Prema, your color is new ... - 13 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... - 13

प्रेमा तुझा रंग नवा... - 13

आरोही " निखिल सर नो... नो... "

आरोही का ओरडली म्हणून सगळ्यांचं लक्ष तिथे गेलं तर समोरचं दृश्य बघून सगळे हादरले....पुढे....


डॉक्टर ओटी च्या बाहेर आले.... आणि इतक्या वेळ त्यांची वाट बघत बसलेली आरोही पटकन उठून त्यांच्याजवळ आली....


आरोही " डॉक्टर आता ते कसे आहेत...."


डॉक्टर " जास्त काही नाही झाल , घाबरण्याचे काही कारण नाही.... हाताला गोळी शिवून गेली आहे फक्त....आता ते डेंजर झोन च्या बाहेर आहे , येतील थोड्यावेळाने शुध्दीवर...."


आरोही रिलॅक्स होत " थँक गॉड.... थँक्यू डॉक्टर , मी भेटू शकते त्यांना...."


डॉक्टर " हो पण त्यांना जास्तीत जास्त आराम करू द्या... जास्त वेळ नका थांबू..."


आरोही " हो...."


आरोही निखिल ला भेटायला आत गेली....

निखिल आत शांतपणे झोपला होता.... त्याच्या डाव्या हाताला पट्टी बांधलेली , आणि उजव्या हाताला सलाईन.... बाजूला हार्ट रेट मॉनिटर पण लावलेलं....


आरोही त्याला अस लागलेलं बघून तिला गिल्ट वाटत होत.... सगळ तिच्या मुळे झालय अस तिला वाटत होत....

ती विचार करत असताना च निखिल च्या आवाजाने भानावर आली....


निखिल " आरोही...."

आरोही " हं... बोला तुम्हाला काही पाहिजे का ?... हात वैगरे काही दुखतय का डॉक्टरांना बोलावू...."


निखिल ( मनात " किती ती काळजी... तिला अस काळजी करताना बघून तो मनोमन सुखावला....) मनात बोलून झाल्यावर तिला गोड स्माईल देत " काही नको... आणि हो इतकी पॅनिक व्हायची गरज नाही आय एम ओके..."


आरोही ( मनात " आरु एवढी रिॲंक्ट व्हायची काय गरज होती.... काय विचार करतील ते , ओह गॉड काय होतंय मला...) भानावर येत " ह... हो सॉरी माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास झाला..."


निखिल " अग यात त्रास कसला , आपण आता फ्रेंड्स आहोत तर फ्रेंड साठी इतकं त्रास तर सहन करू शकतो..."आरोही " ते तुमच्या हाताला... "


निखिल " अग आय एम ओके.... जास्त नाही लागलं आहे , होईल लवकर ठीक..."


आरोही " ओके 😊..."


निखिल "😊..."


आरोही " ते रक्षित चे वडील तुम्हाला..."


निखिल " आय नौ तुला प्रश्न पडला असेल की ते मला कसं ओळखतात , त्यांचं आणि माझं नातं काय तेही सांगतो.... तर ऐक...."( थांबा थांबा थांबा.... किती ती घाई ऐकण्याची त्याआधी आश्रम मद्ये काय झालं ते तरी जाणून घ्या...चलो फिर फ्लॅशबॅक में....)
फ्लॅशबॅक......

निखिल बाजूला फोनवर बोलत असताना पाठून कोणीतरी त्याच्यावर बंदूक रोखून ठेवली होती....

आरोही च सहज लक्ष गेलं तस ती ओरडली...


आरोही घाबरत " निखिल सर नो... नो..."


बाकीच्यांच पण लक्ष तिथे गेल्यावर तेही घाबरले...
आरोही आणि बाकीचे पुढे येणार तर त्या माणसाने त्यांना अडवल आणि ट्रिगर दाबून बंदूक अजुन त्याच्या जवळ घेऊन डोक्यावर रोखून ठेवली....तो माणूस " हे जास्त शहाणपणा नकोय समजल , नाही तर याला कायमच वर पाठवेल..."


आरोही कळवळून विनंती करत " तुम्हाला माझ्याशी देणंघेणं आहे... प्लीज त्यांना सोडा..."


तो माणूस " तुझ्याशी देणंघेणं तर आहे... त्याआधी याचा हीसाब किताब पूर्ण करू नंतर तुझ बघू... जास्त माज आलाय ना जेलमध्ये टाकण्याचा... ( निखिल कडे बघत...) काय मिस्टर निखिल ओळखल मला..."निखिल त्या माणसाकडे रागात बघत " हो बरोबर ओळखल तुला मी..... त्यादिवशी तर वाचलास पण यावेळी सुटणार नाही माझ्या हातून..."


तो माणूस " अरे आधी स्वताला सोडून तरी दाखव माझ्या तावडीतुन..."


निखिल त्या माणसाच्या हातून सुटण्याचा खूप प्रयत्न करत होता....


तो माणूस हसतच " अरे किती ती तळमळ सुटण्याची..."


तो माणूस आणि निखिल एकमेकांना ओळखत आहे , हे जाणून आरोही आश्र्चर्यचकित झाली...


तो माणूस आरोही ला आश्र्चर्यचकित होताना बघून " हे पोरी ( आरोही कडे बघत ) तू तर मला चांगलं ओळखलं असेल...की विसरली मला..."


आरोही " हो विश्वनाथ राव बरोबर ओळखल मी तुम्हाला.... त्या रक्षित ला तर जेलमध्ये टाकल , तुम्हाला पण जेलमध्ये जायची हौस आहे का.... तुम्हाला जायचं असेल तर सांगा बुकिंग करून ठेवते जेलमध्ये जाण्याची...."


आरोही ने अस बोलल्यामुळे त्यांना खूप राग आला आणि रागातच....


" तुला जास्तच माज आलाय का जेलमध्ये पाठवण्याचा.... तुला तर मी नंतर बघतो आधी ( निखिल कडे बघत... ) याला बघू दे... तुझ्याकडे बघून अस वाटत आहे की तुला प्रश्न पडला असेल की मी इथे कसा... ते आधी सांगतो नंतर बघतो मग तुला....

( त्यांनी सांगायला सुरुवात केली...) मी तुमच्यावर पाळत ठेवत होतो जेणेकरून तुम्हाला समजणार पण नाही.... पहिलं कोणीतरी माझ्या धंद्याच्या आड आलेलं ती म्हणजे आरोही , हिने रक्षित ला पूर्व्यासहित जेलमध्ये टाकल होत , नशीब की ते आपलेच पोलीस होते म्हणून रक्षित ला बाहेर काढणं सोप्प गेलं....रक्षित बाहेर आला तेव्हा त्याला सागितलं यावेळी जरा जपून काम करावं लागेल , मग आम्ही प्लॅन बनवला हिला हिच्या वडीलां पासून वेगळं करायचं... आणि झालंही तसंच ती तिच्या वडीलापासून वेगळी झाली , नंतर मग रक्षित ने तिचा इमोशन्स बघून आपल्या कामासाठी तिचा वापर करायचा ... आणि शेवटी तिने त्या कामासाठी होकार दिला हां आधी आढेवेढे केले मग नंतर हो बोलली , पण तिला माहिती नव्हत की काम काय आहे.... मीच रक्षित ला बोललं की तिला आधीच नको सांगू काय काम आहे , तिला एका ठिकाणी बोलावून काय काम करायचं ते आणि जर तिने ऐकल नाही तर तिच्या आई वडिलांना मारण्याची धमकी देऊन तिच्याकडून काम करून घे , रक्षित ने माझं बोलन मान्य करून तिला एका ठिकाणी बोलावून घेतलं यासाठी पण ती नखरे करत होती... हिचे नखरे बघून मला खूप राग आला होता , नंतर शेवटी ती भेटण्यासाठी तयार झाली....


रक्षित ज्या जागी बोलावलं होतं तिथे आरोही आली पण सोबतच तिच्या ( रिया कडे रागाने बघत...) मैत्रिणी ला पण घेऊन आली , नंतर विचार केला की हिच्या कडून पण काम करून घेऊ... मी तिथेच एका बाजूला तुमच्यावर पाळत ठेवत होतो...


मला वाटल माझा प्लॅन आता सक्सेस होण्याच्या मार्गावर आहे.... पण सगळा प्लॅन या आरोही नेच फ्लॉप केला पोलिसांना तिथे बोलावून , या आरोही चा मला खूपच राग येत होता अस वाटत होत की आताच जाऊन हिला कायमच उडवून टाकू... तिथे पोलीस असल्यामुळे मी काही करू शकत नव्हतो...


रक्षित आरोही ला मारायला जाणार तर या ( निखिल कडे बघत...) निखिल ने हिला वाचवलं.... मला निखिल ला बघून आश्चर्य वाटल आणि आनंदही होत होता , कारण चार वर्षापूर्वीची तपस्या संपली होती.... बदला जो घ्यायचा होता....


थोड्यावेळाने तुम्ही तिघे बाहेर निघून त्या पाठोपाठ मीही काही अंतरावरून तुमच्या वर लक्ष ठेवत होतो.... जेव्हा निखिल ने आरोही ला सोडण्यासाठी विनंती करत होता तेव्हाच माझ्या डोक्यात हा प्लॅन आला , आरोही या आश्रम पासून वेगळी होऊन एकटीच तडफडत मरेल आणि निखिल ला मी कायमच वर पाठवेल.... मग मी पटकन गुंडांना सांगून त्यांना आश्रम खाली करण्याचं काम दिलं आणि आश्रम मधल्या लोकांवर पाळत ही ठेवायला सांगितली... आणि माझ्या प्लॅन ला सुरुवात झाली , फक्त एकच कमी होती की आरोही हो बोलायला पाहिजे... शेवटी ( रिया कडे बघत... ) या तिच्या मैत्रिणी मुळे तयार झाली....


तुम्ही तिघे पोहचेपर्यंत आधीच मी तिथे पोहोचलो आणि तिथे एका साइडला उभ राहून तुमची वाट बघत बसलो आणि सोबत च रक्षित ला पण सोडवण्याचा प्रयत्न करत होतो पण ते पोलीस चांगले असून मला काही करता येत नव्हत... थोड्यावेळाने तुम्ही आलात आणि माझं प्लॅन पण सक्सेस होण्याच्या मार्गावर होत....

आता मी ( असुरी हास्य आणत...) निखिल ला सोडणार नाही...."


ते निखिल मारणार त्या अगोदरच पाठून आवाज येतो...


" त्या आधी आमच्या तावडीतून सुटून दाखवा..."


त्यांनी मागे वळून पाहिले तर तिथे पोलीस आलेले , पोलिसांना इथे बघून त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या....


पोलीस कमिश्नर त्यांच्या कपाळावर पडल्येल्या आठ्या बघून " आरोही सेफ नाही आहे हे समजून आम्ही तिच्या ब्रसलेट मद्ये चीप लावली जेणेकरून तीच लोकेशन आणि कोणकोणासोबत काय काय बोलणं होतंय ते समजेल.... सो आम्ही तुमचं बोलणं ऐकून लगेच इथे पोहोचलो.... आता तुम्ही तुमची गन आमच्या हवाले करा पटकन नाही तर... ( त्यांच्या सोबत आलेल्या पोलिसांना इशारा करत... ) अरेस्ट करा यांना...."विश्वनाथ रावांनी आपली गन पोलिसांना दिली आणि दोन्ही हात वर करून उभे राहिले....

एक पोलीस हातात हतकडी घेऊन त्यांच्या जवळ आला , तस त्यांचं लक्ष त्या पोलीस च्या बंदूक ठेवलेल्या खिशाकडे गेलं... आणि संधीचा फायदा उचलून त्यांनी पटकन बंदूक काढली आणि निखिल च्या हातावर वार केला...


आरोही किंचाळत " निखिल सर...."


हे एवढ अचानक झाल की कोणाला काही समजलच नाही.... आणि सगळ्यांनी निखिल कडे धाव घेतली , याच संधीचा फायदा उचलून विश्वनाथ राव पळून गेले.... बाकीचे गुंड पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांना पळता आल नाही...


निखिल च्या हाताला लागल्यामुळे त्याच्या हातून रक्त वाहत होत... त्याला लगेचच हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले....

थोड्यावेळाने हॉस्पिटल मध्ये पोहचल्यानंतर तातडीने निखिल ला ऑपरेशन थेटर मद्ये नेण्यात आले..... शेवटी निखिल ला गोळी शिवून गेल्यामुळे ऑपरेशन सक्सेस झाला....चलो आता वर्तमानकाळात....
वर्तमानकाळ.....


निखिल विश्वनाथ रावांना कसं ओळखतो हे सांगतो....


निखिल " ही चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा मी स्टडी साठी दिल्लीला होतो.... पप्पा बिसनेस सांभाळण्यात खूप बिजी होते , मला माहित नव्हत की इकडे काय चालू आहे इतका मी स्टडी मध्ये गुंतलो होतो...

एक दिवस अचानक मॉम कडून कळलं की पप्पा बिसनेस मध्ये शेअर्स डाऊन झाल्यामुळे त्यांना अटॅक आला आहे... म्हणून मी लगेच इकडे आलो... थोड्या दिवसांनी पप्पा बरे झाल्यावर त्यांच्याकडून समजल आपल्याच कंपनीतल्या एका माणसाने अस केलं आहे पण कोणी केलं याचा शोध नाही लागला....


पप्पांनी पोलीस कमिश्नर ची हेल्प घेतली शेवटी त्या व्यक्तीला पकडण्यात यश मिळाले.... तो दुसरा तिसरा कोणी नसून विश्वनाथ रावांचा मोठा मुलगा सोहम होता... जो आमच्या कंपनी मध्ये राहून काळे धंदे करत होता.... हे समजेपर्यंत तिथे पोलीस आले , पोलिसांना बघून तो पळत सुटला आणि एन्काऊंटर मध्येच त्याचा मृत्यू झाला... एन्काऊंटर मध्येच त्याचा मृत्यू झाल्याने ती केस तिथेच थांबवण्यात आली.... मी जस हा प्रॉब्लेम सोल्व झाल तस लगेच मी परत दिल्लीला गेलो....


या घटनेला एक वर्ष होऊन गेले होते , पण परत हाच प्रॉब्लेम येऊ लागला.... प्रॉब्लेम जास्त वाढत असल्याने मला दिल्ली वरून येथे यावं लागलं , या प्रॉब्लेम च्या पाठी कोण आहे हे शोधण्यासाठी एक वर्ष लागला.... ते विश्वनाथ राव च होते आपल्या मुलाचा बदला घेण्यासाठी त्यांनी आमच्या कंपनीचे शेअर्स पाडले , ते नेता असल्यामुळे त्यांना कुठली अडचण नाही.... आणि सोबतच ते पप्पांना पण हानी पोहचवू लागले.... नंतर एक वर्षाने समजल्यावर त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली....


विश्वनाथ रावांना जेलमध्ये टाकल्यामुळे त्यांचा लहान मुलगा रक्षित याने मला कायमच मारण्याची शपथ घेतली... माझ्या वर एक दोन वेळा वार करण्याचा प्रयत्नही केला होता त्यात मी वाचलो , पण मला माहित नव्हत की यापाठी कोण शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता , पण त्यात मी अयशस्वी ठरलो....


नंतर मी एका प्रायव्हेट व्यक्तीला याचा शोध घेण्याच सांगितलं आणि त्याने एका महिन्यातच शोध घेतला... आणि त्यात तुझ्याबद्दल पण कळलं होत... तुझा , त्याचा काय संबंध आणि तो तुझ्यासोबत काय करणार आहे हे जाणण्यासाठी तुझ्याशी मैत्री करायची हा निर्णय घेतला होता पण थोड अवघडले पणा पण वाटत होत... तुला त्याच्या पासून वाचवायचं आहे म्हणून मी काही विचार न करता मी तुझ्याशी मैत्री करेल हे ठरवून टाकल.... ( त्याने तो तिच्यावर प्रेम करतोय हे सांगणं टाळलं.... नाही तर त्याच्या गालावर नक्षी दिसली असती 🤭...)
आणि तू जिथे जाईल तिथे मी तुला फॉलो करत होतो...तू त्याला पहिल्यांदा न घाबरता त्याला जेलमध्ये पाठवलं तेव्हा मला तुझ्यावर गर्व फिल होत होतं... पण परत रक्षित जेलमधून सुटला आहे हे समजल्यावर मला आणखीनच टेन्शन आलं होतं , कारण वडील आणि मुलगा दोघं एकत्र होते.... विश्वनाथ रावांना जेलमध्ये टाकल तेव्हा काही दिवसांनी रक्षित ने पैश्याची फर्माईश दाखवून त्यांना सोडवलं.... त्यानंतर ते परत कसे बसे नेता बनले....


एक दिवस तो तुझा वापर करणार आहे हे समजल्यावर मला तुझी काळजी वाटू लागली म्हणून मी तुझ्या पाठोपाठ तुला त्याने जिथे बोलावलं तिथे आलो... पण त्याआधीच त्याला तू पोलिसांच्या ताब्यात दिले होते.... तेव्हा मला खूप आनंद झाला होता की तू त्याला पकडल ते...

तो तुला मारायला येत असतानाच मी मध्येच आलो तुला वाचवण्यासाठी....."


आरोही हात जोडत रडवेल्या आवाजात " निखिल सर तुमचं जितकं आभार मानावे तितके कमीच आहेत.... थँक्यू सर थँक्यू वेरी मच....तुम्ही नसता तर माहीत नाही त्याने अजुन काय काय केलं असत...."


निखिल " अग आरोही प्लीज हात नको जोडू आणि थँक्यू पण नको बोलू , ते माझं कर्तव्य होत...."


तेवढ्यात निखिल चे मॉम डॅड येतात.... आणि तो आता ठीक आहे हे बघून त्यांना समाधान वाटत....

मॉम आणि डॅडना येथे आलेलं बघून आरोही पटकन उठून बाजूला उभी राहते....


निखिल ची मॉम त्याच्या जवळ येत आणि त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत " बाळा आता कसं वाटत आहे तुला... "


निखिल गोड स्माईल देत " मी एकदम बरा आहे मॉम..."


निखिल चे डॅड " बेटा कुठे त्रास दुखत वैगरे तर नाही ना..."


निखिल " कुठे त्रास होत नाही आहे डॅड , फक्त हाताला लागल्यामुळे ते दुखत आहे... होईल थोड्या दिवसांनी ठीक...."


त्यांना निखिल ने गोळी लागल्याचं बोलण टाळून ॲक्सिडन झल्याच सांगितलं... उगाच त्यांना टेन्शन नको म्हणून....


निखिल च्या मॉम च लक्ष आरोही कडे गेलं तस त्यांनी निखिल ला प्रश्न विचारला " ही ( आरोही कडे बघत....) कोण..."


निखिल " ही माझी फ्रेंड माझी विचारपूस करायला आली ..."


आरोही हसतच त्या दोघांचे पाया पडत " नमस्ते काकी.... नमस्ते काका...."


निखिल ची मॉम हसतच " किती गोड आहे ही... कधी तरी ये घरी... "


आरोही " हो 😊...."निखिल चे वडील काहीतरी बोलणार तेवढ्यात रिया आत येते आणि आरोही ला बघतच " आरोही आपल्याला आता जावं लागेल खूप लेट झाला आहे...."


आरोही " हो खूपच लेट झाला आहे.... आणि यांना भेट हे निखिल सरांचे आई वडील...."


रिया त्यांच्याकडे बघत " सॉरी घाईमद्ये तुम्हाला नाही बघितल.... नमस्ते.... "


मॉम डॅड एकत्रच " इट्स ओके....😊"


रिया घड्याळात बघत " आरोही निघायचं का नाही तर रिक्षा वैगरे नाही भेटणार लवकर...."


आरोही " हो चल... ( तिघांकडे बघत....) चला येते मी....😊"


त्या जाणार त्यांना थांबवून निखिल " थांबा तुम्ही माझ्या कार ने जा ड्रायव्हर सोडेल तुम्हाला...."


मॉम " हो तुम्हाला अस एकट जाणं ठीक नाही...."


मॉम ने बोलल्यामुळे आरोही हो बोलते आणि ती रिया सोबत बाहेर निघून जाते...


निखिल आरोही गेल्यामुळे त्याचं मन कट्टू होत....

आणि इकडे पण तीच अवस्था असते पण कळत नाही... अहो आरोही च अजुन कोण तिला कळत होत पण वळत नव्हत....

रिया आणि आरोही थोड्यावेळाने आश्रमात पोहोचतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात....

रिया थकल्यामुळे फ्रेश होऊन लगेच झोपून जाते...इकडे आरोही च्या रूममध्ये......


आरोही फ्रेश होऊन बेडला एका साइडला टेकून निखिल चा विचार करत बसलेली असते...


आरोही विचारात " निखिल सरांची इतकी काळजी बघून मला त्यांचा खूपच हेवा वाटतो आहे.... ती मुलगी किती लकी असेल तिला निखिल सरांसारखा जोडीदार भेटेल... पण त्यांना गोळी लागलेली बघून माझं मन सैरभैर का झालेलं आणि माझ्या पासून कुठेतरी दूर घेऊन जातंय असं ही वाटत होत..... नंतर हॉस्पिटल मध्ये निघताना पाय जड होत होते.... अस का होतंय मी खरच त्यांच्या वर प्रेम करू लागले का... ते पण करत असतील का माझ्यावर प्रेम...."


तिला या विचारांनी झोप उडवली होती , काहीच समजत नव्हतं तिला... मूड फ्रेश व्हाव म्हणून तिने मोबाईल वर गाणी लावली....

आणि गाणं पण त्याच सिच्यूएशन वर लागलेलं...
मेरे दिल को ये क्या हो गया
में ना जानू कहां खो गया
क्यू लगे दिन में भी रात है
धूप में जैसे बरसात है
हैसा क्यू होता है बार बार
क्या इसको ही कहते है प्यार


मेरे दिल को ये क्या हो गया
में ना जानू कहां खो गया
क्यू लगे दिन में भी रात है
धूप में जैसे बरसात है
हैसा क्यू होता है बार बार
क्या इसको ही कहते है प्यार


आ आ आ आ आ आ आ आ
हो सपने नए सजने लगे
दुनिया नई लगने लगी
पहले कभी ऐसा ना हुआ
क्या प्यास ये जगने लगी
मदहोशी यो का है समा
वो झुकने लगा आसमां
खामोशी बनी है जुबां
छेड़े है कोई दास्तां
धड़कन पे भी छाया है कुमार
ऐसा क्यू होता है बार बार

हा आइने में देखा तुझको
आई शरम आंखे झुकी
धक से मेरा धड़का जिया
एक पल को ये सांसे रुकी
अब चोरी सताने लगी
रातों को जगाने लगी
में यूहीं मचलने लगी
कुछ कुछ बदलने लगी
जाने रहती हूं क्यू बेकरार
क्या इसको ही कहते है प्यार
ऐसा क्यू होता है बार बार
क्या इसको ही कहते है प्यार


हे गाणं ऐकून तिने वैतागून गाणं बंद केलं बेडवर आडवी झाली....


आणि कधी तरी मध्यरात्री तिला झोप लागली.....हॉस्पिटल मध्ये.....


निखिल चे डॅड आश्र्चर्यचकित होत " व्हॉट....😳..."

क्रमशः

©भाग्यश्री परबयात काही चूक असल्यास माफी असावी 🙏....
पार्ट कसा वाटला नक्की सांगा...🥰 Stay tuned 🥰
🤗 Stay happy 🤗
😃 Take care 😃

Rate & Review

Milu

Milu 1 year ago