निखिल " हो सांगतो त्या आधी बसून घेऊ..."
आरोही " ओके..."
पुढे....
ते तिघे एका टेबलाजवळ बसतात...
निखिल कॉफी ची ऑर्डर देऊन बोलायला सुरुवात करतो...
निखिल " मी इथेच जवळच्याच मार्केट मध्ये आलेलो... घरी जात होतो तर आरोही ला रिक्षातून उतरताना बघितल म्हटल भेटून घेऊ... कार पार्किंग करून आत आलो तर बघितल की त्यादिवशी चा मुलाशी बोलत आहे, आणि शॉक पण झालो की याला तू जेलमध्ये टाकले होते तर हा बाहेर कसा काय आला... त्याचे हावभाव पण वेगळे वाटले म्हणून मी थोड पुढे आलो... आणि त्याचं बोलण ऐकून राग आलेला , मी रागात त्याला मारण्यासाठी येणार तेवढ्यात आरोही बोलायला लागली... आणि आरोही च बोलण ऐकून तर खूप चांगलं वाटल... मस्त पुराव्यामद्ये अडकवल त्याला तू , आय एम प्राउड ऑफ यू की तू माझी फ्रेंड आहेस.... "
आरोही " अस काही नाही सर एका गुन्हेगाराला शिक्षा द्यायची होती ती दिली त्याला.... पण तुम्ही मला वाचवलं त्याच्या मरण्यापासून त्यासाठी थँक्यू... "
निखिल " अरे थँक्यू कशाला बोलतेय फ्रेंडशिप मद्ये थँक्यू नाही बोलत ना अस ऐकलय मी हो ना...."
आरोही " हं... हो... 😊 हिला भेटा ही माझी फ्रेंड रिया ही फ्रेंड कमी बहिणी सारखी जास्त आहे...."
निखिल हात पुढे करत " हॅलो मिस रिया..."
रिया त्याच्या हातात हात देत " हॅलो...."
हे तिघे कॉफी पित गप्पांच्या मैफिलीत रमून गेले....
आरोही घड्याळ बघत " निखिल सर आम्हाला आता जावं लागेल लेट झाला आहे खूप...."
निखिल " तू मला असं सर नको म्हणू सर फक्त ऑफिस मध्ये बाहेर आपण फ्रेंड आहोत तर एकेरी बोल... "
आरोही " मी प्रयत्न करेन...."
निखिल " ओके नो प्रोब्लेम.... हं मी तुम्हा दोघींना सोडतो चला.... "
आरोही " पण सर..."
आरोही पुढे काही बोलणार तर रिया तिचा हात पकडुन तिला डोळ्यांनी आधार देत...
रिया " हो चालेल..."
निखिल " ओके चला..."
आरोही रियाला डोळ्यांनी दटावत " हे काय आहे... त्यांना कशाला त्रास... "
रिया " कुठे काय... आपल्याला खूप लेट झाला आहे... आता रिक्षा भेटन अवघड आहे म्हणून मी हो बोलले..."
आरोही " मी आश्रमात राहते हे समजल्यावर कसे रिॲक्ट करतील...."
रिया " डोन्ट वरी मी आहे , सगळ खरं सांगू त्यांना... तसही ते तुझे बॉस आणि फ्रेंड आहेत , मग त्यांना समजन गरजेचं आहे... सो रिलॅक्स काही नाही होणार...."
आरोही " ओके...."
आरोही आणि रिया कार मध्ये जाऊन बसले... रियाने आरोही ला रिया ने निखिल शेजारी पुढे बसायला सांगितले ॲड्रेस साठी आणि स्वतः मागे जाऊन बसली...
कार मध्ये कोणीच काही बोलत नव्हत पूर्ण शांतता होती... फक्त गाण्याचे बोल ऐकु येत होते , आरोही फक्त निखिल ला ॲड्रेस दाखवण्याचं काम करत होती....
थोड्यावेळाने ते आश्रम समोर कार उभी राहिली...
आरोही " बस इथेच आल आमचं घर... "
निखिल ने समोर बघितल तर ते एक आश्रम होते... त्याचा डोक्यात अनेक प्रश्न फिरत होते... आरोही ला विचारावं वाटत होत...
शेवटी त्याने न राहून तिला विचारले...
निखिल " आरोही तू इथे... "
आरोही " हो..."
निखिल तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता....आणि त्याच्या चेहऱ्यावर चे प्रश्नचिन्ह अरोहीने हेरले....
( आरोही ने आधीच कार मध्ये निर्णय घेतला होता की निखिल ला सगळ सांगून टाकेल घर आल्यावर तिने निखिलच्या चेहऱ्या चे हावभाव बघून सांगणार च होती की रिया बोलू लागली...)
रिया " त्या रक्षित मुळे हीचे आई वडील हिचा तिरस्कार करत आहेत...."
निखिल " मग सांगायचं ना सगळी चूक त्याची होती... वैगरे वैगरे..."
रिया " तुम्हाला काय वाटत हिने प्रयत्न नाही केला... खूप प्रयत्न केला होता पण हिचे वडील ऐकायला तयार नाही.... म्हणत होते की सगळी चूक तुझी आहे , खूप तडफडत होती ही आई वडिलांच्या प्रेमासाठी लहानपणी तिरस्कार करत होते आणि आताही तसचं..."
आरोही आई वडिलांच्या प्रेमासाठी अस तडफडताना पाहून खूप वाईट वाटतं होत...
निखिल " लहानपणी तिरस्कार म्हणजे..."
आरोही काही बोलणार तर आतून खूप मोठ्या मोठ्याने आवाज येत होते....
ते तिघे आत गेले आणि समोरचं दृश्य बघून तिघेही हादरले....
समोर काही गुंड लोक आश्रमातल्या सर्व लोकांना एका साइडला उभ करून त्यांच्यावर बंदुकीच नेम धरून नजर रोखत उभे होते....
आरोही ला पाहून एक साधारण बारा तेरा वर्षांची मुलगी ओरडली....
" आरोही ताई...."
ती मुलगी ओरडली तस त्या गुंड्यांच लक्ष या तिघांकडे गेलं....
एक गुंड त्यांच्यावर बंदूक रोखत " हे ज्यादा शानपत्ती नहीं चुपचाप इधर आके खड़े रहने का समझें... "
तस या तिघांनी आपले दोन्ही हात वर करुन हळू चालत आश्रमातली लोक जिथे उभी होती तिथे येऊन उभे राहिले....
ती लहान मुलगी " अरे अंकल जी हमे क्यू पकड के रखा है वो तो बताओ.... और ये शानपत्ती मतलब शान नाम की कोई चहा पत्ती निकली है क्या... ( तुम्ही म्हणाल हे काय आहे... तर मी सांगते या मुलीला थोडी हिंदी मधले काही शब्द समजत नाही बाकी मराठी इंग्लिश समजत... सो ये प्रॉब्लेम आहे... चलो कंन्टीन्यू करूया ) हमें भी बताओ हम भी इसका स्वाद लेते है...."
त्यातला एक गुंड " ये लडकी चुपचाप से वहा खड़ी रेह.... नहीं तो खोपड़ी फोड़ दूंगा तेरी समझी , जबसे देखो बकबक किये जा रही हैं...."
ती मुलगी " में वही तो खड़ी हूं आपको शायद चश्मा लगा होगा... पर एक बात समझ नहीं आयी खोपड़ी मतलब क्या और ये खोपड़ी फोड़ने के लिए हतोडा चाइए ना आपके हाथ में तो बंदूक , पर आप नाराज मत होना मैने अभी एक नया हतोडा लाया है बहुत अच्छा है उससे खोपड़ी फटाक से फुट जायेगी... आपको चाइए लाऊ क्या..."
या मुलीची बडबड ऐकून तो गुंड पूर्णतः वैतागला होता...
तो गुंड रागातच " खोपड़ी मतलब सर.... ( बंदूक दाखवत ) इस बंदूक से उड़ा दूंगा..."
ती मुलगी विचित्र एक्स्प्रेशन आणून " ईईईई में लड़की हूं लड़का नहीं जो मुझे तुम सर बोल रहे हो...".
आता ही मुलगी गेली कारण त्या गुंडचा पेन्शन निघून गेला होता...
तो गुंड पूर्ण लालबुंद होऊन " तुझे तो में..."
तो गुंड तिला काही करणार तर आरोही मध्येच आली...
आरोही " भैया इसकी तरफ से मे माफी मागती हुं... इसकी हिंदी थोड़ी वीक है इसलिए उसे कुछ समझ नहीं आ रहा था , प्लीज इसे जाने दो..."
तो गुंड " ठीक है वैसे इससे हमें कोई मतलब नहीं... हमें तो यह आश्रम खाली होने से मतलब है...."
त्यानंतर सगळे शांत उभे होते...
निखिल आरोही च्या बाजूलाच उभा होता...
निखिल हळू आवाजात आरोही ला " आरोही आपण असं हातावर हात ठेवून बसू नाही शकत काही तरी करावं लागेल..."
आरोही " हो पण काय..."
निखिल तिच्या कानात " ऐक..... ..... ( प्लॅन नंतर समजेल काय आहे...😁😁😁)
आरोही प्लॅन ऐकल्यावर " डन...👍 "
आरोही ने मग सगळ्यांना प्लॅन शेअर केला...
सगळे " ओके... 👍 "
थोड्यावेळाने....
निखिल समोरच्या खुर्चीवर बांधलेल्या गुंडला रागात बघत " बोल का आश्रम खाली करत होता कोणी सांगितलं होतं हे सर्व करायला... बोल पटकन नाही तर तुला उल्टा लटकवून मारेल.... "
( तुम्ही हा विचार करत असाल की हे कसे पकडले गेले तर मी सांगते... निखिल जी प्लॅन सांगितला होता त्यावर सगळे रेडी होते...
निखिल चा प्लॅन हा होता की....
आश्रमातले जिथे उभे होते , तिथे त्या गुंडांनी सगळ्यांना हेरल होत...
सगळे त्यांचं निरीक्षण करत होते , जस त्यांचं आपल्याकडे लक्ष नाही हे समजल्यावर सगळ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या हातातील बंदूक आपल्या ताब्यात घेतली....
सगळ्या गुंडांना मारून खुर्चीवर बांधून ठेवले...
पुढे तुमच्या समोर आहे...)
निखिल ने त्याला दोन तीन बुक्के तोंडावर मारले... तो अजूनच मारत होता , त्याला अस मारताना बघून दुसरा गुंड घाबरून त्याने बोलायला सुरुवात केली...
गुंड घाबरतच " मी... मी.... मी सांगतो हे कोणी करायला सांगितलं ते... "
निखिल त्याच्याकडे बघत " बोल पटकन...."
गुंड " विश्वनाथ रावांनी हे आश्रम खाली करायला सांगितलं होतं... "
आरोही ओरडतच " व्हॉट... विश्वनाथ राव रक्षित चे वडील ते अस का करतील...."
रिया " कदाचित तू रक्षित ला जेलमध्ये टाकल म्हणून , ते सोडवू शकले नाही... त्याचा राग असेल "
आरोही डोक्याला पकडुन तिथे असलेल्या चेअर वर बसत " ओह गॉड..."
निखिल तिला धीर देत " डोन्ट वरी मी आहे... काही नाही होणार... "
आरोही " पण तुम्हाला त्रास होईल यात..."
निखिल " आरोही आपण आता फ्रेंड आहोत तर एक फ्रेंड दुसऱ्या फ्रेंड ला मदत करतो... तस मी पण माझ्या फ्रेंड ची मदत करत आहे.... "
निखिल बोलत असताना त्याला कॉल आला....
कॉल रिसिव्ह करून निखिल बोलण्यासाठी एका साइडला गेला....
निखिल कोणाशी तरी बोलत असताना सहजच आरोही च लक्ष त्याच्या कडे गेलं आणि समोरचं दृश्य बघून ती मोठ्याने ओरडली....
आरोही " निखिल सर नो... नो... "
आरोही का ओरडली म्हणून सगळ्यांचं लक्ष तिथे गेलं तर समोरचं दृश्य बघून सगळे हादरले....
क्रमशः
©भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी....
पार्ट कसा वाटला नक्की सांगा....
💖 Stay tuned 💖
🥰 Stay happy 🥰
🤩 Take care 🤩