सकाळी आध्या उठून फ्रेश होऊन नाष्ट्या साठी बाहेर आली....
डायनिंग टेबल कडे जातच होती की आत्या ने तिला मध्येच अडवल....
आत्या " आल्या बघा महाराणी नटून तटून...."
( जशी आई तशी मुलगी यांचा स्वभाव गीता सारखाच... स्वताला स्मार्ट समजणे हे यांचे विचार....)
आध्या आठया पाडत मनात " यांना काय झाल मध्येच भुताने झपाटले तर नाही ना..."
आध्या " ह... आत्या तुम्हाला कदाचित चष्मा लागला आहे , एकदा डोळे तपासून घ्या...."
तिच्या अश्या बोलण्याने आत्याला ला खूप राग आला....
आत्या रागात " मला बोलतेय मला या... या... अंजली ला..."
आध्या " हो तुम्हाला च बोलतेय एक काम करा आत्या डोळ्यासोबत कान पण तपासा..."
आत्या " तोंड सांभाळून बोल समजल नाही तर...."
आध्या " नाही तर... नाही तर काय आत्या...."
आत्या मनात " बघून घेईन नंतर जास्तच तोंड चालतंय ना पुढे बघ अशी अद्दल घडवेन आयुष्यभर कोणाशी बोलणारच नाही...."
आध्या गूढपणे हसत " आत्या मनात बोलून झाल असेल तर जाऊ शकता , कशाला शब्द वाया घालवत आहात काही फायदा नाही होणार कारण ही आध्या आता पहिली आध्या नाही राहिली आणि हो माझं आयुष्य धुळीत मिसळायचं असेल तितकं मिसळा ही आध्या परत परत नव्याने उभी राहणार तेही न घाबरता.... ( आत्या ला खुन्नस देत...) आध्या च्या आतली वाघीण जागी झाली आहे , आता वाईट गोष्टी ला संपवून च राहणार ही वाघीण समजल..."
एवढ बोलून आध्या डायनिंग टेबल च्या देशेने निघून जाते आणि इथे आत्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहते....
अंजली विचार करत उभी असलेली असताना पाठून कोणीतरी खांद्यावर हात ठेवत , त्याने अंजली एकदम दचकते तिच्या अश्या दचकण्याने ती व्यक्ती दचकते...
ती व्यक्ती अंजली ला पाठीत मारत " अग ये दचकली कशाला घाबरली ना मी..."
त्या व्यक्तीचा आवाज ऐकुन अंजली पाठी वळून बघते " आई तू... ते विचार करत असताना तू अचानक हात ठेवला त्यामुळे घाबरले..."
गीता ( आजी ) " हा... इतका कोणाचा विचार करत होतीस त्यामुळे एवढी घाबरली ते..."
अंजली ( आत्या) " आध्या चा..."
गीता " आध्या त्या महाराणी चा का...."
अंजली " हो.... ती महाराणी आता धमकी देऊन गेली म्हणे आता माझ्यातली वाघीण जागी झाली आहे आता वाईट गोष्टी संपवून च राहणार...."
गीता " अस आहे का , तिला जेवढी धमकी द्यायची तेवढी देऊ दे ही गीता असा बदला घेईन की ती आपल्या सावलीला पण घाबरेल...."
अंजली " हा... स्वताला वाघीण समजते..."
गीता आणि अंजली गूढ पणे हसत नाष्ट्या साठी निघून जातात....
पण... पण.... पण.... कोणी तरी लपून अंजली आणि आध्या च्या बोलण्याचा व्हिडिओ काढत होता....
तो व्यक्ती गीता आणि अंजली गेल्यावर स्वतःशीच मनात क्रूर पणे हसत " आता मज्जा येईल.... "
अरे अजुन राहील की या व्यक्ती सोबत अजून कोणीतरी होत ते दुसऱ्या साईड ला लपून व्हिडिओ काढत होत....
डायनिंग टेबलवर गीता आजी , अंजली आत्या , कल्पना , आध्या , कल्पेश सगळे शांततेत नाष्टा करत होते कोणी कोणाशी बोलत नव्हत कोणी मनात बोलत होते , कोणी कसला तरी विचार करत होता , तर कोणी प्लॅन बनवत होता....
आध्या मनात " मला माफ कर देवा मी चुकीचं करतेय माहीत आहे , पण अस गप्प राहून संकट तर दूर नाही होणार ते आणखी वाढत जाईल त्यामुळे मला काहीतरी करावं लागेल.... माझी हीच इच्छा आहे की आमचे कुटूंब बाकीच्या कुटुंबा सारखे व्हावे जिथे कधीच भांडण नाही , एकमेकांना मदत करेल , सुखात नसले तरी अडचणीत नेहमी सोबत असेल.... मी प्रयत्न करेन जर प्रयत्न करूनही काही होत नसेल तर... तर... तर काय ?....."
कल्पना च्या आवाजाने तिच्या विचाराची तंद्री भंग झाली....
आध्या ने आजूबाजूला बघितल तर तिथे कल्पना आणि आध्या दोघीच होत्या....
कल्पना " बाळा कसला विचार करत आहेस...."
आध्या " कसला नाही आई.... चल मी शाळेची तयारी करते...."
कल्पना " हो... जा...."
कल्पना शी बोलून आध्या आपल्या रूम मध्ये निघून गेली....
कल्पना मनात " देवा माझ्या लेकीला सुखी ठेव आता , खूप सहन करत आली आहे ती...."
मनात बोलून कल्पना किचन मधल आवरायला निघून गेल्या....
थोड्या वेळाने आध्या शाळेत जायला निघाली....
आध्या जाताना कल्पना ला आवाज देत " आई जातेय मी...."
आवाज ऐकुन कल्पना किचन मधून पळत तिच्या जवळ येत " हे घे टिफीन पूर्ण संपवायचा आहे आणि वेळेवर ये घरी आज बाबा येतील संध्याकाळ पर्यंत येणार आहेत...."
आध्या " अग आई हळू जरा , हो मी येईन लवकर.... एक मिनिट बाबांना दोन दिवसांनी डिस्चार्ज भेटणार होता ना , मग आज कस...."
कल्पना " त्यांची तब्येत आता बरी आहे थोडी.... काही टेन्शन सारखं नाही आता म्हणून लवकर डिस्चार्ज देत आहे...."
आध्या " ठीक आहे येईन मी लवकर...."
कल्पना " हो... सावकाश जा आणि सावकाश ये..."
गीता आजी ओरडत " अग कल्पना सावकाश आली तर लवकर कशी येईल ती... तू ( आध्या ला ) लवकर च ये नाही तर बाबांचा ओरडा खावा लागेल...."
आध्या त्यांना इग्नोर करत , तोंड वाकड करत सरळ निघून गेली....
तिच्या अश्या वागण्याने गीता आजीला भयंकर राग आला....
गीता कल्पना ला " बघ कशी तोंड वाकड करत गेली.... शिकव जरा तिला..."
इतकं बोलून त्या रागात तणतणत तिथून निघून गेल्या....
कल्पना हताश होऊन आपल्या कामाला निघून गेल्या.....
आध्या शाळेत आली ती एके ठिकाणी पल्लवी आणि तारिका ची वाट बघत उभी असते.....
थोड्यावेळाने त्या दोघी आध्या जवळ येतात....
तारिका आणि पल्लवी एकसाथ " हॅलो आध्या...."
आध्या " हॅलो बडी...."
पल्लवी " कशी आहेस बरी आहे ना तू...."
आध्या " हो , एकदम मस्त आहे मी...."
तारिका या दोघींना विचित्र पणे बघत " पल्लू अस का बोलत आहेस जस काय ही दोन तीन दिवस आलीच नाही आणि अस असेल तर मग आतापर्यंत जी आध्या होती ती कोण होती , कोणी डूप्लिकेट आध्या तर नाही ना..."
आध्या " व्हॉट , काहीही काय बोलत आहेस तारे तू..."
पल्लवी " अग तस नाही काही मी सांगते थांब..."
पल्लवी तिला सगळ सांगते....
तारिका " ओह अस आहे तर...."
( पण तारिका च्या चेहऱ्यावरून अस दिसत होत की तिला काहीच फरक पडला नाही.... ती तस दाखवत नाही....)
पल्लवी " हो..."
या तिघी बोलत असताना तिथे एक मुलगा येतो जो तारिका च्या ओळखीचा असतो...
तो आणि तारिका मस्त गप्पा मारत असतात , इथे पल्लवी आणि आध्या त्यांच्या गप्पा ऐकत फक्त उभे असतात...
पण यांना माहीत नव्हत कोणी तरी दोन व्यक्ती यांच्यावर नजर ठेवून आहे....
थोड्यावेळाने बेल वाजते तसे सगळे आपापल्या वर्गात जाऊन बसतात....
क्रमशः
©® भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी....