भाग ४
"प्लीज रीया ऐकून घे ना..एकदाच..प्लीज मला भेटायचं आहे तूला.." वरुण म्हणाला..
"मला भेटायचं नाही ..आणि फोन ठेवा आता.." तीने फोन कट केला आणि गादीवर फेकून दिला..
आता पुढे...
रीया रुममध्ये येरझारा घालत होती..विचार करुन करुन तीचं डोकं दुखायला लागलं होतं..
"हा कशाला फोन करत असेल मला काय गरज आहे मला फोन करायची..काय हवयं याला..माझा पिहुल.. त्याच्यासाठी तर नाही ना...मी माझ्या लेकराला नाही नेवून देणार कुणाला..माझा मुलगा आहे तो माझं नाव लावतो पिहुल रीया सावंत ..मी मोठं केलं त्याला ..आईचं आणि बापाचं प्रेम देते त्याला कशाकशाची कमतरता भासू देत नाही.. आतापर्यंत नाही झाली याला आपण बाप असल्याची जाणीव ..आता आला मोठा ..म्हणे एकदा ऐकुन घे..का ऐकुन घेऊ मी माझं ऐकलं त्यांनी जेव्हा मी ओरडुन सांगत होते..माझी अवस्था ..त्यांना थोडी तरी दया आली नाही माझ्यावर ..माझ्या लेकरावर आता आठवण झाली रीया आणि तीचा मुलगा जीवंत आहे याची.." किती आणि काय काय विचार सुरु होते तीच्या डोक्यात..डोकं अक्षरशः दुखायला लागलं..तीने विचार डोक्यातून जाण्यासाठी पुस्तक हातात घेतले आणि वाचायला लागली...पण त्यातही तीचं मन लागेना ..तीने वैतागून पुस्तक ठेवून दिले..आणि मोबाईलवर गाणी लावली.. स्वतःसाठी काॅफी बनवायला घेतली...एव्हाना तीच्या ऑफिस सुटायची वेळ झाली होती..तीला तुषारची आठवण आली..तीने मॅसेज केला.."हाय"...लगेच रिप्लाय आला..
"हाय रीया कशी आहेस..सुटी का घेतलीस.. तब्येत बरी आहे ना.."
"हो ठिक आहे..जरा काम होतं.."
"ओके.."
"मला जरा बोलायचं आहे..येतोस का घरी.."
"ठिक आहे.. ॲड्रेस पाठव.."
ती तुषारला लोकेशन पाठवते..तीने आजपर्यंत कुण्या मित्राला घरी बोलवले नव्हते..पण आज तीला बोलावसे वाटत होते त्याच्याशी ..तीने काॅफी बनवायची तशीच ठेवून दिली तुषार सोबत घेवू म्हणून..विस मिनीटात तुषार चा काॅल आला सोसायटीच्या खाली आलोय म्हणून..तीने फ्लोअर नंबर सांगून वर यायला सांगितले..ती दार उघडून दारातच उभी होती...तुषार लिफ्टमधून वर आला..ती दिसताच हात वर करुन हाय केले..तीने त्याला आत बोलवले..
"बस मी पाणी आणते.." ती तुषार ला बसायला सांगून पाणी आणायला गेली..तुषार तीचे घर निरखून बघत होता..फार सामान नव्हतं पण स्वच्छ आणि निटनेटक सगळं..रीया ने काॅफीसाठी परत गॅस सुरु केली..पाणी आणून तुषार ला दिले..
"छान आहे घर.." तुषार म्हणाला..रीया ने फक्त स्माईल दिली..
"तू बस ना उभी का आहेस..आणि पिहुल कुठे गेला.." तूषार म्हणाला..
"तो झोपलाय..उठेल थोड्या वेळात..मी काॅफी आणते.." रीया किचनमध्ये गेली..काॅफी तयार झाली होती तीने दोन कपामध्ये काॅफी आणली..सोबत थोडे स्नॅक्स ही आणले..
"साॅरी मी तुला त्रास दिला.." रीया म्हणाली..
"त्रास कसला..तसंही घरी कोण आहे माझी वाट बघायला..मी भटकतच असतो तसाही.." तुषार म्हणाला...त्याला रीया ला भेटायची इच्छा झाली होतीच..पण सांगणार कसं..
"एकटा राहतोस..?." रीया म्हणाली..
"हो तूला माहित नाही का अजून..कोण राहणार माझ्यासोबत.." तुषार म्हणाला..
"रुममेट वगैरे...?" रीया म्हणाली..
"नाही मला नाही आवडत कुणासोबत रहायला..कोण कसे निघतील आजकाल काही भरोसा नाही..आणि मागच्या वर्षीच फ्लाॅट घेतला..आई-बाबा येत असतात अधूनमधून." तुषार
"अच्छा.."
"बरं तू का सुटी घेतलीस..तू नसलीस की मन लागत नाही ऑफिसमध्ये.." तुषार म्हणाला..त्याला गम्मत करायची सवय आहे म्हणून रीया ला माहित होते.. म्हणून तो बेधडक बोलून गेला..
"पिहुल जीद्द करत होता पार्कमध्ये ने म्हणून मग घेतली सुटी.." रीया म्हणाली..
"फार छान केलस..त्याला वेळ देत जा..काम तर काय नेहमीच असणार आहे.." तुषार म्हणाला..
"हो..मला तूझ्याशी थोडं बोलायचं होतं.." रीया
"हो बोलना..काय बोलणार आहेस.." तुषार
"अरे पिहुल च्या वडिलांचा फोन आला मघाशी..मला फार भीती वाटत आहे.." रीया म्हणाली..
"काय म्हणाला तो.." तुषार
"भेटायचं आहे..असं काहितरी म्हणत होता..मी काही ऐकुन घेतले नाही लगेच फोन कट केला.." रीया म्हणाली..
"म्हणजे तूझी शंका खरी ठरली तर..आता तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहेत ते.." तुषार म्हणाला..
"हो ना.." रीया उदास होत म्हणाली..
"तू घाबरतेस कशाला...तो कुणावर जबरदस्ती थोडीच करु शकणार आहे..कायदा काही आहे की नाही..आणि मी सोबत आहे तूझ्या.." तुषार तीला समजावत म्हणाला...
"माझ्या पिहुल ला तर नेणार नाही ना सोबत.." रीया म्हणाली..
"कसं शक्य आहे..आणि पिहुल जाणार आहे का त्याच्यासोबत..तू नको काळजी करु..आता फोन आला तर मला सांग...आणि ऐकून घे त्याला काय म्हणायचे आहे ते.." तुषार म्हणाला..
"आता थोडंसं हलकं वाटतं मला..नाहितर फार टेन्शन आलेलं होतं.." रीया म्हणाली...
"म्हणून तर मनातलं शेअर करायला शिकायचं.." तुषार बोलत होता..पिहुल ऊठुन बाहेर आला आणि दुरुन तुषार कडे बघत होता..तुषारचे लक्ष त्याच्याकडे गेले..
"हाय पिहुल, हाऊ आर यू."
"पिल्लू उठलास का ..ये.." रीयाने त्याच्याकडे पाहून हात केले तसं तो धावत येऊन तीच्या कुशीत शीरला..
"पिल्लू अंकल ना हाय कर.." रीया त्याला म्हणाली..
"हाय अंकल ..आय ॲम फाईन.." पिहुल म्हणाला..
"तू तर फारच गोड बोलतोस..हे घे तूला चाॅकलेट.." तो बॅगमधून चाॅकलेट काढत म्हणाला...
"थॅंक यू अंकल.." पिहुल ने चाॅकलेट घेतले.. थोड्या वेळाने पिहुल त्याच्याशी छान गप्पा मारायला लागला..
"चल मी आता निघतो रीया... बाय पिहुल.." तुषार म्हणाला..
"तुषार अंकल नको ना जाऊस ..थांब ना.." पिहुल त्याच्यासोबत छान मिक्स झाला होता..
"नाही रे जायला लागेल ना मला.." तुषार त्याचे गाल ओढत म्हणाला..
"जेवण करुन जा ना तुषार ..मी लगेच करते स्वयंपाक.." रीया म्हणाली..दोघांच्या आग्रहाने तुषार थांबला..पिहुल तर फारच खुश झाला..जेवण करून तो घरी गेला..रीया ची भीती आता गेली होती...
रीयाचे आता नेहमीप्रमाणे रुटिन सुरू झाले ..ऑफिस, घर, पिहुल आणि तीची रोजची धावपळ... ती तीच्या आयुष्यात आनंदी होती..तीचं सर्वस्व तीचा पिहुल तीच्या जवळ जो होता..आज ती ऑफिस सुटल्यावर घरी जायला निघाली..शील्पा चा रस्ता वेगळा होता..तीला बाय करुन ती आपल्या रस्त्याने वळली..समोर वरुण उभा होता.. ती त्याला अव्हाईड करुन जायला निघाली..
"रीया ऐक ना मी तूला भेटायला आलोय.." वरुण म्हणाला..
"का ? मला भेटायला..? .." ती कुत्सीत हसत म्हणाली..
"हो ..तूला भेटायला आलो..प्लीज ऐकून घे ना माझं.." वरुण केविलवाणा चेहरा करत म्हणाला..
"बोला..ऐकतेय.." रीया म्हणाली..
"इथे..?" वरुण
"हो इथेच..मी तुमच्यासोबत कुठे येईल ही अपेक्षाच ठेवू नका..लवकर बोला काय बोलायचं ते.." रीया ठामपणे म्हणाली..तीचा तो काॅन्फिडन्स बघून वरुण थोडा घाबरलाच..
"हे बघ आपल्या आयुष्यात जे झालं ते फार वाईट झालं..मी फार मोठी चुक केली..मला माफ कर..पण प्लीज एकदा विचार कर..आपण परत एकत्र येऊ शकतो.. आपल्या मुलाला आई-वडील दोघांचंही प्रेम मिळेल.." वरुण बोलत होता..
"एक मिनीट वरुण... आपला मुलगा ?..माझा मुलगा आहे तो तुमचा त्यांच्याशी काही संबंध नाही..कळलं का ..आणि तुम्ही म्हणता ते शक्य नाही.." रीया मोठ्या आवाजात म्हणाली..
"अगं असं काय करतेस रीया मी माफी मागतोय ना तुझी.." वरुण काकुळतीने म्हणाला..
"तुमच्या माफी मागितल्याने सगळं ठिक होणार आहे वरुण...मी जो त्रास सहन केला..त्याच्या आठवणी पुसणार आहेत..माझे मागचे दिवस मला परत मिळणार आहे..माझ्या मुलाला त्याच्या वडिलाच बोट धरून चालायला शिकताना बघता येणार आहे मला....नाही ना.. तुम्ही कशीकाय अपेक्षा करु शकता मी तुम्हाला माफ करावे.." रीया रागात बोलत होती..
"सगळ ठिक होऊ शकत आताही वेळ गेलेली नाही रीया..मला माझी चुक कळलीय..पुन्हा असं नाही वागणार मी.." वरुण म्हणाला..
"काहीही ठिक होवू शकत नाही..आपल्या वाटा वेगळ्या आहेत..आपापल्या वाटेने चालण्यातच शहाणपणा आहे.." रीया म्हणाली..
"तू एकटीने कसं आयुष्य काढणार आहेस रीया..एवढं सोप्प आहे का..?"
"हा..हा..जोक छान करता येतात वरुण तुम्हाला..माझ्या एकटेपणाची काळजी करताय.?.जेव्हा गरोदर असताना घरातून काढून दिलंत त्यावेळी नाही आला हा विचार मनात.." रीया कुचेष्टेने हसत म्हणाली..
"तेव्हा नव्हतं माझं डोकं ठिकाणावर..प्रेमाचं भुतं चढलं होतं डोक्यावर..घरात येणाऱ्या सुखाला स्वतःच्या हाताने बाहेर काढलं मी.. म्हणून तर शीक्षा मिळाली मला.." बोलताना वरुण चे डोळे ओले झाले होते.
"आमच्या शिक्षेच काय....आम्ही मायलेकांनी कुठला गुन्हा केला ज्याची शिक्षा आम्ही भोगली..तुमची शीक्षा त्यापुढे फारच छोटी आहे.." रीया म्हणाली..
"चुका सुधारल्या जावू शकतात रीया...प्लीज विचार कर.." वरुण
"सगळ्या चुका नाही सुधारता येतं..आणि माझ्या जखमेवरची खपली काढायला परत नका भेटू मला..मी हात जोडते तुमच्या.." रीया म्हणाली..
"रीया निदान पिहुल चां तरी विचार कर ना..मला जवळ घ्यायचं आहे त्याला..लाड करायचे आहेत गं त्याचे .." वरुण
"तो अधिकार गमावला तुम्ही..मला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करु नका.." रीया म्हणाली..
"रीया प्लीज..."
"झालं असेल बोलून तर मी जावू का.. उशीर होतोय मला.." रीया म्हणाली तीने लगेच रिक्षा ला हात दिला..बसली आणि निघून गेली..वरुण हताश होऊन ती गेली त्या दिशेने बघत होता...तूषार त्यांना दुरुन बघत होता..तो घरी जायला निघालेला रीया बोलत दिसली म्हणून तो थांबून तीला बघत होता...त्याने हा वरुण असावा असा अंदाज बांधला..
रीया घरी गेली..पिहुल तीचीच वाट बघत बसलेला..तो धावत तीच्याकडे आला..तीने पिहुल ला जवळ घेतले तीला हुंदका अनावर झाला .. रडायला लागली.. त्याची आया जी घरी जायच्या तयारीत होती..ती रीया ला रडताना बघून थांबली..
"काय झालं रीया का रडतेस अशी.." रीया फक्त रडत होती पिहुल सुद्धा आता गोंधळून रडायला लागला.."
सूमन ने तीच्यासाठी पाणी आणले.."रीया हे पाणी घे...रडणं थांबव आता बघ ते लेकरु कसं गोंधळलं आहे.." ती रीयाच्या डोक्यावर थोपटत बोलत होती..रीया आता जरा शांत झाली..पाणी प्यायली..आणि पिहुल घ्या चेह-यावर प्रेमाने हात फिरवला..
"नाही पिल्लू रडायचं नाही..मम्मा आहे ना.." रीया त्याला घट्ट कुशीत घेऊन म्हणाली..
"रीया चहा करुन देऊ का गं तूला.." सुमन म्हणाली..
"नको ताई तुम्हाला उशीर होत असेल ना जायला .." रीया म्हणाली..
"तू ठिक आहेस ना..काही झालं आहे का.? का रडायलीस गं इतकं.." सुमन म्हणाली.
"काही नाही असं वाटलं माझ्या बाळाला घेऊन जातंय कुणी माझ्यापासून.." रीया पिहुलच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली..
"मम्मा मी नाही जाणार कुठेच तूला सोडून..तू घाबरू नको मम्मा मी आहे न.." तो तीचे डोळे पुसत धीर देत म्हणाला..
"शहाणं गं माझं बाळ ते .." ती त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली..
"बरं चल मी येते रीया..ठिक आहेस ना तू.." सुमन म्हणाली..
"हो ताई मी ठिक आहे..या तुम्ही.." रीया म्हणाली..तीने उठून बॅग ठेवली आणि फ्रेश व्हायला निघून गेली..ती वाॅशरुमच्या बाहेर येईपर्यंत पिहुल तीथेच उभा होता..ती फ्रेश होवून आली आणि किचनमध्ये गेली..सोबत पिहुल..
"काय हवंय माझ्या बाळाला खायला.." ती विचारत होती..
"आताच खाल्लं मम्मा मी ..भुक नाही आता मला.." पिहुल
तीने चहा करायला घेतला आणि दुसरीकडे कुकर लावले..पिहुल ला बिस्कीट खायला दिले कपात चहा गाळून तीने चहा घेतला..भाजी पोळ्या नंतर करता येईल म्हणून..तीने आधी तीच्या आई-बाबांना फोन लावला..पिहुल सोबत त्यांना बोलू दिले..नंतर पिहुलला टिव्हीवर कार्टून लावून दिले आणि ती बाबांना फोनवर सगळं सांगायला लागली...पण पिहुलच लक्ष टिव्ही कडे नव्हतच तो रीयाच बोलणं कान देऊन ऐकत होता..बाबांनी तीला फोनवर समजावले..
"त्याने काहि त्रास नाही दिला ना अजून..तसं काही झालं तर आपण पोलिस कम्पेंट करु..आणि तू घाबरु नकोस..नाहीतर इकडे येतेस का काही दिवस रहायला.." तीचे बाबा म्हणाले..
"नको बाबा वहिनीची डिलेव्हरी आली ना उगाच माझी अडचण नको.." रीया म्हणाली..
"त्यात कसली आलीय गं अडचण..पण बघं तू विचार कर.." तीचे बाबा म्हणाले..तीने बाबांसोबत बोलून फोन ठेवून दिला..
"मम्मा काय झालं ग..कोण वरुण मला का न्यायच म्हणत आहे..सांग ना मम्मा..." पिहुल तीच्या गालाला हात लावत म्हणाला..रीया मोठे डोळे करुन त्याच्याकडे बघतच राहिली..
"पिहुल तू माझं बोलणं ऐकत होतास..मी टिव्ही बघायला सांगितले होते ना तुला.." रीया त्याला कुरवाळत म्हणाली..तीला आता पिहुल ला काय उत्तर द्यावे तेच कळत नव्हते..
"पिहुल तूला कुणी भेटायला आले आणि म्हणाले की तूझा पप्पा आहे तर ..?" रीया पिहुल ला विचारु लागली..
"माझे पप्पा...कोण आहे ग.." पिहुल निरागसपणे विचारत होता..
"ते पप्पा म्हणवून घ्यायच्या लायकीचे नाहीत बाळा.." रीया त्याला समजावत म्हणाली..
"म्हणजे.."
"त्यांनी आपल्याला घरातून हाकलून दिले होते..परत कधीच भेटायला पण नाही आले.." रीया म्हणाली..
"दृष्ट आहेत मग फार..मी नाही बोलणार त्यांच्याशी कट्टी माझी.." पिहुल म्हणाला..
"हो रे बाळा फार दृष्टपणे वागले आपल्याशी..नाही माफ करुन शकत आपण त्यांना.." रीया म्हणाली..
"तूला सोडून कुठेच नाही जाणार मी मम्मा.." पिहुल म्हणाला..तो तीच्या मांडीवर डोकं ठेवून पडला..ती त्याच्या डोक्यात हात फिरवत होती..तीचा फोन वाजला म्हणून तीने फोनकडे बघितले तूषार चां होता..तीने पिहुल ला टि.व्ही. बघायला सांगून फोन रिसिव्ह केला..
"बोल तुषार."
"ठिक आहेस ना रीया..काय म्हणत होता वरुण..वरुणच होता ना तो..काय म्हणत होता.." तुषार म्हणाला..
"हो ..तूला कसं कळलं.." रीया म्हणाली..
"मी ऑफिसमधून बाहेर पडलो तर तुम्ही दोघं बोलताना दिसलात..मी थांबलो होतो तू रीक्षा घेईपर्यंत..पण ऐकायला आले नाही ..काय म्हणत होता तो.." तुषार म्हणाला..
"माफी मागत होता..आणि एक संधीही.." रीया म्हणाली..
"काय ठरवलस तू.." तुषार म्हणाला..
"त्याला माफ करणं माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे..मी नाही देऊ शकत त्याला संधी.." रीया म्हणाली..
"चीडला नाही ना तो.."
"नाही फार शांतपणे बोलत होता..त्याला गरज आहे ना आता..पण भीती वाटते काही करणार तर नाही ना तो..माझ्या पिहुल ला.." रीया म्हणाली...
"ते नको घाबरू काही नाही करणार तो..तू ठिक आहेस ना..रडली असणार ..हो ना.." तुषार म्हणाला..
"तूला कसं कळत रे सगळं.." रीया आश्चर्याने म्हणाली..
"कळतं ..आता इतक्या वर्षांची ओळख आहे.."
"चल मी ठेवते फोन..पिहुल झोपेल त्याला जेवण बनवून द्यायचय.." रीया ने फोन ठेवला..तीला तूषारच प्रेम कळतं होतं..पण एक्सेप्ट करायचं नव्हतं म्हणून ती अंतर ठेवून असायची त्याच्याशी..आजही तो पुढे काही बोलत नये तू टाळत होती त्याला पण कधीपर्यंत टाळणार होती..एक दिवस तर सामना करावाच लागणार होता..
क्रमशः
©® सरोज गावंडे