिवास करीत असलो तरी. जेणेकरुन या देशात धार्मिकतेवरुन कोणतेच वाद वा दंगली होणार नाहीत. शांतता टिकेल व सुव्यवस्थाही राहिल. हे तेवढंच खरं. आपण सर्व धर्मियांनी एकमेकांशी भावाबहिणींच्याच नात्यानं राहावं. कुणीच कुणाचं निदान धर्मासाठी तरी रक्त सांडवू नये म्हणजे पावलं. कारण या भारतात राहणारे आपण सर्व वेगवेगळ्या धर्मातील लोकं एकाच आईची लेकरं आहोत. आपण सर्व भारतीय व भारतवाशी आहोत. हे नाकारता येत नाही.
श्यामलचा तोच धर्माबाबत विचार. लोकांतील धर्माबाबत असलेली आगपाखड व लोकांचं वागणं विचारात घेण्यालायक होतं. तिचे धर्माबाबत असलेले विचार वाखाणण्याजोगे होते.
***********************८**********************
देशात बेरोजगारी वाढली होती. देशातील मुलांना शिक्षण शिकूनही नोकरी लागत नव्हती. त्यातूनच त्यांनी ऑनलाईन स्वरुपाचं संघटन निर्माण केलं होतं. ज्याला नाव दिलं होतं. बेरोजगार पार्टी. श्यामलला वाटत होतं की जर देशात उद्योगधंदे उभारले गेले असते तर ती पार्टी निर्माणच झाली नसती? त्याबद्दलही तिच्या मनात विचार होते.
ती एक पार्टी. ती बेरोजगारीवर मात करण्यासाठीच निर्माण झालेली पार्टी होती. ती तरुणांची पार्टी होती. हवं तर ही पार्टी याआधीच कितीतरी वर्षापुर्वी निर्माण व्हायला हवी होती. परंतु वेळ झाला. परंतु काही का असेना, ती योग्य वेळेस निर्माण झाली होती आणि ती तिच्याच मोठ्या मुलानं निर्माण केली होती.
बेरोजगार पार्टी. ही पार्टी बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी निर्माण झालेली होती. असं वक्तव्य व विचार या पार्टीचे जनक असलेल्या दिपकनं व्यक्त केले होते. तसं पाहिल्यास एका मसल्यावर वक्तव्य करतांना वकीलांना परामर्श देत असतांना सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश म्हणाले होते की सध्या बेरोजगार तरुण वर्ग हा झुरळासारखा असून तो परजीवी आहे. परजीवी जसा इतरांवर अवलंबून असतो. तसाच येथील सुशिक्षीत बेरोजगार वागतो.
मा. न्यायाधीश महोद्यांनी न्यायालयात परामर्श देतांना केलेलं साधं वक्तव्य. तसं पाहिल्यास त्यात राजकारण नव्हतं आणि सध्याची बेरोजगाराची स्थिती अशीच होती. दिपक हा उच्चशिक्षीत झालेला तरुण होता. त्यानं भरपूर शिक्षण घेतलं. परंतु त्याला नोकरी काही लागली नव्हती.
सध्याच्या काळात सर्वच विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांना उच्च शिक्षण सर्रास मिळतं आणि तेवढंच सहजही. कारण परिक्षेचा दर्जा बराच सोपा केलेला आहे. परिक्षा पद्धती ही देखील तेवढ्या प्रमाणात कठीण नाहीच. त्यातच आठवीपर्यंत शिक्षण हे नापास करणारं शिक्षण नाही. त्यामुळंच मुलं सहजच पहिल्या वर्गात गेली की ती आठवीपर्यंत सहजच जातात. तेवढ्या प्रमाणात परिश्रम न करता. मग आठवी ते नववी व अकरावी मुलं सहजच काढतात. कारण ती त्या परिक्षा त्या विद्यार्थ्यांच्या शाळेतीलच असतात. राहिला प्रश्न दहावी व बारावीचा. तर त्याही परिक्षेत शाळेतीलच प्रात्यक्षिक स्वरुपाचे गुण मिळत असतात. त्यानंतर पास व्हायला फक्त पंधरा ते वीस गुण लागतात. ते गुण विद्यार्थी लेखी परिक्षेतील पेपर सोडवून अगदी सहज मिळवून घेतात. शिवाय या परिक्षेत सेंटर हे होम सेंटर मिळतं. ज्यात विद्यार्थ्यांना पंधरा ते वीस गुणांच्या पास होण्यापुरत्या गोष्टी तेथीलच पर्यवेक्षकांमार्फत पुरवल्या जातात. तसंच शेजारी जर सेंटर असेल, तर त्याच शाळेतील तेथील विद्यार्थ्यांसाठी हेराफेरी पद्धत वापरात असल्यानं मुलं दहावी व बारावी परिक्षा सहज पास होतात. आता राहिला पदवीचा प्रश्न. तर पदवीमध्येही गॅप देत देत परिक्षा पास करता येते व मुलं सहजच पदवीधारक बनतात. परंतु असं कौशल्य प्राप्त केलेल्या मुलांमध्ये काहीतरी करुन दाखविण्याचं कौशल्य नसतं. मग समस्या निर्माण होते. समस्या असते नोकरीची. हाताला काम मिळण्याची. त्यावेळेस विद्यार्थ्यांचं शिक्षण तर पुर्ण झालेलं असतं. परंतु हाताला काम नसतं. साधं काम करायला गेल्यावर लाज वाटते. वाटतं की मी नसतो शिकलो असतो तरी हे काम मला करता आलं असतं. मग लाजेमुळं काही किरकोळ स्वरुपाची कामं करण्यात अडथळा निर्माण होतो. शेवटी सरकारच्या व्यवस्थेवर अवलंबून राहावं लागतं, तो विचार करीत की मला सरकारी नोकरी लागली तर समाजात माझी इज्जत निर्माण होईल.
सरकारी नोकरी..... त्या नोकरीवर अवलंबून असणारा हा सुशिक्षीत तरुणवर्ग. ज्यांना सरकारी नोकरी मिळत नाही. त्याचं कारण आहे, सरकारी नोकऱ्या पुरेशा नसणं. आज सरकारी नोकरीचे आकडे व बेरोजगार सुशिक्षीत तरुणांचे आकडे जर तपासले तर गुणोत्तर नक्कीच असमान आहे. देशातील तरुण सुशिक्षीत बेरोजगार चौपट आहेत सरकारी नोकरीच्या संख्येपेक्षा. हा आकडा वाढला कसा? हा आकडा वाढला, सरकारच्याच नापास न करण्याच्या धोरणानं. ज्याचा शिक्षणात मेंदूही चालत नाही. तो तरुण ढक्कलगाडी स्वरुपात अगदी पदवीपर्यंत सहज पोहोचतो. मग तो सुशिक्षीत बेरोजगार ठरणार नाही तर काय? अन् तो जेव्हा सुशिक्षीत बेरोजगार ठरतो. तेव्हा तो सहज परजीवीच ठरतो. मग सरकार हात झटकतं नोकरी देण्याच्या बाबतीत. तसंच सरकार नोकऱ्याही देतं. परंतु नोकरी मिळाल्यानंतर हाच नोकरदार वर्ग चूप बसत नाही. तो दरवर्षी किंतू, परंतु गोष्टीसाठी आंदोलन करतं. ज्यात सरकारचंच नुकसान होतं. म्हणूनच अलिकडील काळात सरकारनं ठरवलंय की देशातील तरुणांना शिक्षण द्यायचं. परंतु नोकरीच्या संधीच उपलब्ध करुन द्यायच्या नाहीत. आंदोलनावर उपाय शोधत असतांना सरकारनं सगळ्या क्षेत्राचं खाजगीकरण करण्याचा विडा उचलला. ना रहेगा बॉस, ना बजेगी बासरी. अर्थात सगळे क्षेत्र जर खाजगी झाले तर कोणीच आंदोलन करणार नाही. असं सरकारचं मत. अन् विद्यार्थ्यांनी शिकावंच. पदवी धारण करावी व आपल्यातील ज्ञानाच्या भरवशावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःत एवढं कौशल्य निर्माण करावं की त्यानं एखादा उद्योग उभारावा व त्या उद्योगाला न शिकणाऱ्या वा कमी शिकणाऱ्या मुलांना नोकरीवर लावावं. म्हणजे देशात सुशिक्षीत बेरोजगारीचा प्रश्नच निर्माण होणार नाही. हेही सरकारचंच मत. परंतु मुलं शिकली. ती उच्चविद्याविभुषीत झाली की सरकारवरच नोकरीसाठी अवलंबून राहतात. अशावेळेस सरकार नोकरी देत नाही. मग सारेच प्रश्न निर्माण होतात. जे आज निर्माण झाले आहेत व सुशिक्षीत बेरोजगारांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी बेरोजगार पार्टी काढावी लागलेली आहे.
सध्या सुशिक्षीत बेरोजगारांचा जो प्रश्न निर्माण झालाय. तो पुर्वी होता काय? याचं उत्तर आहे, होता. परंतु तो आता जेवढा तीव्र स्वरुपाचा वाटतो. तेवढा तीव्र नव्हता. कारण पुर्वी इयत्ता आठवीपर्यंत नापास न करण्याचं धोरण नव्हतं. मुलं ज्या वर्गात असायची. त्या वर्गाचं त्यानं कौशल्य प्राप्त केलं नाही तर ती चक्कं नापास व्हायची. कारण प्रत्येकाची बुद्धीमत्ता वेगवेगळी असायची. ती पात्रता वरच्या वर्गात जाण्याची नसायची. अशी मुलं कशीबशी पास होवून पाचवीपर्यंत जायची. मग वय वाढलेलं असायचं. शिक्षण शिकणं जीवाकड यायचं व ती शाळा सोडायची. ज्यातून ती त्याच अल्प वयात आईवडिलांसोबत कामाला लागायची. ज्यातून कोणत्याही कामाचं कौशल्य त्यांच्यात अगदी अल्पवयातच निर्माण व्हायचं. अशी मुलं मोठी झाल्यावरही कोणतीही कामं करायला मागंपुढं पाहायची नाहीत. त्यांना कोणतीही कामं करतांना लाजही वाटायची नाही. त्यांना कोणत्याही कामाचं एवढं कौशल्य हस्तगत असायचं की ती उच्चभ्रू शिकलेल्या तरुणांना कामाच्या व कौशल्याच्या बाबतीत खाली बस म्हणायची. अर्थात शिकलेल्या लोकांना एखाद्या कामाच्या बाबत जे यायचं नाही. ते या कमी शिकलेल्या तरुणांना अनुभवाच्या आधारावर यायचं.
बेरोजगार पार्टी, नुकतीच निर्माण झालेली पार्टी. बेरोजगारीवर मात करण्यासाठीच निर्माण केलेली पार्टी. गत सरकारनं बेरोजगारांसाठी काहीच केलं नाही. असं त्यांचं मत. तसं पाहिल्यास विद्यमान सरकारनंच नाही तर गतकाळातील सरकारनंही त्यांच्यासाठी काहीच केलं नाही. असंही त्यांचं मत. सरकारनं त्यांच्यासाठी गतकाळात भरपूर उद्योगधंदे निर्माण करायला हवे होते. जेणेकरुन बेरोजगारीचा प्रश्नच निर्माण झाला नसता. तो सुटला असता व सरकारला आणि सुशिक्षीत बेरोजगारांनाही सोडवता आला असता. परंतु असे झालेच नाही. त्यातच नापास न करण्याच्या चक्रानं त्यातच परिक्षा पद्धतीच्या सुलभतेनं तो प्रश्न दिवसेंदिवस वाढतच गेला. आज देशाचा विचार केल्यास उद्योगाची संख्या कमी अर्थात अत्यल्प आहे. त्यामानानं पुर्ण शिक्षण झालेल्या सुशिक्षित तरुणांची संख्या जास्त आहे. असे तरुण की ज्यांना लहान लहान लघूउद्योग करणे लाजीरवाणे वाटते. ज्यांना सरकारनं उपलब्ध करुन दिलेल्याच नोकऱ्या हव्या. ज्यांना सरकारीच नोकऱ्या हव्या. परंतु सरकारी नोकऱ्याही कमीच आहेच. शिक्षण शिकणारे भरपूर. ज्यात आता तरुणवर्ग ओरडतोय. परंतु याबाबतीत खरा विचार केल्यास ह्या तरुणवर्गाला ओरडण्याइतकं सशक्त कोणी बनवलं? सरकारनंच ना. म्हणूनच बेरोजगार पार्टी तयार होतेय. अन् ती जर निर्माण होत असेल, तर सरकारला ओरडण्याची काय गरज आहे? परंतु सरकार ती पार्टी निर्माण होताच ओरडत आहे व त्यांच्या पार्टी निर्माणाची परवानगी नाकारत आहे. ही शोकांतिकाच आहे. खरं म्हणजे यात दोन कारणं आहेत. पहिलं कारण आहे, आज जर सुशिक्षीत बेरोजगार निर्माण झाले नसते तर आज बेरोजगार पार्टी निर्माणच झाली नसती. दुसरं कारण आहे, देशात उद्योगधंद्याची भडिमार असती तरही बेरोजगार नसते व बेरोजगार पार्टी निर्माण झाली नसती. अन् आता जर ती निर्माणच झालेली आहे. तर तिला तिचे काम करु द्यावे. त्या पार्टीला आपली सत्ता जाईल. या भीतीनं विरोध करु नये. हं, भविष्यात आपल्याला या पार्टीकडून क्षती पोहोचू नये म्हणून सरकारनं आतातरी सुधरावे. भरपूर प्रमाणात उद्योगधंदे उभे करावेत. जेणेकरुन आज निर्माण झालेला बेरोजगारीचा प्रश्नच निर्माण होणार नाही. सरकारनं हे जर केलं तर कोणताच तरुणवर्ग बेरोजगार पार्टीला समर्थन करणार नाही. परंतु सरकारनं हे करायला हवं. जर सरकारनं हे केलं नाही तर उद्या हेच तरुण चिडून जावून आज जशी बेरोजगार पार्टी तयार केली. उद्या हेच तरुण नेपाळसारखी क्रांती करतील व सरकारला पदावरुन पायउतार करतील. तेव्हा सरकारनं वेळीच सावध होवून याच तरुणांसाठी त्वरेनं उद्योगधंदे निर्माण करायला हवेत.
महत्वाचं सांगायचं झाल्यास सरकारनं आणखी एक काम करावं. त्यांनी अभ्यासक्रम आखतांना आपल्या अभ्यासक्रमाचे पहिलीपासूनच सुत्र बदलावे. जेणेकरुन मुलं जास्त शिक्षण शिकून बेरोजगार ठरणार नाहीत. तसं पाहिल्यास कालचीच नापासची पद्धती बरी होती. सुशिक्षीत बेरोजगार वाढले नसते. ना बॉस असता ना बासरी असती.
उद्योगधंदे उभारता येतात. पण........ त्याचा त्याला विचार होता. तो विचार होता.
'बेरोजगारी ही सध्या एक भारत देशातील भीषण समस्या आहे. प्रत्येकांच्या हाताला काम मिळायलाच हवं. असं देशातील प्रत्येक माणसाचं म्हणणं. तसं तरुण खुश तर जनता खुश. मग सरकारही खुश आणि देशही खुश. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. परंतु सध्याची देशाची स्थिती तशी नाही. बेरोजगारी सतत वाढत चाललेली आहे. त्यामानानं सरकारी उद्योगधंदे नाहीत. उद्योगधंदे उभारता येवू शकतात. परंतु त्यात अनेक अडचणी आहेत व मुख्य अडचण आहे पैसा. तो पैसा राजकारणी मंडळी राजकारण करण्यासाठी वापरतात. ज्यातून उद्योगधंदे उभे राहात नाही व बेरोजगारीची भीषण समस्या निर्माण होत आहे.
प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या धर्माला आज चिकटून आहेच. तसाच तो प्रत्येकच राजकीय पक्षालाही चिकटून आहेच. जे राजकीय पक्ष त्यांना आश्वासन देतात. काही आश्वासनाची परिपुर्ती करतात. देशात उद्योगधंदेही काढतात आणि असे उद्योगधंदे काढत असतांना गवगवा जास्त व कार्य कमी प्रमाणात करतात.
एक असाच विषय. बेरोजगार पार्टी का निर्माण झाली. हा माझा प्रश्न? त्यावर मी लिहिलं की देशात बेरोजगारी निर्माण झाली. लोकांना सरकारी नोकऱ्या मिळत नाही. बेरोजगार जास्त झाले. त्यामानानं उद्योगधंदे कमी झाले. देशात उद्योगधंदे निर्माण होत नाहीत. अन् होतात तर ते सरकारी उद्योगधंदे नसतात. त्यावर एका व्यक्तीचं वक्तव्य. वक्तव्य होत,
''ओ. सर, आपण खरोखर अभ्यास केला आहे का की खरंच कामे मिळत नाही वगैरे? कामं म्हणजे काय, फक्त सरकारी कंपनी मध्येच करायला पाहिजे अशी कामं म्हणायची आहेत काय? कामं कोणत्याही स्वरुपाची का असेना, युवकांनी करायला हवीत. त्यासाठी चिडून जायला नकोच.''
पुढील व्यक्तीमहोदयाचं त्यावर उत्तर. त्यावर मी म्हटलं,
"देशातील तरुणाई उच्च शिक्षण जर शिकली तर त्या उच्चशिक्षीत तरुणांनी चांगल्या नोकरीची अपेक्षा धरु नये काय?"
माझं मत होतं, चांगली नोकरी अर्थात सरकारी नोकरी. त्यावर उत्तर देत पुढील व्यक्तींचं म्हणणं. त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिलीत. त्यांनी उदाहरणं देवून म्हटलं.
"एवढे इन्फ्रास्ट्रक्चर उभं होत आहे तर ती कामे कोण करत आहेत? अजून तरी मशीन नाहीच. माणसंच आहेत. हे ब्लिंकिट वगैरे सारखे ऑनलाईन प्लॅटफॉर्मला अनेक डिलिव्हरी बॉय लागतात. अगदी गावागावात पण. ती कामे कोण करत आहे? माणसंच ना. सध्या उबर /भारत/ओला वगैरेचे ड्रायव्हर आणि त्यांची टॅक्सी मेन्टेन करणाऱ्या कंपन्यांत कामे कोण करत आहे? माणसंच ना. स्विगी/झोमॅटो वर खायच्या वस्तू विकणारे कोण आहेत? माणसंच ना. ही जी उदाहरणे दिली आहेत. त्यात चांगला बिझनेस आहे आणि लोक करत आहे. आपल्या माहितीत असलेली मुले स्वतः काही करत नाही आणि सरकारला उगाच ब्लेम करतात. त्याचं कारण म्हणजे बाहेरच्या विदेशी शत्रूंजवळून पैसे घेऊन फक्त भारतात कुठले तरी आंदोलन करु पाहणे, जेणेकरुन भारतात अशांतता पसरावी जेणेकरुन इथं जे बाहेरचे लोक इन्व्हेस्ट करत आहे ते बंद होईल. जरा आजुबाजूच्या देशांचा अभ्यास करा. हेच करुन तिथल्या जेन जी ला उकसवण्यात आलं आणि सरकार बदलण्यात आले. तुम्हाला वाटते आहे का की आपली जेन जी एवढी मूर्ख आहे की असे काही करेल? नाही करणार. कारण प्रत्येक तरुण पाहतो आहे भारताची बदललेली स्थिती. बदललेले त्याचे ग्लोबल स्थान. आज मी भारतीय म्हटले की कसे वागतात. विदेशामध्ये ते प्रत्येक जण बघत आहे. तुम्हाला जरी ही पार्टी योग्य वाटत असली तरी. ही पार्टी मुळात चुकीच्या वेळेस जन्माला आली आहे आणि चुकीच्या माणसाने बनवली आहे. जो स्वतः बेरोजगारच आहे."
ते त्यांचं वक्तव्य. त्यावर उत्तर देत मी म्हटलं.
"ती पार्टी निर्माण व्हावी. असं मलाही वाटत नाही. परंतु सरकारी उद्योगधंदे निर्माण व्हावेत. असं मलाच नाही तर देशातील तळागाळातील प्रत्येक माणसांना वाटते. त्यांना खाजगीकरण नकोच वाटते. आपण जी उदाहरणे दिलीत. ती खाजगी कामधंद्याची दिलीत. ते नकोय इथल्या तरुणांना. कारण खाजगी कंपन्या आज जरी जास्त दर देत असल्या तरी उद्या त्या देतीलच. याची शाश्वती नाही."
ते माझं म्हणणं. त्यावर उत्तर देत ते व्यक्तिमत्व म्हणालं.
"सरकारी उद्योग लावणे तेव्हाच शक्य असते. जेव्हा टॅक्समध्ये खूप पैसे एकत्र होत असेल. कारण एम्प्लॉयमेंट ही लाईफ टाइमची जबाबदारी होईल सरकारची. जास्तीचे सरकारी उद्योग नुकसानदायक आहेत. त्याची कारणे अनेक आहेत. अन् असे उद्योग वाढवून काय फायदा होणार देशाला?"
फायदा? नुकसान? जास्तीचे उद्योगधंदे उभारुन देशाला फायदा काय? जास्तीचे उद्योगधंदे उभारणे नुकसानदायक नाही काय? शिवाय टॅक्समध्ये खुप पैसे एकत्र होत असेल तर उद्योग उभारता येणे शक्य आहे. असं त्यांचं जे म्हणणं होतं. त्यावर उत्तर देणं मी योग्य समजलो नाही. कारण बोलण्या बोलण्यातून वाद चिघळत गेला असता. पार्टी राहिली जागच्या जाग्यावर. सरळ वैयक्तिक स्तरावर विचारांचं युद्ध छेडलं गेलं असतं.
उद्योगधंदे, तेही सरकारी उद्योगधंदे उभारणे. ज्याला पैसा लागतो. उद्योगधंदे उभारण्यात अनेक ज्या अडचणी असतील. त्यातील मुख्य अडचण पैसाच. तसा गवगवा केला जात आहे की देशात पैसाच नाही. अन् कसा राहणार? कारण टॅक्स गोळा होत नाही. का बरं होत नाही टॅक्स गोळा? कारण आजही असे कितीतरी गर्भश्रीमंत लोकं आहेत की त्यांच्यावर कितीतरी कोट्यवधीचे टॅक्स थांबलेले आहेत. जे वसूल केले जात नाहीत. वसूल होत नाहीत. ते वसूल करताही येतात. जर कडक कारवाई केली तर...... जर त्यांचे बंगलेच सील करुन विकले गेले तर....... परंतु कोण करणार कडक कारवाई? कारण त्यातील काही लोकं हे सत्ताधारी पार्टीचे सदस्य असतात. काही गुंडमवाली असतात, तर काही सेलिब्रेटी असतात. ज्यांना हेतुपुरस्सर सोडलं जातं. दुसरा मुद्दा हा की याच देशात राहणाऱ्या काही लोकांनी देशातील बँकांना डुबवून अरबो रुपये लुटले व या देशातून ते पळून गेले. खरंच त्यांच्याकडील पैसा जर परत आला असता तर देशात सरकारी उद्योगधंदे उभे राहू शकले नसते काय? परंतु असं झालं नाही. तिसरा मुद्दा आहे तांदूळ व गव्हाचा. सध्या लोकांना निःशुल्क तांदूळ व गहू मिळतो. तो महिन्याला दहा किलो प्रती व्यक्ती असा आहे. तो गरिबांना आहे आणि देशात अशी बरीच कुटुंब आहेत की जे त्याचा लाभ घेतात. परंतु किती प्रतिशत लोकांना त्याचा लाभ मिळतो. देशातील एकुण जनतेपैकी कमीतकमी अंदाजे पन्नास ते साठ प्रतिशत लोकांना त्याचा लाभ मिळतो. मात्र फक्त देशातील वीस टक्के जनताच तेवढी गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील आहे. बाकीचे नावापुरतेच दारिद्र्य रेषेखालील आहेत. दारिद्र्य रेषेखालील लोकं म्हणजे नेमके कोण? ज्यांना एकापेक्षा जास्त मुलं आहेत असे, ज्यांच्याकडे पक्की इमारत आहे असे, ज्यांच्या नावावर दोन चाकी गाडी आहेत असे की जे सरकारी नोकरीवर आहेत असे? आजच्या काळात राशनचा लाभ घेणारी मंडळी ही पक्क्या इमारतीत राहतात. चालवायला दोनचाकी गाडी वापरतात. घरात एकच्या वर मुलं आहेत. परंतु राशनच्या दुकानातून गहू, तांदूळ निःशुल्क मिळते म्हणून उचलतात व घरी नेवून इतरांना जास्त दामात विकूनही टाकतात. अलिकडील काळात तर असे तांदूळ, गहू घेणारे लोकंच वस्तीवस्तीतून फिरत असतात. त्याचं काय? राशनचा तांदूळ, गहू त्यांनाच मिळावा. ज्या घरी एकच अपत्य आहे, ते झोपड्यात राहतात, त्यांच्या घरी त्यांच्या नावावर एक सायकल आहे, गाडी नाही. अन् वार्षीक मिळकत एक लाखापेक्षा कमी आहे. तसं पाहिल्यास आज देशात कोणीच गरीब असेल, असं वाटत नाही. हे सरकारलाही एका क्लिकवर दिसतं. तरीही सरकार निमूटपणे लोकांची शहानिशा न करता राशनमध्ये निःशुल्क तांदूळ, गहू देत असतं. अन् यात माहीत जरी झालं की सरकारच्या तिजोरीतून तांदूळ, गव्हाचा अपहार झाला. तरी तो पैसा वसूल केल्या जात नाही. म्हणूनच सर्रासपणे लोकं सरकारी योजनेचा लाभ घेत असतात. आज असाच लाभ जीवनधारा विहीर बांधकाम, इंदिरा आवास योजना, विधवा पेन्शन योजना, वृद्ध पेन्शन योजना, अशा कितीतरी योजनेतून जनतेनं मिळविलेला आहे व पैसा लाटला आहे. त्यातच सरकारच्या पैशाचा अपहार केलेला आहे. तोच पैसा वाचला असता तर देशात खरंच सरकारी उद्योगधंदे उभे राहू शकले असते.
आज प्रत्येकजण खावूनपिवून सुखी आहे. त्यामुळं राशनच्या नावावर निःशुल्क तांदूळ, गहू न दिलेला बरा. तोच पैसा वाचवावा व त्यातून उद्योगधंदे निर्माण करावे. म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न सोडवता येवू शकतो. चवथा मुद्दा आहे, लाडकी बहिण योजना. या योजनेत तर चक्कं प्रत्येक घरातील महिलांनी हातच धुवून घेवून सरकारला लुटले. मात्र सरकारच्या लक्षात आल्यावरही सरकारनं त्यांच्यावर माया करुन त्यांची दया घेतली व कारवाई केली नाही. आज कितीतरी करोड रुपये त्यांना दिले. तेवढ्या पैशातून उद्योग उभे राहू शकले असते. पाचवा मुद्दा आहे, वृद्ध व विधवा पेन्शन योजना. वृद्ध व विधवांना नक्कीच पेन्शन द्यावी. जर त्यांना मुलंबाळं नसतील तर....... अलिकडील काळात मुलंबाळं असतात. तरीही ते पोषत नाहीत. असा हवाला दिला जातो. अशांना पेन्शन मागितली जाते व सरकार अशांना पेन्शनही देते. त्यातच सरकारच्या पैशाचा अपव्यय होतो. यात उपाय म्हणजे सरकारनं आपल्या पैशाचा अपव्यय न होवू देता अशा म्हाताऱ्यांना पेन्शन नक्कीच द्यावी. परंतु ती पेन्शन त्यांच्या मुलांच्या मिळकतीतून जबरन वसूल करावी. त्यानंतर वाचलेल्या पैशातून उद्योग उभारावे. तसेच विधवांना पेन्शन देण्याची गरज नाहीच. कारण आजच्या विधवांना मुलं असतात व ती मुलं त्यांना पोषायला समर्थ असतात. जर मुलं लहान असतील तर त्या स्वतःचं उदरभरण करायला समर्थ असतात. काही विधवा तर अशाही आहेत की ज्यांनी आपला दुसरा विवाहही केलेला आहे आणि सरकारकडून पैसाही घेत आहेत. निराधार योजनेचंही तसंच आहे. आधार असलेले कितीतरी लोकं आजच्या काळात निराधार म्हणून पैसे उचलत आहेत. मात्र कोणाकडेच प्रत्यक्षात जावून चौकशी करायला वेळ नाही आणि गेलेच तर दोन चार रुपये घेवून प्रकरणं दाबून टाकणारेही भरपूर आहेत.
देशातील राहणाऱ्या सर्वच लोकांना निःशुल्क पैसे मिळतात. लाडक्या बहिणीच्या नावावर. पेन्शन मिळतं, वृद्ध, विधवा व निराधार म्हणून. कोणाला राशनचा तांदूळ, गहू निःशुल्क मिळतो. कोणी येथीलच पैसा, बँकांना डुबवून विदेशात नेतात. कोणी टॅक्स भरत नाही. अन् सरकारही त्यावर डोळेझाक करुन स्तब्ध पाहात राहातं. प्रत्यक्षात कारवाई करुन शिकंजे कसत नाही. म्हणूनच लोकांची हिंमत वाढलीय लाभ घेवून देशातील पैशाचा अपहार करण्याची. जिथे देशातील नेतेच देशात कितीतरी पैशाचे घोटाळे करतात. तिथं जनतेच्या लहानशा घोटाळ्याचं काय? परंतु अशा सरकारी योजना व त्यातून अपहार करणारे लोकं. सरकारच्या लक्षात येवूनही सरकारचं त्यांना केवळ राजकारणासाठी माफ करीत जाणं. हाच भाग देशातील तरुणाईच्या जीवाशी खेळणारा आहे. देशातील तरुणाईला निःशुल्क राशन नको. त्यांना हाताला काम हवं. जे काम सरकारच देवू शकतं. सरकारी उद्योगधंदे निर्माण करुन. परंतु सरकारनं वरील प्रकारच्या गोष्टी केल्या. प्रत्येक परीवाराला शहानिशा न करता योजना दिल्या. राशन निःशुल्क दिलं वा पेन्शन दिल्या. लाडक्या बहिणींना पैसे वाटप करीत बसले. टॅक्स वसूल केले नाही. लोकांना बँका डुबवून पळू दिले तर देशात पैसाच उरणार नाही, उद्योग धंदे उभे करण्यासाठी. मग सुशिक्षीत तरुणाईंना काम मिळणार नाही. बेरोजगारी सतत वाढतच जाईल व एक वेळ अशी येईल की बेरोजगार पार्टी एक ट्रेलर होतं. ती तरुणाई खवळेल व सरकारलाच एक दिवस नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच सरकारनंही त्यावर विचार करावा आणि तरुणाईसाठी नक्कीच लवकर पावलं उचलावीत. विनाकारण पैशाचा होणारा अपव्यय बंद करावा. सरकारी नोकरदाराच्या खिशातून एक दोन दिवसाचाही पैसा काढावा. प्रत्येक नागरिकांकडून टॅक्स वसूल करावा व तरुणाईचा प्रश्न सोडवावा. सरकारी उद्योग धंदे निर्माण करुन. जेणेकरुन तरुण खुश तर देशही खुश व देश खुश तर सरकारही खुश. अन् ज्या देशातील तरुणाई खुश असेल, त्या देशातील जनताही आपोआपच खुश झाल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढंच खरं. परंतु त्यासाठी सरकारी उद्योगधंदे उभारावेच लागतील. विनाकारण सरकारनं देशातील लोकांना खुश ठेवण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ देवून मतांसाठी राजकारण करु नये म्हणजे झालं.
बेरोजगारीवर मात करण्यासाठीच निर्माण केलेली बेरोजगार पार्टी. जी दिपकनं निर्माण केली होती. त्यानंतर त्याला शहरातीलच एका खाजगी संस्थेत सरकारी नोकरी लागली. जी शिक्षकी पेशातील नोकरी होती. कालांतरानं त्याचा विवाह झाला. दोन मुले झाली व तो संसारात रममाण झाला होता. त्यातच मुलांचे शिक्षण व संसार या सर्व गोष्टींमध्ये रममाण झाल्यानं आयुष्यातील पंधरा वर्ष कसे निघून गेले ते कळलेच नाही. या दरम्यान त्यांचं आईकडेही दुर्लक्ष झालं होतं. अशातच नोकरीला पंधरा वर्ष झाले. त्यानंतर टि ई टी आली व टि ई टी रुपात गहण संकट त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच निर्माण होवून ती टि ई टी परिक्षा आपण पास होवू का? हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला होता. त्यातच त्याचा लहान भाऊ राज विदेशात एका खाजगी पॅकेज स्वरुपात नोकरीवर लागला होता. तोही आपल्या आईकडे फिरकून पाहात नव्हता.
************************९*******************
क्रमशः भाग दोनमध्ये