आध्या आणि कल्पना घाबरून एकमेकांकडे बघत राहतात...
आध्या घाबरत " आई आता काय करायचं...."
कल्पना " उचलावच लागेल ना आता , नाही तर काही खर नाही मग..."
आध्या " हो... उचल स्पीकर वर ठेव..."
कल्पना उचलायला जाणार फोन वाजून बंद झाला तेवढ्यात...
मग काही सेकंदाने परत फोन वाजला मग त्यांनी लगेच उचलून स्पीकर वर ठेवला...
फोनवरील व्यक्ती कल्पना ने फोन उचलल्या " इतका वेळ लागतो का फोन उचलायला , डोकं आहे की नाही बाबा फोन आला आहे पटकन उचलाव..."
कल्पना अडखळत " सॉरी... सॉरी आई..."
( गीता शिंदे या विश्वास यांच्या आई यांचा स्वभाव एकदम खडूस सारखं , आध्या पहिली मुलगी झाली म्हणून यांना खटकत होतं... नेहमी त्यांच्या इच्छेनुसार होत आलेलं त्यांची इच्छा होती माझ्या मुलाला एक मुलगा व्हावा पण त्यांच्या मुलाला मुलगी झाली म्हणून त्या आध्या चा नेहमी तिरस्कार करायची , काही वाईट गोष्टी घडत असेल तर त्या नेहमी आध्यालाच दोष देत असायच्या , आध्या च्या नंतर कल्पेश झाल्याने त्यांना खूप आनंद झाला मग कल्पेश चे लाड आणि आध्या चा तिरस्कार करू लागल्या , यांच्या लाडा मुळेच कल्पेश असा वागायला लागला... आताही त्यांना वाटत होत की विश्वास यांची हालत आध्या मुळे झाली आहे...म्हणून त्यांनी कल्पना ला फोन केला...)
फोनवरील व्यक्ती " हा... हा... जास्त नाटक नको हे सॉरी तुझ्याजवळ ठेव समजल... आणि मी काय ऐकत आहे तुझ्या लेकी मुळे माझा मुलगा चक्कर येऊन पडला ते..."
त्यांचं अस बोलण ऐकून कल्पना गप्प झाल्या त्यांना काय बोलावं काही कळत नव्हत , त्यांचं बोलणं कल्पनाच्या आणि आध्या च्या जिव्हारी लागलं होतं...
कल्पना काही बोलत नाही म्हणून त्या थोड्या मोठ्या आवाजात ओरडत " मी काय बोलली ऐकू आल का काही ..."
त्यांच्या ओरडण्याने या दोघी दचकल्याच आणि एकमेकांना पाहू लागल्या...
तरीही आवाज येत नाही म्हणून गीता " अस सांगणार नाही ना जाऊ दे मीच येते तिकडे मग बघते माझ्या मुलाची हालत कशी आणि कोणामुळे झाली..."
गितानी कल्पना च काहीही न ऐकता , बोलू न देता लगेच फोन ठेऊन दिला...
गीता फोन ठेवताच आध्या कल्पना ला " या का भुता सारखं माझ्या मागे पडलेल्या असतात जस काय मी एक राक्षसीन आहे..."
( आध्या ला त्यांच्या तिरस्काराची सवय झालेली म्हणून तिला काही वाटत नव्हत...)
कल्पना तिच्या वर कटाक्ष टाकत " आध्या गप्प बस काहीही नको बडबड करुस त्या तुझ्या आजी आहेत... त्यांच्या समोर अस बोललीस तर माहीत नाही काय काय होईल..."
आध्या " माझ्यापेक्षा तिचीच काळजी तुला..."
कल्पना " जास्त नाटक नको करू समजल..."
आध्या " मी नाटक करते... मी... मी... ( वर बघत ) हे देवा कसले कसले विचित्र दिवस बघायला भेटत आहे आजकाल , कसं व्हायचं या बिचाऱ्या लेकरू च..."
आध्या ची अशी नाटक बघून कल्पनाने डोक्यावरचं हात मारून घेतला....
कल्पना " तुझ काही नाही व्हायचं..."
आध्या " एक मिनिट आई आजी ला कस माहीत पडल की बाबा आजारी आहेत आपल्याशिवाय कोणाला माहित नाही ना... आजी कोणी भूत वैगरे पाळते की काय जे तिला लगेच एका दिवसात समजत..."
कल्पना ने आध्या च शेवटचं वाक्य ऐकून डोळेच मोठे केले " आध्या काहीही काय बोलतेस आजीला समजल ना की तू तिच्या पाठीमागे काहीही बोलत असते तर घरात भूकंप यायचा..."
आध्या " येऊ दे की काय झाल उलट चांगलं होईल... पण ज्याने आजीला सांगितलं आहे ना त्याला तर मी उलटच जमिनीत घाडेन..."
कल्पना थोड रागातच " आध्या तुझ्या जिभेला काही हाड काहीही बोलतेस... असेल कोणी तरी सांगितलं , शेवटी त्यांना कळणारच होत ना...चल आता बाबांना डब्बा घेऊन जायचा आहे..."
आध्या " हो चल..."
थोड्यावेळाने त्या दोघी विश्वास ना डब्बा घेऊन हॉस्पिटल मध्ये जातात...
हॉस्पिटल मध्ये....
कल्पना जेवण देण्यासाठी आय.सी.यू च्या आत जाते आणि त्यांच्या पाठोपाठ आध्या ही जाते....
कोणीतरी आलेलं बघून विश्वास डोळे उघडतात , समोर कल्पना सोबत आध्या ला बघून त्यांना भयंकर राग....
विश्वास रागात " हिला कशाला आणलं आहेस इथे , जायला सांग हिला माझ्यासमोर अजिबात नकोय ही..."
कल्पना " अहो..."
कल्पना काही बोलणार तेवढ्यात आध्या त्यांचा हात पकडुन गप्प करते...
आध्या " आई मी जाते बाहेर बाबांना वाढ जेवण..."
आध्या कल्पना कडे बघत डोळ्यांनीच दिलासा देते आणि बाहेर निघून जाते...
बाहेर आल्यावर मुश्किलीने अडवलेले अश्रू शेवटी तिच्या डोळ्यातून निघतच आणि ती तोंडावरच हात ठेवून रडू लागते...
इथे आध्या ला अस रडताना बघून त्या लपून बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान आणि असुरी हास्य येत...
क्रमशः
© भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी...