Prema, your color is new ... - 11 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... - 11

प्रेमा तुझा रंग नवा... - 11

रिया मेसेज बघून शॉक झाली होती....
आणि शॉक मधेच ती अरोहिला बघत होती...
आरोही ती गालात हसत तिच्याकडे पाहत होती....

पुढे....


रिया " रक्षित , तू नक्की भेटणार आहेस का त्याला ?...."


आरोही हसत " हो मग आता त्याचं काम तमाम करायचं आहे... पूर्ण पुराव्यानिशी त्याला जन्मपेठेची शिक्षा झालीच पाहिजे...."


रिया " मग मी पण येणार आहे तुझ्यासोबत तुला अस एकटीला सोडू नाही शकत.... इकडे जीव वर खाली होतो माझा... ( आरोही काही बोलणार त्या अगोदरच ) आता तू काही बोलू नको की मला काही नाही होणार.... मी तुझ्यासोबत येणार म्हणजे येणार , दॅट्स फायनल... "आरोही " ओके बाबा ये तू माझ्यासोबत तू काय ऐकणार नाही.... "

रिया " हा.... "


आरोही हसत रियाला एन्जॉय पार्टी म्हणत तीही पार्टी एन्जॉय करू लागली....


साडे अकरा पर्यंत पार्टी चालू होती... हळू हळू सगळ आटोपून आपापल्या रूममध्ये झोपायला गेले....
दुसऱ्या दिवशी सकाळी.....

आरोही आपल पटपट आवरून ऑफिस साठी निघाली...


थोड्यावेळाने ती आत ऑफिस च्या लिफ्ट समोर उभी असते.... आणि बटण प्रेस करते , जस लिफ्ट चा दरवाजा उघडतो तस ती आत जाते...

लिफ्ट चा दरवाजा बंद होतच असतो की , कोणीतरी मध्येच पाय ठेवून अडवत.... त्यामुळे आरोही दचकते , कोण आहे बघण्यासाठी मान वर करुन समोर बघते तर निखिल असतो तिचा बॉस....


निखिल " सॉरी... सॉरी ते मला माहीत नव्हत तुम्ही होता ते..... "


आरोही " इट्स ओके सर.... डोन्ट वरी तुमचंच ऑफिस आहे हे.... "

निखिल " हां.... 😀 ते काल मी जरा जास्तच रिअँक्ट झालो... अस तुमच्या मनाविरुध्द लिफ्ट साठी... "

आरोही त्याला मध्येच तोडत " नाही सर तुम्ही नका सॉरी बोलू मीच चुकले रागवायला नव्हत पाहिजे होत.... सॉरी "


निखिल " नो नो चूक माझीच होती.... मी सॉरी म्हणेन..."

आरोही " नो सर मी सॉरी... "

निखिल " नो मी सॉरी..."


असच या दोघांची नोक झोक चालू होती....
शेवटी आरोही ने सांगितलं...

आरोही " सर चूक दोघांची होती आपण दोघेही सॉरी बोलू मग विषय संपला...."

निखिल " हा हे ठीक आहे... ओके आय एम सॉरी 😊.... "

आरोही " ओके मी पण सॉरी.... "

निखिल "😊.... "


निखिल हसतच उजवा हात पुढे करून " सो फ्रेंड्स... 😊 "


आरोही ने थोडा विचार करून... नंतर शेक हॅण्ड करून त्याची फ्रेंडशिप स्वीकारली.....

निखिल तर खूपच खुश झाला की तिने त्याची फ्रेंडशिप स्वीकारली.... तो मनामद्येच नाचत होता....

तोपर्यंत त्यांचं फ्लोअर आल होत....
ते दोघे एकत्रच लिफ्ट बाहेर आले....

निखिल " मग आज तरी लिफ्ट....😊"

आरोही " सॉरी सर आज नो ते मला मैत्रिणीसोबत मार्केट मध्ये जायचं आहे... सो "

निखिल " ओके ओके ठीक आहे... जा बट नेक्स्ट टाईम..."

आरोही " हो सर नेक्स्ट टाईम पक्का..."

निखिल " ओके... सो गूड डे....😊 "

निखिल तिच्याशी थोड बोलून आपल्या कॅबिन मद्ये निघून गेला...
आणि आरोही पण आपल्या डेस्क वर येवून काम करू लागली....हा एक दिवस कामा मध्येच निघून गेला....
दुसऱ्या दिवशी संडे होता तर आरोही मस्त पैकी झोपलेली....
पण मोबाईल च्या आवाजाने तिची झोप चाळवलेली...
तिने मोबाईल बघितलं तर त्यात एक मेसेज होत...
जसा तिने तो मेसेज वाचला...

आरोही " ओह नो मी अस कस विसरू शकते..."

आरोही पटकन उठून रियाला आवाज देऊ लागली....

आरोही " रिया.... रिया.... "

रिया " अग हळू जरा... एवढी का ओरडतेय काय झाल...."


आरोही " अग आज त्याला भेटायचं आहे ना , तू मला का आठवण करून दिली नाहीस... काल कामाच्या गडबडीत विसरूनच गेले होते..."


रिया " हे तू मला विचारतेस मी नीट आठवण करून दिली होती तुला... तुझ लक्ष होत तरी का त्याकडे... "


आरोही जीभ चावत " कदाचित मी झोपेत होते म्हणून लक्ष नसेल... "

रिया " हे बरंय आधी स्वतः चूक करायची आणि ऐकवायच दुसऱ्याला...."


आरोही " सॉरी सॉरी प्लीज माफ कर दो.... आता तू येते आहेस ना माझ्यासोबत चल लवकर आवर... मी पण येते आवरून पटकन.... "


रिया " हो... हो... चल... "रिया आणि आरोही तयार होऊन लगेच मेसेज वर पाठवलेल्या पत्त्यावर जातात....

तिथे गेल्यावर...

रक्षित " या मॅडम या... "


आरोही चेअर वर बसत " बोल का बोलवलं इथे... त्या आधी ऑर्डर देऊ दे... तू काही घेणार ( रक्षित बोलणार त्या अगोदरच तिने ऑर्डर दिली ) वेटर तीन कॉफी.... हा बोल आता पटकन का बोलावलं.... "


रक्षित " अहो मॅडम जरा धीर धरा सांगतो सांगतो... तर तुला इथे यासाठी बोलावलं आहे... तुला वोटर्स खरेदी करायचे आहेत.... आणि ड्रग चे सप्लाय करायचे..."


आरोही आणि रिया एकत्र " काय.... "


रक्षित " हो तुम्हाला हे करावं लागेल...."


आरोही " नाही... हे नाही करू शकत मी , दुसर सांग काहीतरी.... "


रक्षित " तुला करावच लागेल , यासाठीच तर मी रिलेशन मद्ये होतो... पण बॅड लक तू तर चालाख निघालीस... "


आरोही " मला माहीत होते तू कोण आहेस ते आणि काय करतोस ते...."

रक्षित हसतच " छानच आहे मग... हो मी एका नेत्याचा मुलगा ज्याचा दरारा सगळीकडे आहे.... एका कॅफेत मी बघितल होत तुला तेव्हा मी मित्रांसोबत आलेलो... तू अवडलेलीस पण मला यात पडायचं नव्हत , म्हणजे थोडे दिवस मन भरेपर्यंत तुला वापरायचं आणि नंतर सोडून द्यायचं एवढच... नंतर मी विचार बदलला की तूच माझं हे काम करू शकते , कारण तू बोलण्यात आणि दुसऱ्याचं मन आपलस करण्यात एक्स्पर्ट आहे... पण त्या अगोदरच आपल्यात भांडण झाले आणि ब्रेक अप केलं.... "


रिया रागात " बरं झालं ब्रेक अप झाल ते तुझ्यासारख्या नीचं माणसासोबत राहून आरोही च अजुन जीवन उध्वस्त झालं असत.... माहीत नाही अजुन किती मुलींना फसवल असशील... "


रक्षित " हे तोंड सांभाळून बोल हा.... "

आरोही " हे तिला जास्त बोलायचं नाही समजल... तुझी जागा आता जेलमध्ये आहे... पाठी बघ... "


रक्षित पाठी बघतो तर चार माणस उभी होती...

आरोही " हाच विचार करत असशील हे कोण आहेत तर सांगते मी हे खरे पोलिस आहेत , जे खऱ्या माणसाला न्याय मिळवून देतात...सो आता हे पण सांगते की मला कसं समजलं ते....
तर ऐक तुझा जेव्हा मला मेसेज आलेला खर तर मी तेव्हा घाबरले होते पण रिया ने मला धीर दिला आणि लढण्यासाठी उभ राहायला सांगितलं तेव्हा पासूनच मी डिसाईड केलं की मी तुला धडा शिकवणार... नंतर मी तुझी माहिती गोळा करायला लागले , त्यात मला समजलं की तू नेत्याचा मुलगा आहे.... वाईट धंदे करत आहे आणि तू माझ्या सारख्या बोलण्यात एक्स्पर्ट , मनमिळाऊ मुलींना फसवून त्यांच्या कडून नको ती काम करून घेत होतास तेही समजल मग मी तुला जेलमध्ये पाठवणारच यावर ठाम राहिले... म्हणजे मुलींचं आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचेल आणि वाईट धंदे पण थांबतील...

एक दिवस तू मीटिंग साठी एका ठिकाणी जाणार आहेस हे समजल होत... त्याच दिवशी मी पण आलेले , तू ज्या ठिकाणी बसलेला त्याचं ठिकाणी थोड्या अंतरावर मी होते... कोणत्या तरी ड्रग च्या डील बाबतीत बोलत होतास , मग मी लगेच तुमचं बोलण आणि तुमचं व्हिडिओ रेकॉर्ड केले... तुला जेलमध्ये पाठवण्यासाठी एवढच पुरेस होत...

आणि झालही तसचं पण दुसऱ्या दिवशी लगेच तुझ्या वडिलांनी सोडवलं... जेलमधून सुटल्यावर जेव्हा तू भेटायला अलेलास तेव्हाच मी त्या पोलिस स्टेशन ला गेले होते जिथे तुला जेलमध्ये टाकण्यात आलेलं... तिथे जाऊन समजल की काही पोलिस पण तुमच्या सोबत आहेत , त्यांनी तो पुरावा मिटला होता... आणि माझी खातिर दारी पण करणार होते , पण तुला माझ्याकडुन वाईट काम करून घ्यायची होती... म्हणून मला सोडून दिलं हो ना , पण मी त्याहून चालाख निघाले... नवीन प्लॅन बनवला मी त्यात तू स्वतः गुन्हा कबुल करशील आणि ते तू आताच केलं... मला माहित होत की तू पण माझ्याकडुन तेच काम करवून घेणार ते... सो कसं वाटत आहे आता सगळ खरं समोर आल ते...."


आरोही ने रक्षित ला फसवल हे ऐकून त्याला खूपच राग येतो... आणि रागातच तिच्यावर हात उचलणार तेवढ्यात कोणी तरी त्याचा हात हवेतच पकडतो...

आरोही जी डोळे मिटून उभी असते ती डोळे उघडून समोर बघते तर रक्षित चा हात पकडलेल्या व्यक्तीला बघून शॉक होते....

नंतर ती व्यक्ती रक्षित चा हात झटकत " तुला लाज नाही वाटत मुलींना अस फसवतो ते... इन्स्पेक्टर ( पोलिसांकडे ढकलत ) घेऊन जा याला...आणि याला अशी शिक्षा द्या कधी कोणाला त्रास नाही देणार...."

रक्षित ला पोलिस घेऊन जातात आणि रक्षित रागात सारखं मागे आरोही ला बघत असतो...


पोलिस रक्षित ला घेऊन गेल्यावर....

आरोही " निखिल सर तुम्ही इथे... " ( हो तो हात पकडणारा व्यक्ती निखिल होता... )


निखिल " हो सांगतो त्या आधी बसून घेऊ..."

आरोही " ओके..."क्रमशः


©भाग्यश्री परब


यात काही चूक असल्यास माफी असावी...
कमेंट करून सांगा पार्ट कसा वाटला..


🥰 Stay tuned 🥰
💖 Stay happy 💖
🤗 Take care 🤗

Rate & Review

Ajay Ankush

Ajay Ankush 2 years ago

Usha

Usha 2 years ago

Prakash Gonji

Prakash Gonji 2 years ago

I M

I M 2 years ago