Sobati - 5 in Marathi Moral Stories by Saroj Gawande books and stories PDF | सोबती - भाग 5

सोबती - भाग 5

भाग ५


"चल मी ठेवते फोन..पिहुल झोपेल त्याला जेवण बनवून द्यायचयं.." रीया ने फोन ठेवला..तीला तूषारच प्रेम कळतं होतं..पण एक्सेप्ट करायचं नव्हतं म्हणून ती अंतर ठेवून असायची त्याच्याशी..आजही तो पुढे काही बोलत नये तू टाळत होती त्याला पण कधीपर्यंत टाळणार होती..एक दिवस तर सामना करावाच लागणार होता..


आता पुढे..


रीया च्या वहिनीला मुलगी झाली.. म्हणून रीया आज सकाळपासून तीच्या सोबतचं होती..पिहुल तर बाळाच्या अगदी अवती भवती...किती वेळा त्याला दुर हो म्हणाव लागत होतं..


"पिल्लू फार छोटी आहे ना रे ती..अजुन नाही खेळता येत तीला..आता फक्त दुरुन बघायचं हा तीला.." रीया त्याला समजावत होती..


"जरा मोठी झाली की तूझ्यासोबतचं खेळणार आहे ती.." त्याचे मामा म्हणाले..त्याचे आजोबा त्याला बाहेर घेऊन गेले..रीया वहिनीजवळ थांबून होती..सगळे अतिशय आनंदात होते..दोन दिवस वहिनी दवाखान्यात ॲडमिट होती... वहिनीला आई नव्हती..रीया तीच्याजवळ थांबून होती...पिहुल ला तीने आई-बाबांसोबत घरी पाठविले होते...दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळाला ..वहिनीला आणि बाळाला घरी आणले..


रीयाही पिहुल ला घेवून घरी आली..ती खुपचं थकली होती...काॅफी करुन घेतली आणि बाल्कनीत येऊन बसली..तीला जरा हलकं हलकं वाटतं होतं घरी आल्यावर..पण हा पिहुल...याला मामीच्या बाळाजवळच जायचं होतं..त्यासाठी हट्ट सुरु होता..तीने कसेबसे त्याला समजावले...किति प्रश्न विचारत होता.. म्हणाला आपण पण आणायचं आपल्या घरी छोटं बाळ..रीया ने कपाळावर हात मारुन घेतला..त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता देता रीया च्या नाकिनव यायचे..आणि लाडही यायचा..तो एकमात्र विरंगुळा होता तीच्या आयुष्यातला..


रीया आता अधूनमधून आईबाबांकडे बाळाला भेटायच्या निमित्ताने जावून यायची ..ती आपलं टेन्शन विसरली होती...ऑफिस घर आणि पिहुल यात पुर्णपणे व्यस्त झाली होती..


तुषार ला रीया सोबत बोलायचे होते..ती त्याला आवडते हे कबुल करणार होता..पण त्याची हिंमत होत नव्हती..रीया ने नकार दिला तर त्याला भीती वाटत होती..तरीही बोलणे गरजेचे होते ..तो योग्य संधीची वाट बघत होता..एवढ्यात रीयाची फार धावपळ सुरु असायची त्यामुळे त्याला रीयासोबत फारसे बोलायला मिळत नसायचे...रात्री त्यांचं व्हाॅटसॲप वर बोलणं व्हायचं पण अगदी फार्मल...पण रीया त्यातही आधी सारखी मनमोकळ बोलत नव्हती..काय झाले कुणास ठाऊक..तुषार ला कारण कळत नव्हते..पण तीच्याशी बोलल्याशिवाय त्याला झोपच लागत नव्हती...


आज ऑफिस ला जाताना रीया त्याला बसस्टॉपवर थांबलेली दिसली..त्याने गाडी थांबवली..रीयाही आढेवेढे न घेता बसली कारण तीलाही उशीर होत होता..दोघेही गप्पच होते..थोड्याच वेळात दोघेही ऑफिसला पोहोचले...तेही वेळेच्या आतच..


"रीया एक ना मला भेटशील का दुपारी ..जरा बोलायचं आहे तुझ्याशी.." तुषार म्हणाला


"काय रे काहि महत्वाचे आहे का.." रीया म्हणाली


"हो महत्वाचेच आहे..भेटशील ना.." तुषार तीच्याकडे बघत म्हणाला


"ओके.. लंच टाइम मध्ये..चालेल ना.." रीया


"धावेल.." तुषार हसत म्हणाला..दोघेही आतमध्ये गेले पंच करुन आपापल्या जागेवर बसले..तुषार मात्र मनातच तीच्याशी काय बोलायचं कसं बोलायचं याची जुळवाजुळव करत होता...रीया ला अंदाज आला होता तुषार ला काय बोलायचं आहे याबद्दल..पण कधीतरी तीला हे फेस करावच लागणार होतं..रीया आपला विचार दुर सारुन आपल्या कामात बिझी झाली..


"रीया...येतेस ना.." तुषार रीया च्या केबिनमध्ये येऊन तीच्या जवळ उभा राहत म्हणाला..


"आ..हो..हो..येतेय.." रीया जरा अडखळत म्हणाली..


"शील्पा मला जरा काम आहे..मी तुषार सोबत बाहेर जाऊन येते...तु लंच करुन घे.." रीया शील्पा ला म्हणाली..


"चल .." रीया ..तुषार तीच्या सोबत बाहेर आला.. गाडी काढयला लागला..


"अरे तुषार बोलायचे तर आहे ना जाऊया की जवळच गाडी कशाला.." रीया म्हणाली..त्याने तीच काहिहि न ऐकता गाडी तीच्यासमोर आणली..रीयाला त्याने एका रेस्टॉरंट मध्ये नेले..त्याने एक टेबल बुक केला होता..तीथे जावून बसला रीया लाही बसायला सांगितले..


"आधी जेवण मागवूया.." तुषार जेवणाची आर्डर देत म्हणाला..


"तू बोलना.. तोपर्यंत जेवण येईल.." रीया म्हणाली


"तू हल्ली बोलत नाहीस माझ्याशी व्यवस्थित.." तूषार


"असं काही नाही ..बोलत तर असते.." रीया


"नाही रीया बोलण्यातला वागण्यातला फरक लक्षात येतो..तूला कुठल्या गोष्टीचा राग आलाय का माझ्या.." तूषार


"नाहि रे..काही टेन्शन असेल म्हणून एखादं दिवस नसेल बोलले..तसंही मी आता जास्त बिझी होते ना वहिनीला बाळ झालं तर तीथेच होते काही दिवस.." रीया कारण देत होती.. तूषार च्या ते लक्षात आले..


"ठिक आहे.. राग नाही ना तूझा माझ्यावर मग काही हरकत नाही..बाकी कस चाललंय तूझं.." तुषार म्हणाला..


"हो ठिक चाललय.." रीया म्हणाली..


"वरुण ने परत काही त्रास नाहि ना दिला.." तुषार


"नाहि .." रीया..


"रीया तू पुढे काय ठरवलस.." तुषार म्हणाला..


"कशाबद्दल..?"


"तूझ्या आयुष्याबद्दल..किती दिवस एकटी राहणार आहेस.."


"मी एकटि कुठे आहे माझा पिहुल आहे ना.." रीया म्हणाली.. तेवढ्यात जेवण आले ...दोघांनी लंच केले..तुषार ला तीच्याशी बोलायचे असल्याने त्याचे जेवणाकडे तेवढेसे लक्ष नव्हते..जेवण संपल आणि आता त्याने बोलायला सुरुवात केली..


"रीया तु लग्नाबद्दल काय ठरवलस.." तुषार म्हणाला..


"काहीच नाही..तसा काही विचार केला नाही.." रीया


"कर ना...माझ्याशी लग्न करायचा.." तुषार तीच्याकडे बघत म्हणाला..


"तुला वेड लागलयं का तुषार..काहीहि विचार करु नकोस.." रीया म्हणाली..


"वेड कशाला लागायला हवं..सरळ सरळ प्रश्न केला मी माझ्याशी लग्न करतेस का.." तुषार तीच्याकडे आशेने बघत म्हणाला..


"तुषार मी डिव्होर्सी आहे एक मुलगा आहे मला तोही पाच वर्षांचा.." रीया थोडी रागात म्हणाली..


"रीया माहित आहे ग मला सगळं ..परत का सांगतेस.." तुषार शांतपणे म्हणाला..


"माहित आहे तर का असा विचारतोस..तूला चांगली मुलगी मिळेल.." रीया


"मला नको तूझ्या पेक्षा चांगली मुलगी तूझ्याशीच करायचं आहे मला लग्न.." तुषार म्हणाला..


"तूझ्या घरी माहित आहे का तू हा विचार करतोस ते.." रीया म्हणाली..


"आधी तूझा होकार ...नंतर सांगतो मी घरी.." तुषार म्हणाला..


"कसे मान्य करतील..उगाच स्वप्नांचे मनोरे नको रचु तुषार .." रीया म्हणाली..


"मी तूला आवडत नाही का रीया..खरखर सांग.." तुषार म्हणाला..


"आवडतोस एक मित्र म्हणून.." रीया..


"नवरा बायकोच नातं पण मैत्रीच असतं ना.." तुषार


"जबाबदा-या असतात त्या नात्यात ..एवढं सोपं नाही.." रीया


"जबाबदारी, विश्वास, प्रेम हे तर राहणारच गं ..आणि कुणासोबत पण लग्न केलं तरी हे सगळं आलंच..पण तू मला जास्त समजून घेशील.." तुषार म्हणाला..


"मला कुणावर विश्वास ठेवायला कठिण जाईल आता.. एकदा दुधाने तोंड पोळलं की माणूस ताकही फुंकून पित असतो..." रीया म्हणाली..


"सगळी माणसं सारखी नसतात...आणि तू ओळखतेस मला..असं बोलून माझा इन्सल्ट नको करु.."


"तूला दुखवायचा हेतू नहता तूषार माझा..आय ॲम साॅरी.." रीया खाली बघत म्हणाली..


"कळतंय मला रीया तुझ्या मनात काय सुरु आहे..आणि साॅरी नको म्हणू.." तुषार म्हणाला..


"तूला नाही कळणार तूषार..कसं एक्सेप्ट करतील माझ्या घरचे..तूझ्या घरचे सांग ना.."


"असं नको बोलू रीया..हवं तर मी तूझ्या आईबाबांकडे येतो तूला मागणी घालायला.." तूषार म्हणाला..


"मला नाही वाटत ते मान्य करतील.." रीया


"तू तूझा निर्णय सांग आधी..त्यांच्याशी मी बोलतो..आणि पिहुल ची काळजी नको करुस तो माझी जबाबदारी असणार आहे..त्याला मी वडिलांचं प्रेम देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार.." तुषार बोलला..

रीया तर ठरवून आलेली होती नकार द्यायचा ..पण तीची नकार द्यायची पण इच्छा होत नव्हती ..होकारही कसा देणार ..तीची द्वीधा मनस्थीती साफ तीच्या चेहऱ्यावर दिसत होती..


"रीया..तूला वेळ हवा आहे का विचार करायला.." तुषार म्हणाला..


"हो .. विचार करुन सांगते मी...." रीया त्याच्याकडे बघत म्हणाली...


"ठिक आहे...चल निघूया.." तुषार ने बिल भरले आणि तोपर्यंत रीया बाहेर आली होती..दोघे ऑफिसला पोहोचले..रीया खाली उतरली..


"रीया नीट विचार कर.." तूषार तीच्याकडे बघत म्हणाला..रीया ने होकारार्थी मान हलवली..आणि आपल्या केबीनमध्ये आली..तीचं कामात मन लागत नव्हते..काय उत्तर द्यावे तूषारला तीला कळत नव्हते..

सुटी झाल्यावर घरी जाताना तूषार दिसला पण तीने त्याच्याकडे बघायचे टाळले.. घाईघाईने ती घरी गेली...पिहुल तीची वाट बघत बसलेला होता..धावत येऊन तो तीच्या कुशीत शीरला.. रोजच्याप्रमाणे..


"काय काय केलंय आज पिल्लू ने..होमवर्क केला की नाही.." रीया त्याला जवळ घेऊन म्हणाली..


"हो मम्मा पुर्ण होमवर्क केला मी..आणि टिव्ही बघीतला.." पिहुल तीला सगळी माहिती देत होता..


"अरे व्वा .. शहाणं झालं तर आता पिल्लू.." रीया


"मम्मा आज जावूया ना आपण छोट्या बेबीला बघायला.." पिहुल तीला लाडीगोडी लावत म्हणाला..


"नाहि रे बाळा मी दमलेय ना..संडे ला जावूया हा आपण.." रीया त्याला समजावत होती..


"नाही मम्मा ..आज जावूया ना..मला खेळायचे आहे बेबीसोबत." पिहुल हट्ट करत म्हणाला..


"बेबी ला कूठे खेळता येत..छोट आहे ना अजून.." रीया म्हणाली..पण तो काही ऐकायला तयार नव्हता..रीया चां नाइलाज झाला ती पिहुल ला घेवून तीच्या माहेरी आली..त्याचा आनंद तर विचारायलाच नको..सारखं आपलं बाळाजवळ.. आई-बाबांना भेटून रीयाला आणि तीच्या आईवडीलांना आनंदच होतं असे..तरीही तीला सारखं सारखं येणं आवडत नव्हतं..


"पिहुल बाळ झोपलय ना आता तुही झोप बरं.." त्याचे आजोबा म्हणाले..


"नाही आजोबा.. मला अजून झोप नाही आली..बाळ पण उठणार आहे थोड्या वेळाने.." पिहुल बाळाच्या जवळच बसून होता..रीया ने पिहुलला जवळ उचलले...


"ते बेबी शहाणं आहे लवकर झोपत आणि सकाळी लवकर उठत चल तू पण झोप आता..उद्या स्कूल ला जायचं आहे ना.." ती जबरदस्ती त्यांच्या रुममधून त्याला बाहेर आणत म्हणाली.. आढेवेढे घेत तो झोपी गेला..रीया आईबाबांसोबत गप्पा मारत बसली होती..आजही तीच्या आईने तीच्या लग्नाचा विषय काढला..रीया च्या डोळ्यासमोर तूषारचा चेहरा आला..परत डोक्यात विचार सुरु झाले..मनात विचार येवुन गेला बरं झालं आपण इकडे आलो नाहीतर विचार करुन करुन उगीच डोक्याला मुंग्या आल्या असत्या..


मोबाईल हातात घेतला..नेहमीप्रमाणे तूषारचा मॅसेज होता..


"हाय.. काय करतेस. वगैरे त्यांच रोजच जुजबी बोलणं सुरु झालं..


"माझ्या प्रस्तावावर विचार केलास का.." तूषार


"नाही अजून वेळ नाही मिळाला.." रीया


"आता आहे ना वेळ कर ना विचार..मी वाट बघतोय उत्तराची.." तूषार..


"बरं करते.. पण यासाठी आधी फोन ठेवावा लागेल.." रीया..


"ओके..चल बाय.." तुषार


"बाय " रीया ने फोन बंद केला...आता खरंच विचार करावा लागणार होता..पहिला प्रश्न डोक्यात येत होता तो पिहुल चां..तूषार म्हणतोय खरा.. पण खरंच पिहुलला वडिलांचं प्रेम देईल का.?.आणि लोक काय म्हणतील हाही एक विचार होताच..पाच वर्षाचा मुलगा घेवून मी तूषारसोबत लग्न करणे हा किती चर्चेचा विषय असेल..? आणि माझे आईवडील होतील या लग्नाला तयार..? रीया रात्री ब-याच उशीरापर्यंत विचार करत होती..झोप तशीही उडाली होतीच.. उत्तर काही सापडत नव्हते..रात्री कधीतरी तीचा डोळा लागला..


दुस-या दिवशी ऑफिसला गेली..तूषार दिसला..त्याने डोळ्यांनीच विचारले..तीने नकारार्थी मान हलवत आपल्या केबिनमध्ये येऊन बसली...टेबलवर भरपूर कामाच्या फाईल्स पडल्या होत्या.. ती आली आणि कामात लक्ष घातले..


"रीया काल कुठे गेला होतात तू आणि तूषार.." शील्पा विचारत होती..


"ते जरा मला काम होत बाहेर.. म्हणून मी नेलं होतं तूषार ला.." रीया म्हणाली..


"रीया एक विचारू तुला.." शील्पा..


"तू कधीपासून परमिशन मागायला लागलीस.." रीया म्हणाली..पण हि काय विचारते म्हणून जरा भीतीही वाटली..


"तूषार प्रेम करतो ना तुझ्यावर.." शील्पा विचारत होती..


"मला नाही माहित..तूला कसं काय..." रीया अडखळत बोलली..


"कसं माहित..?..अगं त्याच्या डोळ्यात दिसत ते..तू नाही बघीतलस..? " शील्पा म्हणाली..


"नाही माहित मला.." रीया


"मग घे ना माहित करुन..तूषार एवढा चांगला जोडीदार तूला खरचं मिळणार नाही.." शील्पा म्हणाली..


"त्यानी विचारलं मला लग्नाबद्दल..पण माझाच निर्णय होत नाही आहे.." रीया ने आता खरखर सांगितले..


"मग तू कशाची वाट बघतेस रीया ..लगेच हो म्हणून टाक..आणि काय गं मी विचारल्यावर सांगतेस.." शील्पा चापटी मारत रुसल्याच नाटक करत म्हणाली..


"ऐ असं काय करतेस रीया..मला जरा ऑड वाटल सांगायला..मी डिव्होर्सी आहे..काय रीॲक्ट करशील असं वाटलं.." रीया मान खाली घालून म्हणाली..


"मी नाही हा विचार करत रीया..आणि तुही नको करुस..लवकर होकार देऊन टाक.." शील्पा म्हणाली..


"घरचे तयार होतील का ? हाही प्रश्न आहेच ना.." रीया म्हणाली..


"आधी तू तर हो म्हण..घरचे होतील ग..तुम्हा दोघांमध्ये नाव ठेवण्यालायक काही आहे असं नाही वाटत मला.." शील्पा म्हणाली.. बाॅस ऑफिसमध्ये आले तसे त्यांनी बोलणे थांबविले..आणि कामाला लागल्या..


रीया तीचं काम करत होती पण शील्पाच्या बोलण्याचा ती मनात विचार करत होती...क्रमशः

©® सरोज गावंडे

Rate & Review

Dhanashree Sawant
Harshada Bhalerao
Arati

Arati 2 months ago