ते रेकॉर्डिंग ऐकुन त्याचा राग सातव्या आस्मानवर पोहोचला.... त्याने फोन बंद करून कार ची स्पीड पहिल्यापेक्षा डबल वाढवून सुसाट निघून गेला.....
पुढे...
पार्थ आणखी काही भेटत का ते शोधत होता... इकडे तिकडे बघत असतानाच त्याची नजर एका वस्तू वर पडली तस त्याच्या डोळ्यात चमक आली तो मनातच " अच्छा तर याने या माणसाला मारल... हे तर कन्फर्म झाल कोणी आता हा भेटल्याशिवाय काहीच कळणार नाही... पुढे दुसऱ्या कोणाचा नंबर लागण्याआधी याला पकडल पाहिजे... या बॉल ( हो ते तेच बॉल होत जे अगोदरच्या चार डेथ बॉडी च्या बाजूला भेटल होत... ते बॉल हलक असल्याने वाऱ्यामुळे सरकत एका कोपऱ्यात जाऊन थांबल.... ) वरून काही समजत नाहीये आता डोक शांत झाल्याशिवाय काही क्लू नाही भेटणार..."
पार्थ मनातच बोलत असताना त्याला कोणीतरी आवाज देतो तसा तो भानावर येतो....
पार्थ सोबत असलेला एक ऑफिसर त्याच्याजवळ येत त्याला " सर... बॉडीला पोस्टमाॅर्टम साठी पाठवली आहे... "
पार्थ " ओके... आजूबाजूला काही सापडल का पुरावा..."
तो ऑफिसर " नाही सर....काहीच सापडल नाही..."
पार्थ " ओके... परत एकदा नीट बघा काही भेटत का...."
तो ऑफिसर " हो सर... "
इतक बोलून तो ऑफिसर पुढच्या कामाला निघून जातो....
पार्थ तो गेल्यावर आपल्या हातात असलेल्या बॉल ला चेहऱ्यासमोर धरत दुसऱ्या हातात असलेल्या प्लास्टिक च्या पिशवीत ठेवून ते प्लास्टिक आपल्या खिशात टाकत तो झपाझप पावले टाकून त्या गोडाऊन च्या बाहेर निघून गेला.....
निखिलच्या घरी.....
ऑफिस ची कामे आटपून निखिल आपल्या घरी येतो.... घरी आल्या आल्या हॉल मधल्याच सोफ्यावर स्वतःला झोकून देतो...
त्याची आई सुमित्रा किचन मध्ये काम करत असताना बाहेरून गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने त्यांना समजत की निखिल आला आहे त्यामुळे ते पटकन त्याच्या साठी पाणी घेऊन किचन च्या बाहेर येतात..
सुमित्रा त्याच्याकडे बघतात तर त्याचा चेहरा खूप काम केल्याने थकल्यासारखा वाटत होता... त्यांना कळायला वेळ नाही लागला की तो इतका का थकला आहे....
सुमित्रा मनातच " देवा आरोही लवकर भेटू दे... माझ्या मुलाला अस बघवत नाही आहे...."
सुमित्रा मनात बोलून निखिल जवळ जाते..
मॉम ला आलेल बघून निखिल उठून बसतो , तस त्या त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देत तिथेच त्याच्या बाजूला बसतात...
निखिल पाणी पिऊन ग्लास तिथे असलेल्या टेबलावर ठेऊन सुमित्राच्या मांडीवर झोपत त्यांचे हात आपल्या डोक्यावर ठेवून डोळे बंद करतो...
सुमित्रा निखिल च्या डोक्यावर हात फिरवत आपल्याला मुलाच्या शांत चेहऱ्याकडे एकटक बघत होत्या...
सुमित्रा च्या डोक्यावरून प्रेमळ हात फिरविण्याने निखिल चा दिवसभराचा थकवा एका क्षणात निघून जातो , त्याला आता रिलॅक्स वाटत होत....
सुमित्रा त्याचा चेहरा बघत " बाळा , काही समजल का आरोही बद्दल..."
निखिल डोळे मिटून च " नाही मॉम प्रयत्न करतोय... "
सुमित्रा " हम..."
सुमित्रा पुढे काही बोलणार तर निखिल ला काही तरी आठवल...
तो पटकन उठत इकडे तिकडे बघतो.. त्याला अस इकडे तिकडे बघताना सुमित्रा " काय झाल निखिल ?...."
निखिल सुमित्रा कडे बघून " मॉम डॅड कुठे आहेत...."
सुमित्रा " ते काही कामानिमित्त बाहेर गेले... कधीचे गेलेत ते अजुन आले नाहीत..."
निखिल आठ्या पाडत " म्हणजे...."
सुमित्रा " सकाळी नऊ ला निघाले म्हणाले दुपारी तीन पर्यंत येतो.. इथे आठ वाजले अजुन आले नाहीत...."
निखिल चिडून " हे तू मला आता सांगत आहे...."
सुमित्रा " अरे इतक का चिडत आहेस अडकले असतील कुठे तरी...."
निखिल सुमित्रा च्या बोलण्याला इग्नोर करून खिशातून मोबाईल काढत बाहेर च्या दिशेने झपझप पावले टाकून जातो , तर त्याला बाहेरून सारंग ( त्याचे वडील ) लंगडत येताना दिसले , त्या दोघांच लक्ष खाली गेल तर त्यांच्या पायाला ड्रेसिंग केलेल दिसल ....
त्यांना अश्या अवस्थेत पाहून सुमित्रा आणि निखिल धावतच सारंग जवळ गेले..
एका बाजूने निखिल तर एका बाजूने सुमित्रा त्यांना पकडुन घरात आणल आणि सोफ्यावर बसवल...
सुमित्रा लगेच त्यांच्यासाठी पाणी आणायला गेली , निखिल तिथेच त्यांच्या बाजूला बसत...
निखिल सारंग " मग आता सांगणार का हे कुठून लागवून आणल ते.. ( भुवया उंचावत ) हम..."
सारंग त्याच्याकडे बघत " तू अस बोलत आहेस जस काय मी काही घोळ घालून आलोय..."
निखिल चिडून " डॅड..."
सारंग हसत " ओके... ओके सांगतो... चिडू नकोस..."
निखिल " हा..."
सारंग " झाल अस की मी काही कामासाठी बँकेत गेलो होतो... तर काम झाल्यावर बाहेर पडलो बघतो तर गाडी खराब झाली होती , तुला कॉल केला तर बिझी दाखवत होता... घरी पण केला कॉल पण कोणी उचलला नाही मग एक ऑप्शन राहिला माझ्याकडे रिक्षा... रिक्षा साठी रेड सिग्नल बघून रोड क्रॉस करत होतो तर मध्येच एक ट्रक आला... त्या माणसाने खेचल नसत तर मी वाचलो नसतो...."
निखिल " अस कोण मध्येच... "
निखिल पुढे काही बोलणार त्याचे डोळे मोठे होतात.. त्याचा मनात क्षणात येऊन जात की हे सगळ प्लॅन आहे... तो लगेच उठून " आलोच मी डॅड पाच मिनिट " सारंग ला बोलून पटपट जिना चढून आपल्या बेडरूम मध्ये आला...
पाठून सुमित्रा आवाज देत होती तोपर्यंत तो आपल्या बेडरूम मध्ये निघूनही गेला होता...
निखिल आपल्या बेडरूम मध्ये आल्या आल्या पार्थ ला कॉल केला....
दोन तीन रिंग नंतर पार्थ ने कॉल उचलला " हॅलो..."
निखिल " हॅलो पार्थ...."
पार्थ " थांब आधी नीट श्वास घे नंतर बोल ( निखिल पटपट जिना चढल्याने त्याला दम लागला होता )...."
निखिल स्वताला नॉर्मल करत सारंग सोबत काय घडल ते सगळ सांगतो...
पार्थ निखिल च बोलून झाल्यावर " हम मी बघतो कोण आहे ते.... आणि हो तुम्ही तिघ जरा सावधान रहा...."
निखिल " हो... चल मला फ्रेश होऊन जेवण करायच आहे मग काम पण आहेत खूप..."
पार्थ " हो चल... बाय..."
निखिल " बाय... " बोलून फोन कट करतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो....
इथे पार्थ निखिल ने फोन ठेवल्या ठेवल्या एका ऑफिसर ला कॉल..
पलीकडून फोन उचल्यावर " हॅलो मोरे... मी एका एरिया च अड्रेस सेंड करतोय तिथे जाऊन सीसीटीव्ही बघा आणि त्यातले सगळे रेकॉर्डिंग मला सेंड करा.. आजच पाहिजे मला...."
ऑफिसर " हो सर... आजच मिळेल सर रेकॉर्डिंग तुम्हाला..."
पार्थ " गुड... लागा कामाला..."
एवढ बोलून पार्थ फोन कट करून पुढच्या कामाला लागतो... (पार्थ गोडाऊन मधून थेट पोलिस स्टेशन मध्ये आलेला असतो )...
आरोही आणि रिया असतात त्या घरात.....
आरोही आणि रिया शोधत असतात तर आरोही च लक्ष एका भिंती कडे जात , ती त्या भिंतीजवळ जाते आणि निरखून बघते तर तिथे एक काळया गोल सारख काही तरी होत जे एका बटणासारख खूपच वेगळ दिसत होत....
आरोही सगळ्यांना आवाज देते " हे इकडे या... बघा...."
आरोही च्या आवाजाने सगळे तिच्याजवळ जातात...
सगळे आलेले बघून आरोही त्या गोष्टीकडे बोट दाखवत " हे बघा वेगळच दिसत आहे ना बाकीच्या बटणापेक्षा... "
रिया निरखून बघत " हो आरोही ( बाकीच्या भिंतीवर असलेल्या बटणार नजर फिरवून ) इथे असलेल्या बटणापेक्षा हे वेगळ दिसत आहे..."
आरोही विचार करून रिया आणि बाकी सगळ्यांकडे बघून " काय करू दाबू का ?.... "
सगळे थोड विचार करून एकमेकांकडे बघत आरोही ला " हो.. हो.. दाब..."