एवढ बोलून तो रागातच फोन कट करून बाजूच्या सीटवर जोरातच फेकून देतो.....
स्टेअरींग वर जोरात हात मारत स्वतःशीच " तुला सोडणार नाही मी बदला तर घेऊनच राहणार... माझ्या फॅमिली ला दूर करून खूप मोठी चूक केली तू.... खूप त्रास दिलास त्याचा तिप्पट मी त्रास देणार आहे....."
इतक बोलून कार स्टार्ट करत वेगाने आपल्या घराकडे गाडी घेतो.....
पुढे....
रिया आणि आरोही असतात त्या घरात....
सगळे काही भेटत का ते शोधत असतात....
आरोही आणि रिया एका बाजूला शोधत बोलत होत्या...
रिया " आरु एक विचारू...."
आरोही " परमिशन काय मागत आहेस विचार....."
रिया " तुला निखिल ची आठवण नाही येत... आय मीन मी बघितल आहे की आपल प्रेम खूप दूर आहे ते आपल्या जवळ कधी येईल , भेटेल का सांगता येत नाही तर काही मुली आठवण काढून रडत बसतात स्वताला त्रास देतात वैगरे... तू निखिल वर प्रेम करते ना मग तुला त्याची आठवण येत असेल ना.... "
आरोही " हो येते खूप येते निखिल ची आठवण इतकी की वेडी होऊन जाईल मी... मला माहित नाही आम्ही भेटणार की नाही.... ( आजूबाजूला शोधत असलेल्या मुलींवर नजर टाकून रिया कडे बघत....) या मुलींना आपण येण्या अगोदर तीन वर्षापासून इथे ठेवल होत आता पाच सहा वर्ष तरी झाले असतील.... तुला माहिती जेव्हा आपल्याला इथे ठेवल त्या पहिल्या दिवशी मला निखिल ची खूप आठवण येत होती नंतर तीन चार दिवस गेले त्याची इतकी आठवण येत होती की खूपच रडू येत होत तेव्हा डोक पण काम करत नव्हत.... निखिल ला भेटण्यासाठी इतकी तडफत होते की मी वेडीच झाले असते.... असच एक दिवस विचारात हरवताना माझ लक्ष यांच्या कडे गेल... मग माझ्या मनात विचार आला की हे तर आपल्या अगोदर इथे आहेत यांना पण कोणाची तरी आठवण येत असेल तरी चेहऱ्यावर दुःख न दाखवता गप्प इथे बसून आहेत.... कदाचित यांना माहीत नाही की पुढे आपल काय होणार आपण भेटू शकणार की नाही.... नंतर मी डीसाईड केल की काहीही करून इथून निघाव लागेल.... मग मी बघत राहिले किती जण पाळत ठेवून आहे आपल्यावर नंतर हा प्लॅन मी रेडी केला... पण एक रस्ता तर मोकळा झाला तर दुसर संकट येऊन उभ राहील.... "
रिया तिच्या खांद्यावर हात ठेवून " आरु यू आर स्ट्रोंग मला विश्वास आहे तू कसही करून यातून काढून राहणार कारण ही आरोही एकदा निर्णय घेतला ते पूर्ण करूनच राहते , आम्ही आहोत तुझ्या सोबत..... बस तू पुढे चल आणि तुझी , निखिलची भेट लवकर च होईल.... "
रियाच्या सपोर्ट ने आरोही ला थोड बर वाटल आरोही एक्साईट मध्ये तिला " भेटल्यावर मी निखिल एकदम झकास सरप्राइज देणार..."
आरोही ला आनंदात बघून रिया चेहऱ्यावर स्माईल आली " हो... हो.... "
आरोही " अरे बोलत काय बसलोय आपण चल लवकर शोध भेटेल काहीतरी...."
रिया " हो... "
बोलून झाल्यावर दोघी शोधायला सुरुवात करतात.....
एका प्लॅट मध्ये....
गीता ओरडून ओरडून कोणाशी तरी बोलत होती " तू माझ्या सोबत अस नाही करू शकत समजल....माझ्या पोटात तुझ बाळ आहे समजल्यावर लगेच हे नात तोडशील का... हे बघ अस केल ना तू आणि तुझे काम जगासमोर आणेल.... "
पलीकडून " मला धमकी माझ्या विरुध्द उभ राहायचा पण विचार करू नकोस नाही तर याचे वाईट परिणाम होतील....."
गीता खुनशी हसत " तुला काय वाटत मी घाबरेल तुला नाही माझ्याकडे पुरावा आहे तुझ्या विरूद्ध... मी ते पोलिसांना देईन मग नंतर पोलिस काय करतील , किती शिक्षा होईल माहीत नाही मला...."
पलीकडून " हे बघ तू अस काही करणार नाही आहे.... सांग तुला किती बंडल पाहिजे देतो मी...."
गीता " बंडल नकोय मला बस लग्न कर माझ्याशी...."
पलीकडून " लग्न वेड लागल आहे का तुला मी नाही करणार.... "
गीता रागात " नको करुस बघ आता मी काय करते...."
एवढ बोलून गीता फोन कट करते....
( गीता ला माहीत नव्हत तिच बोलण रेकॉर्ड होत आहे...)
पलीकडून " हॅलो... हॅलो...."
फोन कानापासून बाजूला करत बघतो तर फोन कट झालेला होता....
तो स्वतःशीच रागात " हीची हिम्मत कशी झाली माझ्याशी अस बोलण्याची सोडणार नाही हिला मी....."
तो रागात समोर च्या व्यक्तीला गीताचा फोटो दाखवत " संपवा हिला...."
समोर चा व्यक्ती त्याची ऑर्डर मानून " ओके बॉस.... " एवढ बोलून तो फोटो घेऊन निघून जातो....
ती व्यक्ती निघून गेल्यावर तो समोर असलेला फ्लॉवर पॉट उचलून भिंतीवर फेकतो आणि तसाच बेडरूम मध्ये निघून जातो....
इथे पार्थ कळल की एका गोडाऊन मध्ये डेथ बॉडी भेटली आहे म्हणून तो लगेच दोन तीन ऑफिसर ना घेऊन त्या ठिकाणी निघून जातो.....
तिथे पोचल्यावर त्या डेथ बॉडी बघून सगळ्यांच्या अंगावर काटा आला होता....
तो माणूस खाली जमिनीवर पडलेला होता....
पार्थ एका डॉक्टरांशी " काय झाल डॉक्टर ?...."
डॉक्टर " मर्डर आहे हे... अस वाटत आहे की याला कोणतीतरी एकदम घट्ट तारेने बांधून ठेवले होते , त्याच्या शरीरावर जागोजागी तारेचे निशाण आहेत... आणि सोबत याच्या अंगावर विंचू सोडल होते , विंचू चावल्याचे स्पष्ट दिसत आहे...."
पार्थ सगळ ऐकुन सुन्न झाला होता " अस कोण मारत कोणाला...."
एक ऑफिसर पार्थ जवळ आलेल बघून ते डॉक्टर पुढच्या कामाला लागतात....
तो ऑफिसर " सर हे मोबाईल याच्या खिशातून भेटल आहे.... याला पासवर्ड असल्याने उघडू शकत नाही.... ( दुसऱ्या हातातली वस्तू दाखवत ) आणि ही तार एका कोपऱ्यात होती... अस वाटत या तारेने याला बांधल असेल कारण यावर रक्त लागल आहे...."
पार्थ " हम...कोणाला समजू नये हे मर्डर आहे म्हणून याला जमिनीवर ठेवू ही तार लपवून ठेवली.... हे मोबाईल सायबर मध्ये पाठव आणि त्यांना मोबाईल ओपन झाल की या मोबाईल मधली सगळी डिटेल पाठवायला सांग.... ही तार पण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून दे... "
तो ऑफिसर पार्थ ला " हो " बोलून पुढच्या कामाला निघून जातो....
तो गेल्यावर पार्थ विचार करत " याच्या चेहऱ्याकडे बघून अस वाटत आहे की हा कोणी साधारण माणूस नाही आहे कोणी गुंड वाटत आहे ( कारण त्याचे केस थोडे मानेपर्यंत येत होते , दाढी, मिशी थोडी वाढलेली , कपडे गुंड टाईप घातलेले ) ...काय तरी गडबड आहे.... याच्याबद्दल आता मोबाईल चा पासवर्ड ओपन झाल्यावरच कळेल...."
मनात बोलून पार्थ आणखी काही भेटत का ते बघत होता....
इथे रक्षित ट्रॅफिक मध्ये फासला....
रक्षित वैतागून वॉच बघत " या ट्रॅफिक ला अताच मध्येच यायच होत का....कधी पोहोचणार तिथे तोपर्यंत ते सगळे तिथून निसटले पण असणार...."
रक्षित त्या ठिकाणी पोहचायला ट्रॅफिक मूळे खूप वेळ लागणार होता म्हणून त्याची चिडचिड होत होती.....
इथे तो गोडाऊन मधून निघून कार स्टार्ट करून वेगात आपल्या घराच्या दिशेने जात होता....
मध्येच त्याला कोणाच तरी मेसेज आला... त्याने कार चालवत ते मेसेज बघितल....
त्यातला एक मेसेज ओपन करून बघितल ते एक व्हिडिओ होत....
व्हिडिओ मधल्या व्यक्तीला बघून त्याने कार एका बाजूला उभी केली आणि ते व्हीडिओ बघू लागला...
तो जसा व्हीडिओ बघत होता तस त्याचा रागाचा पारा आणखी चढत होता.....
त्या व्हिडिओ सोबत एक रेकॉर्डिंग पण होती त्याने ती ओपन करून ऐकली...
ते रेकॉर्डिंग ऐकुन त्याचा राग सातव्या आस्मानवर पोहोचला.... त्याने फोन बंद करून कार ची स्पीड पहिल्यापेक्षा डबल वाढवून सुसाट निघून गेला.....
🌠 Take