कॅन्सर फोबिया : प्रवास संपला नाहीभाग १ : भीतीच्या पलीकडे... एक नवा किरणलेखन : अविनाश शांताबाई भिमराव ढळे एक अश्वस्थामा --------------------------------------------------------------------रात्रीचे जवळजवळ दोन वाजले होते.घरात सगळे झोपले होते.पण समीरच्या डोळ्यांना झोप नव्हती.हातात मोबाईल होता.स्क्रीनवर एक रिपोर्ट उघडा होता.काही वैद्यकीय शब्द त्याला समजत नव्हते.Lymph node... biopsy... malignant... staging...त्याने एक शब्द Google वर टाकला.पुढच्या क्षणी दहा वेबसाइट उघडल्या.एका ठिकाणी कॅन्सर.दुसऱ्या ठिकाणी stage.तिसऱ्या ठिकाणी मृत्यूचे आकडे.चौथ्या ठिकाणी कोणीतरी लिहिले होते,“ही औषधी घेतली की कॅन्सर सात दिवसांत बरा होतो.”पाचव्या व्हिडिओमध्ये कुणीतरी सांगत होते,“केमोथेरपी करू नका.”समीरचा श्वास वाढला.त्याने मोबाईल बाजूला ठेवला.पुन्हा उचलला.पुन्हा Google.पुन्हा भीती.पुन्हा प्रश्न.आणि शेवटी एकच विचार..
Cancer Phobia : सत्य आणि भ्रम - 2
CANCER PHOBIAभाग २ : कॅन्सर का होतो? रोजच्या सवयींमध्ये दडलेला धोका!लेखन : अविनाश भिमराव ढळेएक अश्वस्थामा------------------------------------------------------------------------“प्रत्येक आजारामागे एकच कारण असे नाही. पण काही धोके आपण ओळखू शकतो, काही सवयी बदलू शकतो आणि काही आजारांचा धोका कमी करण्यासाठी आजपासूनच पावले उचलू शकतो.”१. एक साधा प्रश्न, ज्याचे उत्तर प्रत्येकाने शोधले पाहिजेनागपूरच्या एका गजबजलेल्या चौकात सकाळ सुरू झाली आहे. कुणी कामावर जाण्यासाठी बस पकडत आहे, कुणी दुचाकीवरून दुकान उघडायला निघाले आहे, कुणी शेतमाल विकण्यासाठी बाजाराकडे जात आहे, तर कुणी मुलांना शाळेत सोडून स्वतःच्या कामाला लागले आहे.या गर्दीत अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा आणि नाश्त्याने होते. काहींच्या खिशात सिगारेटचे पाकीट असते, काहींच्या हातात गुटख्याची ...Read More
Cancer Phobia : सत्य आणि भ्रम - 3
CANCER PHOBIAभाग ३ : शरीराचे संकेत... दुर्लक्ष की जागरूकता?लेखन : अविनाश भिमराव ढळे एक भागातून पुढे .......“शरीर नेहमी मोठ्या आवाजात इशारा देत नाही. कधी एखादी छोटी गाठ, न भरणारी जखम किंवा बदललेली दिनचर्या आपल्याला थांबून विचार करायला सांगत असते.”१. ती गाठ छोटी होती... पण प्रश्न मोठा होता!एका साधारण सकाळची कल्पना करा.नागपूरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात घराची नेहमीची धावपळ सुरू आहे. मुलांना शाळेत जायचे आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीला औषधे घ्यायची आहेत. कोणाला कार्यालयात पोहोचायचे आहे, तर कोणाला बाजारात.या गडबडीत घरातील एका व्यक्तीच्या मानेवर हात जातो. काही दिवसांपासून जाणवणारी छोटीशी गाठ तिथेच आहे.सुरुवातीला वाटते, कदाचित सर्दीमुळे असेल. ...Read More