AGENT - X (5) books and stories free download online pdf in Marathi

AGENT - X (5)


५.

"आय मिन वाय? लिटरली वाय?" मी किंचाळलोच!
"बिकॉज आय हेट ग्रीडी पीपल!" तो शांतपणे म्हणाला.
"आणि तुला कसं ते सुद्धा जाणून घ्यायचं असेल!" त्यानंच विचारलं.
मी काहीच बोललो नाही.
"ऐक!" माझी संमती आहे का नाही हे जाणून घेण्याची तसदी न घेता तो सांगू लागला,
"लायटर मध्ये हायड्रोजन सायनाईड होतं. लायटर सुलगावल्यावर फ्लेमची हायड्रोजन सायनाईडशी रिएक्शन झाली. आणि त्या विषारी फ्युमनं मेस्त्री मेला. हायड्रोजन सायनाईड इज हायली फ्लेमेबल अँड व्हेरी टॉक्सिक! इट कॅन किल पीपल इन्स्टंटली! आणि तेच मिलिंद मेस्त्री सोबत झालं! ही शुड हॅव बिन अवेअर, दॅट स्मोकिंग इज इंजुरीअस तो हेल्थ!" पुन्हा कपटी आणि नीच हसू त्याच्या ओठांवर तरळलं.
"पण का?" मी अगदी काकुळतीला येऊन विचारलं,
"त्या बिचाऱ्याचा या सगळ्यांशी काही संबंध नव्हता! हा तोही गुन्हेगार होता. इन द सेन्स... पण तरी..." मी माझा मुद्दा सोडायला तयार नव्हतो. कारण त्यानं सांगितलेलं कारण मला समाधान देणारं नव्हतं.
"कारण मी इकडे शेतकरी आणि शेतीला संरक्षण देण्याचा प्रयत्न करतोय, वाढवायचा प्रयत्न करतोय आणि हा साला त्याच शेतकऱ्यांची पिळवणूक करतोय!" तो चिडून म्हणाला आणि थोडावेळ तो शांत झाला आणि मग म्हणाला,
"तो टॅक्स चोरत होता! आणि ही देशाशी केलेली गद्दारी आहे. अशा लोकांना मोकळं सोडणं म्हणजे सामान्य लोकांवर केलेला अन्याय ठरेल! म्हणून... म्हणून!" बोलताना मिस्टर वाघ खूपच कन्सर्न्ड् वाटत होता.
"आणि तुम्ही पकडला गेला असता तर..." मी माझा नेहमीचा प्रश्न केला.
"इतके दिवस माझ्यासोबत असून तुला असा प्रश्न पुन्हा पुन्हा पडतोच कसा?" त्यानं मला विचारलं.

मला माहित आहे तो कशातच कधी अडकणार नाही, पण त्यानं हे केलं कसं हे जाणून घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. कारण तेच माझं काम आहे!

"त्याला लंग्ज कॅन्सर होता. सलग सिगरेट्स पिऊन त्यामुळं तो त्याच कारणानं मेलाय असा घरच्यांचा समज झाला."
"आणि संशय येऊन त्यांच्या फॅमिलीनं पोलीस कम्प्लेन्ट केली असती; तर?" मी विचारलं.
मी त्याचा पाठलाग सोडायला तयार नव्हतो. मला त्याच्याबुद्धिमत्तेची परीक्षा घायची होती.
"तर काय? त्याची अटॉप्सी झाली असती!"
"तुम्ही किती सहज बोलताय? रिपोर्ट मध्ये समजलं असतं ना, की मिलिंद मेस्त्री कशामुळे मेलेत ते... शिवाय त्यांच्या घरी सीसीटीव्ही असतीलच. तुम्ही नक्कीच पकडला गेला असता..." मी काळजी व्यक्त केली.
"एन्टरन्सलाच चार कॅमेरे होते."
"तरी तुम्ही रिस्क घेतलीत?" मला काही सुधारेना.
"आपलं ध्येय गाठण्यासाठी जोखीम घ्यावीच लागते सूरज! आणि पोलिसांनी शोध घेतलाच असता, तर तो नज़ीम अहमदचा! जो अस्तित्वातच नाही!" तो हसत म्हणाला आणि त्यानं डोळा मारला.

हं!... मला काय बोलावं सुचेना. मिस्टर वाघचा एस्केप प्लॅन इतका परफेक्ट असतो, की मी कितीही प्रयत्न करून त्यात काही चूक किंवा खोट काढूच शकत नाही!...
असो... मिलिंद मेस्त्रीला मारून मिस्टर वाघने या प्रकरणातील त्याचा पहिला बळी घेऊन त्याच्या सायकॉलॉजिकल खूनी खेळाचा श्रीगणेशा केला होता...
आता बाघायचं हे आहे, की त्याच्या या कर्मयज्ञात अजून कोण - कोण त्याच्या हातून समिधा म्हणून स्वाहा होतंय...!

"लायटरनं मेस्त्रीला मारायचं हे तुम्ही कसं ठरववलंत?" मी विचारलं.
"केस संबधित कोणत्याही माणसाची मी सगळी माहिती आधी काढतो हे तुला माहितच आहे. त्याला सिगरेटचं व्यसन आहे आणि त्याला त्यामुळं लंग्ज कॅन्सर पण झालाय हे मला माहीत झालं होतं. म्हणून मग तो लायटर तयार केला.
"पण जाता जाता मेस्त्री एक काम चांगलं करून गेला. एक नवीन बिझनेस आयडिया देऊन गेला. ज्यात शेतकऱ्यांचा पण फायदा झाला आणि माझाही!"
पुढं सांगण्याआधी मिस्टर वाघ बोलला. आणि त्यानं प्रोसिड केलं...

मिस्टर वाघचा इकडं हा धंदा चाललेला, तर दुसरीकडं धन्वंतरी फार्माचा एमडी मिथिल अदीप भारद्वाज त्याच्या उरलेल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सशी कॉन्फरन्स रूममध्ये चर्चा करत होता...
"मला माहित आहे, आपले काही साथीदार गेल्यानं आपला खूप मोठा लॉस झालाय. आणि मी हे पैशांच्या बाबतीत म्हणत नाही! खरंच! आपले सर्व दिवंगत बोर्ड मेंबर्स् अत्यंत हुशार आणि नेहमीच कंपनीचं हित पाहणारेच होते. आणि म्हणूनच ते रिस्पेक्टेबलही होते आणि तसेच तुम्हीही आहात. पण ते गेले म्हणून आपण आपलं काम तर नाही ना थांबवू शकत? म्हणून मी रिक्वेस्ट करतोय, की कंपनीच्या भल्याचा विचार करा आणि या प्रोजेक्टला सहमती द्या!" मिथिल एका प्रपोसलकडं निर्देश करत म्हणाला.
"सॉरी! वी कान्ट अलाव थिस! थिस इज अट्टर्ली रिडीक्युलस!" एक वयस्कर बोर्ड मेंबर साकेत मिश्र चिडलेल्या स्वरात म्हणाला.
संवाद थांबला होता. मिथिलनंही त्याची जागा आणि कॉन्फरन्स रूम सोडली होती...

मिस्टर वाघशी बोलणाऱ्या निशांत या बोर्ड मेंबरने मिस्टर वाघला ही माहिती पुरवली होती.
"सगळेच शॉक मध्ये आहेत, तरी एमडींना या प्रपोसलच पडलंय... हे अगदीच न पटण्यासारखं आहे..."
"कसलं प्रपोसल?" मिस्टर वाघनं विचारलं.
पण त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र निशांतनं टाळलं होतं. आणि मिथिलची केबिन दाखवून तो बाहेरूनच निघून गेला होता.
जेवढं सांगणं त्याला महत्त्वाचं वाटलं ते त्यानं सांगितलं होतं. या उपर त्या प्रपोसल संदर्भात मिस्टर वाघनं काय तो शोध घ्यावा हा निशांतच्या गप्प बसण्या मागचा अर्थ होता.
"नमस्कार, आत येऊ?" मिस्टर वाघनं मिथिलची परवानगी घेतली.
"कोण?" मिथिलनं त्याला आत येण्याची परवानगी न देता दारावर उभा करूनच विचारलं.
"मी विजय वाघ. प्रायव्हेट इन्वेस्टीगेटर. तुमचे दिवंगत बोर्ड मेंबर नारायण सांगावकर यांच्या फॅमिलीने त्यांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी मला हायर केलं आहे. ही केस हाताळत असलेल्या इन्स्पेक्टर मिलींद हजारे यांनी तुम्हाला माझी माहिती दिली असेल..." मिस्टर वाघ संकोचल्यासारखा बोलला.
"हो. हो. या!" मिथिलनं मिस्टर वाघला त्याच्या केबिन मध्ये प्रवेशन्याची सहमती दिली.
मिस्टर वाघ मिथिलच्या डेस्कपाशी पोहोचला. मिथिलनं त्याला बसण्यासाठी खुर्ची ऑफर केली.
"बसा!" मिथिल मिस्टर वाघला म्हणाला.
मिस्टर वाघ त्याच्या समोर बसला.
"तुम्ही काही बोलण्या - विचारण्या आधीच मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, की जी काही माहिती द्यायची होती, ती इन्स्पेक्टरना आम्ही दिली आहे. या नंतर सांगण्यासारखं आमच्याकडे काही नाही. आमची स्टेटमेंट्स जमा आहेत. तुम्ही ती वाचून घेतलीत, तर बरं होईल. तुमचा व आमचाही वेळ वाचेल!" मिथिलनं मिस्टर वाघला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला.
"स्टेटमेंट्स मी वाचली आहेत. मला तुम्हाला काहीच प्रश्न विचारायचे नाहीत. मी फक्त तुमचं ऑफिस पहायला आलोय. पण तुमची परवानगी असेल, तरच!"
"बरं! पण कशाला हात लावू नका!" खूप विचारांती दीर्घ श्वास सोडून मिथिल म्हणाला.
"थँक्स!" मिस्टर वाघनं हसून आभार मानले.
"या. तुम्हाला आमच्या मॅनेजरशी भेट घालून देतो. ते तुम्हाला आमची सगळी डिपार्टमेंट्स दाखवतील. या!" मिथिल खुर्चीतून उठत म्हणाला.
मिस्टर वाघनं त्याला फॉलो केलं.
दोघं ऑफिसच्या कॉरिडॉर मध्ये चालत असताना मिथिल त्याला म्हणाला,
"सॉरी थोडा रूड वागलो, पण काय आहे, या प्रकरणामुळं खरंच खूप त्रास झालाय ओ... बिझनेसवर आणि सर्व एम्प्लॉईजवर पण याचा इफेक्ट झालाय. हे सगळं आमच्याच बाबतीत का होतंय ते कळतं तर नाहीच, पण आमच्यातील आणखी कोणी आणि कधी मारला जाईल, याची पण काही खात्री नाही...!"
"भिण्याचं कारण नाही. तुमच्या कंपनी मधील लोकच मारले गेलेत असं नाही. त्यामुळं तुम्ही घाबरण्याचं काहीच कारण नाही!" मिस्टर वाघ त्याला आश्वस्त करत म्हणाला.
"गेस यु आर राईट!" मिथिल अजूनही नाराजीतच म्हणाला.
दोघं मॅनेजरच्या केबिन पाशी पोहोचले होते. मिथिलनं नॉक न करताच दरवाजा उघडला आणि मॅनेजरला हाक मारली.
"लोहकरे!"
मॅनेजर लगबगीनं बाहेर आला.
"हे पोलिसांकडून आलेत. यांना आपली कंपनी नीट दाखवा." मिथिलनं मॅनेजरला आज्ञा केली.
"होय सर!" मॅनेजर मिथिलला बोलून त्यानं मिस्टर वाघला मागून येण्याची विनंती केली,
"इकडून सर!" तो मिस्टर वाघला म्हणाला.
मिस्टर वाघनं स्मित करून होकारार्थी मान डोलावली व मिथिलला पुन्हा धन्यवाद देऊन तो मॅनेजर मागून चालता झाला...

सगळी कंपनी पाहून झाल्यावर मिस्टर वाघनं पुन्हा मिथिलची गाठ घेतली आणि तो निघून गेला...