या दोघी समोर येऊन उभ्या आणि त्याला डिस्टर्ब केलं त्यामुळे त्याला खूपच राग आला होता....
तो रागात काही बोलणार तेवढ्यात आध्या मध्ये बोलली " अरे थांब मला ओळखल नाही का , मी कधीपासून वाट बघत होती पण तू आलाच नाही खूप वाट बघितली...त्यादिवशी बोलला होतास की उद्या भेटू मी आलेले पण तू आलाच नाही , मी तर रोज यायचे पण तू दिसायचा च नाही... "
तिच्या बोलण्याने तो मुलगा पिघळला होता...
तो प्रेमळ आवाजात " सॉरी तुला माझी वाट बघावी मला माहितीच नव्हत तू माझी वाट बघत होती ते , काय आहे ना मी अभ्यासात खूप बिझी होतो ना... ( आध्या मनात : तू आणि अभ्यास चेहऱ्यावरून वाटत नाही , मुलींना त्रास देण्यात बिझी होता अस बोल ना किती ते खोटं....) मग आता भेटलो आहोत तर चल एन्जॉय करू मस्त पैकी फिरू..."
त्याने पुढे येऊन आध्या चा हात पकडला आणि पल्लवी कडे बघून " ह... हिला पण घेऊन जाणार जायचं का आपल्याला , पण ही आली तर डिस्टर्ब होईल ना काय आहे ना दोघात तिसरा नको.... तू जाऊ शकते मी हवं तर रिक्षा करून देतो आणि पैसे पण देतो रिक्ष्याचे हा...."
आध्या त्याला हसत च " हो चालेल ना..." अस बोलते , पण काही क्षणात तिच्या चेहऱ्यावर रागीट भाव निर्माण होतात...
त्याने मनगटावर पकडल्याने तिने तिच्या हाताचा पंजा दुमडून त्याचा मनगट पकडला आणि नसेवर जोरात दाबला ज्याने तो एकदम कळवळून तिचा हात झटकन सोडून दिला...
तो आपला एक हात दुःखर्या हातावर ठेवत रागाने तिला " आर यू मॅड , तुझी हिम्मत कशी झाली..."
तो पुढे येऊन तिच्यावर हात उगारणार तर पल्लवी ने मध्येच येऊन त्याच्या थोबाडीत अस जोरात मारल की तो जमिनीवर जाऊन पडला....
त्याच्या कानाखाली बसली म्हणून तो आणखी रागात आलेला , तो रागात च त्यांच्या अंगावर धाऊन येणार त्याअगोदर च या दोघी सावधान झाल्या आणि तो जवळ आल्यावर लाथेने दोन्ही गुडघ्यांवर जोरात मारल ज्याने तो परत खाली पडला... मग तो कसतरी उठून उभा राहिला कारण त्याला इतकं जोरात लागल होत की सहनच झालं नाही हळू हळू उठून तो परत त्या दोघींच्या समोर आला...
आध्या ने परत त्याच्या दुसऱ्या गालावर मारल आणि रागातच त्याला " तुझ्यामुळे... तुझ्यामुळे बाबांनी माझ्यावर अविश्वास दाखवला..."
अजुन एक मारत आध्या " हे मला त्रास दिल्याबद्दल..."
परत एक मारत " हे बाबांना गैरसमज करून दिल्याबदद्ल..."
परत एक मारत " हे बाकीच्या मुलींना मानसिक त्रास देवून तिच्या मनाशी खेळलं त्याबद्दल...."
परत एक मारत " आणि हे माझ्या मैत्रिणीला उलट बोलल्याबद्दल..."
त्याला चार कानाखाली भेटल्याने त्याच्या गालावर चांगलेच बोटांचे ठसे उमटलेले होते , ओठातून थोड रक्त येत होत , गाल एकदम लाल झालेला....
पुढे तमाशा होऊ नये म्हणून त्या मुलाच्या मित्रांनी त्याला उचलून घेऊन तिथून पळून गेले....
त्यांना अस पळून जाताना बघून पल्लवी हसत मागून ओरडत त्यांना " अरे थांबा अजुन पूर्ण नाही झाल बाकी आहे , कुठे पळत आहात..."
तोपर्यंत ते नाहीसे झाले...
पल्लवी ते निघून गेल्या नंतर आध्या कडे बघून खळखळून हसत " गेले बघ ते तुला घाबरून , हम तुझ्यापासून जरा सावध राहायला हवं नाही तर कधी रक्षसीन बाहेर येईल सांगता येणार नाही..."
आध्या लटक्या रागात तिला " काय मी रक्षसीन थांब तू..."
आध्या पल्लवी ला मारायला जाणार तोपर्यंत पल्लवी तिथून निसटली होती...
थोड्या अंतरावर या दोघी पळून थकल्याने त्या थांबल्या...
पल्लवी " आध्या मानल पाहिजे हा त्याचा चेहरा तर पूर्ण लाल झालेला आणि टॅटू पण मस्त दिसत होता त्याच्या गालावर त्याला काढायची गरज नाही टॅटू आणि त्याचे पैसे पण वाचले...."
आध्या हसत " हो बरोबर बोललीस तू..."
तिथेच काही अंतरावर एक व्यक्ती स्वतःशीच हसत च " वा माझी शेरणी , आय एम प्राउड ऑफ यू.... "
आणि त्याच ठिकाणी दुसरीकडे दोन व्यक्ती आपापसात बोलत होते....
पहिली व्यक्ती मोबाईल मध्ये एक व्हिडिओ बघत " अरे वा आज चांगलाच हिरा हाती लागला आहे , आता वेळ आली आहे प्लॅन वर्क करण्याची , खूप वर्ष या दिवसाची वाट बघत होते ( दुसऱ्या व्यक्तीकडे बघत ) तुला माहीत आहे ना काय करायचं...."
दुसरी व्यक्ती कुस्तीत हसत " हो माहीत आहे काय करायचं ते , अरे एक आठवलं तुला त्यांना कॉल करायचा आहे ना ते बोलले होते प्लॅन वर्क जेव्हा कराल तेव्हा कॉल करा..."
पहिली व्यक्ती " हो लक्षात आहे मस्त पैकी..."
पहिली व्यक्ती ने एका व्यक्तीला फोन केला आणि ते काही तरी बोलून फोन ठेऊन दिला...
पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला " चल कामाला लाग , आजच झाल पाहिजे सगळ...आता येईल खरी मज्जा..."
दुसरी व्यक्ती " हो चल..."
ते दोन व्यक्ती आपापसात बोलून निघून गेले...
इथे आध्या पल्लवी ला घड्याळ बघून " अरे चल मी जाते खूप लेट होईल , मग बाबा चिडतील...."
पल्लवी " हो जा लवकर भेटू उद्या..."
आध्या " हो..."
या दोघी एकमेकींचा निरोप घेऊन आपल्या घराचा रस्ता पकडला....
थोड्यावेळाने आध्या घरी पोहोचली आणि फ्रेश , जेवण वैगरे करून अभ्यासाला बसली....
काही वेळाने अचानकच जोरात दरवाजा आपटण्याचा आवाज आला , त्याने अभ्यास करत असलेली आध्या दचकली... आणि लगेच ती रूम च्या बाहेर आली....
आपटण्याच्या आवाजाने घरातले सगळेच जमले , ते बघतात तर विश्वास खूपच रागात सोफ्यावर बसले होते....
आध्या चाचरत " बाबा काय झाल ?..."
आध्या ने असा प्रश्न विचारल्याने विश्वास ना आणखी राग आला आणि ते रागातच " मला विचारत आहेस काय जस काय तुला काही माहीतच नाही हो ना... ( तिला फोन मध्ये एक व्हिडिओ दाखवत...) हे बघ हे इतकं मोठं पराक्रम केलं आहेस की ते माफी च्या लायक नाही...."
आध्या तो व्हिडिओ बघते आणि ते बघून शॉक होते...
व्हिडिओ मध्ये पल्लवी , आजी आणि शिव होता त्यांच्याशी बोलताना चा , दुसर आज त्या मुलासोबत हसून बोलताना चा व्हिडिओ होता पण ते अर्ध होता अस वाटत
होत , त्यात तो मुलगा आध्या चा हात पकडुन हसत तिच्याशी बोलत होता आणि आध्या पण हसत त्याच्याशी बोलत होती.... त्यातले अर्धे पार्ट डिलीट करून एडिट केले होते...
आध्या तो व्हिडिओ बघून लगेच विश्वास ना " बाबा हे... हे... खोट आहे , एडिट केला आहे हा व्हिडिओ आणि तो मुलगा त्रास देत होता तर त्याला धडा शिकविण्यासाठी आम्ही नाटक केलं होत नंतर त्याला त्याची शिक्षा पण दिली होती.... बाबा विश्वास ठेवा माझं त्याच्याशी कोणताही संबंध नाही..."
विश्वास " स्वताला वाचवण्यासाठी अश्या खालच्या पातळीवर जाशील वाटल नव्हत , आणखी किती खोट बोलणार आहेस... तू माझी मुलगी आहेस यावरच शंका येतेय..."
गीता आजी " बघ मी बोलत होते तुला विश्वास या मुलीवर लक्ष ठेवत , पण नाही या महाताऱ्या आई कोण ऐकतेय... तू नसताना हिने काय काय केलं होतं..."
विश्वास " आई काय केलं होत सांग मी नसताना..."
गीता आजी " नको बाबा मी सांगितलं तर ही आणखी काही तरी करेल , मला मारल वैगरे तर..."
विश्वास जोरात ओरडतच " आई लवकर सांग मी नसताना हिने काय काय केलं ...."
विश्वास च्या ओरडण्याने आजूबाजूचे पण जमा झाले होते आणि गप्प पणे समोर चाललेला तमाशा बघत होते , कारण दरवाजा अर्धा उघडाच होता ना...
गीता आजी " तू बोलत आहेस तर सांगते , ही तू नसताना धमक्या देत असायची की तुम्ही खूप मोठी चूक केली आहे , तुमच्या मुळे मला अशी शिक्षा भेटली आहे याची किंमत मोजावी लागेल सोडणार नाही मी तुम्हाला... अस बोलत असायची रोज , मी म्हातारी काय करणार दुसर काही दिसत नव्हत म्हणून सहन करून घेतलं...."
आत्या " हो आई बरोबर बोलत आहे विश्वास मला पण अशीच धमकी देत असायची जेव्हा मी हिला शाळेतून घेऊन यायचे तेव्हा म्हणून मी बोलले होते की मला जमणार नाही म्हणून ते हिच्या धमकीला घाबरून..."
हे बोलत असताना च वंदना ( शेजारीण ) मध्येच थोड्या मोठ्याने यांना ऐकू जाईल अशा आवाजात " अरे बापरे मला विश्वास च बसत नाही आध्या अशी निघाली , काय हो विश्वास भाऊ , कल्पना वहिनी हिला संस्कार द्यायला विसरलात का... आता अस सोडून दिलं तर पुढे माहीत नाही काय काय बघायला भेटेल ते , एक काम करा लग्न लाऊन द्या हीच म्हणजे सुधारेल ही मुलगी आणि ही इथे राहिली तर या सोटायटीतल्या मुली पण हिच्या सारख्या वागतील ( त्यांच्या सोबत असलेले बाकीच्यांना बघत ) हो ना..."
वंदना च ऐकुन बाकीचे पण त्यांच्यात हो ला हो मिळवत होते...
या सगळ्यांचं ऐकुन विश्वास आध्या ला रागात " आणखी काही ठेवलं आहे का बोलायचं , आता हे लोक बोलत आहे तसचं होईल तुझ लग्न म्हणजे थोडी तरी अक्कल येईल..."
इतक्या वेळ शांत बसलेली आध्या अचानक खेकसली...
आध्या ला या लोकांचा बोलण्याचा , आत्या आणि आजीचा खूपच राग आलेला आणि ती रागात ओरडून "बास आता खूप झालं बोलून आणि खूप ऐकुन घेतल पुढे एक शब्द पण नकोय , बाबा तुम्ही खूप मोठी चूक करत आहात अविश्वास दाखवून याचा परिणाम पुढे खूपच वाईट होईल.... मी किती तळमळत होते एका वडिलांच्या प्रेमासाठी पण तुम्ही तर.... ( दारात उभ्या असलेल्या सगळ्यांना बघत...) तुम्हा लोकांना फक्त तमाशा बघायला आवडत हो ना , तुम्हाला मी इकडे राहिले तर त्रास होईल हो ना त्यापेक्षा मी इथून निघून जाते खूप दूर...."
एवढ बोलून आध्या रागात आपल्या रूम मध्ये निघून गेली आणि जोरात दरवाजा बंद केला....
ती गेलेली बघून कल्पना विश्वास ना " आज मी एक आई म्हणून सांगते तुम्ही एक वडील म्हणून एका मुलीला समजून घेण्यास खूप मोठी चूक केली आहे , तुम्हाला खरच वाटत का की आध्या अस काही करेल बोला तुमच्या मुळे फक्त तुमच्यामुळे तिला आपल्या जवळच्या मैत्रिणी ला अस लपून भेटाव लागत फक्त तुमच्या मुळे एकदा विश्वास ठेवला असता तर तुम्हाला तिच्याबद्दल असलेले सगळे गैरसमज निघून गेले असते , पण तुम्ही काय केलं तिच्या वर अविश्वास ठेवला नको ते आरोप केले जे की त्यात तिची कोणतीही चूक नाही... अहो तिने काय चूक केली आहे ती जन्माला आली हीच चूक होती का , तुम्हाला मुलगी नको होती का जे तुम्ही असे वागत होता , बोला... काय चूक होती तिची... "
कल्पना च्या बोलण्यावर विश्वास ना काय बोलावं तेच समजत नव्हत....
विश्वास ना अस गप्प राहिलेले बघून कल्पना च बोलली " काय झाल नाही आहे ना उत्तर कसं असेल..."
इतकं बोलून त्याही आपल्या रूम मध्ये निघून गेल्या...
कल्पना गेलेल्या बघून गीता आजी विश्वास ना " जाऊ दे त्यांचं मनावर नको घेऊ या दोघी तुला आपल्या तालावर नाचवत आहे , कदाचित या दोघींच्या डोक्यात काही तरी खुळ चालू आहे , मगाशी लग्नाचं बोलत होते तोच एक चांगला उपाय आहे..."
आत्या " हो , माझ्या ओळखीचे आहेत काही जण बोलावून घेते मी हवं तर..."
विश्वास काही उत्तर न देता आपल्या रूम मध्ये निघून गेले....
विश्वास निघून गेलेले बघून गीता आजी आणि आत्या एकमेकींकडे बघून हसत होते....
संध्याकाळी कल्पना चहा साठी आध्या च्या रूम जवळ आल्या , त्यांना दरवाजा उघडलेला दिसला म्हणून त्या लगेच आत शिरल्या , त्यांना भीती होती की तिने काही उलटसुलट वैगरे केलं असेल....
कल्पना आध्या ला आवाज देत होत्या पण तिच्या कडून काही प्रतिसाद येत नव्हता , त्यांनी तिची सगळी रूम पालथी घातली तरी ती कुठेच नव्हती... बाहेर असण्याचा प्रश्नच नव्हता कारण त्या बाहेरच होत्या काम करत ती बाहेर असती तर त्यांना ती दिसली असती....
आध्या भेटत नाही म्हणून त्या सैरभैर झाल्या...
कल्पना अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असताना अचानक त्यांचं लक्ष एके ठिकाणी गेलं तिथे टेबलवर एक पेपर फडफडत होत , त्यांनी पटकन जाऊन तो पेपर उचलला आणि वाचायला लागल्या...
त्यांनी पेपर वाचलं तस त्या मटकन खाली बसल्या आणि जोरात ओरडल्या " नाही..."
त्यांचा आवाज ऐकुन घरातले सगळे आध्या च्या रूम मध्ये आले... आणि बघतात तर कल्पना एकटक त्या पेपरला बघत होती....
विश्वास नी पुढे येऊन कल्पना च्या हातातून तो पेपर घेतला आणि वाचू लागले....
प्रिय आई , बाबा
आई तू माझ्या सोबत प्रत्येक वेळी माझ्या सोबत होतीस , बाबांनी काही उलट सुलट बोललं तर तूच माझी समजूत काढायची त्यांचं किती प्रेम आहे ते सांगायची तेही तुला माहित होत की चुकीचं वागत असताना कारण मी त्यांचा तिरस्कार करू नये म्हणून , आई बाबा कसेही वागले तरी मी त्यांचा कधीच तिरस्कार नाही केला आणि करणार पण नाही...
मला बाबांकडून एकच अपेक्षा होती की त्यांनी माझ्यावर एकदा विश्वास ठेवावा म्हणून मी ते बोलत होते तसेच राहत होते मला वाटायचं की मी आता त्यांचं ऐकतेय तर ते ठेवतील विश्वास , पण काहीच नाही झाल.... उलट ते आणखी तिरस्कार करू लागले माझा....
आज जे झाल त्यावरून मी हा निर्णय घेतला आहे की तुमच्या पासून खूप दूर निघून जावं , आता बाबांना अजिबात त्रास होणार नाही माझा मी परत कधीच इथे फिरकणार नाही , तोंडही नाही दाखवणार....
मला माहिती मी गेल्यावर लोक बोलतील उलट सुलट पण मी लोकांचा विचार नाही करत ते तर काहीही बोलत असतात त्यांना फक्त चान्स हवा असतो दुसऱ्याला टोमणे मारण्याचा...
मी तुम्हाला त्रास होऊ नये हाच विचार करून निघून जात आहे , हे चुकीचं पाऊल आहे हेही माहिती मला पण याशिवाय दुसरा उपाय नाही माझ्याकडे , इथे राहिले तर आणखी त्रास होईल मला आणि तुम्हाला पण , तुम्हाला अस त्रासात नाही बघू शकत मी म्हणून मी हे शहर कायमच सोडून जात आहे...
आणि हो मला शोधण्याचा अजिबात प्रयत्न करू नका...
काळजी घ्या स्वतःची आणि बाकीच्यांची....
तुमचीच मुलगी
आध्या...
ते पत्र वाचून विश्वास ना भयंकर राग आला आणि ते रागातच " बघा हीची नाटक गेली असेल कोणा मुला सोबत...."
इतकं बोलून त्यांनी तो पेपर फाडला आणि रागातच रूम च्या बाहेर निघून गेले...
इथे कल्पना रडत स्वतःशी च " आध्या माझं बाळ का गेलीस का...."
पाच वर्षा नंतर....
एक मुलगी बाल्कनी मध्ये उभी राहून बाहेरचा नजारा बघत होती...
तेवढ्यात एक मुलगा मागून येऊन तिला मागूनच मिठीच घेतो...
तो मुलगा " हाय स्वीटहार्ट...."
क्रमशः
©® भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी....