दुसऱ्या दिवशी....
सगळे नाष्टा करून आपापल्या कामाला निघून जातात...
काल तिच्या बाबांनी बोलल्या प्रमाणे आध्या ला विश्वास सोडायला येतात...
रिक्षात...
आध्या हिम्मतीने " ब... बाबा माझी चूक काय आहे ते तरी सांगा , मलाच माहीत नाही मी कोणती चूक केली ती... तुम्ही सांगाल तर ती चूक सुधरवायच प्रयत्न करेन प्लीज सांगा... हवं तर मी माफी मागते हात जोडून , मला दुसरी शिक्षा द्या पण मैत्रिणी पासून दूर नका करू प्लीज..."
विश्वास " गप्प एकदम गप्प बसायचं समजल एकही शब्द तोंडातून काढायचं नाही... चुका सुधारशील , तू जी चूक केली आहे ती माफी मागायच्या लयकीचीच नाही आणि माफ करायच्या लायक पण नाही.... माफी मागून गेलेले शब्द परत येणार आहेत का सांग आणि हो दिलेली शिक्षा बदलली जाणार नाही आहे तिच असेल , यातून जर नियम तोडल तर माहीत आहे ना काय होणार ते... आली शाळा जा..."
आध्या बाहेर बघते शाळा आलेली असते बोलून काही उपयोग नाही म्हणून ती नाईलाजाने तिथून निघते...
पण तिला मनातून एक अपेक्षा असते की बाबांनी हे सगळ सोडून दुसर काही तरी प्रेमाने बोलावं , जस बाकीच्या मुलींशी बाबा बोलत असतात...
ती जात च असते तर विश्वास तिला मध्येच थांबवतात...
तिला वाटत की बाबा काहीतरी बोलतील म्हणून ती आनंदी होऊन मागे वळते...
विश्वास " आई आणि ताई शी एकही शब्द बोलायचं नाही , त्यांच्या आसपास पण भटकायचं नाही समजल....आणि हो मोबाईल वर पण बोलण बंद , जे काही अभ्यासा बद्दल असेल ते माझ्या समोर करायच..."
आध्या नाराज होऊन " ह... हो..."
विश्वास आध्या शी बोलून तिच्याकडे न बघता निघून गेले...
आध्या तिथेच उभी राहून त्यांना जाताना बघत स्वतःशीच " चला आध्या शिक्षा भोगायला तयार व्हा... सुशीला आजीची आठवण येतेय , त्यांच्याशी आता बोलण पण नाही होणार घरी पण जाता नाही येणार त्यांच्या... देवा फक्त एकदा भेट घडवून दे फक्त एकदा प्लीज...."
शाळेच्या आत....
आध्या पल्लवी , तारिका जिथे उभ्या होत्या त्यांना एकदा बघते आणि जड पणे हसत तशीच सरळ पुढे निघून जाते...
पल्लवी ती जात असताना लगेच तिचा हात पकडून थांबवत " मला माहित आहे तू का इग्नोर करून जात आहेस ते..."
आध्या तिला शॉक होऊन च बघते...
पल्लवी " अशी शॉक होऊन नको बघू आणि हे घे वाच..."
पल्लवी तिच्या हातात काही तरी देते आणि तारिका ला घेऊन जातच असते की तारिका पल्लवी चा हात झटकुन आध्या ला रागात " तुझ्या मुळे माझी सेल्फ रिस्पेक्ट खाली आलीय तुझे बाबा काय काय बोलत होते मला की तुमच्यामुळे आध्या बिघडली आहे आणि बाबांना नको नको ते बोलत होते.... माझच चुकल की तुझ्यासारख्या गरीब मुलीशी मैत्री केली ती आणि तुला काय वाटल भोलेपणाचा दिखावा करशील , मी बघतच राहणार नाही मला समजल आहे तू फक्त माझ्या श्रीमंती ला बघून मैत्री केली आहेस...."
तारिका आध्या बद्दल अस बोलत असताना पल्लवी ला खूप राग येतो आणि ती रागात तिला " बस जास्त बोललीस तू आता पुढे एकही शब्द नको... तू सेल्फ रिसपेक्ट ची गोष्ट करतेय त्या आधी स्वतः कडे बघ मग बोल समजल... श्रीमती चा माज तुझ्या त भरला आहे आध्या मध्ये नाही... आतापासून मैत्री तुटली आपली परत कधी आमच्या दोघींच्या वाटेला दिसली नाही पाहिजे समजल आणि हो आध्या ला त्रास द्यायचा पण प्रयत्न नको करून नाही तर गाठ माझ्याशी आहे... जा निघ इथून परत तोंड दाखवू नकोस..."
तारिका रागात दोघींना " बघून घेईन मी..."
इतकं बोलून ती तणतणत तिथून निघून जाते...
पल्लवी स्वतः ला शांत करत आध्या ला " तिचा खरा चेहरा समोर आला अस समज , ती सोडून गेली तर काय झालं ही पल्लवी आयुष्यभर तुझ्यासोबत आहे... आणि हो हे रिसेस झाल्यावर वाच..."
एवढ बोलून त्या दोघी क्लास रूम मध्ये जातात....
रिसेस मध्ये....
आध्या आसपास च वातावरण बघते क्लास रूम मध्ये कोणी नव्हत ती एकटीच बसली होती....
आसपासचा अंदाज घेत आध्या हळूच आपल्या बॅग मधून पल्लवी ने दिलेली बुक काढते...
आध्या ती बुक उघडून बघते तर तिच्या चेहऱ्यावर मोठ हास्य पसरत....
क्रमशः
©® भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी....