Datla's suspicion was terrible ... 18 in Marathi Women Focused by Bhagyashree Parab books and stories PDF | दाटला हा संशय भीषण होता... १८

दाटला हा संशय भीषण होता... १८

आध्या सुशीला आजीला घट्ट मिठी मारून रडत होती आणि आजी तिला शांत करत होत्या....


सुशीला आजी " बाळा रडू नको अशी रडताना छान नाही वाटत तू...तुला काहीही अडचण असेल तर मला बिंदास्त सांग माहीत आहे की आता फोन वर नाही बोलू शकत पण पल्लवी ला सांग मग ती मला सांगेल..."


आध्या स्वताला शांत करत " हो..."


सुशीला आजी " शहाणं माझं बाळ ते.... आणि ( त्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तीला बघत...) हा माझा नातू शिव..."


पल्लवी " अरे शिव तू... आजी आम्ही तिघ तर एकाच वर्गात शिकतो आम्हाला माहीत नव्हत की तुम्ही याच्या आजी आहात..."


सुशीला आजी " अरे वा मग तर चांगलच आहे... "


आध्या आणि पल्लवी ला बघून शिव चे हावभाव बदलेले होते , पण लगेच त्याने नॉर्मल होत छोट हास्य चेहऱ्यावर ठेवत त्यांचं बोलणं ऐकू लागला..... पण आजीने त्याच्या चेहऱ्यावरच्या हालचाली बरोबर ओळखल्या होत्या आणि त्या गोड हसल्या....आध्या , पल्लवी आणि सुशीला आजी त्या थोड बोलून निघून कारण आध्या च्या येण्याचा वेळ झाला होता...

सुशीला आजी " बाळा काळजी घे येते मी..."


आध्या " हो..."आध्या चा निरोप घेऊन सगळे आपापल्या वाटेला निघून गेले....

आध्या पण निघून गेली....

त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला....


एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला " अरे वा आजचा दिवस छान आहे , चांगलाच पुरावा हाती लागला आहे... बस आता योग्य वेळेची वाट बघायची आहे , मग खूपच मज्जा येणार आहे लाईव्ह शो बघायला...."


दुसरी व्यक्ती " हो खूपच मज्जा येणार आहे , तुम्ही आता बघाच मी आणखी काय करते ते.... हा..हा..हा.."शिव आणि सुशीला आजी त्यांच्या कार मधून घरी जात होते , शिव विचारात हरवला होता...


त्याच्या आजीला समजत होत तो कोणत्यातरी विचारत आहे , पण तो स्वतः सांगेल म्हणून गप्प बसल्या कारण त्यांना त्याच्यावर जबरदस्ती करायची नव्हती....


( चला शिव ची आणि त्याच्या कुटूंबाची ओळख करून देते....
शिव राणे आध्या च्याच वयाचा आणि तिच्याच वर्गातला , आध्या चा स्वभाव म्हणून त्यांची एकमेकांना ओळख नव्हती.... शिव श्रीमंत असला तरी तो नॉर्मल मुलानं सारखा राहायचा त्याला असा दिखावा आवडत नसे , आणि त्याला असे दिखावा करणारी माणस ही आवडत नसे... शिव लहान असला तरी तो मोठ्या माणसासारखा समजूतदार होता , कधी कोणा मोठ्यांना उलट उत्तर देत नसे आणि जर कोणाची चुक असली तर तो त्यांच्या चुका समजावून सांगायचा , पण जर एखादी गोष्ट लिमिट च्या बाहेर गेली की त्याला सहन होत नसे....
शिव चे वडील यश राणे एक जगातील टॉप फर्स्ट वर बिसनेस मन आहे....
आई तृप्ती राणे गृहिणी , आणि त्यासोबत त्या कोणतीही लाज न बाळगता शिवणकाम चा एक बिसनेस करायच्या...
यश चे आई वडील म्हणजेच शिव चे आजी , आजोबा यांच्या सोबत च राहायचे... यांना एकच मुलगा आहे ते म्हणजे यश....
सुशीला आजी ना तर भेटलोच आहे...
शिव चे आजोबा वासुदेव राणे....
सो ही फॅमिली एकत्र राहत , एकत्र जेवत , एकत्र मज्जा मस्ती करत... कधी यांच्यात वादविवाद होत नसे , झाला तरी समजून घेऊन परत एकत्र येत...)


असेच दिवस जात होते. पल्लवी आणि आध्या अजूनही बुक पत्र लिहून एकमेकांशी बोलत होत्या , आध्या सुशीला आजी ची भेटाव वाटत असेल तर ती पल्लवी ला सांगायची आणि पल्लवी सुशीला आजींना फोन करून आध्या चा निरोप सांगायची मग सुशीला आजी तिला भेटायला यायच्या...

दिवस जात होते पण विश्वास चा स्वभाव अजुन तसाच होता... आध्या ला वाटायचं मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागत आहे तर बाबा आता माझ्याशी नीट बोलतील , पण बोलायचं सोडा ते तिच्या नजरेला नजर पण देत नव्हते , ते तिचा चेहराच बघत नसे.... त्यांचं अस वागणं बघुन आध्या ला खूपच वाईट वाटत असे , ती रोज रात्री रडत होती... आध्या आता एकटी राहू लागली होती तिला एकट राहण्याची सवय झालेली , ती आता दाराला कडी लावून झोपत होती... आध्या एकटी राहायला लागली हे बघून कल्पना ला बर वाटल पण विश्वास च असे तिच्यासोबत वागणे बघून राग तर यायचा पण त्या काहीच करू शकत नव्हत्या... कारण जर त्या आध्या साठी पुढे आल्या तर नाव त्यांना नाही आध्या ला ठेवलं असत , की हिच्या मुळे हे सर्व झाल म्हणून....

बघता बघता आध्या आता अकरावीला आली ती जरी दुःखी असली तरी ती कधी अभ्यासावर परिणाम होऊ देत नव्हती प्रत्येक क्लास मध्ये टॉप होती दहावीत पण तिने टॉप केलं आणि आता ती अकरावीला कॉमर्स हा विषय घेतला.... ती आता कॉलेज ला जाणार म्हणून विश्वास ना आणखी टेन्शन आल होत , कारण ती आता मोठी झाली होती तरुण वयात आलेली....


आध्या च चांगल झाल कारण आत्या आता स्वतः बोलत होत्या की हिला आता घ्यायला येणं जमणार नाही , त्यामुळे विश्वास ना नाईलाजाने त्यांच्या बहिणीच ऐकावं लागल कारण त्यांना ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि जबरदस्ती ही करू शकत नव्हते....
आत्या घ्यायला येत नसली तरी त्यांनी तिच्यासाठी एक नियम ठेवला होता की बरोबर या वेळेत घरी यावं त्यासाठी गीता आजी ला लक्ष ठेवायला सांगितल होत....आत्या नाही म्हणून आध्या आणि पल्लवी आता सोबत येऊ शकत होत्या , कोणाला समजणार नाही याची काळजी घेत होत्या पण यांना कोण सांगणार की तुमची हीच एका चुकीमुळे पुढे जाऊन खूपच भयानक घडणार होत....

या दोघी आज कॉलेज सुटल्यावर घरी जात होते त्यांचं शाळा आणि कॉलेज एकच होत म्हणून रस्ता तोच लागत होता घरी जाण्याचा...

पल्लवी तिचा निरोप घेऊन आपल्या घराच्या रस्त्याने जातच होती की आध्या ने तिला हात पकडुन अडवल....

आध्या " पल्ली..."


पल्लवी थांबून तिच्याकडे बघत " काय झाल आध्या थांबवलं कशाला काही झाल आहे का...."


आध्या एका दिशेला बोट दाखवत " हो... ते बघ तिकडे...."


पल्लवी तिने बोट दाखवलं त्या दिशेला बघत " काय आहे तिथे... ( पल्लवी ने बघितल तर तिथे एक मुलगा एका मुलीला छेडत होता... तर इथे पल्लवी चा राग सातव्या अस्मानात पोहोचला होता....) याची हिम्मत कशी झाली मुलीला हात लावायची...."


आध्या तिथेच बघत " तो तोच आहे ज्याने माझं जगणं कठीण केलं होत , याच्या मुळे बाबा अविश्वास दाखवायला लागले होते... हा तोच आहे ज्यादिवशी...."


आध्या बोलली तस पल्लवी चा राग आणखी वाढत चालला होता , का नाही येणार राग ज्याच्या मुळे तिच्या जिवलग मैत्रिणीला इतकं सहन करावं लागलं होत हेच नाही ज्याच्यामुळे त्यांची मैत्री वर तिच्या बाबांनी अविश्वास दाखवला होता वेगळी होणार होती यांची मैत्री मग राग तर येणारच ना....


पल्लवी " आता या मुलाचं काही खर नाही माझ्या हातून कोणीच वाचवू शकणार नाही याला कोणीच नाही , असा धडा शिकवेल ना विचार करशील मी जन्माला का आलो ते... चल आध्या याचा पाऊण उतार करूया...."


आध्या " हो... मला पण बदला घ्यायचा आहे अशी कशी सोडू मी...."


या दोघी त्यांच्याकडे निघून गेल्या... आणि त्या मुलीला बाजूला करून त्याच्या समोर उभ्या राहिल्या....क्रमशः

©® भाग्यश्री परब

यात काही चूक असल्यास माफी असावी....

Rate & Review

Bramha Sutar

Bramha Sutar 11 months ago