सकाळ.........
खिडकीतून सूर्यकिरण तिची झोप अडवत होता... तिच्या सुंदर चेहऱ्यावर सूर्याची किरणे त्रास देत होती...तिला खूप दिवसांनी एकदम शांत झोप लागली होती निवांत😇, सूर्याच्या किरणामुळे तिला जाग आली..... उठून फ्रेश होण्यासाठी गेली...
फ्रेश होऊन ती नाश्त्यासाठी हॉलमध्ये आली , आणि पटपट नाष्टा करू लागली कारण तिला ऑफिसला लवकर जायचं होतं , भरपूर काम pending होती तिला... पटापट नाश्ता करून ती ऑफिसला जायला निघाली आणि बस स्टॅण्ड वर येऊन थांबली बसची वाट बघत.... तेवढ्यात तिला अननोन नंबर वरुन कॉल आला.... तिने आधी नाही उचललं , नंतर परत आला तेव्हा वैतागून कॉल उचलला.
आरोही " हॅलो कोण?"
पलीकडे " हॅलो बेबी कशी आहेस?"
आरोही घाबरून "क... क.... कोण तू?" ( आरोही घाबरण्याचे नाटक करत आहे हा...कारण पलीकडे कोण आहे ते माहीत आहे तिला)
पलीकडे " ओह बेबी इतक्या लवकर मला विसरलीस नॉट फेअर हा ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून, पण जाऊ दे सांगतोच मी तुझा बॉयफ्रेंड रक्षित.....आता ओळखलं का.... आठवतंय ना काय केलं होतं मी की विसरलीस 😈😈😈"
आरोही " प्लीज काय पाहिजे आता तुला का माझ्या पाठी लागला आहेस.... सोड माझा पाठलाग " ( मनात गुढपणे " बरोबर आठवतंय मला मी अजुन विसरली नाही आहे , तुला काय वाटल मी घाबरणार 😂😂😂 अजिबात नाही.... तू समोर तरी ये मग दाखवते आरोही काय आहे ती 😠" )
रक्षित " नाही मी तर पाठलाग करणारच.....आणि हो तू आज भेटणार आहे.... मी ॲड्रेस सेंड करतोय तिथे आणि जास्त चालाखी केलीस तर बघ.....माहीत आहे ना मी कसा आहे 😈😈😈........."
आरोही रडवेल्या आवाजात " हो हो येते मी " (मनात " अरे वा दुश्मन ने खुद भुलाया , आता तुला खरं रूप कळेल माझं रक्षित..... 😃😃😃😃😃")
रक्षित " हा आता कसं हुशार आहेस.... चल बाय बेबी लवकर भेटू....... आणि नाही आलीस तर माहीत आहे 😈😈😈......."
आरोही " ह.....हो "
आरोही फोन ठेऊन सुटकेचा श्वास घेतला......मनात " अब आयेगा हसली मजा......मला धमकी देतोय आता बघ ही आरोही तुझी काय हालत करते.... परत मान वर करून पण कोणत्या मुलीकडे नाही बघणार..... जस्ट वेट अँड वॉच रक्षित 😈😃"
तेवढ्यात समोरून बस आली आणि आरोही बस मध्ये चढून ऑफिस साठी निघाली.....
आरोही बस मधून उतरून ऑफिसच्या गेट समोर उभी राहिली....... पण अचानक तीच लक्ष निखिलच्या कार कडे गेलं... निखिल कारमधून उतरत होता, पण त्याच्या हाताला लागल होत मनगटावर तेथून खूप रक्त निघत होते.... आरोही घाबरून गेली ते सगळ बघून , पण तिलाच समजत नव्हते की काय होत आहे.... त्याची एवढी काळजी का वाटत आहे... आरोहीने विचार झटकून लगेच पळत निखिल जिथे होता तिथे गेली...
आरोही त्याचा जिथे लागलं त्या हाताला पकडून " अहो , सर तुम्हाला लागले आहे खूप चला हॉस्पिटल मध्ये तुम्हाला ट्रीटमेंट ची गरज आहे"😳😳😳
निखिल " नको आय एम फाइन "
(जेव्हा आरोहीने निखिलचा हात पकडला तेव्हा त्याच्या अंगात सर्रकन काटा आलेला आणि ह्रदय धडधडायला लागले होते.....मग त्याने कसबस उत्तर दिले.....)
आरोही " अहो सर खूप लागलं आहे तुम्हाला 🥺 जावं लागेल हॉस्पिटलला , रक्त खूप वाहत आहे पलीझ चला"
( आरोही काय बोलतेय तिलाच समजत नव्हतं...तिला कोणी जखमी दिसले की तीच मन खूप बैचेन होत, म्हणून ती एवढी धडपड, विनवणी करत होती....)
निखिल " ओके चला"
( त्यालाही तिला नकार द्यायचा नव्हता आता ती इतकी मागे लागली आहे , म्हणून त्याला नाईलाजाने होकार द्यावा लागला....)
आरोही " हो चला "
निखिल आणि आरोही बॅक सीट वर बसले , मग निखिल ने ड्रायव्हर ला कार स्टार्ट करायला सांगितली आणि ते हॉस्पिटल ला जायला निघाले......
(कन्फ्युज असाल की आता निखिल ला कसं लागलं डोन्ट वरी सांगते मी, डोक्याला इतकं त्रास नका देऊ हो 🤭 चलो फिर फ्लॅशबॅक)
फ्लॅशबॅक.......
निखिल घरातून निघाला तेव्हा त्याला मध्येच दोन जणांची भांडण होताना दिसली.....
निखिल मनात " ओह नो काय हे मध्येच कुठेही भांडण करतात.....वेळ जागा काही बघत पण नाही , आता ऑफिसला पोहोचायला उशीर होईल खूप...."
पण अचानक निखिल ने समोर बघितल तर त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि राग दोन्ही स्पष्ट दिसत होते....समोर जे भांडत होते त्यात एकाने दुसऱ्याला चाकू दाखवलं होतं , त्याच्या वागण्यावरून तो चोर असावा....जेव्हा त्याने चाकू दाखवलं तेव्हा तेथे गर्दी जमा झाली , पण कोणी मदतीसाठी पुढे येत नव्हत..... म्हणून ते बघून निखिलला राग आला, तो लगेच कारमधून उतरला मदत करण्यासाठी.....
निखिल कारमधून उतरून त्यांच्या समोर आला आणि ज्याच्या हातात चाकू होता त्याच्या मानेला एकदम गट्ट पकडलं....ज्याला पकडलं त्याने त्याच्या तावडीतून सुटण्याची खूप प्रयत्न केले पण व्यर्थ...कारण निखिलने दिवस रात्र जिम मध्ये घालवून मेहनतीने बॉडी कमवलेली तेच त्याच्या कामी आल.....
शेवटी त्या चोराने जीव एकटवून निखिलच्या हाताला मनगटावर वार केला, तेव्हा त्याच्या हातावर छोटासा चाकूचा कट झाला.....पण तोपर्यंत तेथे पोलिस आलेले आणि त्यांनी तो दृश्य बघितल, म्हणून त्या चोराला लगेच अटक करण्यात आल...
पोलिस " आर यू ओके "
निखिल " येस , आय एम फाइन 😇 बर झालं तुम्ही आलात ते , थँक्यू सो मच 😊"
पोलिस " ते आमचं कर्तव्य आहे , थँक्यू तर तुम्हाला बोलायला पाहिजे तुमच्यामुळेच तर या चोराला पकडता आल 😇😊.....चलो आता याच मस्तपैकी पाहुणचार करतो आम्ही....."
निखिल " हो 😊😊"
पोलिस त्या चोराला घेऊन गेले....
मग निखिल ने मोर्चा त्या माणसाकडे वळवला त्याच्याबरोबर भांडण चालू होते.....पण लोकांची गर्दी थोडी कमी झालेली काही लोक अजूनही तिथे उभे होते....सहज निखिलच लक्ष त्या लोकांकडे गेलं आणि त्याला प्रचंड राग आला....निखिलने रागातच त्यांना बोलायला सुरुवात केली....
निखिल रागात 😠😠😠" तुम्ही काय इथे तमाशा बघत होता का , तुम्हा लोकांकडे डोळे , मेंदू , हात, पाय आहेत ना...इकडे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारायला जात होता आणि त्याच्या हातात चाकू होता तरी तुम्हाला या माणसाची दया नाही आली का...याच्या जागी तुमचं आपल कोणी असत तर असच केलं असत का.....माणुसकी नावाची गोष्ट राहिली आहे की नाही तुमच्यात , फक्त तमाशा बघत उभे राहिले मदत करण्याऐवजी....आता काय बघत बसला आहात जावा तमाशा संपला 🙏🙏🙏😠😠😠😠"
त्याचा राग बघून तिथली लोकं गपचुप मान खाली घालुन निघून गेली....त्या माणसाने निखिलचा राग कसबस शांत केलं...
निखिल शांत होवून त्या माणसाला....
निखिल " तुम्ही ठीक आहात ना काका?"
तो माणूस " हो बाळा मी ठीक आहे, ( निखिलच्या हाताकडे बघत) बाळा तुझ्या हातातून तर खूप रक्त येत आहे चल हॉस्पिटल ला जाऊ..."
निखिल " नको काका मी ते बघून घेईन , तुम्ही कुठे राहता मी सोडतो घरी तुम्हाला..."
काका " नको बाळा त्याची गरज नाही , मी इथेच राहतो जवळ जाईल मी....😊 बाळा बघ किती लागलं आहे तुला इथेच दवाखाना आहे चल..."
निखिल " नका हो काका मी करून घेईन डोन्ट वरी, तुम्ही नीट जाणार ना घरी की मी सोडू तुम्हाला ..."
काका " नको जाईल मी चल जातो मी आणि काळजी घे , हाताला मलमपट्टी करून घे 😊😊😊...."
निखिल " हो काका चला निघतो मी आणि हो मी करून घेईन मलमपट्टी डोन्ट वरी...."
काका " हो😊, आणि मला वाचवण्यासाठी खूप धन्यवाद तू नसता तर माहीत नाही त्याने काय केलं असत ...."
निखिल " अहो काका, तुम्ही धन्यवाद का बोलताय ते तर माझं कर्तव्य होत.... धन्यवाद बोलून तुम्ही मला परकं करत आहात...."
काका " नाही रे बाळा खरच खूप धन्यवाद तू असा मदतीसाठी धावत आलास नाहीतर तू बघितल ना कोणी आलं नव्हत मदतीसाठी...."
निखिल " जाऊ द्या हो काका आजकाल माणुसकी हरवलेली दिसते , ते फक्त स्वतःचं बघतात दुसऱ्याचं नाही....तुम्ही सुखरूप आहात ना तेच चांगलं आहे...
( वॉच बघत ) चला काका खूप लेट होतोय जातो मी...आणि हो तुम्हाला माझी कधी गरज लागली तर ( कार्ड देत ) हे घ्या माझं कार्ड , मी करेल तुम्हाला मदत कधीही...."
काका " हो चालेल , निघतो मी चल "😇
निखिल " हो 😊"
काका आपल्या घरच्या दिशेने निघून गेले आणि निखिल तोही आपल्या कारमध्ये बसून ऑफिस साठी गेला....
वर्तमानकाळ......
निखिलची कार हॉस्पिटल समोर उभी राहिली....मग निखिलने ड्रायव्हरला कार पार्किंग करायला सांगून , आरोही आणि निखिल हॉस्पिटल मध्ये आले ...
नंतर निखिल च बॅंडेज करून ते दोघे बाहेर आले....तेवढ्यात ड्रायव्हर गाडी घेऊन आला....
ते दोघे कारमध्ये बसताच आरोहीचा फोन वाजू लागला.... आरोही फोन उचलून बोलायला सुरुवात केली...
आरोही " हॅलो "
पलीकडून " ______________"
आरोही पॅनिक होत " तू रडू नको मी येते, शांत बस आले मी लगेच रडू नको बाळा "
पलीकडून "__________"
आरोही " हो येते मी लवकर "
येवढ बोलून तिने फोन ठेऊन दिला....
निखिल " काय झाल इतकी का पॅनिक झाली काही प्रॉब्लेम आहे का..."
आरोही " तुम्ही माझी हेल्प करू शकता ?*
निखिल " हो, बोल काय झाल? "
आरोही " प्लीझ , मला एका ठिकाणी सोडता का? खूप अर्जंट आहे 🥺"
निखिल " डोन्ट वरी सोडतो मी आणि मीही येतो तुझ्यासोबत तुलाही काही हेल्प होईल आणखी "
आरोही " ओके "
( आरोही ला खूपच टेन्शन आलेलं ....खरं तर निखिल ला तिकडे घेवून नाही जायचं होतं उगाच त्याला त्रास होईल म्हणून...पण तिथे जाणं खूपच गरजेचं होतं म्हणून तिने मागचा पुढचा विचार न करता ओके बोलली )
निखिल " ओके , ड्रायव्हर मॅडम जो अड्रेस सांगतील तिथे घेवून चला "
ड्रायव्हर " ओके सर "
( आरोही ने ड्रायव्हर ला अड्रेस सांगितलं आणि ड्रायव्हर ने तशी कार वळवली )
आरोही आणि निखिल आरोही ने सांगितलेल्या अड्रेसवर पोहोचले....ते एक हरी ओम चाळ होती .... ते दोघे चालत चालत एका घराकडे आले आणि आतलं दृश्य बघून तिथेच स्तब्ध झाले......
क्रमशः
©® भाग्यश्री परब
यात काही चुकल तर माफी असावी 🙏🙏🙏🙏🙏
😇 Stay tuned 😇
😊 Stay happy 😊
🤗 Take care 🤗