१.साई हॉस्पिटल, स्पेशल वॉर्ड - एक वीस-बावीस वर्षांची मुलगी बेडवर पडून होती. आणि मी आणि मिस्टर वाघ तिच्या समोर उभे होतो. 'सिस्टिक फायबरोसिस' नांवाच्या आजाराने ती ग्रस्त होती. असह्य त्रास असून देखील तिच्या चेहऱ्यावरचं हसू ढळलेलं नव्हतं. तिच्याकडं पाहत असताना मला एक गोष्ट जाणवली, की ज्या अर्थी मिस्टर वाघ मला या मुलीला भेटवायला घेऊन आला आहे, त्या अर्थी तो पुढं जे काही सांगणार आहे, ते याच मुलीशी संबंधित आहे. तिला 'बाय' करून मिस्टर वाघ वॉर्डच्या बाहेर पडला. माझ्यासाठी ती मुलगी एक तर अनोळखी होती. तशात तिची ही अशी अवस्था पाहून काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नसल्यानं मी काहीच न बोलता मिस्टर

Full Novel

1

AGENT - X (1)

१.साई हॉस्पिटल, स्पेशल वॉर्ड - एक वीस-बावीस वर्षांची मुलगी बेडवर पडून होती. आणि मी आणि मिस्टर वाघ तिच्या समोर होतो. 'सिस्टिक फायबरोसिस' नांवाच्या आजाराने ती ग्रस्त होती. असह्य त्रास असून देखील तिच्या चेहऱ्यावरचं हसू ढळलेलं नव्हतं. तिच्याकडं पाहत असताना मला एक गोष्ट जाणवली, की ज्या अर्थी मिस्टर वाघ मला या मुलीला भेटवायला घेऊन आला आहे, त्या अर्थी तो पुढं जे काही सांगणार आहे, ते याच मुलीशी संबंधित आहे. तिला 'बाय' करून मिस्टर वाघ वॉर्डच्या बाहेर पडला. माझ्यासाठी ती मुलगी एक तर अनोळखी होती. तशात तिची ही अशी अवस्था पाहून काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नसल्यानं मी काहीच न बोलता मिस्टर ...Read More

2

AGENT - X (2)

२. इन्स्पेक्टर मिलींद हजारेनं त्याच्या केबिन मध्ये येऊन आपली टोपी व काठी वैतागानं टेबलवर आदळली आणि त्यानं आपल्या खुर्चीत झोकून दिलं."सातवा खून!" घाम पुसत तो समोर बसलेल्या मिस्टर वाघला म्हणाला.मिस्टर वाघ हजारे येण्याअगोदर एक अर्धा तास आधी येऊन मस्तपैकी कांदाभजी आणि चहाचा आस्वाद घेत बसला होता. "सिरीयल किलर?" तोंडातली भजी चावत आणि चहाचा घुटका घेत त्यानं हजारेला विचारलं."वाटतंय तसंच. पण प्रत्येक खुनाचा पॅटर्न वेगळा आहे. म्हणून एकाच व्यक्तीनं सगळे खून केलेत असं समोर प्रथमदर्शनी तरी वाटत नाही, पण एकाच शहरात सलग खून होतायत म्हंटल्यावर ते कोणीतरी एकटाच किंवा एक टोळी करते आहे असंच वाटतं...!""कन्फ्युजिंग! हं?""येस!""मी तुमचं कन्फ्युजन दूर करतो! हे कोणीतरी ...Read More

3

AGENT - X (3)

३.आणखी एक मृत्यू झाला होता. धन्वंतरी फार्माचा तिसरा बोर्ड मेंबर, सत्तेचाळीस वर्षीय नारायण सांगावकर आपल्या लिविंगरूम मध्ये विस्कटला होता. विस्कटला म्हणतोय; कारण त्याच्या शरीराच्या वरचा भाग कापून तुकडे करून लिविंगरूम भर विखुरले होते. मिस्टर वाघ त्या ठिकाणी पोहोचला. तो येण्याआधी पंचनामा उरकून हजारेनं सर्वांना तेथून बाहेर काढलं होतं. मिस्टर वाघ या केसवर काम करतोय हे त्याला कोणालाही कळू द्यायचं नव्हतं. मिस्टर वाघनं बॉडी पाहिली. मृताचा गळा चिरण्यात आला होता."किचन नाईफ वापरलंय!" मिस्टर वाघ बॉडी एक्झामाईन करत मागेच उभ्या असलेल्या हजारेला म्हणाला."किचन मधला चाकू? कशावरून?" हजारेनं आश्चर्यानं विचारलं."बॉडीवरील कट बघा. खांद्यापासून वर चिरलंय. एखाद्या गाईला कापावं तसं. कुकिंगच्या भाषेत याला 'चक स्टेक ...Read More

4

AGENT - X (4)

४. एकएका कसायाची आणि सेफची कसून चौकशी होत होती, पण म्हणावं असं महत्त्वाचं काही हाती लागत नव्हतं. त्यांच्याकडील चाकूच पण असणाऱ्या सगळ्या हत्यारांची फॉरेन्सिक कडून तपासणी केली जात होती. डॉग स्कॉडला पण मोठ्या संख्येनं कामाला लावलं होतं. सांगावकरच्या डेडबॉडीची स्मेल कुत्र्यांना देऊन पकडलेल्या लोकांमधून खुनी शोधण्याचा शेवटचा पर्याय हजारे अँड टीमने करून पाहिला, पण असफल ठरले. तरीही हजारे हार मानणाऱ्यातला नव्हता. 'आर्टिकल ४८' च्या अंतर्गत या सगळ्या लोकांना हजारेनं जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं. पण या सगळ्यांत मिलींद हजारेच्या एक गोष्ट लक्षात आली नव्हती, की खूनी शेफ किंवा कसाईच असावा असा काही नियम नव्हता. एखादी सामान्य व्यक्ती जीला 'चक कट' बद्दल माहिती ...Read More

5

AGENT - X (5)

५."आय मिन वाय? लिटरली वाय?" मी किंचाळलोच!"बिकॉज आय हेट ग्रीडी पीपल!" तो शांतपणे म्हणाला. "आणि तुला कसं ते सुद्धा घ्यायचं असेल!" त्यानंच विचारलं.मी काहीच बोललो नाही. "ऐक!" माझी संमती आहे का नाही हे जाणून घेण्याची तसदी न घेता तो सांगू लागला,"लायटर मध्ये हायड्रोजन सायनाईड होतं. लायटर सुलगावल्यावर फ्लेमची हायड्रोजन सायनाईडशी रिएक्शन झाली. आणि त्या विषारी फ्युमनं मेस्त्री मेला. हायड्रोजन सायनाईड इज हायली फ्लेमेबल अँड व्हेरी टॉक्सिक! इट कॅन किल पीपल इन्स्टंटली! आणि तेच मिलिंद मेस्त्री सोबत झालं! ही शुड हॅव बिन अवेअर, दॅट स्मोकिंग इज इंजुरीअस तो हेल्थ!" पुन्हा कपटी आणि नीच हसू त्याच्या ओठांवर तरळलं."पण का?" मी अगदी काकुळतीला येऊन ...Read More

6

AGENT - X (6)

६.मिथिल आपल्या प्रपोसलचा हेका काही केल्या सोडायला तयार नव्हता. मिस्टर वाघ येऊन गेल्यानं तो बिथरला नक्कीच नव्हता, पण सावध झाला होता. मिस्टर वाघ गेल्या-गेल्या सगळ्या ऑफिसमध्ये शोधाशोध करून त्यानं लगेच तातडीची बोर्ड मीटिंग बोलावली,"गेल्या काही दिवसांत झालेल्या नुकसातून हीच एक डील आपल्याला बाहेर काढू शकते." तो मीटिंग मध्ये म्हणाला.हेच मिथिल पुन्हा पुन्हा सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यासाठी पुन्हा मिस्टर वाघ येऊन गेल्याच्या दिवशी तातडीची मिथिलनं बोर्ड मीटिंग त्यानं बोलावली होती..."जे झालं, ते वाईट झालं... आपले तिसरे बोर्ड मेंबर सांगावकर अकाली मृत्यूमुखी पडले..." अत्यंत कळवल्यानं तो बोलला."खून आहे तो..." बावन्न वर्षांचा निशांत पुरोहित हा बोर्ड मेंबर मिथिलला ...Read More

7

AGENT - X (7)

७. आता मिथिलचं नेक्स्ट टार्गेट कोण आहे हे मिस्टर वाघला माहीत होतं! रादर् मिथिलसाठी त्यानं स्वतःच ते सेट केलं मिस्टर वाघचं नेमकं काय चालू आहे हे हजारेला मात्र काही उमगत नव्हतं. तो अक्षरशः वैतागला होता. फिफ्टी प्रसेन्ट पेयमेंट त्यानं मिस्टर वाघला आधीच केलं होतं आणि असं असून ठोस असं काही मिस्टर वाघ करत असल्याचं (त्याच्या दृष्टिकोनातून तरी) त्याला दिसत तर नव्हतं. मिस्टर वाघनं त्याला सतत रिपोर्टिंग करावं असं त्याचं म्हणणं होतं. जे मिस्टर वाघ कधीच करणारा नव्हता..."तुमचं काय चाललंय काही कळत नाही मिस्टर वाघ!" तो रागातच मिस्टर वाघला बोलला.यावेळी मिस्टर वाघनं स्वतःच स्वतःला मिलींद हजारेच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं होतं आणि ...Read More

8

AGENT - X (8)

८.एकाचवेळी दोन ठिकाणी लक्ष ठेवता येणार नाही म्हणून मिस्टर वाघनं मिलींद हजारेला निशांत पुरोहितवर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं. "आणि तुमच्या कामाला लावू नका! तुम्ही पर्सनली त्याच्या मागावर रहा!" मिस्टर वाघ हजारेला म्हणाला."पण का? इज ही अ परपेट्रेटर्?" हजारेनं विचारलं."कळेल लवकरच!" मिस्टर वाघ गंभीरपणे म्हणाला."आणि तुम्ही काय करणाराय?" "दुसरं एक काम आहे!" "मिस्टर वाघ! माझं जर काम झालं नाही, तर तुम्हाला खूप महागात पडेल एवढं ध्यानात ठेवा! तुम्ही काही काम करताय, असं मला तर वाटत नाही! आताही तुम्ही मलाच कामाला लावताय! एवढे पैसे तुम्ही घेतलेत ते कशासाठी?" हजारेनं मिस्टर वाघवर चिडून त्याला सुनावलं."तुम्हाला माझी वर्किंग प्रोसेस पटत नसेल, तर तसं सांगा. मी आत्ता ही ...Read More

9

AGENT - X (9)

९."तुम्ही त्या बिल्डिंगमधे काय फेकलंत?" मी विचारलं.या सलग घडणाऱ्या आणि विलक्षण घटना ऐकून माझा श्वास रोखला गेला होता. रिलीफ म्हणून मी मिस्टर वाघला प्रश्न केला. मला जाणून पण घ्यायचं होतंच, की त्यानं काय कारभार केलाय..."त्यांना नर्व 'व्हिएक्स' हवं होतं. ते दिलं!" तो सहज म्हणाला."म्हणजे? आणि हे व्हिएक्स, हे नर्व एजंट्स... काय भानगड काय आहेत?" मी कापाळावर आठ्या आणत विचारलं."नर्व एजंट्स आर केमिकल वेपन्स!" त्यानं शाब्दिक बॉम्ब फोडला,"व्हिएक्स हा त्यातील एक अत्यंत विषारी प्रकार! शॉर्टफॉर्म फॉर 'वेनमस एजंट एक्स' केमिकल फॉर्म्युला C11H26NO2PS! लिक्विड, क्रीम व गॅस फॉर्म्समध्ये हे आढळतं. हे एक अत्यंत प्राणघातक असं नर्व एजंन्ट आहे. संयुक्त राष्ट्रानं मोठ्या ...Read More

10

AGENT - X (10)

१०. "मला वाटलेलं तुम्ही शॅम्पेन पाजून हजारेला मारताय...!" मी सुन्न होऊन बोललो."वेडायस की काय? एवढी महाग शॅम्पेन मात्री कोण बिसाईड्स, आय नेव्हर युज माय ट्रिक ट्वाईस! पकडलं जाण्याची शक्यता असते!"मला माहितीय मिस्टर वाघ पित नाही. पण मला चिडवण्यासाठी तो उपहासानं तसं म्हणायला होता..."हजारेचा खून झालाय म्हंटल्यावर इन्वेस्टीगेशन झालं असेल?" "हो.""मग तुम्ही वाचला कसे?"यावर तो हसला. "तुझ्या लक्षात आलं असेल, तर याचं उत्तर दिलंय मी तुला." तो म्हणाला."बरं. पण त्याचे अकाऊंट स्टेटस तपासलं असेलच. त्यांनी मरणाआधी तुम्हाला एवढी मोठी अमाऊंट ड्रान्जॅक्ट केल्याचं समोर आलं असेल...""तो असले ड्रान्जॅक्शन्स करण्यासाठी त्याच्या बायकोचं अकाऊंट वापरायचा. ती एका श्रीमंत घरातली मुलगी आहे. त्यामुळं मोठी रक्कम तिच्या अकाऊंटवर ...Read More

11

AGENT - X (11)

११. फायनल वर्डीक्ड् -मिस्टर वाघनं मिथिलची ती 'मॉसबर्ग एमसी वन एससी' ही सबकॉपॅक्ट सेमी ऑटोमॅटिक नाईन एमएम पिस्टल माझ्यासमोर पण आज माझं त्या गनकडं लक्ष नव्हतं."सबकॉपॅक्ट सेमी ऑटोमॅटिक नाईन एमएम कॅलिबर! कपॅसिटी फ्लश-फिट मॅगझीनमध्ये सहा राऊंड व एक्सटेंडेड् मॅगझीनमध्ये सात राऊंड. लांबी सहा पॉईंट पंचवीस इंच. वजन सहाशे तेवीस पॉईंट सात ग्रॅम. फुल्ली लोडेड् अँड इसी टू रेग्युलर कॅरी. खूप कम्फर्टेबल आहे! " तो म्हणाला.मी भयंकर धक्क्यात होतो. तो काय बोलतोय हे त्यावेळी माझ्या कानात गेलं फक्त पण डोक्यात शिरलं नाही... मी विचार होतो, की मिस्टर वाघची प्रत्येक केस अधिकाधिक खतरनाक होत चालली आहे आणि मी त्याचा इच्छा नसताना एक ...Read More