Love your new color... 34 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... 34

प्रेमा तुझा रंग नवा... 34

सोहम काही बोलणार तर त्यांना एका व्यक्तीचा आवाज येऊ लागला " त्यासाठी तुम्ही जिवंत असायला पाहिजे ना..."

त्या व्यक्तीचा अवाजाच्या दिशेने बघितल तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर पश्र्न चिन्ह दिसत होते..

रक्षित , सोहम आणि ती व्यक्ती त्या व्यक्तीला " हे कोण नवीन मध्येच आलय " अश्या नजरेने आठ्या आणून बघत होते...

पुढे...

रक्षित , सोहम आणि त्या व्यक्तीला आपल्याकडे अस बघताना बघून ती व्यक्ती " काय ओळखल नाही का मला... पण मी तुम्हाला बरोबर ओळखतो.."

सोहम " ते कस काय.."

ती व्यक्ती " खरच नाही ओळखल मला.. असो मीच देतो ओळख करून.. विश्वास शिंदेंना तर ओळखत असाल हो ना मी त्यांचा लहान भाऊ विजय शिंदे..."

आरोही लगेच " विश्वास शिंदे तेच आहे ना जिथे माझे बाबा काम करत होते... पण ते तर या जगात नाही आहे , त्यांचा एका ॲक्सिडन्ट मध्ये मृत्यू..."

आरोही च बोलण ऐकून ती व्यक्ती रागात " त्यांचा ॲक्सिडन्ट नाही झाला होता त्यांना मारल गेल होत.."

आरोही " व्हॉट कोणी मारल त्यांना ते तर खूप चांगले होते..."

ती व्यक्ती रागात " हो चांगले होते त्याचाच फायदा घेऊन या विश्वनाथ राव ने मारून टाकल..."

विश्वनाथ " हे तोंड सांभाळून समजल , तो आमच्या कामाच्या मध्ये आला होता.. त्याला मी सांगितल होत मला मदत केली की तुलाही फायदा होईल , पण नाही त्याने सरळ पोलिसांची धमकी दिली... तो पोलिसांना बोलवणार होता तर काय मला मारव लागल त्याला , सोबत त्याच्या वाइफ आणि मुलांना पण..."

( विजय ला तर पोलिसांनी पकडल होत , मग तो कसा सुटला हाच प्रश्न पडला असेल ना.. सांगते सांगते थांबा..

झाल अस की ते दोन पोलिस विजय ला पकडुन घेऊन जात होते तर विजय ने त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून तिथून पळ काढला होता..

( यात माझ कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही आहे.. दुखावल असेल तर माफी असावी.. हे एक स्टोरीचा पार्ट म्हणून लिहिल आहे , आशा करते की तुम्ही समजून घ्याल...)

विजय त्या दोन पोलिसांना " साहेब तुम्ही पहिल्यांदाच एका गुन्हेगाराला पकडत आहात का.."

त्यातला एक पोलिस " हो , म्हणूनच इतका आनंद होत आहे.. आतापर्यंत आम्ही गुन्हेगाराच्या जवळच येत होतो पण ते आमच्या हाती लागलेच नाही ते तर आमच्या दोन पाऊल पुढे निघून जायचे... नंतर पार्थ सर च्या हुशारीने ते पकडले जायचे..."

विजय सायकोलॉजी शिकला असल्याने त्या पोलिसांच्या चेहऱ्यावरून त्याला समजल होत की ते आताच जॉईन झाले आहेत...

विजय त्या पोलिसाला " अच्छा मग असही होऊ शकत की तुम्ही आता ज्या गुन्हेगाराला पकडल आहे तो गुन्हेगार नाही एक सामान्य माणूस आहे.. "

तसे ते दोन पोलिस एकमेकांकडे बघून त्याच्याकडे बघू लागले.. त्यातला दुसरा पोलिस " हे जास्त डोक नको चालवू समजल गपचुप चल..."

विजय " अरे तुम्ही कामात असा हलगर्जीपणा केला तर पार्थ सरांना नाही आवडणार.. मी त्या गुन्हेगाराचा जुळा भाऊ पण असू शकतो... "

पहिला पोलिस " हे तू कशावरून बोलतोय.. आणि आम्ही कस विश्वास ठेवू की तू खर बोलत आहे ते..."

विजय " एकदा माझ्या डोक्यात बघा मी खर बोलतोय की नाही ते.. हव तर मी तुमची मदत करून देतो माझ्या भावाला शोधून द्यायला , शेवटी त्याचा भावाला चांगलच झालेल आवडेल ना..."

तसे ते दोन पोलिस एकमेकांकडे बघतात त्यातला पहिला पोलिस काही तरी विचार करून दुसऱ्या पोलिसाला डोळे मिचकावत " ठीक आहे आम्ही ठेवतो तुझ्यावर विश्वास.."

( त्या पोलिसांनी त्याच्या डोळ्यात बघितल तर त्यांना त्याचे डोळे खर सांगत होते.. खर तर विजय ने तस नाटक केले होते ( पता है आज कल कुछ समझ नहीं आता कौन सही और कौन गलत...) दुसर म्हणजे त्याच्या बोलण्यात खरेपणा जाणवत होता , त्यामुळे त्यांना त्याच्यावर विश्वास ठेवण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता...)

विजय " ओके , मला वाटत तो इथेच कुठे तरी असेल... कारण मी त्याला बाहेर जाताना बघितल नाही.. एक काम करा तुम्ही फ्लॅट्स चेक करा मी इथे खाली शोधतो..."

एवढ बोलून ते पोलिस एका विंग च्या दिशेने गेले आणि इथे विजय त्यांना जाताना पाहून लगेच मागे वळून झपाझप पावले टाकून कार च्या दिशेने जात होता... मग तिथे पोहोचल्यावर पटकन कार स्टार्ट करत निघून गेला..

गाडीचा आवाज ऐकुन त्या पोलिसांनी मागे वळून बघितल नंतर एक मन एकमेकांकडे बघितल.. भानावर येत दुसरा पोलिस ओरडून " बघत काय बसलो आहे चल पटकन नाहीतर आपली नोकरी गेली समज..."

तसे तेही पटकन आपली जीप स्टार्ट करून विजय गाडीच्या मागे निघून गेले...)

वर्तमानकाळ...

विजय " मग त्याचीच शिक्षा द्यायला मी इथे आलो आहे... जोपर्यंत तुम्हा तिघांना नाही मारत तोपर्यंत माझ्या मनाला शांती नाही भेटणार..."

इतक बोलून विजय ने आपल्या जवळ असलेली बंदूक काढून विश्वनाथ कडे निशाणा साधला.. तो ट्रिगर दाबणार तर कोणीतरी त्याच्या हातावर गोळी चालवली आणि त्याच्या हातून बंदूक खाली पडली...

गोळी चालवली त्या दिशेने सगळ्यांच्या नजरा तिथे गेल्या तस इथे रिया आणि आरोही च्या चेहऱ्यावर मिलियन डॉलर वाली स्माईल आली..

आरोही आनंदात मोठ्याने " निखिल... "

आरोही ने आवाज दिल्याने निखिल ने तिच्याकडे बघितल आणि त्याच्याही चेहऱ्यावर मिलियन डॉलर स्माईल आली..

निखिल " आरु.." तो तिच्या दिशेने चालत येत होता.. आरोही पण त्याच्या दिशेने जाणार तर सोहम तिला पकडून तिच्या डोक्यावर गन ताणून " हे जर एक पाऊल पुढे टाकल ना तर हीच डोक उडाल समजायच..."

त्याच्या अस बोलण्याने निखिल ची पावल जागीच थांबली.. निखिल ला अस थांबलेल बघून सोहम जोरजोरात हसत " काय हवा निघाली का..."

त्याच्या बोलण्यावर निखिल ला राग आला आणि तो रागात " जास्त उडू नको समजल... सोड तिला , लढायच असेल तर समोर येऊन लढ अस घाबरवून काय लढतोय..."

सोहम " हे..."

सोहम पुढे काही बोलणार तर एक आवाज येतो " सोड तिला नाही तर यांच डोक उडेल समजल..."

तसा सगळ्यांच्या नजरा त्या आवाजाने दिशेने जात तशी आरोही " बाबा तुम्ही..."

वासुदेव " हो मी बाळा मला माफ कर मी तुझ्याशी चुकीच वागलो..."

आरोही " नाही बाबा तुम्ही तसे वागलात त्यामागे काही कारण असतील , मला विश्वास होता तुमच्यावर की तुम्ही अस वागूच शकत नाही..." ( आरोही ला अगोदरच समजल होत की ते नाटक करत होते... कस ते तिने एकदा रक्षित च बोलण ऐकल होत...)

सोहम " हे तुमचा हिमोशनल ड्रामा बंद करा... आणि तू ( वासुदेव कडे बघत..) त्यांना सोड नाहीतर तुझी मुलगी गेली समज..."

वासुदेव " आधी तू तिला सोड.."

पार्थ मध्येच ओरडून " इनफ... काय कटकट चालू आहे हा... तुम्ही चौघे ( रक्षित , सोहम , विश्वनाथ आणि विजय कडे बघत..) स्वताला हंडर अरेस्ट करत आहात की मी माझ्या पद्धतीने करू..."

पार्थ च बोलून झाल्यावर निखिल " हे पार्था यांना जेल मध्ये टाकण्या अगोदर या सोहम ला तरी विचार की हा कसा वाचला याला तर मारल होत ना..."

पार्थ " निख्या शांत हो आधी यांना अरेस्ट तरी करू दे मग यांची चांगलीच चौकशी करेन हा.. तू नको काळजी करुस... आ..."

पार्थ पुढे काही बोलणार सोहम मध्येच " अरे इतक का कष्ट घेत आहात सांगतो ना मी कसा वाचलो ते..."

सोहम ने बोलायला सुरुवात केली...

क्रमशः

©® भाग्यश्री परब


Rate & Review

Apeksha kishor Pawar