विश्वास आणि कल्पेश निघून गेल्यावर आध्या आणि कल्पना एकमेकांकडे बघत राहतात...
कल्पना भानावर येत " मी आणते दुसरे पोहे बनवून..."
आध्या " नकोय मला..."
कल्पना " आध्या बाळा हे बघ बाबा आता रागात आहे , रागात बाबा काहीही बोलतात , काहीही करतात... राग शांत झाल्यावर ते बोलतील नीट... आता खाऊन घे थोड रात्री काही खाल्ल नाही तू..."
आध्या " आई अजुन किती खोटी आशा दाखवशील तू आणि खोट बोलून का स्वताला त्रासात आणत आहेस..."
कल्पना ".........."
आध्या " नाही आहे ना उत्तर तुझ्याकडे..."
येवढं बोलून आध्या रडतच आपल्या रूम मध्ये निघून जाते...
इथे कल्पना मटकन खाली खुर्चीवर बसतात , त्यांना रडू येत होत... रडावस वाटत होत त्यांना पण त्या अश्रू मोठ्या मुश्किलीने थांबवतात.... आणि आपल्या कामाला निघून जातात...
आध्या आपल्या रूम मध्ये आल्यावर रडून घेते मग फ्रेश होऊन शाळेची तयारी करते आणि तशीच न खाता टिफीन न घेता शाळेत निघून जाते...
थोड्यावेळाने ती शाळेत पोहोचते...
शाळेत आल्या आल्या तिच्या मैत्रिणी तारिका आणि पल्लवी भेटतात...
आध्या ला तारिका आणि पल्लवी या दोनच जवळच्या मैत्रिणी होत्या , बाकीच्यांशी ती कामापुरत बोलायची... विश्वास च्या अश्या स्वभावामुळे ती मुलांशी एकदाही बोलायचं मुलांचं अभ्यासावरुन तिच्याकडे काही काम असायचं तर ती तारिका किंवा पल्लवी च्या मदतीने ती त्यांना मदत करायची... ती शांत आहे म्हणून कोणी तिच्याशी जास्त बोलायचं नाही... पण कोणाला काय माहित होत की ती का शांत असते आणि ती रिअल आध्या चा स्वभाव कसा आहे तो...
तारिका आणि पल्लवी आध्या ला मीठी मारत " आध्या..."
आध्या जितकं स्वताला शांत करता येईल तितकं शांत करत आणि छोटस स्मितहास्य करत मिठीतून बाहेर येत " अरे जरा सांभाळून पडेल ना मी..."
पल्लवी " आम्ही आहोत ना तुला वाचवायला..."
आध्या " हो... हो..."
तारिका वॉच बघत " चल आता लेक्चर सुरू होईल पाच मिनिट बाकी... नंतर बोलू मग निवांत रीसेस च्या वेळी..." ( मुलींना बोलल्याशिवाय राहवत नाही हो ना...)
आध्या आणि पल्लवी " हो... हो... चला..."
या तिघी पटकन आपल्या क्लासरूम मध्ये येतात आणि आपल्या जागेवर जाऊन बसतात...
थोड्यावेळाने लेक्चर सुरू होतो...
आध्या ला कोणत्याही लेक्चर मध्ये मन लागत नसत सतत तिला बाबांचे बोललेले शब्द आठवत असतात , तरीही ती कसबस लेक्चर अटेंड करते....
काही तासांनी शाळा सुटते आणि सगळे आपापल्या मित्रांना भेटून आपल्या घराच्या वाटेला निघून जातात...
आध्या , पल्लवी आणि तारिका पण आपल्या घराच्या दिशेने निघून जातात...
आध्या ला घरी जाताना मध्येच एक रस्ता लागत असतो तिथे जास्त कोणी येत जात नसे मोजकेच लोक येत जात असायचे...
ती त्या रस्त्याने जात असतात त्यांच्याच शाळेतल्या काही टवाळखोर मुलांनी अडवल त्यांच्या वयावरून ती नववी दहावीची मुल वाटत होती...
त्यातल्या एका मुलाने तिला अडवून तिचा हात पकडला आणि विचित्र कमेंट्स करू लागला त्याचबरोबर त्याच्या सोबत असणारे दोन तीन मुल तिला छळत होते...
तेवढ्यात त्या छळत असलेल्या तीन मुलांचं मागे लक्ष त्यांना मागून एक व्यक्ती येताना दिसला म्हणून ती तीन मुल पळून गेले पण तिचा ज्याने हात पकडला होता त्याला माहित नव्हत , हे तिघे पळून गेले त्यांनी त्याला खूप हाक मारली पण तो काही ऐकायला तयार नव्हता....
आध्या स्वताला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होती पण त्याच्यापुढे तिची ताकद कमी पडत होती...
ती मागून येणारी व्यक्ती त्यांच्या जवळ आली...
आणि समोरचं दृश्य बघून रागात ओरडत " काय चालू आहे हे.... "
क्रमशः
©® भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी...