कल्पेश त्या व्यक्तीला गालावर एक हात ठेऊन बघत होता....
ती व्यक्ती खूपच रागात " लाज नाही वाटत का अस बोलताना ती बहीण आहे ना तुझी... आम्ही हेच शिकवलं आहे का तुला की कोणाशी कस बोलायचं ते , तुझ्या बाबांना तुझी चुक दिसत नाही आहे हीची चूक दिसतेय... जास्त लाडावून ठेवलं आहे म्हणजे कसही वागशील का... आता आपल्या बहिणीशी अस वागतोय माहीत नाही पुढे जाऊन बाकीच्या मुलींशी कस वागशील... जर पुढे अस काही घडल ना तर तुझी आई तुला विसरून गेली अस समज... तिला साथ देण्याच सोडून हे असल काही बोलतोयस , ज्यामुळे तिला आणखी त्रास होईल... "
कल्पना विश्वास ना भेटून बाहेर येतच होत्या की त्या तिथेच थांबल्या कल्पेश आध्या शी बोलत होता तेव्हा त्यांनी सगळ ऐकलं आणि त्यांना खूपच राग आला , त्यांनी पुढचा मागचा विचार न करता त्याला एक ठेऊन दिली...
त्यांनी कधी कल्पेश आणि आध्या वर हात उचलला नव्हता आज पहिल्यांदा त्यांनी कल्पेश वर हात उचलला तेव्हा मारल्यावर त्यांना रडू येत होत पण त्यांनी मुश्किलीने अश्रू अडवले...
त्यांनी अस बोलण्याने कल्पेश ला राग आला तो रागातच "
आई , तू या मुलीमुळे मला मारलस आणि वरून इतकं ऐकवलस मी सोडणार नाही आहे आता हिला..."
एवढ बोलून तो तणतणत तिथून बाबांकडे निघून गेला...
लहान मुलांना अगोदरच चांगलं वळण लावायला पाहिजे त्यांना तसचं मुक्त सोडून दिल तर ते आणखी बिघडतात...
कल्पेश गेला त्या दिशेने कल्पना आणि आध्या त्याला बघतच राहतात....
कल्पना तिथल्या बाकावर दोन्ही हातांनी डोकं गच्च पकडून बसत " हे काय होतंय सगळ..."
आध्या त्यांच्या जवळ बाजूला बसत एक हात खांद्यावर ठेऊन " आई शांत हो मला नाही काही वाईट वाटल... वाईट तर याच वाटल आहे की बाबांनी अविश्वास दाखवला माझ्यावर...आई आता जे चालू आहे तस चालू दे , मी हे सर्व सहन करायला तयार आहे... आणि मी दाखवेन की माझी काही चूक नाही... त्या मुलाला शोधून काढेन आणि खर समोर आणेन..."
कल्पना " बाळा नक्की झाल काय आहे त्यामुळे हे इतके रागवलेत आणि यांची अशी हालत झाली..."
आध्या " यामागच कारण तो मुलगा आहे..."
कल्पना " कोण आहे तो मुलगा आणि झाल काय होत नक्की..."
कल्पना ने अस बोलल्यावर आध्या त्यांना तो मुलगा काय करत होता , बाबांसमोर काय काय बोलला त्यामुळे बाबा रागवले हे घडलेलं सगळ सांगते...
आध्या ने सांगितलेलं सगळ ऐकुन त्यांना खूप राग येतो पण ती त्या मुलाच्या तावडीतून वाचली म्हणून थोड हायस वाटत....
ती एकदा वाचली पण नंतर तस परत घडल तर वाचू शकेल का....
हा विचार कल्पना आईच्या मनात येऊन गेला आणि त्या थरथर कापू लागल्या , त्यांना थंड वातावरणात पण घाम येऊ लागला.... त्या घाबरल्या होत्या...
आई ला अचानक काय झाल म्हणून आध्या घाबरली , ती कल्पना चा हात हातात घेऊन आणि दुसरा हात गालावर ठेऊन " आई.... आई... काय झालं , काय होतंय तुला..."
आध्या च्या आवाजाने त्या दचकल्या आणि त्यांनी तिच्या कडे बघितल , तिला लगेच आपल्या मिठीत घेतलं आणि आपली पकड एकदम घट्ट केली...
कल्पना विचार करून करून त्यांच डोकं सुन्न झालं होतं...
आपली मुलगी आता तर वाचली पण पुढे पुढे काय होईल... काय होईल पुढे... याच विचाराने त्या अस्वस्थ झाल्या होत्या...
आध्या आई अस वागणं बघुन हळूच ती मिठीतून बाहेर आली आणि दोन्ही हात त्यांच्या गालावर ठेवून " आई इतकी का घाबरली , इतकं घाम का आलाय तुला आणि इतकी अस्वस्थ का झालीय सांग काय झालं ?...."
कल्पना अडखळत " ते... तो मुलगा परत काही केलं तर त्याने..."
आध्या हसत " आई इतकं का घाबरतेस , मी त्याला चांगलच वठणीवर आणणार होते त्याला पण बाबा त्यांना बघून मला काही सुचलच नाही... तुला माहित आहे ना ही
आध्या कशी आहे ती डोन्ट वरी काही नाही होणार मला चील... पण मी तुला आणि बाबांना खूप घाबरते हा..."
तिच्या अश्या बोलण्यावर कल्पना मनमोकळ हसतात आणि तिचा कान पकडून " शहाणी म्हणे आई ला घाबरते..."
आध्या " हा... आई सोड दुखतय तुला घाबरणार नाही तर कोणाला घाबरणार हो ना..."
कल्पना तिचा कान सोडून दंडावर हलकस मारत " जास्त मस्ती आली आहे हा..."
त्या दोघी मनमोकळे पणाने हसल्या पण त्यांना माहित नव्हत की लपून कोणी तरी त्यांचं बोलणं ऐकत होत...
ती व्यक्ती रागात त्यांच्याकडे बघत स्वतःशीच " हसा जेवढ हसायचं आहे तेवढं या चेहऱ्यावर नंतर अश्रू दिसेल..."
गुढपणे हसत तो तिथून निघून गेला....
विश्वास ना काही खायला आणाव म्हणून आध्या आणि कल्पना घरी निघून आले...
कल्पेश ला विश्वास सोबत च राहायचं होत म्हणून कल्पना आणि आध्या ने जास्त आढेवेढे न घेता त्याला तिथेच ठेवलं...
कल्पना आणि आध्या लिफ्टमधून बाहेर निघाल्या निघाल्या त्यांच्या शेजारच्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या दोन बायकांनी त्यांना अडवल....
वंदना " काय हो कल्पना ताई आज आवाज नाही आला म्हंटल ओरडण्याचा...."
( आध्या च्या घरी जेव्हा बाबा ओरडायचे तेव्हा त्यांचा आवाज दरवाजा थोडा उघडा असल्याने आवाज बाहेर पर्यंत यायचा आणि नेहमी ते आध्या वरच ओरडायचे...)
सुरेखा " अहो वंदना ताई तुम्हाला माहिती का आज काय झाल यांचे मिस्टर चक्कर येऊन पडले...आणि हे सर्व त्यांची मुलगी आध्या मुळे झाल म्हणे..."
( या दोघींना नेहमी सवय होती दुसऱ्यांना टोमणे मारण्याची , समोरच्याला काय वाटेल याच त्यांना काहीच देणं घेणं नव्हत.... )
वंदना " अय्या हो का ( आध्या कडे बघत ) काय ग आध्या अस काय केलस ज्यामुळे तुझे बाबा चक्कर येऊन पडले... अस घोटाळा वैगरे काही केलं नाहीस ना..."
सुरेखा " कल्पना ताई जरा आपल्या मुलीला सांभाळून , लक्ष ठेवा हा नाही तर कधी काय चुकीच्या गोष्टी करेल सांगता येत... माहीत आहे ना आजचा जमाना कसा आहे ते... आताच्या मुलाला अस मुक्त सोडलं तर काय काय करून ठेवतात आयुष्याचं..."
या दोघींचं अस बोलण ऐकून आध्या ला खूप राग येतो ती त्यांना काही बोलणार कल्पना तिचा हात पकडुन थांबवत डोळ्यांनीच नको बोलते.... आणि सरळ त्या दोघींना इग्नोर करून आध्या ला घेऊन निघून जाते....
घरी आल्यावर आध्या " आई मला का बोलू दिल नाहीस कश्या विचित्र बोलत होत्या त्या काकी..."
कल्पना " बाळा त्यांना बोलून काही फायदा होणार आहे का , त्यांनी एका कानाने ऐकल असत आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं असत... मग आपण पण तसचं करायचं एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं , कशाला शब्द , वाक्य वाया घालवायचे..."
कल्पना ने समजावून सांगितल्या मुळे आध्या ला थोड बर वाटल आणि रागाच्या जागी आता स्माईल ची बाजू घेतली होती...
आध्या " आई यू आर ग्रेट..."
कल्पना " हो... हो... झाल कौतुक आता चल बाबांना डब्बा घेऊन जायचा आहे..."
आध्या " हो..."
कल्पना आणि आध्या डब्बा भरत असतात तेव्हा कल्पना चा मोबाईल वाजतो...
मग त्या दोघींचं लक्ष मोबाईल वर जातो आणि त्यावरच नाव ऐकून दोघी घाबरतात....
क्रमशः
यात काही चूक असल्यास माफी असावी....