आरोही मनात बोलत असताना एक रागीट आवाज तिच्या कानी पडतो आणि ती भानावर येते.....
आरोही भानावर आल्यावर तिच लक्ष समोर जात तर ती जोरात किंचाळते " नाही....."
पुढे......
आरोही किंचाळल्याने तिथे असलेल्या मुली दचकतात.... त्यांच लक्ष समोर जात तर त्या घाबरून एका साइडला एकमेकांना चिटकून उभ्या राहतात , समोरच दृश्य बघून त्यांना दरदरून घाम येत होत आणि पूर्ण शरीरही कापत होत.....
आरोही पण एका बाजूला उभ राहून समोर बघत होती... तिलाही भीती वाटत होती पण अस घाबरून चालणार नाही... आपणच घाबरलो तर या माणसाची हिम्मत आणखी वाढेल म्हणून आरोही घाबरलेली असताना तिने चेहऱ्यावर तस दाखवल नाही....
तो माणूस रागात सगळ्यांना " जास्तच हिम्मत आलेली ना तुम्हाला आता काय झाल उंदरासारख घाबरत आहात.... ( तो आरोही कडे बघतो तर ती रोखून त्याला बघत होती...) हे तू तुला जास्तच हिम्मत आलेली दिसतेय हा...."
त्याने उंदीर बोललेल ऐकुन आरोही ला खूपच राग येतो रागातच ती त्याला " मस्ती जास्त अंगात शिरलीय का हा तुझ्या.... तू असेल उंदीर , अरे उंदीर पण म्हणायच्या लायकीचा नाही गाढव आहेस गाढव एक नंबर चा...."
त्या माणसाला आरोही ने गाढव बोललेल ऐकुन त्याला आणखीच राग आला " मला गाढव बोललीस... तुला माहित नाही मी लीडर आहे इथला समजल...."
आरोही " तू असशील लीडर पण तू गाढव म्हणून च शोभतोस...."
तो माणूस " तुला तर.... थांब आता बघ तुझ्या मैत्रिणीची काय हालत करतो ते...."
तो रिया ला काही करणार तर आरोही ( बोलता बोलता आरोही त्याच्या जवळ आलेली हे त्या माणसाला ही समजल नाही....) लगेच त्याचा बंदूक असलेला हात जोरात दाबून पकडते त्यामुळे त्याचा हातात असलेली बंदूक खाली पडते.... जस त्याच्या हातातून बंदूक खाली पडते तस आरोही त्याचा तो हात पाठी जोरात मुरगळते त्यामुळे त्या माणसाची रिया वर असलेली दुसरी पडक सुटून जाते.... तशी रिया पटकन बाजूला जाऊन उभी राहते.....
तो दुसऱ्या हाताने आरोही ला काही करणार तर आरोही लगेच त्याचा पकडलेला हात सोडून त्याच्या दंडाला झटकन मागे वळवून जोर लावून त्याला जोरातच कानाखाली मारते.....
त्याचा गालावर इतकी जोरात पडते की त्याच्या ओठातून रक्त येत होत....तो हात लावून रक्त बघतो तर त्याला आरोही चा खूपच राग आला , रागाने त्याचे डोळे लालभडक दिसत होते , मुठी घट्ट आवळल्या होत्या... तसाच आरोही ला घूरुन बघत होता......
आरोही त्याला अस आपल्याकडे रागाने घुरुन बघताना बघून तुलाही आणखी राग आला आणि तशीच तिने दुसऱ्या गालावर पण ठेवून दिली.....
दुसऱ्या गालावर इतकी जोरात पडली होती की तो तोल जाऊन खाली पडला.... तो जसा खाली पडला तसा बाकीच्या मुलींनी आरोही ची हिम्मत बघून त्याही त्याला मारायला पुढे आल्या.....
मग सगळ्या मुलींनी मन भरेपर्यंत त्याला मारल आणि बांधून एका बाजूला ठेऊन दिल......
इथे निखिल पार्थ ला भेटायला त्याच्या पोलिस स्टेशन मध्ये आलेला पण काय त्याला पार्थ भेटलाच नाही.....
पार्थ पोलिस स्टेशन मध्ये नव्हताच.....
निखिल स्वतःशीच " या पार्थ ला आताच गायब व्हायच होत का हो गॉड.... पार्थ नालायक फोन तरी उचल.... "
निखिल त्याला खूप वेळ फोन करायच बघत होता रिंग वाजत होती पण पार्थ फोन च उचलत नव्हता....
तरीही निखिल फोन करून बघत होता....
पार्थ फोन उचलत नाही म्हणून त्याला खूप राग येत होता , फोन फेकून द्यावा वाटत होत.....
निखिल स्वतःशीच " पार्थ तू एकदा ये समोर अशी हालत करेन... जेव्हा काही अर्जंट बोलायच असत तेव्हाच तू नसतो.... हो गॉड पार्थ कुठे गेला हा.... चला निखिल आता वाट बघण्याशिवाय पर्याय नाही.... "
एवढ बोलून निखिल तिथेच पार्थ ची वाट पाहत बसला.... त्याला आई बाबांच टेन्शन नव्हत त्याने पार्थ कडे येता येताच सिक्युरिटी वाढवून घेतली होती....
बस त्याला एकदा पार्थ ला भेटून काय ते सोक्ष मोक्ष करायच होत.....
पार्थ खूप वेळ झाला अजुन आला नव्हता निखिल अजूनही तिथेच त्याची वाट बघत येरझारा करत होता....
आणि येरझारा करत असतानाच निखिल ला कोणाला तरी धक्का लागला.... धक्का इतक्या जोरात लागला होता की दोघेही खाली पडता पडता वाचले.....
निखिल चा धक्का लागला तो व्यक्ती त्याच्याकडे न बघताच हात चोळत चिडून च " तुला दिसत नाही का.... कसला हात आहे लोखंड सारखा..... "
निखिल ला आवाज ओळखीचा वाटला म्हणून त्याने मान वर करुन त्या व्यक्तीला बघितल तर तो पार्थ होता...
त्याला बघूनच निखिल " उगाच नाही जात जिम मध्ये समजल...."
पार्थ ला पण आवाज ओळखीचा वाटला म्हणून त्याने मान वर करून बघितल तर निखिल होता....
निखिल ला इथे बघून त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह उभ राहील...
पार्थ चा प्रश्नार्थक चेहरा बघून निखिल " सांगतो मी इथे का आलो आहे... आधी बसून घेऊ मग बोलूया का ?...."
पार्थ " हो.... चल कॅफे मध्ये बसून बोलू...."
निखिल " हो...."
तसे ते दोघ बाहेर कॅफे मध्ये जातात.....
थोड्यावेळाने ते कॅफेत पोहोचतात....
निखिल आपली कार पार्क करून पार्थ जवळ येतो....
आणि ते कॅफे च्या दिशेने चालत जातात....
ते चालत असताना च पार्थ मध्येच निखिल ला बोलतो " काय रे डाएट मध्ये लोखंड खातो की काय तू ?...."
पार्थ च्या अश्या प्रश्नाने निखिल च्या कपाळावर आठ्या पडतात... त्याला समजल तो कशाबद्दल बोलत आहे... पण निखिल पार्थचाच मित्र हो तो पण काय कमी आहे का 🤭 " हो खातो.... तुला पण अशीच माझ्यासारखी बॉडी बनवायची का चल तुला रेसिपी सांगतो हा वेगवेगळी तू पण ट्राय कर हा.... मग बघ तुझी बॉडी कशी होतेय...."
पार्थ निखिल च बोलण ऐकून त्याचा पुढे हात जोडून " हे बाबा माफ कर रे मला माझ चुकल , मी विसरलो तू माझाच मित्र आहेस......"
निखिल हसत च " हा आता कस..... चल नौटंकी...."
एवढ बोलून निखिल पार्थ च्या खांद्यावर हात ठेवून त्याला कॅफे च्या आत घेऊन जातो....
इथे एका माणसाला एक कॉल येतो.....
त्याने कॉल रिसिव्ह केल्यावर पलकडची व्यक्ती काही तरी बोलते "............"
त्या व्यक्तीच बोलण ऐकून त्या माणसाला खूपच राग येतो...
तो रागात च " त्यांची हिम्मत च कशी झाली.... आलोच मी...."
एवढ बोलून तो लगेच फोन कट करतो.....
आणि रागातच आपली कार काढत भरधाव वेगाने कार चालवत निघून जातो....
आरोही आणि रिया असतात त्या घरात.....
त्या माणसाला बांधून ठेऊन झाल्यावर त्या सगळ्या जणी एके ठिकाणी उभे राहतात.....
आरोही रिया जवळ येत तिचा एक हात हातात घेत " रिया तू ठीक आहेस ना...."
रिया हसत तिच्या हातावर आपला हात ठेवून " हो मी ठीक आहे.... नको काळजी करू...."
आरोही " त्याने जेव्हा तुझ्या डोक्यावर बंदूक धरली तेव्हा किती घाबरले मी...."
रिया " श्श्श.... शांत हो तो विषय नको आता... आपल्याला इथून लवकरात लवकर निघायला हव...."
आरोही " हो...."
आरोही आणि रिया च बोलण झाल्यावर त्या दोघी बाजूला होतात.....
आरोही समोर उभी राहत सगळ्या मुलींना " आता आपण इथून पळणार आहोत.... तर कोणीही इथे तिथे नाही जायच सगळे एकत्रच असायला पाहिजे समजल...."
सगळे एकत्र " हो...."
आरोही " चला माझ्या मागून...."
आरोही जाऊन तिथला दरवाजा उघडते आणि बाहेर डोकावून बघते तर तिथे पण एक खोली होती त्याला लागूनच एक दरवाजा होता.....
आरोही कानोसा घेते की तिथे कोणी आहे का , तिला कोणी नाही दिसल्यावर मागे बघून सगळ्यांना हातानेच चला म्हणून इशारा करते आणि निघून जाते, तसे सगळ्या जणी पण तिच्या पाठोपाठ निघून जातात.....
आरोही त्या दुसऱ्या खोलीच्या दाराजवळ येऊन उभी राहत दरवाजा उघडते आणि समोर बघून तिचे डोळेच मोठे होतात....
पाठून आलेल्या मुली ही अशी का उभी राहिली म्हणून समोर बघतात तर त्यांचे पण डोळे मोठे होतात....
क्रमशः
©® भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी.....
😍 Stay Happy 😍
✨ Take care ✨