पार्थ " झाल कल्टी मारलीस वाटलच मला...."
निखिल " तुझे गुणगान नको सांगू , मला हेल्प करायला आला आहेस तू हे नको विसरू...."
पार्थ " हो , बोल काय हेल्प पाहिजे तुला...."
निखिल " हा , तर....."
पुढे......
निखिल पार्थ ला पहिल्या पासून सगळ सांगतो त्याच्या बाबांवर झालेला अटॅक , आरोही ला दिलेला त्रास सगळ जसच्या तस त्याला सांगतो.... आरोही च्या बाबांनी काय सांगितल होत तेही सगळ सांगतो ( कळेल कळेल नंतर आरोही च्या काय सांगितल होत ते....)
सगळ सांगून झाल्यावर निखिल सुटकेचा निःश्वास सोडत तिथे टेबलवर असलेल पाण्याचा ग्लास उचलून घडाघडा पाणी पिऊन घेतो....
पाणी फास्ट पिल्याने त्याला जोरात ठसका लागतो....
त्याला ठसका लागलेलं बघून पार्थ लगेच उठून त्याच्या जवळ जात त्याच्या पाठीवर हात फिरवत " अरे हे हळू ना जरा तुला काही झाल तर माझ काय व्हायच , तू मेरा एकुलता एक दोस्त है रे बाबा....."
पार्थ च्या अश्या बोलण्याने निखिल ने तर डोक्यावरच हात मारून घेतला....
निखिल चिडून च पार्थ ला " तुला अश्या कंडिशन मध्ये जोक सुचत आहे का ?.... इथे कंडीशन काय आहे आणि तू बोलतो काय आहे...."
पार्थ निखिल थोड शांत झाल्यावर समोरच्या चेअर वर येऊन बसत " मी कुठे जोक मारला , खर आहे तेच बोललो ना.... काय यार उगाच माझ्यावर येऊन शब्द वाया घालवत आहेस.... "
निखिल त्याच्या पुढे हात जोडून " हा बाबा माझच चुकल जे मी शब्द वाया घालवले...."
पार्थ हसत " हा आता कस.... वाह बघ माझ्या सोबत राहून हुशार झालास...."
निखिल विचित्र नजरेने त्याला रोखून बघत होता....
पार्थ डोळे मोठे करून " काय ?.... अस नको बघू नजर लागायची मला...."
निखिल चिडून " व्हॉट ?...."
पार्थ त्याला अस चिडलेले बघून " काही नाही , कामाचं बोलूया मग...."
निखिल " मग मी काय वेगळ करत होतो का इथे...."
पार्थ त्याच्या बोलण्याकडे सरळ इग्नोर करून एक भुई उंचावत " काम...."
निखिल " तू काही सुधारणार नाहीस... ओके मग माहीत आहे ना काय करायचं ते...."
पार्थ " हो समजल.... एक आठवड्यात सगळ क्लिअर होईल बघ डोन्ट वरी टेन्शन नको घेऊस ये पार्थ हमेशा तेरे साथ ही है भाई....."
निखिल हसत " हो...."
पार्थ घड्याळ बघत " चल येतो.... भेटू परत...."
निखिल " अरे काही तरी खाऊन जा...."
पार्थ " नको लेट होत आहे.... नंतर कधी तरी पक्का...."
निखिल " ठीक आहे.... "
पार्थ चेअर वरून उठत " चल बाय....."
निखिल पण उठत त्याच्या जवळ येत त्याला टाईट मीठी मारत " हो बाय....."
पार्थ निखिल च निरोप घेऊन निघून जातो....
निखिल पार्थ गेल्यावर काम करत मनातच " त्यादिवशी जर वासुदेव अंकल ( आरोही चे बाबा ) ने काही सांगितल नसत तर माहीत नाही आता काय काय वाईट घडले असते..... "
मनात बोलत असताना निखिल भूतकाळ हरवून जातो....
त्यादिवशी निखिल आरोही च्या बाबांकडे आलेला असतो....
निखिल च त्यांच्या वरच्या शंकेमुळे नाईलाजास्तव त्यांना निखिल ला सगळ खर सांगाव लागत.....
वासुदेव ( आरोही चे बाबा ) " ही दहा वर्षे अगोदरची गोष्ट आहे... तेव्हा आरोही दहा वर्षाची होती , आम्ही खूप सुखी कुटुंब होतो... मी आरोही ला प्रेम दाखवत नसलो तरी मला तिच्या प्रती काळजी आणि प्रेम खूप होत.... मी विश्वास शिंदे वी.एस इंडस्ट्री चे मालक यांच्या कंपनी मध्ये कामाला होतो... यांची कंपनी टॉप सिक्स मध्ये होती... कंपनी छान चालू होती , आम्ही मन लावून काम करत होतो... आमच्या कामाचा मोबदला पण छान मिळायचा...
असच छान चालू असताना अचानक विश्वनाथ राव आले , त्यांनी विश्वास सरांना गोड गोड बोलून आपल्याकडे वळवून घेतले... त्यांनी तुमच्या कंपनी ला फायदा होईल , तुमची कंपनी टॉप टू मध्ये येईल अस गोड गोड बोलून त्यांना गुंडाळून घेतले.... आणि विश्वनाथ रावांच्या अश्या गोड बोलण्याने विश्वास सर त्यांच्यात फसले.... विश्वास सर विश्वनाथ जस सांगायचे तस ते करायचे , आणि याचाच फायदा घेऊन विश्वनाथ यांनी त्यांच्या पाठी काळा धंदा सुरू केला त्यात ड्रग्स वैगरे असे लपून ते विकायचे , त्यांना हेच पाहिजे होत म्हणजे त्याच माल विकला जाईल आणि कोणावर शंका पण नाही येणार......
असच हे एक वर्ष चालू होत ते खूप खुश होते विश्वनाथ यांना खूपच फायदा होत होता प्रत्येक आठवड्याला त्याला डबल नफा होत होता.... पण विश्वास यांना हे प्रत्येक आठवड्याला डबल नफा होणे खटकत होत.... म्हणून त्यांनी यापाठी काय कारण आहे हे शोधण्याचा निर्णय घेतला.... एक दिवस योगायोग म्हणजे हे सगळ सत्य विश्वास सरांना समजल....
विश्वनाथ जेव्हा विश्वास सर कंपनी मध्ये नसतात तेव्हा हे उद्योग लपून लपून करत होते.... त्यामुळे विश्वास सर यांना शंका येणं काही पर्याय नव्हता... पण विश्वास सरांना खटकलच , माणूस वाईट गोष्ट कितीही लपवण्याचा प्रयत्न करत असला तरीही सत्य समोर येत.... आणि झाल तसच एक दिवस विश्वनाथ विश्वास सर कंपनी मध्ये नसताना त्यांनी काही माल त्याच्या माला मध्ये मिसळून ते कुठे तरी पाठवण्याची तयारी करत होते.... आणि इथे विश्वास सरांना काही पेपर वर साईन पाहिजे होती म्हणून त्यांना ऑफिस मध्ये त्यांच्या सेक्रेटरी ने बोलावलं होत.... विश्वास सर आपल्या फॅमिली सोबत कुठे तरी जात होते पण मध्येच काम निघाल म्हणून त्यांनी विचार केला की जाता जाता काय काम आहे ते पूर्ण करू , साईन करण्याच पाच मिनिट काम होत त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांना कार मध्येच वेट करायला सांगून ते ऑफिस मध्ये आले......
विश्वास सर आपल्या कॅबिन मध्ये जात असताना त्यांच्या कानावर काही आवाज पडले , त्यांना स्पष्ट ऐकु येत नव्हते म्हणून ते थोड पुढे आले तर त्यांना ते आवाज स्पष्ट ऐकु येत होते.... आणि ते ज्यांनी जे ऐकल त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता... विश्वनाथ आपल्या माला विषयी काही लोकांसोबत डिस्कस करत होते..... तेच ऐकुन विश्वास सरांना विश्वास बसत नव्हता , आणि त्यांनी लगेच रागात त्यांना जाब विचारला... पण विश्वनाथ ला कसलीच भीती वाटली नाही आणि त्यांनी सगळ खर सांगितल.... विश्वनाथ नी खर सांगितल्यावर विश्वास सरांनी पोलिस कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला , आणि ते पोलिस कंप्लीट करणार त्या अगोदरच त्यांनी विश्वास सरांचा बळी घेतला , विश्वास अजुन आले नाहीत म्हणून त्यांची पत्नी आणि मुले त्यांना बघायला आत आले होते.... पण इथेच त्यांचं चुकल त्यांनी सगळ दृश्य बघितल होत आणि त्यातच त्यांचा पण बळी घेण्यात आला.....
आणि मी तिथे असून पण त्यांना वाचवू शकलो नाही.... विश्वास सरांच्या दुसऱ्या मुलाला त्यांनी डोक्याच्या मधोमध गोळी घातली हे बघून मला राहवलं गेलं नाही म्हणून मी जोरात ओरडलो.... मग मी ओरडल्याने त्यांच लक्ष माझ्याकडे गेल , त्यांनी मला पकडायचा आत मी तिथून पळालो आणि मी वाचलो..... पण...."
एवढ सगळ सांगून त्यांचा घसा कोरडा पडला त्यामुळे त्यांनी तिथे टेबलवर असलेल पाणी पिऊन घेतल...
पाणी पिऊन झाल्यावर ते थोड गप्प बसले....
थोड्या वेळाने निखिल " मग काय झाल...."
वासुदेव " मग मी वाचलो पण त्या विश्वनाथ ने मी फोन खिशात ठेवताना बघितल त्यांना शंका आलेली की मी काही तरी रेकॉर्ड केलं आहे मोबाईल मध्ये आणि त्यांची शंका खरी ठरली.... ते माझ्या मागे लागले होते माझ्या मोबाईल मध्ये प्रूफ नष्ट करण्यासाठी , पण मी ते प्रुफ अश्या जागी लपवले होते , जिथे कोणी येणार पण नाही आणि शोधू पण नाही शकणार.... ते मला धमक्या देत होते जर प्रूफ नाही दिले तर माझ्या फॅमिली ला एक एक करून मारेल... पण मी घाबरलो नाही त्यांना प्रूफ द्यायचा नकार दिला सरळ.... मी ऐकत नाही म्हणून त्यांनी माझी पत्नी शलाका आरोही च्या आईला त्रास देऊ लागले कधी छोटासा ॲक्सिडन्ट करून भीती दाखवायचे.... याच भीतीने मला आरोही ला वेगळ कराव लागल , मला समजल होत की आरोही आणि रक्षित ने एकमेकांना प्रेमाची कबुली दिली आहे... पण आरोही ला यातल काहीच माहिती नव्हत ती यात फसली होती , मला माझ्या मुलीला यात फसवायच नाही खूप प्रयत्न केले पण शेवटी ती फसली... रक्षित पण त्याच्या वडिलांसारखा होता त्यांना मदत करत होता त्यांच्या काळया धंद्यात... रक्षित त्याचे वडील जसे सांगायचे तसा तो करायचा... त्यांनी रक्षित ला आरोही ला त्याच्या प्रेमात पाडायला सांगितलं आणि झाल तसचं आरोही त्याच्या प्रेमात पडली त्याच्या गोड बोलण्याने , डोळे झाकून विश्वास ठेवला त्याच्यावर आणि रक्षित तो तिच्याकडून आपल काम करून घ्यायचा गोड बोलून.... मी खूप प्रयत्न केले आरोही ला समजवण्याचा पण ती माझा तिरस्कार करत होती म्हणून तिने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पण माझी आरु जेवढ माझं तिरस्कार करत होती तेवढच तिच्या डोळ्यात माझ्या प्रती प्रेम दिसत होते....
एक दिवस तिला रक्षित च रूप कळल नकळत तिने स्वतः च्या डोळ्यांनी त्याला आणि त्याच्या वडिलांना माल विकताना बघितल आणि तिथेच ती तुटून गेली.... त्यांना समजल की आरोही ला माहीत पडल आहे , त्यामुळे त्यांनी आरोही ला त्रास द्यायला सुरुवात केली , पण आरु प्रत्येक वेळी वाचत आली , मी पण काही करू शकत नव्हतो केलं तरी माझ्या फॅमिली चा जीव धोक्यात होता.... तिने खर प्रेम केल होत त्याच्यावर आणि त्याच खऱ्या प्रेमाने विश्वासघात केला... ती एकटी पडली होती , मी पण काही करू शकत नव्हतो तिला वेगळं ठेवायच होत....
तिला घरात काही किंमत नाही म्हणून तिने घर सोडून दिलं पण इथेच माझं चुकल मी वेगळं ठेवत होतो पण मला ती नजरेसमोर हवी होती म्हणून मी तिला कुठेच जाऊ दिले नाही कारण तिचा जीव धोक्यात होता... आणि तिने चुकीचा अर्थ काढला या गोष्टीचा आणि ती घर सोडून गेली .... नंतर मी खूप शोधलं तिला शेवटी ती भेटली , पण हे विश्वनाथ आणि रक्षित ला माहीत नव्हत की आरु कुठे आहे त्यामुळे मी थोड रिलॅक्स होतो पण लक्ष ठेवण ही गरजेच होत... मी नकळतपणे तिच्या वर लक्ष ठेवत....
लक्ष ठेवत असताना मला समजल की रक्षित आरोही कुठे आहे याची माहिती मिळाली आहे , आणि माझी भीती दुप्पट झालेली.... मी भीतीपोटी खूप विनंत्या केल्या होत्या त्याला की तिला काही करू नका पण त्यांनी काही ऐकलं नाही.... जेव्हा रक्षित तिच्या आसपास असायच्या तेव्हा तो तिला भेटेल त्या अगोदरच मी आरु कडे हजर व्हायचो आणि तिच्या शी तुटक बोलून निघून जायचो , जेणेकरून ती लगेच तिथून निघून जाईल.....
एक दिवस आरोही ला भेटायला बोलावल होत , आणि आरोही तयार झाली भेटायला... पण मला विश्वास बसत नव्हता की ज्या मुलाने विश्वासघात केला आहे त्याला भेटायला तयार झाली... मी काळजीपोटी तिला काही होऊ नये म्हणून मी पण त्या जागी गेलो जिथे आरु ला भेटायला बोलावल होत....
बट आय एम प्राऊड ऑफ आरु ने न घाबरता त्याचा सामना केला मग निश्चित झालो.... आरु स्वतःच रक्षण करू शकते....
नंतर समजल की तू पण तिची काळजी घेत आहे तिच्या नकळत बॉडीगार्ड ठेवले आहेत , मग माझं टेन्शन दूर झाल.... एका वडिलांना अजुन काय हवं असत बस त्याची मुलगी सेफ आहे....
पण एक दिवस समजल की ते तुझ्या पण मागे ते लागले आहेत... त्यांच्या मोठ्या मुलाचा बदला घेण्यासाठी मग काय काळजी च्या जागी भीती निर्माण झाली.... त्यांना आरोही तुला ओळखते हे समजल तर ते तुला आणि आरु ला खूप त्रास देईल म्हणून मी तुम्हाला वेगळं करण्यासाठी अस तुटक बोललो...."
थोड्या वेळ शांत होऊन वासुदेव परत बोलू लागले " मला माहित आहे तू तिच्या वर प्रेम करायला लागला आहेस.... आणि तिच्या पण डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम दिसत होत.... कारण मी तुझ्या बद्दल बोललेल तिला सहन झाल नव्हत म्हणून ती विनवण्या करत होती पण मी समजून न समजल्या सारख नाटक करत होतो.... मला खूपच वाईट वाटत होत काहीच करू शकत नव्हतो म्हणून माझ्या डोळ्यात पाणी जमा झाले...."
त्यांनी जे बोलल ते ऐकुन निखिल च्या पण डोळ्यात पाणी जमा झाले होते पण त्याने ते मुश्किलीने ते अडवले.....
निखिल वासुदेव च्या हातावर हात ठेवून " काका मी वचन देतो आरोही ला काहीच होऊ देणार नाही.... ती सेफ राहील याची जबाबदारी माझी...."
इतक बोलून त्यांचा निरोप घेऊन निखिल तेथून निघून गेला.....
वर्तमानकाळ............
निखिल अजूनही मनात " मी वचन दिलं होत की आरोही ला सेफ ठेवेन... मला स्वतःचाच राग येत आहे का ? का ? तिला शोधू शकलो नाही त्यादिवशी...."
निखिल ला खूप च राग येत होता स्वतःचा रागाने त्याच्या मुठी आवळल्या होत्या....
मोबाईल च्या रिंग ने त्याची तंद्री तुटली....
त्याने स्वतः ला शांत करून फोन रिसिव्ह करून बोलू लागला......
इथे आरोही आणि रिया आहे त्या घरात...........
एक हट्टी कट्टी बाई रागातच दरवाजा उघडून आत आली आणि सगळ्यांना रागाने घुरत होती....
ती रागात काही बोलण्यासाठी तोंड उघडणार त्याअगोदर च तिच्या गालावर कोणी तरी एकदम जोरात कानाखाली मारली.....
क्रमशः
©® भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी.....
🥰 Stay happy 🥰
😍 Take care 😍