Datla, this suspicion was terrible ... 20 (final) in Marathi Women Focused by Bhagyashree Parab books and stories PDF | दाटला हा संशय भीषण होता... २० ( अंतिम )

दाटला हा संशय भीषण होता... २० ( अंतिम )

ती मुलगी " आलास किती वेळ इथे तुझी बायको वाट बघून थकली..."

तो मुलगा " माझी बायको वाट बघत होती माझी , अरे वा म्हणजे आमच्या कडे लक्ष आहे म्हणायचं नाही तर कधी लक्ष च नसत... बिचारा मी किती सहन करायचं..."

मुलगी त्याच्या हातावर फटका मारत " शिव गप रे काहीही काय बोलतो आहे म्हणे लक्ष नाही आमच्या कडे , तू फ्री तरी असतो का कधी आज रविवार आहे तर इथे बायकोला टाईम देण्याऐवजी ऑफिस ची काम करत बसला आहेस.... तूही बाबांसारख करणार का आता , जस बाबांनी आधी प्रेम केलं आणि नंतर...."

शिव तिला आपल्या कडे वळवून ओठांवर बोट ठेवत मध्येच अडवत " श्श्श् काहीही काय बोलत आहेस आध्या तुला माहिती आहे ना किती प्रेम करतो मी , तुला मिळवण्यासाठी किती काय केलं मी एक तर तू एक नजर पण वर करून बघत नव्हती.... प्लीज परत अस नको बोलू तुला एक सेकंद पण नजरेआड नाही करू शकत , आय लव्ह यू...."

शिव चा आवाज बोलता बोलता जड झाला होता , त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते.... ते आध्या ने बघितल तिला वाईट वाटल की माझ्यामुळे तो उदास झाला आहे , तीही तेवढच प्रेम करत होती जेवढ शिव करत होता...

आध्या शिव चा चेहरा ओंजळीत घेत जडवेल्या आवाजात " शिव सॉरी मला राग आलेला , मी पण खूप प्रेम करते रे... मला भीती वाटते की बाबांसारखं तूझही प्रेम कमी होईल... सॉरी ना परत अस नाही बोलणार आय लव्ह यू..."

शिव तिथेच सोफ्यावर बसून तिलाही बाजूला बसवत " आध्या मी कितीही बिझी असलो तरी तुझ्या कडे दुर्लक्ष नाही होणार समजल , मला एक सेकंद पण नाही करमत तुझ्याशिवाय मी ऑफिसला जातो तेव्हा माझ्या डोक्यात हाच विचार असतो की तू काय करत असेल , जेवली असशील का , कोणत टेन्शन घेत असेल का , विचार करून स्वताला त्रास दिलं नसेल ना.... मला माहिती आहे अनुभवलं आहे तू अगोदर किती त्रासात होती तेव्हा जवळ असून पण काहीच करू शकत नव्हतो , कारण काय तर मॅडम एक शब्द काय नजर पण वर करून बघायच्या नाहीत.... आध्या अस नको समजूस मी कामात व्यस्त आहे म्हणजे लक्ष नाही माझं तुझ्याकडे तू काय करते कुठे जाते पूर्ण लक्ष आहे... ( तिचे दोन्ही हात हातात घेत त्यावर किस करत...) आय लव्ह यू आध्या..."

आध्या शिवच्या हातातून हात सोडवत त्याला लगेच मीठी मारत " आय लव्ह यू शिव... आय लव्ह यू , आय एम सॉरी मी आता जे काही बोलली तुला..."

शिव मीठी घट्ट करत " श्श्श शांत हो... "

दोघे एकमेकांच्या मिठीत सहवास घेत अचानक शिव ला शर्टवर ओल वाटल आणि त्याने लगेच तिच्या कडे बघितल तर ती रडत होती... आध्या ला अस रडताना बघून त्याच हृदय कासावीस झाल....

शिव तिचा चेहरा ओंजळीत घेत " आध्या शांत हो प्लीज अस रडत का कोण लगेच शांत हो , तुला माहिती आहे ना मला तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघवत...."

आध्या मुसमुसत त्याला " शिव मी इतकं काय वाईट केलंय ज्याची एवढी मोठी शिक्षा... मी वाईट आहे का , पळून नसते आले असते तर आता अस गिल्टी नाही वाटल असत , तिकडे च राहून सहन केलं असत सगळ गप्प पने.... मेले असते तरी चाललं असतं..."

तिचं बोलणं ऐकून शिव ला राग आलेला पण सर्वात जास्त राग तिच्या वडिलांचा आलेला , त्यांनी तिच्या वर अविश्वास दाखवला नको ते बोलले ज्याने आध्या इतकी तुटून गेलेली....

आध्या ची अशी हालत पाहता राग शांत करत तिला समजावू लागला....

शिव " हेय स्वीटी तुझी काहीच चूक नाही , तू काही चुकीचं केलं नाहीये हम... मी आहे तुझ्यासोबत काहीही झालं तरी अगोदर होतो , आताही आहे आणि नंतरही असेन सो कोणतंच टेन्शन नाही घ्यायचं समजल.... ( नाटकी आवाजात...) हे बर आहे स्वतः तक्रार करायची आणि जेव्हा मी वेळ देतोय तर हे अस रडत बसायच काय करावं मग या बिचाऱ्या जिवाचं...."

त्याच्या अश्या बोलण्याने आध्या रडता रडता हसली....

आध्या त्याच्या दंडावर हलक मारत " शिव काहीही तुझ...नाटक नको करू..."

शिव भोळा चेहरा आणत " मी कसलं नाटक केलं आता , खर तेच बोललो ना..."

आध्या त्याचे गाल ओढत " सो स्वीट..."

शिव तिचा हसरा चेहऱ्याला एकटक बघत " अशीच खुश राहा... सो इस खुशी मे फिरून येऊ मस्त पैकी चल..."

आध्या " नाही नको..."

शिव " का..."

आध्या " माझं मूड नाही फिरायच... माझी इच्छा आहे की बाल्कनीत या सूर्यास्ताच्या रमणीय वातावरणात तुझ्याशी गप्पा मारत तुझ्या हातच्या कॉफी चा आस्वाद घ्यायचा..."

शिव " ओह् जशी तुमची आज्ञा.... आलोच कॉफी घेऊन..."

शिव तिच्याशी बोलून किचन मध्ये कॉफी बनवण्यासाठी निघून गेला....थोड्या वेळाने शिव कॉफी घेऊन आपल्या बेडरूम मध्ये आला , आणि बाल्कनीत येऊन तिच्या हातात कॉफी चा मग देवून तिच्या शेजारी येऊन बसला....

आध्या कॉफी चा एक सिप घेत शिवला " शिव किती छान वाटत आहे वातावरण आणि त्यात तुझी कॉफी अहाहा..."

शिव " ओहहो आज चक्क तारीफ , प्रगती म्हणायची..."

आध्या त्याच्याकडे डोळे बारीक करून बघत " काय म्हणजे मी तारीफ नाही करत हा..."

शिव " मग काय पहिले तर कशी वागायची , जेव्हा तू पळून इथे आली होती नंतर किती प्रयत्न केले होते , तुझ्या तोंडातून तर एक शब्द नाही निघायचा जस काय तोंडाला टाळ लावून ठेवलं आहे..."

आध्या डोळे मोठे करून " आ... शिव गप्प ना काहीही टाळ काय तेव्हा माहीत आहे ना माझा स्वभाव..."

शिव " हो माहिती , आणि तुला पटवायला ला तर नाकी नऊ आले होते... जीवनात कधी इतकं कष्ट नाही घेतले जेवढे तुझ्यासाठी घेतले..."

आध्या हसत " हो का..."

शिव " हसू नको खर आहे हे... त्यादिवशी तू पहिल्यांदा माझ्याशी बोलली होती , तेही रागात..."

आध्या " मग काय तू वागतच तसा होतास..."

बोलता बोलता ते भूतकाळात हरवून गेले...

आध्या पळून गेली तेव्हा तिला कुठे जाव काय करावं काहीच समजत नव्हते , मग अचानक तिला आठवलं की पल्लवी ती मदत करू शकते म्हणून ती लगेच पल्लवी च्या घरी गेली....

पल्लवी अभ्यास करत असतानाच दाराची बेल वाजली....

पल्लवी च्या आई ने दार उघडलं....

समोर एका मुलीला बघून क्षणभर त्यांना वाटल ती आध्या आहे पण तो विचार झटकून त्यांनी तिला विचारल " कोण पाहिजे बाळा तुला..."

ती मुलगी " पल्लवी आहे का ?... मी आध्या तिची मैत्रीण..."

आध्या च नाव ऐकून पल्लवी च्या आईला खूप आनंद झाला त्या आनंदातच " मला वाटल होत तू आध्या असणार पण दुरस कोण असेल म्हणून विचार झटकल... तू बाहेर का उभी आहेस आत ये बाळा.... ( मोठ्या आवाजात पल्लवी ला...) पल्लू बघ कोण आलंय आध्या आली आहे बघ... ( आध्या कडे बघत...) तू बस इथे मी पाणी आणते...."

पल्लवी ची आई आध्या ला सोफ्यावर बसवून पाणी आणायला किचन मध्ये गेल्या...

आध्या सोफ्यावर बसून पल्लवी ची वाट बघत होती...

इथे आध्या च नाव ऐकताच पल्लवी लगेच बाहेर आली आणि मोठ्या आवाजात तिला आवाज दिला " आध्या..."

आध्या तिच्या आवाजाने उठून उभी राहिली आणि तिला भरल्या डोळ्यांनी बघत होती....

तिला अस बघताना बघून पल्लवी लगेच धावत तिच्या जवळ आली आणि मिठीत घेत तिला " आध्या काय झालं कोणी काही बोललं का , तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत सांग मी बघतेच त्यांना अस माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणीला रडवल सोडणार नाही मी..."

आध्या तिच्या मिठीतून बाहेर येत जड आवाजात " मी पळून आले घरातून..."

पल्लवी " काय ?.... तू... तू ( तिला सोफ्यावर बसवत...) बस इथे.... ( पल्लवी तिच्या बाजूला बसत...) काय झाल आध्या तू पळून आलीस..."

आध्या " हो... आज घरी आल्यावर...."

आध्या जेव्हा घरी आल्यावर काय काय घडल बाबांचं दोष देणे , लग्नाचं वैगरे सगळ सांगते....

आध्या रडत पल्लवी ला " मी काय केलं होतं , माझं काय चुकलं ग... काय चुकल..."

पल्लवी तिला मिठीत घेत गप्प करत " शांत हो रडू नको मी आहे , आई बाबा आहेत माझे ते काही तरी मार्ग काढतील..."

या दोघी बोलत असताना पल्लवीची आई पाणी घेऊन येते पण आध्या ला अस रडताना बघून त्या तिच्या दुसऱ्या बाजूला बसत तिच्या पाठीवर हात फिरवत तिला " बाळा काय झाल रडत का आहेस..."

सुलोचना च्या आवाजाने आध्या पल्लवी च्या मिठीतून बाहेर येते , तिची अशी हालत बघता पल्लवी त्यांना बोलायला तोंड उघडत असते तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजते....

सुलोचना पल्लवी ची आई " थांब मी बघते..."

त्या जाऊन दार उघडतात तर समोर पल्लवी चे बाबा आनंद असतात...

सुलोचना आनंद ना " अहो तुम्ही लेट येणार होता ना...."

आनंद पल्लवी चे बाबा " हो काम लवकर झाल म्हणून आलो लवकर... आता आत घेणार की नाही की इथेच चौकशी करणार..."

सुलोचना " हो... हो... या आत बर झाल लवकर आला तुम्ही..."

आनंद पायातले बूट काढत " का काय झाल..."

सलोचना " अहो आध्या बाळ आली आहे , पण ती रडतेय पोर..."

आनंद " काय ?.... काय झाल..."

सुलोचना " माहीत नाही पल्लवी बोलणार होती तेवढ्यात तुम्ही आलात..."

आनंद " चल मग बघू...."

सुलोचना " हो... तुम्ही बसा जाऊन बघा मी येते पाणी घेऊन..."

सुलोचना बोलून किचन मध्ये गेल्या....

आनंद हॉल मध्ये आध्या च्या बाजूला येवून बसले आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत " मी विचार केला तशीच आहेस तू एकदम गोड माझी दुसरी मुलगी... पण तुझ्या डोळ्यात पाणी छान नाही वाटत , अस काय झाल सांगशील..."

तोपर्यंत सुलोचना पाणी घेऊन आलेल्या आणि आनंद ना ग्लास हातात देवून त्या दुसऱ्या सोफ्यावर जावून बसल्या....

आनंद च विचारून झाल्यावर पल्लवी लगेच बोलली " बाबा मी बोलते...."

पल्लवी ने जस आध्या ने तिला घडलेलं सांगितलं तसच्या तस त्यांना सांगितलं....

पल्लवी च बोलून झाल्यावर आनंद आध्या ला " मग आध्या बाळा आता काय ठरवलं आहे..."

आध्या स्वतः ला शांत करत " काका मला इथून खूप दूर जायचं आहे त्यासाठी मला तुमची मदत हवी मी जॉब करून शिक्षण पूर्ण करेन..."

आनंद " जॉब करायची काय गरज आहे तुझ्या पुढच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी उचलणार आहे..."

सुलोचना " हो बरोबर बोललात तुम्ही , शिक्षणाचा सगळा खर्च आम्ही उचलणार आता..."

आध्या " नाही मी माझं शिक्षण पूर्ण करेन तेही स्व कमाई ने प्लीज मला फोर्स नका करू...."

तिची विनवणी ऐकुन आनंद " ठीक आहे , पण आता अकरावी पूर्ण होऊन बारावी ची बोर्ड परीक्षा होईल अस जॉब करून अभ्यास त्रास होईल तुला , फक्त बारावी पर्यंत चा खर्च करू दे , नंतर तुला जे करायचं ते कर जॉब वैगरे... आम्ही तुला दुसरी मुलगीच मानली आहे , एवढ तरी करू दे..."

त्यांचं इतकं प्रेम बघून आध्या " ठीक आहे मी तयार आहे..."

पल्लवी खुश होत " ये हुई ना बात...."

आनंद " माझी उद्या दुसरीकडे मुंबई ला ट्रान्स्फर होणार तर आपण उद्याच जाऊ , आध्या आता आपल्या सोबत च राहणार..."

आध्या " पण..."

सुलोचना " हे बघ आम्ही तुला बारावी नंतर जॉब करू देतोय तर आमचं हे ऐकावं लागेल , तू आमच्या सोबत च राहणार समजल... आणि हे काका , काकी नको बोलू आई बाबा बोल..."

पल्लवी " हो आध्या आई बरोबर बोलतेय... प्लीज आध्या..."

आध्या थोडा विचार करून हो बोलली....
आध्या " ठीक आहे... आई बाबा बोलायला थोडा वेळ लागेल..."

आनंद " ठीक आहे , तुला जितका वेळ हवा तितका घे...."

सुलोचना " चला जेवून घ्या पटकन आणि उद्या तयारी पण करायची आहे..."

पल्लवी " हो हो...."


थोड्या वेळाने जेवून झाल्यावर आनंद आणि सुलोचना आपल्या रूम मध्ये निघून गेले उद्याची तयारी करायला , पल्लवी आणि आध्या पल्लवी च्या रूम मध्ये निघून गेले....

पल्लवी च्या रूम मध्ये आल्या आल्या पल्लवी ने आध्या एकदम घट्ट मिठी मारली....

पल्लवी " आय एम सो हॅप्पी आध्या तू आता आमच्या सोबत राहणार...."

आध्या हसत " हो , तू नसती तर काय झालं असत माझं कुठे गेले असते मी..."

पल्लवी " हे आता तो विषय नको , चल आता झोप लवकर उठायचं आहे उद्या..."

आध्या " हो..."

या दोघी ना गप्पा मारता मारता झोप लागली....


दुसऱ्या दिवशी सकाळी च हे सगळे मुंबई ला निघून गेले....

तिथे जाऊन आध्या च आणि पल्लवी च एकाच कॉलेज मध्ये ॲडमिशन केलं , सोबत कॉम्प्युटर चा क्लास पण लावून दिला....

या दोघी एकत्र कॉलेज ला , क्लास ला एकत्र जात येत होते , मस्ती मज्जा करत होते , या दोघींचं एकमेकांशिवाय पानही हालत नव्हत...

आध्या हळू हळू त्यांच्यात रुळली होती आणि पल्लवी च्या आई बाबा बाबांना आई बाबा पण बोलायची सवय लागली

बघता बघता दोन वर्ष पुर्ण झाली....

आध्या तिने सांगितलेल्या प्रमाणे बारावी झाल्यावर जॉब ला लागली आणि स्वतः च्या पैश्याने ती शिकू लागली , सोबत पल्लवी ने हट्ट करून तिच्या बरोबर जॉब करत होती...या दोघी आता सेकंड इयरला आय आय टी मध्ये शिकत होत्या....

एक दिवस या दोघी क्लास रूम मध्ये बोलत असताना अचानक एक मुलगा त्यांच्या समोर येऊन उभा राहिला...

तो मुलगा " हाय...."

त्या मुलाच्या आवाजाने पल्लवी च लक्ष गेलं आणि ती खुश होत " हे हाय शिव , तू इथे कसा ?..."

आध्या च लक्ष त्याच्या कडे गेलं होतं पण ती काही बोलली नाही , पण माहीत नाही आतून खूप आनंद होत होता का ते तिलाच समजत नव्हते...

शिव " हो बाबा नी आता इथे बिझनेस ओपन केला आहे , सो आम्ही इथेच राहतो आता..."

पल्लवी " ओह अच्छा..."

हे दोघं बोलत असताना कोणी तरी पल्लवी ला आवाज दिला , म्हणून ती उठून जाणार असते तर आध्या तिला मध्येच अडवत " थांब मी पण येते..."

पल्लवी " हे तू थांब इथे पाच मिनिट मध्ये येते...."

पल्लवी लगेच तिथून निघून जाते....

आता तिथे शिव आणि आध्या दोघेच असतात....

शिव " ह...हाय..."

त्याच्या बोलण्याने आध्या काहीच उत्तर देत नाही...

शिव थोड थांबून " काही मदत लागली तर सांग...."

आध्या " नको मदत मी माझं बघेल काय ते , पल्लवी शी काही बोलायचं राहील असेल तर थांबू शकत , बोलून झाल असेल तर जाऊ शकत...."

तिचं बोलणं ऐकून शिव स्तब्ध होतो नंतर भानावर येत " न... नाही झाल बोलून माझं , जातो मी...."

शिव तेथून जाता जाता मनात " काय मुलगी आहे , आजी शी बोलताना तर इतकं प्रेमाने बोलते आणि माझ्याशी तर इतकं रुडली मी हाच विचार करतोय मी केलं काय आहे , जाऊ दे मी का इतका विचार करतोय तिचा अगोदर पण अशीच वागायची माहिती तिचा स्वभाव जास्त मुलांशी बोलत नाही..."

असेच काही दिवस निघून जातात...
शिव इथे आहे म्हणजे आजी पण इथेच असणार म्हणून आध्या आणि पल्लवी खूप खुश झाल्या , पल्लवी ने शिव शी बोलून त्याच्याकडून त्याचा घरचा पो पत्ता घेऊन ठेवला , या दोघी दर रविवारी आजी ना भेटायला जायच्या आणि मस्त मस्ती करून तो दिवस घालवायच्या , हळू हळू आजी सोबत आजोबा , शिव चे आई बाबा यांच्या सोबत बाॅन्डिंग पण छान झाली होती... फक्त शिव आणि आध्या च पटायचं नाही....

शिव आध्या शी बोलण्याचा प्रयत्न करायचा पण आध्या त्याला काडीमात्र भाव देत नव्हती...

हळू हळू त्याची मस्ती वाढत चालली होती तो तिला नोट्स देणे , छोट्या मोठ्या कामात मदत करने चालू असायचं आणि ती त्याच्याकडे डोळे वर करून पण बघायची नाही , तरीही तो तसचं करायचा.....

एकदा नोट्स ची मदत करायला तिच्या कडे आलेला , हे रोजच चालू असायचा म्हणून आध्या इग्नोर करत होती... तरीही शिव तिच्या मागेपुढे करत होता....

हे जास्त झाल म्हणून आध्या ला खूप राग आला आणि रागात च त्याला " तुला मी इग्नोर करतेय , भाव देत नाही आहे तर का येतोय सारखा माझ्या मागे , इतकही समजत नाही का तुला.... तुम्ही मुल ना एकच आहात मुली दिसल्या की त्यांच्या मागे पुढे करता , आई बाबा नी काही शिकवलेल तुमच्या डोक्यात नाही जात...."

आध्या च्या अश्या बोलण्याने शिव ला राग आलेला तोही रागातच " मी फक्त मदत करतोय मला वेड नाही लागलं मुलींच्या मागे लागायला , मला तुझ्याबद्दल सगळ सांगितलं आहे आजी ने तिनेच मला तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं , आजीच बोलली की तुला समजू नये की मी तुझ्या वर लक्ष ठेवायला पण आज तू खूप काही बोलली म्हणून बोलतोय... तुला जर खोट च वाटत असेल तर आजीला जाऊन विचार...."

इतकं बोलून तो निघून गेला....

तो गेलेला बघून आध्या पल्लवी ला " तो खोट च बोलतोय माहीत आहे मला..."

पल्लवी " नाही आध्या तो खरच बोलतोय...."

आध्या " म्हणजे..."

पल्लवी " हो... मी ऐकलं होत त्याला आजी शी बोलताना तेव्हा आपण सातवी ला होतो , आजी बोलत होत्या त्याला तुझ्यावर लक्ष ठेवायला...."

पल्लवी च बोलण ऐकून आध्या ला खूपच गिल्टी वाटत होत ती पल्लवी ला " म्हणजे मी शिव ला नको ते बोलून खूप मोठी चूक केली आहे..."

पल्लवी हसत " हो खूप मोठी केली आहे..."

पल्लवी ला अस हसताना बघून आध्या " तू का हसत आहे , अगोदर सांगू शकत नव्हती...."

पल्लवी " तू सांगू देशील तर ना , तुमचं तोंड तर चेन्नई एक्स्प्रेस च्या स्पीड ने चालू होत..."

आध्या " हा पूरे तो वागत च तसा होता तर मला राग आला आणि रागात काहीही बोलले.... मला माफी मागावी लागेल काहीही करून...."

पल्लवी " हो ती तर मागावी लागेल , उद्या माग आता खूप लेट झाला आहे चल घरी..."

आध्या " हो..."दुसऱ्या दिवशी या दोघी कॉलेज ला आल्या तर समजल शिव आज आला नव्हता... म्हणून या दोघींनी ठरवलं की त्याच्या घरी जाऊ बाकीच्यांशी पण भेट होईल....

कॉलेज सुटल्यावर दोघी शिव च्या घरी गेल्या , तिथे जाऊन समजल की त्याच्या बाबांना बर नव्हत म्हणून सगळे त्यांना घेऊन बाहेर गावी गेले.... नाईलाजाने या दोघींना परत यावं लागलं , यांना माहीत नव्हत की हे लोक कधी येतील तर वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता.....तीन चार महिने निघून गेलेले....
शिव अजुन आला नव्हता....

इथे आध्या त्याची वाट बघून थकली होती , शिव अगोदर तिची काळजी वैगरे घ्यायचा तर आध्या ला इरिटेट व्हायचं आणि आता तो नाही तर तिचा जीव तीळ पापड होत होता , कुठे तरी तिला शिव च्या वागण्याची सवय झाली म्हणा हे तिलाच समजत नव्हत....

इथेही शिवची तिचं हालत होती तो आध्या ची काळजी घेता घेता त्याला ही तिची सवय झालेली....

दोन महिने होऊन गेलेले शिव अजुन आला नाही म्हणून आध्या चिडचीड करत होती विनाकारण कोणावरही रागवत होती...

तिचं अस वागणं बघुन पल्लवी " आध्या काय चालू आहे तुझ अशी का वागतेय तू..."

आध्या आपल्या धुंदीत च बोलून टाकते" बघ हा कसा आहे अजुन यायला पाहिजे होत , इतका वेळ कोण लावत.... अगोदर अस मागेपुढे करायचं आणि मग अस निघून जायचं... कधी येईल हा इथे जीव गुदमरतो आहे....इथे कोणी वाट बघतोय याची काळजी च नाही त्याला...शिव कुठे आहेस...."

पल्लवी " तुला नक्की काय होतंय तो इथे नाही आहे म्हणून की दुसर काही आहे... कही तुम्हे उससे प्यार तो नहीं हुआ..."

आध्या नजर चोरत " हे काहीही काय बोलत आहेस अस काही नाही आहे..."

पल्लवी " मग नजर का चोरली इथे समोर बघून बोल... खर सांग शिव आवडतो ना तुला..."

आध्या लाजत " ह... म्हणजे हो... लहानपणापासून...."

आध्या ने लहानपणापासून बोलल्यावर पल्लवी च डोकं एकदम सुन्न झालं होत....

आध्या जी इतका वेळ मान खाली घालून लाजत होती ती पल्लवी बोलत का नाही म्हणून हळूच मान वर करून बघितल तर पल्लवी चे डोळे मोठे झालेले आणि तोंड उघडच राहील होत...

मग आध्या ने तिला हलवून भानावर आणलं....

पल्लवी तिच्या हलवण्याने लगेच भानावर आली आणि तिच्या कडे लटक्या रागात बघत " तू मला काहीच बोलली नाहीस , मी कोणीच नाही का... कसली छुपेरुस्तम निघाली तू...."

आध्या " अग ये अस काही नाही मी त्याला पहिल्यांदा बघितल तेव्हा च मला तो आवडला होता , पण तेव्हा माहीत नव्हतं की प्रेम वैगरे काय असत बस तो आवडत होता.... नंतर मोठे होत गेलो मी आणखी खेचली जायची त्याच्या कडे बोलायचा पण मोह होत होता पण बाबांमुळे मी बोलत नव्हती , मग नंतर मॅच्यूअर होत गेलो तेव्हा कन्फ्युज झाले की नक्की हे आकर्षण आहे की प्रेम.... तो जवळ डोळ्यासमोर असायचा शाळेत , घरी घेल्यावर अभ्यासात वैगरे वेळ जायचा म्हणून त्याचा इतका विचार येत नव्हता म्हणून मी समजून गेले की आकर्षण असेल मग नंतर त्याचा विचार सोडून दिला आणि लांब राहू लागले... पण कधी कधी अस वाटायचं की तो सतत माझ्यावर लक्ष ठेवून आहे नकळत कुठे तरी ते छान वाटायचं मग नंतर मनाचा मूर्खपणा असेल म्हणून सोडून द्यायचे.... आता तो समोर होता आणि अगोदर तो एक शब्द नाही बोलायचा तो आता बिंधास्त बोलत आहे काळजी घेत आहे कुठे तरी मला ते मनापासून आवडत होत अस वाटल की तोही प्रेम करतोय का पण मनात आलं की तो मला स्वीकारेल का अश्या मुलीला जी आई वडीलांना सोडून अस पळून आली मग मी त्याचा विचार झटकून दिला आणि करिअर वर फोकस केला , त्यादिवशी त्याच अती होत होते म्हणून मला खूप राग आला , त्याला काहीही बोलले होते मग तुझ्याकडून समजल की तो काळजी , लक्ष देत होता आणि नकळत मी त्याला दुखावलं होत त्याच वाईट वाटल होत.... जेव्हा तो गेला तेव्हा त्याची अशी काळजी घेणे वैगरे आवडायला लागलं होत , तो नाही म्हणून बैचेन होत होते... त्याची सवय लागली होती , नंतर समजल मी प्रेमात पडले त्याच्या आय लव्ह हिम खूप प्रेम करते मी त्याच्यावर... कधी येईल शिव हे डोळे त्याला बघण्यासाठी आतुर झाले आहेत...."

पल्लवी " आणि जर त्याच तुझ्यावर प्रेम नसेल तर..."

आध्या " त्याच माझ्यावर प्रेम आहे की नाही माहीत नाही , मी असेच प्रेम करत राहील त्याच्यावर आयुष्यभर.... पण त्याच्या डोळ्यात एकदा त्यादिवशी बघितल होत तो रागात बोलत असला तरी त्याला किती वाईट वाटत आहे हे दिसत होत , कदाचित तोही माझ्यावर प्रेम करत असेल...."

इथे पल्लवी गालात हसत तिच्या कडे बघत होती , जस आध्या च लक्ष तिच्याकडे गेलं तिला अस हसताना बघून आध्या तिला प्रश्र्नार्तक नजरेने तिला " तुला हसायला काय झाल , मी कोणता जोक मारला आहे...."

पल्लवी हसत " अग वेडू तो तुझ्यावर खरच प्रेम करतो फक्त तू रागवशील काहीही विचार करशील म्हणून त्याने त्याचे विचार मनातच दाबून ठेवले...."

आध्या शॉक होऊन तिला " काय खरच पण तुला कसं माहीत.... आता हे नको बोलू त्यानेच तुला सांगितलं...."

पल्लवी " हो त्यानेच सांगितलं , सांगितलं काय मी त्याच्या कडून वदवून घेतले होते... जेव्हा तो इथे आला तेव्हापासून मी नोटीस केलं त्याचे हावभाव तुला एकटक बघणे , तुझी इतकी काळजी घेणे , तुला उदास बघून त्यालाही उदास होत होते , तुला जरा काही लागले तर त्याला दुखत होते इतकं तर प्रेम करणारेच करतात ना.... मग काय त्याला पकडुन जबरदस्ती करून वदवून घेतल , मला ही तुझ्यावर शंका आलेली , तू स्वतः येवून बोलशील म्हणून गप्प राहिले... बघ आता कशी पोपटासारख बोलली... पण मला एका गोष्टी चा राग आला आहे तुला तो लहानपापासून आवडत होता हे मला तेव्हा सांगितलं च नाही ना...."

आध्या लाडी गोडी लावत तिला " सॉरी ना , तेव्हा कुठे समजत होत एवढ इतकं ही महत्वाच नव्हत..."

पल्लवी " ओके ओके जास्त लाडी गोडी लावायची गरज नाही...."

आध्या " हम , शिव लवकर येवू दे...."

पल्लवी " येईल येईल....चल आता...."

आध्या " हो..."

थोड्या दिवसांनी शिव कॉलेज मध्ये आलेला , तो आध्या ची काळजी तर घेत होता पण बोलत नव्हता , कारण ते एक नाटक होत... पल्लवी ने त्याला सगळ सांगितलं होत पण आध्या ला माहीत नव्हत की पल्लवी ने त्याला सांगितलं आहे ते ती स्वतः त्याला सांगेल म्हणून हे सगळ नाटक , त्याला ती प्रेम करतेय हे ऐकून खूप आनंद झाला होता....


तो असा वागतोय म्हणून तिला खूप वाईट वाटल , तिने मनाशीच निश्चय केला की ती त्याला सॉरी बोलेल आणि त्याच्या वरच्या प्रेमाची कबुली करेल.....एक दिवस शिव कॉलेज सुटल्यावर घरी जात च होता तर आध्या ने त्याला मध्येच अडवून ठेवलं....

तो जसा बाजूने जायचा तस ती समोर येत होती...
तिचं अस वागणं बघुन त्याला खूप मज्जा येत होती , त्याने आपल नाटक असच चालू ठेवलं होतं.....

शिव नाटकी चिडत " आध्या बाजूला हो , मला नाही बोलायचं तुझ्याशी...."

आध्या " शिव सॉरी मी त्यादिवशी खूप बोलले..."

शिव " आधी बोलायचं मग सॉरी बोलायचं हो ना... पण मला तुझं सॉरी नकोय..."

आध्या " शिव प्लीज सॉरी ना... प्लीज मला माफ कर..."

शिव जास्त न ताणता " ठीक आहे केलं माफ..."

एवढ बोलून तो जातच होता की पाठून आध्या बोलली " शिव आय लव्ह यू..."

तिच्या तोंडून आय लव्ह यू ऐकुन तो जागीच स्तब्ध झाला....

भानावर येत मागे वळून " काय बोललीस...."

आध्या " हो आय लव्ह यू शिव.... खूप प्रेम मी तुझ्यावर , मला माहित आहे तुही माझ्या वर खूप प्रेम करतो.... ( मग तिने कस प्रेम करते , कधीपासून करते , तिला काय वाटत होत सगळ सांगितलं )...."

तिचं सांगून झाल्यावर ती थोड शांत आली शिव काही बोलत नाही म्हणून तिने त्याच्या कडे पाहिलं तर तो गालात हसत तिच्या कडे बघत होता...

आध्या " तू हसतोस का..."

शिव " मला माहित आहे पल्लवी ने सगळ सांगितलं , हे फक्त न बोलण्याच नाटक होत तू स्वतः येवून बोलशील यासाठी..."

आध्या लटक्या रागात त्याला मारत " यू... येऊ दे समोर त्या पल्लवी ला सोडणार नाही...."

शिव तिचे दोन्ही हात पकडत " अग रिलॅक्स आता झाल ना सगळ क्लिअर...."

आध्या ने हो म्हणून मान हलवली आणि गोड स्मितहास्य करत त्याला बघत होती...

शिव मग तिचे हात सोडून कपाळावर ओठ टेकवले....

मग शिव गुडघ्यावर खाली बसून तिचा एक हात आपल्या हातात घेत आणि दुसऱ्या हातात अंगठी पकडत बोलू लागला " आध्या तुझा स्वभाव , तुझ काळजी घेणे , स्वतःबद्दल न विचार करता दुसऱ्यांचा विचार करणे , तुझ्यामधल असलेले प्रेम हे तुझं वागणं थेट माझ्या मनात बसल आहे
मला तुझ्या हृदयात सामावून घेशील का ?
मला तुझा श्वास बनवशील का ?
माझ्या मनात आयुष्यभर राहशील का ?
आध्या आय लव्ह यू.... विल यू मेरी मी ?....."

त्याच अस प्रपोज करण बघून आध्या भारावून गेली आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले....
आध्या भरल्या आवाजाने " हो.... आय लव्ह यू शिव...."

शिव तिचा होकार ऐकताच पटकन तिला अंगठी घातली आणि उठून तिला घट्ट मिठी मारली......

आध्या आणि शिव दोघेही रडत होते एकमेकांचा सहवास समजून घेत होते....

शिव मिठीतून बाहेर येत तिचा चेहरा ओंजळीत घेत " आय एम सो हॅप्पी... काय सांगू मी निशब्द आहे , अस वाटत आहे जगातलं सगळ सुख भेटल आहे.....आय लव्ह यू...."

आध्या रडत हसतच " मीही खूप हॅप्पी आहे.... लव्ह यू टू शिव.... पण मी अस पळून आले...."

आध्या पुढे काही बोलणार शिव तिला मध्येच अडवत " मला माहित आहे तु काय विचार करत आहेस , तू अस आपल्या आई बाबां चा विचार न करता पळून आली ते मला आवडेल का वैगरे हो ना.... आध्या तू ते केलं ते बरोबर आहे , बाकीच्यांना चुकीचं वाटेल.... जिथे विश्वास नाही तिथे राहण अवघड आहे , आणि त्या अविश्वास च्या नात्यात राहिलो तरी त्यात आपण जिवंत असून पण मेलेलो असतो त्यापेक्षा त्या नात्यापासून थोड दूर व्हाव आणि ते सगळ बाजूला ठेवून एक नवीन सुरुवात करावी.... बाकी वेळ आली की आपोआप सगळ सुरळीत होत....आणि हो मी तुला सगळ्या गुणदोषांसकट स्वीकारलं आहे , आता हे विचार करून तू स्वताला त्रास करून घेणार अस नकोय मला , आध्या फक्त डॅशिंगच छान वाटते...."

शिव च्या बोलण्याने आध्या निशब्द झाली आणि काही न बोलता तिने त्याला मीठी मारली......असेच काही महिने निघून गेले शिव आणि आध्या च प्रेम बहरत जात होत , हे दोघ एकमेकांवर खूप प्रेम करू लागले , समजून घेऊ लागले , एकमेकांना साथ देऊ लागले.....
हळू हळू शिव च्या घरी या दोघांच्या नात्याबद्दल समजल , त्यांना आध्या अगोदरच आवडली होती त्यामुळे कोणतीही अडचण नव्हती.... हे दोघे स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर नंतर लग्न करणार होते.....

सांगितल्या प्रमाणे शिव आणि आध्या ने तीन वर्षा नंतर लग्न केलं आणि आपला सुखी संसारात मग्न झाले........
वर्तमानकाळ.....

शिव ला खांद्यावर जड सारखं वाटू लागलं होत , त्याने बघितल तर आध्या झोपली होती..... तिला अस झोपताना बघून शिव च्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं....

आध्या घरातलं आणि ऑफिस च काम करून थकली होती म्हणून तिला अशी झोप लागली.....

आध्या एका नामवंत कंपनी त मोठ्या पदावर जॉब ला होती , सोबत पल्लवी पण होती तिचही एका चांगल्या मुलासोबत लग्न झालं तीही या नात्यात खुश होती आणि शिव तो आपल्या बाबां चा बिझनेस बघत होता.....


शिव तिच्या गालावर हलक मारत " हे आध्या चल जेवून घे मग झोप हवं तेवढ...."

आध्या झोपेत त्याचा हाताला विळखा घालून " ह.... झोपू दे...."

शिव " आधी जीव मग झोप....चल चल...."

शिवने तिला जबरदस्ती उठवून जेवायला घेऊन गेला , नंतर जेवून झाल्यावर आध्या रूम मध्ये आल्या आल्या झोपून गेली.... शिव पण तिच्या अश्या वागण्यावर हसतच तिला मिठीत घेत झोपून गेला.....
असेच काही महिने जात होते शिव आणि आध्या च नात आणखी घट्ट होत चाललं होत......


एक दिवस आध्या , शिव , शिव चे आई बाबा , आजी आजोबा , सोबत पल्लवी , पल्लवी चे हजबंड , पल्लवी चे आई बाबा , पल्लवी च्या हजबंड चे आई बाबा हे सगळे मुंबई मध्ये जवळच असलेल्या ठिकाणी छोट्या ट्रीप वर आलेले....

सगळे मस्ती करत होते , मोठी मंडळी एकी कडे , प्रेम वीर एकीकडे.....


आध्या एका साईड ला उभी राहून समोरचा नजारा बघत होती , ते बघत असताना अचानक तिला तिच्या कमरेवर कोणीतरी हात ठेवला मान वर करून बघते तर तो शिव होता... शिव ने तिला पाठीमागून मिठीत घेतलं होत....

आध्या त्याच्या हातावर मारत सुटण्याचा प्रयत्न करत " शिव सोड काय करत आहेस , सगळे आहेत इथे...."

शिव मीठी आणखी घट्ट करत " कोण नाही मी माझ्या बायकोला मिठीत घेतलं आहे समजल...."

आध्या " शिव नखरे नको जास्त सोड..."

शिव तिच्या गालावर ओठ टेकवत " नाही सोडणार काय करशील...."

आध्या डोळे मोठे करत त्याला बघून " शिव...."

शिव फक्त हसत तिला बघत होता....

अचानक मागून आवाज आला त्या आवाजाने हे दोघे सावरत बाजूला झाले....

मागून एक व्यक्ती " वा इथे असले नाटक चालू आहेत...."

दोघांना आवाज ओळखीचा वाटला म्हणून दोघांनी मान वर करून बघितल तर ते आध्या चे बाबा विश्वास होते सोबत तिची आई कल्पना , भाऊ कल्पेश , आत्या आणि गीता आजी ही होते....

झाल अस की हे लोक पण इथे काही कामासाठी आलेले ज्या हॉटेल मध्ये आध्या आणि शिव होते त्याच हॉटेल मध्ये हे लोक पण होते....
विश्वास खाली फिरत असताना त्यांनी या दोघांना बघितल होत , आध्या बघून त्यांना भयंकर राग आलेला म्हणून ते रागात हे दोघं उभे होते तिथे आले....
विश्वास ना रागात कुठे तरी जाताना बघून बाकीचे पण त्यांच्या पाठोपाठ आले....

आणि विश्वास मोठा आवाज ऐकुन आध्या , शिव सोबत आलेले आणि आजूबाजूचे पण लोक जमा झाले....

आध्या या सर्वांना इथे बघून तिचे डोळे भरून आलेले....

आध्या जड आवाजात " बाबा.... आई..."

तिच्या तोंडून बाबा ऐकल्यावर विश्वास " मला बाबा म्हणायचं नाही समजल , तुझा आणि माझा तेव्हाच संपला जेव्हा तू घर सोडून गेली होती आता कोणताही संबंध नाही राहिला आपल्या.... आता समजल तू घर या मुलासाठी सोडून गेली होती ( तिच्या गळ्यात मंगळसूत्र बघून...) ओह लग्न पण केलस ( शिवकडे बघून मग आध्या ला....) हा तुझाच नवरा आहे ना की दुसरा कोणी , नवऱ्याला सोडून याच्या सोबत मज्जा करत आहेस...."

त्यांच्या अश्या बोलण्याने आध्या पूर्णपणे तुटून गेली होती तिला विश्वास च बसत नव्हता जे समोर उभे आहेत ते खरच तिचे बाबा आहे का....
आणि इथे शिव च्या मुठी रागाने आवळल्या होत्या , त्याला त्यांचं बोलण आवडल नव्हत त्यांनी सरळ तिच्या चारित्र्यावर हात ठेवला होता , तिची चूक नसताना तिला काहीही ऐकवत होते म्हणून त्याला भयंकर राग आला , त्यांचं बोलणं त्याला सहन झाल नाही.....

शिव रागातच " इनफ , माझ्या आध्या काहीही बोललेल मी ऐकुन घेणार नाही.... तिने तुमची रेसपेक्ट केली , काळजी घेतली ते नाही दिसत का तुम्हाला फक्त तिने न केलेली चूक दिसतेय , मला तुम्हाला तिचे वडील म्हणायला पण लाज वाटत आहे.... इतका अविश्वास तेही स्वतः च्या मुलीवर.... तुम्हाला हेच बघायचं आहे ना की यात चूक न केल्यासारख काय आहे थांबा.... ( शिव आपला फोन काढून त्यांच्या कडे जात त्यांना त्यातले काही व्हिडिओ दाखवत होता.... ते व्हिडिओ बघून विश्वास ना एकदम झटका लागला , त्यांचं डोकं सुन्न झालेलं....) आता बोला तिची कोणती चूक आहे.... हे नका विचारू की सगळ माझ्याकडे कस.... मी पहिल्यांदा तिला बघितल होत तेव्हा काही मुल तिला छळत होते , तेव्हा मी माझ्या जवळ असलेल्या बॉडी गार्ड ना तिला वाचवण्यासाठी तिथे येत होता , आम्ही थोड लांब असल्याने तिथे पोहोचेपर्यंत वेळ लागणार होता तरीही पटापट पोहचण्याचा प्रयत्न करत होतो , आम्ही पोहोचलो तोपर्यंत तिथे आला होता आणि तिला काहीही बोलत होता आध्या मला आधीच आवडत होती म्हणून तुम्ही जे तिला बोलत होता ते ऐकुन तिच्याबद्दल खूप वाईट वाटल.... मग तुम्ही गेल्यावर बॉडी गार्ड च्या मदतीने तिथल्या सी सी टीव्ही कॅमेरा च्या साहाय्याने तिथला घडलेला सीन गार्ड च्या फोन मध्ये रेकॉर्ड करून ठेवला ( आपला शिव स्मार्ट आहे हो...) बाबांची ओळख होती म्हणून ते रेकॉर्ड लगेच भेटल , मी त्याच दिवशी तुमच्याकडे येणार होतो , पण तुम्ही रागात असणार आणि तिला तुम्ही आणखी काही रागाच्या भरात बोलणार म्हणून मी गप्प बसलो नंतर वेळ आल्यावर सांगेन अस ठरवल....
मग समजल की तिला तुम्ही शिक्षा दिली आहे ते ऐकुन अस वाटल की अताच जाऊ आणि सगळ क्लिअर करू पण तुम्ही अजूनही रागात होता.... आध्या कसही करून माझ्या आजीला भेटेन हे माहीत होत आणि तसच झालं होत.... मग आजीने मला हिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होत आणि तसचं मी आपल काम करत होतो तिच्या नकळत.... तुम्हाला तो व्हिडिओ आध्या सोबत आम्ही तिघ बोलत असताना ( पल्लवी , आजी आणि शिव ) व्हिडिओ पाठवला होता तो तारिका ने आध्या च्या मैत्रिणी ने पाठवला होता , कारण तुम्ही तिला आध्या वरून काहीही दोष देत होते तोच बदला घेण्यासाठी तिने तस केल होत आणि तिला मदत तुमच्या आईने आणि बहिणीने केली होती हे बघा व्हिडिओ ( भाग सोळा आणि एकोणीस मध्ये ते दोन व्यक्ती व्हिडिओ ते तारीका आणि आत्या होत्या.... आणि यांचे व्हिडिओ काढत होता तो व्यक्ती शिव असतो....) आणि अजून एक आई ने तुम्हाला
आध्या बद्दल काहीही भरून दिलेलं ते फक्त त्यांचं नाटक होत , तेच नाही यांनी त्यासाठी या ( कल्पेश कडे बघत ) छोट्या मुलाची मदत घेतली त्यासाठी , हे बघा हा व्हिडिओ ( तो व्हिडिओ बघून विश्वास ने त्याच्या कडे बघितल....) हा विचार करत असाल ना की तुमच्या घरचा व्हिडिओ माझ्या कडे कसा , सांगतो हा व्हिडिओ मला कल्पना काकी नी दिला आहे त्यांना मी एकदा भेटलो होतो तेव्हाच त्यांनी मला दिला ( भाग तेरा आणि चौदा मध्ये आत्या आणि गीता आजी बोलत असताना व्हीडिओ काढणार व्यक्ती कल्पना असते.... आणि शिव च्या आजी सोबत बोलताना चा व्हिडिओ कल्पेश काढतो....) मग सांगा आता यात काय चूक आहे आध्या ची सांगा...."

शिव च सगळ ऐकुन आध्या शॉक मध्येच त्याला बघत होती.....

विश्वास ना सगळ माहीत पडल्यावर त्यांना स्वतःचीच लाज वाटत होती , त्यांनी थोडी हिम्मत करून आध्या कडे जात तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत तिला " आध्या मला माफ कर...."

आध्या त्यांचा हात आपल्या हातातून सोडवून हसत त्यांना " सगळ पुराव्यासह दाखवलं म्हणून माफी मागत , बाबा जिथे विश्वास असतो तिथे पुराव्याची गरज नसते... तुम्ही तेव्हाच विश्वास दाखवला असता तर पळून जाण्याची वेळ आली नसती.... मी कधीच नाराज नव्हते तुमच्यावर त्यामुळे माफ करण्याचा प्रश्न नाही येत.... तुमच्या शी बोलले तरी तेवढे कंफर्टेबल नसेल मी....( शिव कडे जात)शिव मला इथे उभ नाही राहायचं चल...."

शिव काहीच करू शकत नव्हता , कारण निर्णय आध्या चा होता... तिला साथ देण्याच वचन तो पाळत होता , म्हणून तो तिला तिथून घेऊन जातो....

तिथून जात असताना आध्या मध्येच थांबत मागे वळून पळत जाऊन कल्पना ला मीठी मारत रडू लागते....

कल्पना तिला गोंजारत " काळजी घे बाळा , काही वाटल तर मला फोन कर...."

आध्या रडत " हो तू पण काळजी घे..."

आध्या कल्पना ला मन भरून बघून घेते आणि शिव सोबत हॉटेलमध्ये आपल्या रूम मध्ये निघून जातात....

ते दोघं गेलेले बघून शिव चे आई , बाबा , आजी,आजोबा पल्लवी आणि तिची फॅमिली पण त्या दोघांच्या पाठोपाठ निघून जातात....

मग विश्वास कल्पना ला बघून ते काही बोलणार तर कल्पना त्यांना हातांनी थांबवत " थांबा , मला आता काही बोलायचं नाही तुमच्याशी मी जेव्हा सांगत होते तर तेव्हा माझं ऐकुन नाही घेतल तुमचं तेच खर करत होता.... मी बोलले होते वेळ येईल तेव्हा तुम्हाला तुमचीच लाज वाटेल.... माफी वैगरे मागून गेलेली वेळ आणि शब्द परत नाही येत...."

एवढ बोलून त्याही तिथून निघून गेल्या.....

गीता आजी आणि आत्या त्यांच्या जवळ जात असताना च विश्वास रागात त्या दोघींना " मला तुम्हाला आई आणि बहीण बोलायला पण लाज वाटते.... तुम्ही दोघी इतके खालच्या पातळीवर जाल मला वाटल नव्हत , तुम्हाला अस करून काय भेटल सांगा.... मी माफ नाही करणार तुम्हाला कधीच नाही.... जा इथून माझ्या नजरेसमोरून निघून जा...."

गीता आजी " आमचं ऐकुन घे...."

विश्वास आणखी रागात आवाज चढवत " मी एकदा सांगितलेलं ऐकू येत नाही का...."

त्यांना इतक्या रागात बघून नाईलाजाने त्या दोघी निघून जातात....

विश्वास सगळे गेल्यावर मटकन खाली बसून जोरात ओरडतात " आध्या...." आणि धाय मोकलून रडायला लागतात.....

इथे शिव आणि आध्या रूम मध्ये आल्या आल्या आध्या शिव घट्ट मिठी मारून रडत असते....

शिव तिला रडू देत केसांवर हात फिरवत असतो....

मन भरून रडून झाल्यावर आध्या थोडी शांत होते....

शिव तिला बेड वर बसवत तिचा चेहरा ओंजळीत घेत " तुला कोणीही सोडून जाऊ दे , हा शिव नेहमी तुझ्या सोबत पाठीशी उभा राहील... गेलेले दिवस परत तर नाही आणू शकत पण येणार दिवसात तुला जितकं खुश करता येईल तितकं खुश ठेवेन हे माझं वचन आहे...."

आध्या मीठी मारत " आय लव्ह यू शिव... मीही खुश ठेवण्याचा प्रयत्न करेन..."

शिव हसत " फक्त आय लव्ह यू... "

आध्या " मग काय पाहिजे..."

शिव खट्याळ नजरेने तिच्या जवळ जात " आजच जेवण थोड तिखट होत , तर गोड वैगरे काहीं पाहिजे...."

आध्या ला त्याचा बोलण्याचा रोख कळतो ती लाजत त्याला ढकलत " शिव गप्प बस , समजल मला..."

शिव तिला लाजताना बघून हृदयावर एक हात ठेवून " आये ये तेरा शर्माना..."

आध्या काही बोलायला जाणार तर शिव लगेच तिच्या ओठांवर ओठ ठेवतो.... आध्या आधी बावरते मग त्याला प्रतिसाद देऊ लागते....

दोघे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत काही तासांनी एकमेकांच्या मिठीत झोपून जातात....

शिव आणि आध्या च आता पुढचा नवीन प्रवास सुरू होतो...._समाप्त_


©® भाग्यश्री परब

यात काही चूक असल्यास माफी असावी.....


Rate & Review

Bramha Sutar

Bramha Sutar 11 months ago