Prarabdh in Marathi Short Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | प्रारब्ध...

प्रारब्ध...

प्रारब्ध....

"आलीस का एकदाची ऑनलाइन? थॅंक्यू.. " चिडचिड करतच यश नी बोलायला सुरवात केली...

"काय रे यश,किती चीडशील? माझ म्हणण तरी ऐकून घे कि जरा..आल्या आल्या चिडचिड करून काय मूड घालावतोयस? मला वाटत आपण आज बोलायलाच नको रे..उद्या जमल तर येईन ऑनलाइन आणि माझा मूड असेल तर बोलू... आणि आज फोन करण, मेसेज करण टाळलस तर बर होईल..." निशा वैतागूनच म्हणाली...

निशा आणि यश ची मैत्री तशी जुनी तशी नवीन.......एकाच शाळेतले पण मनमोकळेपणानी दोघ 11वी पासून बोलायला लागलेले. बोलता बोलता कधी खूप चांगले मित्र झाले त्यांनाही कळल न्हवत......दोघ सारखे बोलायचे अस न्हवत..पण जमेल तेह्वा न चुकता बोलायचेच... आणि मन मोकळ करायचे...प्रत्येकवेळी अगदी फोन वर अस नाही...कधी फोन किंवा मेसेज किंवा ऑनलाइन... गरज असतांना धावत येणारे आणि आनंदाच्या वेळी बरोबर असणार हे नक्की असायचं... दुसऱ्याला जे आवडत नाही ते बोलण कटाक्षानी टाळायचे..त्यामुळे त्यांच्या मैत्रीत कधी दुरावा आला न्हवता....


"सॉर्री ग... सकाळी मी तुला मेसेज केलेला कि आज ऑनलाइन बोलू ...किती वेळ वाट पाहत होतो तुझी आणि तू आली नाहीस मग मी चिडलो...तू आली नाहीस म्हणून तुला तुला किती वेळा फोन केलेला...मेसेज पण केलेले...तू एकदाही फोन उचलला नाहीस...मेसेज ला उत्तर दिल नाहीस...कुठे इतकी बिझी होतीस? आणि सॉर्री...मी नाही चिडत.... तू पण प्लीज तू भांडू नकोस.... आणि माझा भांडायचा मूड नाहीये..खरच...नंतर कधीतरी भांडू...तू बोल कशी आहेस?"


" मी मस्त ... तू कसा आहेस? आणि कितीवेळा सांगितलाय मी बोलायला आल्या आल्या चिडचिड करत नको जाउस रे... तू चिडचिड केलीस कि माझा मूड चांगला नाही राहत ....माहितीये ना?? तरीही आज चिडचिड केलीसाच....भेटीची सुरवात चिडचिड करून झालेली मला नाही आवडत...”

नेहमी प्रमाणे दोघांची बोलायला सुरवात झाली..आधी वातावरण जरा तापलेल होत पण ते तस राहणार न्हवत हे नक्की होत...वातावरण हळू हळू निवळायला लागल...

“आता मी लक्षात ठेवीन...तू प्लीज चिडू नकोस आत्ता..ओके? मी ठीके....जरा बोलायचंय तुझ्याशी..वेळ आहे ना?” यश बोलला...

"हो हो...नाही चिडत..तू हक्काचा वाटतोस..म्हणून जास्त चिडते...मी पण सॉरी! येस..आपण बोलू पण जरा वेळानी..मी जेवून येते मग बोलू आरामात..उद्या सुट्टीच आहे...लवकर झोपायची घाई नाही..तू पण जेवून ये...ठीके??"

"चालेल...पण नक्की ये ग..मी वाट पाहीन...अगदीच जमल नाही तुला तर रात्री फोन करतो मग बोलू....पण मला बोलायचच आहे सो झोपू बिपु नकोस...महत्वाच बोलायचं आहे.."

"ओके"...

निशा जेवण लवकर आटपून लगेच ऑनलाइन आली.. यश ऑनलाइन आला नाही हे पाहून ती चिडली......आता फोन करून झापु म्हणून ती फोन उचलला पण तितक्यात लॅपटॉप वर डिंग आवाज झाला..यश आहे हे बघून निशा फोन खाली ठेवला..

" आलीस! आता सांग... तू का नाही आलीस ऑनलाइन?? मी खूप वाट पाहत होतो तुझी....यायला जमणार न्हवत तर येत नाही असा एक मेसेज तरी करायचा ना..." यश म्हणाला..

"सांगते काय गोंधळ झालेला...आजचा दिवसच खराब होता रे.. सकाळपासून मूड खराबच होता आणि कस काय माहित नाही पण माझी गाडी एका सॅट्रो ला जोरदार धडकली...भरपूर चेपली त्यांची गाडी...चुक माझी होती..आणि मला काही बोलता येत न्हवत...ते काका खूप वेळ लेक्चर देत होते.. खूप लोका जमलेली माझी मजा पाहायला...सगळा गोंधळ...शेवटी कसातरी करून त्यांच्या लेक्चर मधून सुटका झाली... सगळ थोडक्यात निभावाल म्हणून बर....पण मनस्ताप झालाच....आणि घरी यायला उशीर झाला.." निशा स्वताची चूक मान्य करत बोलली.....

" काय ग पूजा... मला 1 फोन केला असतास तर मी नसतो का आलो? मी बोललो असतो काकांशी...तू पण ना...आणि तुला काही लागल नाही ना? बाय द वे, तुला नीट गाडी चालवता येताच नाही..मलाही त्याचा अनुभव आहेच....हाहा! "

" यश,मला चिडवू नकोस रे... ते प्रकरण आता मिटलय सो त्याबद्दल नको बोलायला... आधीच खूप लेक्चर ऐकून आलीये आणि मूड खराब आहे सांगितलय तुला......आता तू चालू नको होऊस...आणि मूड अजून खराब करू नकोस..कळल? आणि हसतोयस काय दुष्ट? तुला माझ्याशी काहीतरी महत्वाच बोलायचं ना?? ते बोल...सांग, का इतकी वाट पाहत होतास माझी?? रिझल्ट जवळ आलाय? आणि तुला रिझल्टच टेन्शन आलय? "

“ओके ओके...नाही देत त्रास! पण मी काही न सांगताच तू कस काय ओळखलस ग?? अग रिझल्ट आहे परवा एम बी ए चा!! ...यू नो, रिझल्ट च मला किती टेन्शन येत.. ह्यावेळी पण खूप टेन्शन आलंय.." यश हताश होऊन बोलला..

"काय रे यश… डू नॉट टेल मी,तुला परत रिझल्ट च टेन्शन आलय… रिझल्टच टेन्शन काय घ्यायचं?? तू आता एम बी ए होशील आणि रिझल्ट च टेन्शन? आत्तापर्यंत किती रिझल्ट झाले असतील... तरी रिझल्ट च टेन्शन? "

"अग निशा,आय नो, मी खूप परीक्षा दिल्या आहेत आणि हा आयुष्यातला पहिला रिझल्ट नाहीये पण मला प्रत्येक रिझल्ट च टेन्शन येत! का नाही माहित!! खरच खूप टेन्शन आलाय मला… तू तुझी नेहमीसारखी बडबड कर मग जर बर वाटत आणि टेन्शन कमी होत…तुझ्या शी बोललो कि बर वाटत मला!!”

"मी बडबड करते?वॉट डू यु मीन यश? जरा चांगला शब्द नाही सुचला का?” थोड चिडल्या सारख बोलत निशा म्हणाली, “आणि मी तुला दरवेळी तेच सांगते तरी तुझ टेन्शन कमी होत? ”

"ए निशा,काहीतरी काढून आता तू भांडू किंवा चिडू नकोस…आपल ठरलय ना आज नो भांडण? सो प्लीज....आणि खरच टेन्शन आलाय..खर काय ते सांगितलं. यू नो,मी फार कोणाशी इतक्या मोकळेपणानी बोलत नाही …फक्त तुलाच सांगतो टेन्शन आलय..बाकी कोणाला अस काही सांगायला मला नाही आवडत...अगदी आईलाही सांगत नाही कि मला परीक्षेच टेन्शन येत! आत्ता प्लीझ मदत कर…"

" सॉरी सॉरी... मला सांग, तुला रिझल्ट ची भीती का वाटते? अभ्यास तर मस्त झालेला...परीक्षाही उत्तम गेली होती मग रिझल्ट च टेन्शन का घ्यायच? आणि तू टेन्शन घेऊन काही होत का? महत्वाच म्हणजे,तू भरपूर कष्टा घेतलेस मग रिझल्ट मस्त असणारचे...मला खात्री आहे……शेवटचा रिझल्ट आहे मस्त घेऊन ये रिझल्ट!!! आणि हो,तू अजून शिकला नाहीस तर शेवटचा रिझल्ट!!! एन्जॉय कर!! अॅंड नाऊ स्टॉप वरीयिंग! रिलॅक्स हो मस्त… गाणी ऐकत बस...ऑर बेस्ट म्हणजे तुला आवडणारे गेम्स खेळत बस....मन दुसऱ्या गोष्टीकडे वळव...आणि मला सांग, परवा किती वाजता रिझल्ट आहे?? आता प्लीज नको घेऊस रिझल्ट च टेन्शन...." निशा काळजी ने बोलली..

" थॅंन्क्स निशा...आता थोड हलक वाटताय....तुझ्याशी बोललो कि एकदमच बर वाटत... तुझ्याकडे जादू आहे! मला तुझ बोलण ऐकण मस्ट होत, म्हणूनच तुझी वाट पाहत होतो तर तुझा काही पत्ताच न्हवता.... परवा १० ला कॉलेज मध्ये जाईन.. १ पर्यंत रिझल्ट मिळेल" यश थोडा उत्साहित होऊन बोलायला लागला..

" काय रे यश, थॅंक्यू काय आता? आता मला चिडवू नकोस..मी चिडले कि किती चिडते यु नो वेरी वेल....मित्र आहोत आपण एकमेकांचे....मग मी मदत नाही करायची तर कोणी करायची?? स्टॉप बिइंग फॉर्मल....आणि परवा रिझल्ट लागला कि लगेच फोन करा आठवणीने..विसरू नका..ओके ना?? आता सांग, उद्या फ्री आहेस ना?? सकाळी सकाळी टेकडीवर जाऊ.. तिथे गेलो कि एकदम फ्रेश होशील…. "

“ ओके... ग्रेट आयडिया... डन! सकाळी ६ ला मी येतो तुला घ्यायला. मग आपण जाऊ मस्त टेकडीवर फिरायला"

" ग्रेट…. भेटू मग उद्या सकाळी… उशीर करू नका आणि वेळेत या तुम्ही! हाहा… आता झोप मस्त… उद्या निवांत बोलण होइलच… गुड नाईट…"

"येस.. मी पण झोपतो आता छान झोप लागेल…. आत्तापुरत तरी नो टेन्शन... आणि उद्या भेटशीलच.. तेह्वा पूर्ण टेन्शन जाईल! थॅंक्यू निशा!!!! गुड नाईट… " इतक बोलून यश बेड वर आडवा झाला...…दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे यश निशा कडे आला.....दोघ टेकडीवर जाऊन आले ...टेकडीवरची स्वच्छ हवा खाऊन यश एकदम ताजातवाना झाला..

“टेकडीवर जायची आयडिया मस्त होती, निशा..मला खरच मस्त वाटतंय आता...थोड फार टेन्शन होत ते हि गेलाय... तुझ्या बोलण्यात खरच जादू आहे....थॅंक्स अ लॉट...निसर्गाच्या सानिध्यात गेल कि मन एकदम रीचार्ज होत..” यश भरभरून बोलत होता..

“जादू? दर वर्षी तेच बोलते! आणि तुझ टेन्शन जात! हाहा... कधी कधी मला वाटत तू टेन्शन येण्याच नाटक करतोयस का काय?”

“नो नो...खरच टेन्शन जात!”

“ओके...तुझ टेन्शन गेल आता मला पण मस्त वाटतय..”

“आता काय प्लॅन? “

“आता हॉटेल मध्ये जाऊन मस्त ब्रेकफास्ट करू...ओके?”

“येस..आपली नेहमीची जागा....बाय द वे,तू खायला घालतोस का मला?” मिश्किलपणे निशा बोलत होती..

“म्हणजे काय ग...मी काय इतका कंजूस वाटलो का? आणि तू किती खातेस? चिमणी सारख..” यश हसू आवरत बोलत होता...

“हाहा....”

“चल आता खाऊन येऊ मग मी तुला घरी सोडतो आणि घरी जाऊन मस्त आराम करतो”

दोघांनी ब्रेकफास्ट केला आणि यशने निशाला घरी सोडल......

“आता परत टेन्शन नको घेऊस रे..ठीके ना? रात्री फोन वर बोलूच...आता पळते...जरा पेंडिंग काम आहेत ती करते..”

“नाही..आता टेन्शन अजिबात नाही... तुला रिझल्ट कळवेनच! थॅंक्स परत एकदा.....” इतक बोलून त्यानी गाडी चालू केली आणि जाताजातच नकळतपणे यश पुटपुटला... “मिस यु..लव यु..” यश च्या लक्षात आल,आपण चुकीच काहीतरी बोलून गेलो..निशाला ऐकू गेल असेल तर ह्या विचारांनी कासावीस होऊन तिथे एकही क्षण न थांबता तो निघाला...

यश जाताजातांना काय बोलला हे निशाला ऐकू आल नाही......तीनी यश ला हाक मारली.. “यश,थांब थांब....शेवटी काय म्हणलास रे? मला ऐकू नाही आलं..” पण यश काही उत्तर न देताच तिकडून निघून गेला......

निशाच्या मनात विचार आला.. “असा काय वागतो हा विचित्र...” तेह्वा निशाला काहीतरी ऑड वाटल पण ती त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आपली काम करायला निघून गेली....

यश जाता जाता गाडीवर विचार करायला लागला,“निशाला ऐकू गेल नाही हे बर झाल....आणि मी काहीही काय बोलतो? मी नेहमीच मिस करतो निशा ला पण ते कधीच बोलत नाही..तिला आवडत नाही ते बोललेलं तरी कसा काय बोलून गेलो काय माहित? मी तिच्यावर खूप प्रेम करायला लागलोय... आज पहिल्यांदीच तस फील झाल मला...आणि फीलीन्ग्स दाबून ठेवता येत नाहीत मला.... आणि ते बोलून गेलो! पुढेच्यावेली ती समोर आली आणि भावनेच्या भरात मी तिला खर सांगितलं तर.....ओ माय गॉड.... तिला खर कळल तर? ती दुखावली जाईल! नो नो...तिला माझ्या भावना कळता कामा नये... आज चुकून बोलून गेलो पण तिला ऐकू आल नाही म्हणून बर..” आणि त्यानी ठरवलं.. “आता रिझल्ट सांगितला कि काही दिवस निशा शी बोलायलाच नको... चुकून कधी बोलून गेलो तर प्रोब्लेम होईल...त्यापेक्षा जास्ती बोलायचाच नाही...आणि चुकूनही तिला काही कळायला नको....”

विचार करता करता यश घरी पोचून बेड वर आडवा झाला आणि गेम्स खेळायला लागला.....

रात्री यश फोन करत नाही म्हणून वाट पाहून निशा यश ला फोन केला..बराच वेळ यश फोन उचलला नाही....पण शेवटी एकदाचा त्यानी फोन उचलला..निशा बोलायला चालू केल, “काय म्हणताय साहेब? टेन्शन गेलाय ना पूर्ण? सकाळी काही न उत्तर देताच का रे निघून गेलास...आय फेल्ट सो बॅड....आणि कंजूस आहेस रे तू...एक फोन करायला काय जात होत...इथे मला टेन्शन यायला लागलेलं...सगळ ठीक आहे कि परत डोक धरून बसलाय...”

“मी ठीके ग...डू नॉट वरी...जरा पुढचा विचार करत होतो” तुटक उत्तर देत यश म्हणाला

“डिस्टर्ब केल का मी? सॉरी...” निशाला काहीतरी बिनसलंय हे जाणवत होत पण ते विचारण तिनी काटाक्षानी टाळल होत..

“सॉरी काय? उद्या बोलतो आता..झोप येतीये सो झोपतोय” यश तिच्याशी बोलण टाळायच म्हणून बोलला....

“ओके..गुड नाइट”

यश तिच्याशी बोलण टाळतोय हे तिच्या लक्षात येत होत पण तीला कारण काय असेल त्याचा अंदाज लागत न्हवता...तिनी विचार केला...”मे बी उद्याच परत टेन्शन आल असेल आणि एकट रहायचं असेल म्हनून बोलला नसेल.. उद्या नीट बोलेल” अशी मनाची समजूत काढत निशा झोपायला गेली...

तिथे यश ला झोप येण शक्यच न्हवत..रिझल्टच्या टेन्शन मुळे नाही तर निशाच्या विचारानी...तिच्या विचारांनी त्याला पूर्णपणे घेरल होत..निशानी सांगितलेले शब्द त्याच्या कानात सारखे घुमत होते.. निशा त्यांची मैत्री घट्ट झाली तेह्वाच त्याला म्हणली होती.. “आपण नेहमीच चांगले मित्र म्हणून राहू...कधी बाकी विचार नको करूस.. आत्ता प्रेमाला माझ्याकडे वेळ नाही.. ह्या आधी एका मित्रानी सांगितलं होत, प्रेम आहे.. माझा विश्वास बसला पण त्यांनी माझ्या बरोबर टाइम पास केला आणि निघून गेला... त्यांनी मला खूप दुखवल...म्हणून तू अस काही बोलण टाळ.. मला कधी दुखवू नकोस... कारण माझा अनुभव आहे, प्रेम आहे अस म्हणणारे लोक ओळखही दाखवत नाहीत!!” निशानी ते सांगून बरीच वर्ष झाली होती तरी निशाचे ते शब्द यश च्या मनावर कोरले गेले होते.. त्याला निशाला अजिबात दुखवायचं न्हवत!! माणस बदलतात, विचार बदलतात ह्याचा त्यानी विचारच केला नाही! नकळत तो आज मिस यु आणि लव यु बोलून गेला....विचार करता करता त्याला झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला.....

रिझल्ट चा दिवस...यश १० वाजता कॉलेज मध्ये गेला आणि रिझल्ट त्याच्या हातात मिळाला...रिझल्ट उत्तमच होता...रिझल्ट निशाला सांगायला यश फोन लावला..”हे निशा,रिझल्ट मिळाला..यु वर राईट..मी उगाच टेन्शन घेत होतो... थॅंक्स निशा फॉर एवरी थिंग...”

“ग्रेट यश. आय अॅम सो हॅप्पी...तुला वेळ आहे ना?? तुला काहीतरी सांगायचं....” निशा नी आनंदानी उत्तर दिल..

“आता जरा कॉलेज च्या मित्रांबरोबर गप्पा मारतोय...नंतर बोलू” निशाशी बोलण टाळायचा प्रयत्न करत यश बोलला...

“ओके..होप ऑल गुड....चल बोलू नंतर..अभिनंदन...आणि एन्जॉय!!” निशा ला हि जाणवत होत...यश तिच्याशी बोलण टाळतोय...आणि त्याला तीच म्हणण ऐकूनही घ्यायचं नाहीये..

नेहमी भरभरून बोलणारा यश त्यादिवशी मात्र वेगळाच वागत होता...आता निशा ची खात्री पटली,यश च काहीतरी बिनसलं आहे..पण तिनी त्याला विचारण टाळल होत...तिला वाटल होत,यश स्वताहून तिला सांगेल..पण ह्यावेळी यश मनातल बोलणार न्हवता ह्याची तिला कल्पना न्हवती...

बरेच दिवसांनी निशानी यश ला फोन केला.. “ हेलो यश..कसा आहेस? विसरलास का रे मला? तुला काहीतरी सांगायचं रे.. रिझल्टच्या दिवशी पण तुल मला बोलून दिल न्हवतस”

“विसरलो नाही ग...पण मूड नाहीये सध्या..आणि मूड नसतांना बळजुबरिनी कशाला बोलायचं ना? आणि मी बोलत नाही म्हणजे मी तुला विसरलोय असा अर्थ काढूच नकोस...तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस..पण सध्या खरच नाहीये बोलायचं कोणाशीच...एकांतात राहाचय मला...आणि काम आहे बरच....नंतर बोलू...डोंट माइंड...आणि तुला काय सांगायचं ते फार महत्वाच नाहीये ना? मग नंतर सांग..“ इतके बोलून यश फोन ठेवला...तो निशाला काय सांगायचंय हे बोलायला वाव दिला नाही....मनातल्या मनात निशा दुखी झाली...पण आता परत यश ला फोन करायचा नाही हे मनोमन ठरवत तीनी फोन ठेवला......

खर तर निशाचाही यश वर प्रेम असत आणि तिनी ठरवलेल असत, यश चा रिझल्ट लागला कि ते सांगू..पण तेह्वापासूनच दोघांमध्ये दरी निर्माण झाली ...आणि तीच म्हणण यश पर्यंत पोचतच नाही!! निशा ठरवते आता यश शी परत बोलून त्याला त्रास द्यायचा नाही पण ते तिला शक्य होत नसत...ती अधून मधून यश ला एखादा फोन किंवा मेल केल..पण तिचा फोन यश नी कधी घेतला नाही! आणि मेल ला उत्तर देण त्याला जमल न्हवत....

दिवस भराभर पुढे जात होते..यश आणि निशातल बोलण एकदमच कमी झाल होत...दोघांनीही एकमेकांशिवाय जगण स्वीकारलं होत.. आणि त्यांनी आयुष्याचा प्रवास चालू ठेवला होता...यश आणि निशाला एकमेकांशी न बोलून खूप त्रास होत होता....यशचही निशावर मनापासून प्रेम होत आणि निशाच सुद्धा...पण कधीतरी निशा बोलून गेली होती कि आपण फक्त मित्रच राहू..त्यापुढे विचार करू नकोस...आणि ते निशाचे शब्द यश च्या मनावर कोरले गेले होते....त्याला काहीही करून निशाला दुखवायचं न्हवत सो तो तिच्याशी न बोलण पसंत करत होता... यश विचार करत होता,माझ्या नसण्यानी निशाला फरक पडणार नाही आणि तीच ज्यावर प्रेम असेल असा कोणीतरी मिळेलच.....त्याला स्वताला कितीही त्रास होत असला तरीही त्यांनी निशा पासून लांब राहायचं ठरवलं...... आणि तेह्वाच,निशा ला सांगायचं होत तीच यश वर प्रेम आहे तर यश तीला हि काहि बोलायची संधीच देत न्हवता...

अजाणतेपणी दोघा हळू हळू दुरावत गेले...पण मनानी ते एकमेकांपासून कधीच दूर गेले न्हवते... तरी एकमेकांशी दिलखुलास बोलण ते टाळतच होते...भूतकाळ विसरता यावा म्हणून दोघांनी स्वताला कामात एकदम व्यस्त करून घेतलं होत.....दोघ एकमेकांशी बोलण टाळत होते ते त्याना चुकीच वाटतच न्हवत..यश ला निशा चिडू नये अस वाटत होत आणि यश बोलत नाही म्हणूण निशा मनातून दुखावली गेली होती त्यामुळे स्वताहून बोलायला कोणीच तयार न्हवत...दोघांमधला मनमोकळा संवाद पूर्णपणे बंदच झाला....एकमेकांशी बोलण ते टाळतच होते..कधी बोलले तर हाय हेलो इतकाच...पूर्वीसारख मोकळेपणा उरलाच न्हवता त्यांच्या मैत्रीत.. दिलखुलास गप्पा मारणारे घट्ट मित्र चुकीच्या समज बरोबर घेऊन आणि चुकीच्या निश्कार्ष्यामुळे एकमेकांपासून दुरावले होते... आता परत निवांत भेट होईल अशी आशा पूर्णपणे सोडून दोघ आपापल आयुष्य जगत होते..

आयुष्य एखाद्या वळणावर काहीही अपेक्षा नसतांना इतक बदलून जात...यश आणि निशाच्या आयुष्यातही तसाच काहीस लिहील होत...सगळच अनपेक्षित घडणार होत...तेच प्रारब्ध होत आणि ते होण अगदी नक्कीच होत....

दोघ परत एकदा भेटणार होते आणि अनपेक्षितपणे भेटलेच ते एका दुकानात...काही न ठरवता झालेली हि त्यांची पहलीच भेट होती...अनपेक्षितपणे यश आणि निशा समोरासमोर आले तेह्वा काय बोलून सुरवात करावी हे दोघांनाही कळतच न्हवत...सुरवातीला दोघ अनोळखी असल्यासारख वागत होते....पण शेवटी निशानी बोलायला चालू केल..."हाय यश...ओळख आहे ना? किती दिवसांनी...कसा आहेस आणि कुठे आहेस? तू एकही फोन केला नाहीस इतके दिवसात...मी किती वेळा फोन केलेला तुला पण तू फोन नाही उचललास...आणि मेल ला उत्तर द्यायला तुला वेळ झाला नसेल ना?"

"मी ठीक...तू कशी आहेस? अग सध्या लाइफ बिझी झालाय एकदम...वेळच मिळत नाही..." यशनी सारवासारव करत उत्तर दिल...

"आपण हॉटेल मधे जाऊन बोलायच का रे? खूप बोलायचाय....पण तुला वेळ आहे ना? की आज पण वेळ नाहीए?"

"आहे वेळ....आपण जाऊ हॉटेल मधे...मला पण बोलायचाय तुझ्याशी..."

दोघ हॉटेल मधे गेले आणि इतके दिवस यश नी निशाला टाळलेल पण आता बर्‍याच वर्षांनी दोघ एकमेकांसमोर आले आणि तेह्वा त्यांना एकमेकांना टाळण अशक्यच झाल....दोघ बरेच दिवसांनी एकमेकांनाशी मोकळेपणानी बोलणार होते...दोघ त्याच्या आवडत्या हॉटेल मध्ये गेले...जरा वेळ शांततेत गेला पण नंतर यश बोलायला सुरवात केली...

"बोल...काय चालूये सध्या? लग्न बिग्न केलास की नाही?? "

"हाहा...लग्न केलेल ना.... इतक्या लवकर विसरलास? तुला लग्नाला बोलावल पण होत... तुम्ही बिझी...लग्नाला आला न्हवतास...पण लग्नाला आला नाहीस बर केलास...मी लग्न केलेले म्हणजे खूप मनापासून केलच न्हवत...आई बाबा सारखी कटकट करत होते....लग्न कर लग्न कर..खूप मागे लागले आणि १ मुलगा बरा वाटला मग म्हणल आई बाबांची कटकट तरी संपेल म्हणून केल त्याच्याशी लग्न..पण आमच लग्न टिकलच नाही..2 महिन्यातच म्यूचुअल डीवोर्स घेतला आम्ही...दोघांना एकमेकांबरोबर रहावस वाटत न्हवत...मग आम्ही वेगळ ह्यायचा निर्णय घेतला..आणि आता हॅपी सिंगल आहे...तू सांग!! " निशा झालेल्या गोष्टीच दुख न करत बोलली..

"ओ येस...तुझी पत्रिका मिळाली होती..मला जमल न्हवत लग्नाला यायला....पण नंतरच काहीच कळलच न्हवत ग.....तू काहीच बोलली का नाहीस? फोन करायचस.."

"हो का..मी फोन का नाही केला? वॉट डू यु मीन यश? मी तुला बर्‍याच वेळा कॉंन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलेला पण तू बिझी होतास...माझा फोन घेतच न्हवतास...आणि मेल ला ही उत्तर दिल न्हवतस...तू फार बदलस रे...मला तुझी गरज होती पण तुला वेळच न्हवता...खूप वाईट वाटल होत..मग नंतर मी विचार केला, तुला माझी पर्वा नाही तर मी तरी का अपेक्षा करू...नीड टू मूव ऑन.... आणि बघ,मी मूव ऑन केलय... आणि हैप्पी आहे! तू बोल...लग्न केलस??"

बऱ्याच वर्ष्यांनी का होईना पण दोघ दोघ पहिल्यासारखे मोकळेपणानी बोलायला लागले..

"सॉरी निशा....मी मुद्दाम न्हवत केल...माझी मजबूरी होती... तू सांग,आता कशी आहेस? आणि खूप दिवसांपूर्वी तुला मला काहीतरी सांगायच होत...काय सांगायच होत? तेह्वा माझी मनस्थिती ठीक न्हवती ग..." निशाला यश च्या बोलण्यातून हताशपणा जाणवत होता...

" आत्ता आठवतंय तुला मला काहीतरी सांगायचं होत? वाह...काही नाही रे....तेह्वा मला तुला सांगायच होत मांझ तुझ्यावर प्रेम आहे...आधी सांगितलं नाही कारण मी तुझ्या रिझल्ट साठी थांबले होते...रिझल्ट नंतर भेटल्यावर बोलणार होते..पण तेह्वा तू बोलूनच दिल न्हवतस मला.....नंतरही तू मला तू मला टाळत होतास..आणि ते मला जाणवताही होत...मग नंतर मी पण ठरवलं,आता मीही जास्ती संबंध ठेवणार नाही... ठीके, झाल ते झाल..आता पूर्वीच्या गोष्टी काढून दुख करण्यात काय उपयोग? आता तर मी स्वताला कामात इतक गुंतवून घेतलाय कि कश्याचा विचार करायलाही मला वेळ नाहीये.. " निशा खूपच समंजस झाली होती आणि ते तिच्या बोलण्यातून कळत होत..

"काय? डोण्ट टेल मी...तू माझ्यावर प्रेम करत होतीस..."

यश ला मधेच थांबवात निशा बोलते..."सॉरी डिस्टर्ब करते मधे...पण महत्वाच आहे सो...मी प्रेम करत होते नाही...करते अजूनही..."

"ओ माय गोड. ..काय बोलू आता? काही कळतच नाहीये..." यश सुन्न झाला....तरी त्यांनी मन खंबीर करून बोलायला सुरवात केली.. “ तू काय बोलतीयेस मला कळतच नाहीये ग..मी आधी कधीतरी तुला सांगितलेलं मला तू आवडतेस तेह्वा तू किती चिडली होतीस...रागानी काही बोलली होतीस! नंतर किती दिवस बोलतही न्हवतीस... तू दुखावेली गेली होतीस तेह्वा....तुझ ते बोलण माझ्या मनावर कोरल गेल होत...मी तुझ्या प्रेमात पडलो होतो... आणि तेह्वा तुला ते सांगून मला दुखायचं न्हवत...मी तेह्वा योग्य वाटल तेच केल होत....आणि मला स्वप्नात जरी वाटल असत तुलाही तेच सांगायचं तर मी तुझ्याशी बोललो असतो.. पण तुला अजिबात दुखवायचं न्हवत मला...आणि मी आज पर्यंत तू सोडून कोणाशी लग्न करण्याचा विचारही केलेला नाही... तू पुन्हा एकदा दुखावली जाऊ नयेस इतकीच इच्छा होती माझी..पण न बोलून मी तुला दुखी केल...वेरी वेरी सॉरी!!!” यश च्या मनात साठलेलं बाहेर पडत होत....आणि जे बोलायच तो किती दिवसापासून वाट पाहत होता ते एका श्वासात बोलून मोकळा झाला..... “मी तुझ्यावर खूप प्रेम करतो... माझ्याशी लग्न करशील? ह्यापुढे मी तुला कधीही त्रास होऊन देणार नाही हे माझ वचन आहे तुला...”

डोळ्यातल्या अश्रूंना वाट करून देत निशानी बोलायला सुरवात केली...... “हो यश.. मी म्हणाले होते! पण कालांतरानी मला अस जाणवलं माझ तुझ्यावर प्रेम आहे! पण तेह्वा खूप उशीर झाला होता! आता कधीच दूर जाऊ देणार नाही तुला...आणि माझ पण चुकलच रे...मी खूप टोकाची वागलेले पूर्वी...त्याचा सगळा मनस्ताप दोघांना भोगावा लागला...”

“डोंट वरी निशा..आता सगळ ठीक आहे..सगळे गैरसमज दूर झाले आणि आपण एकत्र आहोत..” यश च्या चेहऱ्यावर आनद दिसायला लागला...

“येस..आपण शेवटी भेटलोच...बघ,काय गम्मत आहे ना यश...नियतीनी आपल्याला एकमेकांपासून दूर केल पण आपण परत एकत्र आलो ते नियतीमुळेच......गम्मत आहे सगळी..नियतीचा खेळच अजब....”

“करेक्ट निशा..माझा विश्वास न्हवता नियती आणि विधिलिखित वर पण आज नियतीपुढे मी नतमस्तक झालो....आता कधीच माझ्यापासून दूर जाऊन देणार नाही तुला...लव यू सो मच निशा......”

“लव यू यश....”

इतक बोलून यश आणि निशा एकमेकांच्या मिठीत शिरले.

अनुजा कुलकर्णी.

Rate & Review

Nishikant Joshi
Ankush

Ankush 2 years ago

juhi

juhi 2 years ago

Gajanan kulkarni

Gajanan kulkarni 3 years ago

vinayak mandrawadker

ठीक आहे