Rutu Badalat jaati - 10 books and stories free download online pdf in Marathi

ऋतू बदलत जाती... - भाग..10







ऋतू बदलत जाती....१०.

ऋतू बदलत जाती...

"एवढ्या दिवसांमध्ये तुला नाही आवडला का तो..??" शांभवी.

त्या वाक्य सरशी महेशीची नजर खाली झुकली.

"अच्छा.. म्हणून तू माझ्या लग्नाच्या आधीच निघून गेली होती का?.." शांभवीचे शब्द क्रिश बोलत होता पण आता जणू त्या दोघींच बोलत आहेत असे वाटत होते.

*****************

आता पुढे....

तेवढ्यात सावीच्या रडण्याचा आवाज आला.. शांभवी आणि महेशी पळतच अनिकेतच्या रूमकडे गेल्या . शांभवी मध्ये गेली, पण महेशीचे पाय मात्र बाहेरच थांबले .शांभवी घेऊ शकत नव्हती, महेशी आत जाऊ शकत नव्हती आणि समोर अनिकेत तीला हातात हलवून हलवून उगी करण्याचा प्रयत्न करत होता, जे त्याला जमत नव्हते.

शांभवी महेशी कडे बघत होती की महेशी तिला घेईल, पण महेशी ती बिचारी विवंचनेत अडकलेली.. पण सावीचे रडणे वाढतच होते.
अखेर महेशी कडून रहावले नाही ,तिने एक दिर्घ श्वास घेतला अन ती आत मध्ये गेली.
"द्या तिला माझ्याकडे.." महेशीने रागात सावीला अनिकेत कडून काढून घेतले ,तो तर बघतच राहिला.

महेशीने तिच्या पोटात थोडं दाबून बघितले ,गॅसेस वाटत नव्हते."सर्व काही ठीक वाटतयं कदाचित तिला भूक लागली असावी "मग तिने तिचा डायपर चेक केला तर तो ओला लागला.

"बघ तुझे बाबा ...आले मोठे मी सांभाळतो...! पोरगी रडते कशामुळे तेही समजत नाही त्यांना...माझ्या बबडीच डायपर ओल झालं ..भुकू पण लागली थोडी थोडी...
बुद्धू आहेत ना बाबा..हो बुध्दूच आहेत... "
तिला वाटले अनिकेत बाहेर गेला. तो तर दरवाजात उभा राहून ऐकत होता.. आणि तिच्या शब्दा गणिक त्याचा पारा चढतही होता. ती सावीला घेऊन मागे वळली, पण दरवाजात त्याला बघून तिने एक मोठा आवंढा गिळला. त्याचा चेहरा रागाने लाल झालेला.

ती काहीच बोलली नाही .पटकन सावीला घेतलं आणि चटकन तिथून निसटली ,ती सरळ किचन मध्ये जाउन थांबली. सावीचं रडणंही थांबलं होतं,तिने सावीला प्रॅम मध्ये ठेवलं आणि तिच्यासाठी दूध बनवायला लागली.." सावी बेटा आता काही खरं नाही माझं... तुझ्या बाबांनी ऐकलं आपलं सर्व... जाम रागात आहे ते... आता हाकलून लावतील मला ते घरातून..."महेशी सावीशी बोलत होती.

शांभवी तिथेच होती, तिची बडबड एकूण शांभवीला हसू आले.. अनिकेत जिना उतरून खाली येत होता ,तोही किचन कडे आला ,महेशी काय करते ते बघायला... तिने सावीसाठी असलेल्या चांदीच्या ग्लासमध्ये थोडंसं दूध घेतल आणि सावीला ती कडेवर घेवून, किचन मध्ये गोल गोल फिरत हळूहळू पाजत होती.. सावीच्या पोटात पडले तशी ती हळूहळू खुलू लागली .आता ती हसत होती .महेशी वेगवेगळे आवाज काढत होती, आणि सावी हसत होती, तिला हसतांना बघून अनिकेतचा राग कुठल्या कुठे पळून गेला.
त्याने त्या दोघींना डिस्टर्ब नाही केलं . तो परत रूम मध्ये जाऊन झोपला .जवळपास अर्ध्या तासाने सावी ही महेशीच्या खांद्यावर डोके ठेवून झोपून गेली. महेशीला आता प्रश्न पडला की आता सावी ला कुठे झोपवायचं ?आपल्याजवळ झोपवल तर अनिकेतला आवडणार नाही.. पण मग त्याच्या रूम मध्ये कसं जायचं..." ती अनिकेतचा रूम जवळ गेली. पण तो बेडवर झोपलेला होता..." आत मध्ये जाऊ की नको.. जाऊ ..काय करू ...?" ती दरवाजातूनच परतत होती तेव्हा अनिकेतने तिला आवाज दिला .
"मी जागी आहे ठेवा सावीला त्या पाळण्यात...आणि थँक्स ..."अनिकेत.

ती सावीला झोक्यात ठेवून वळतच होती की त्याने परत आवाज दिला.

"आणि हो ...माझ्याबद्दल माझ्या सावीला काहीबाही सांगू नका.. "अनिकेत.

महेशीने मागे वळून न बघता फक्त मान हलवली, आणि तिथून निघून गेली,ते सरळ क्रिशच्या रूम मध्ये जाऊन थांबली.

"देवा..!! शांभवी तुझा नवरा जाम डेंजरस आहे.."महेशी धापा टाकत बोलली.

"मॅडम.. पुढे तो तुमचाही नवरा होणार आहे.. तेव्हा सांभाळून राहा.. "क्रिश मस्करीच्या सुरात बोलला.

"शांभवी आहेना इथं.."महेशीने त्याच्या मस्करीकडे दुर्लक्ष केलं.

"हो इथेच आहे ती ...आम्ही तुझीच वाट बघत होतो."क्रिश.

"काय बोलत होतात तुम्ही.."महेशी.

"शांभवी म्हणते... तिला लवकरात लवकर इथून मुक्त व्हायचेय....तर आपण अनिकेतला सर्व सांगून टाकू.. आणि तुमचं लवकरात लवकर लग्न लावून टाकू..."क्रिश.

"तिला का एवढी घाई झाली आहे मला सोडून जायची...? सांग तिला मी नाही करणार तुझ्या नवऱ्याशी लग्न.."महेशीला जरा रागच आला.

"हे बघ महेशी... आपल्यामुळे क्रिश ही अडकून पडला आहे ,त्यालाही त्याचे काम असतील... हे सर्व लवकरात लवकर झालं तर चांगलंच आहे ना.."क्रिश जसाचे तसा बोलला.

"हा तुझ्या त्या वाघाच्या तोंडी मला देऊन तुला मुक्त व्हायचंय का...??" महेशी.

"रियली.. महेशी वाघ....!! हा हा हा !! शांभवी आणि क्रिश दोघेही हसायला लागले.

"मगाशी बघायला पाहिजे होतं तुम्ही... काय राग होता बापरे ...! चेहर्‍यावरचे हावभाव.!. डोळे लाल झालेले ..! मी सटकले तेथून नाहीतर माझं काही खरं नव्हतं. वाटलं आता घराबाहेर काढता की काय..."महेशी.

"तू बोललीस तस होती त्यांना... बुद्धू... म्हणे काहीही महेशी..."शांभवी .

"बुद्धू नाहीतर काय...! पोरगीच डायपर ओलं झालं आहे ....तिला भूक लागली आहे... आणि हे नुसते हातात घेऊन तिला उलूलू करून राहिलेत ..."महेशी.

"नाही होती सवय त्यांना महेशी ...ते फक्त तिच्या सोबत खेळायचे ... कामचं एवढी होती त्यांना... की या सर्व गोष्टींकडे बघायला त्यांना वेळच नव्हता ...रात्री मी सुवर्णा आणि आजी आम्हीच सांभाळायचो सावीला.... अनिकेतला रात्रीची झोप आवश्यक होती... म्हणून आम्ही तिला खालीच घेऊन थांबायचो... दिवसभर त्याला खूप दगदग व्हायची.. रात्रीची झोप नीट व्हायला पाहिजे म्हणून आम्ही त्याला नाही उठायचो... शांभवी चे डोळे भरून आले.."शांभवी.

".."महेशी.

'आपण मूळ मुद्द्याकडे जायचं का.."क्रिश.
शांभवी ने तिचे अश्रू पुसले आणि तिने मान डोलावली.

"तर महेशी .तुला तर माहितीच आहे की शांभवी चा एक्सीडेंट हा निव्वळ योगायोग नव्हता.... तो कोणी घडवून आणला होता.. म्हणजे एक तर त्याचे शांभवीशी वैर असेल किंवा अनिकेत शी तरी... तर शांभवीच्या एक्सीडेंट मागे त्या व्यक्तीचा काय हेतू होता आणि कुणी केलं... हे आपल्याला बाहेर काढायचं आहे... तोपर्यंत तरी.. मला असं वाटते की आपण अनिकेत आणि महेशीच्या लग्नाची घाई करू नये.."क्रिश.

"हम मलाही तसंच वाटतं... आदीती मध्येच बोलली.

"अरे पण तू... तू किती दिवस असा येथे थांबणार ... तुला तुझे काम असतीलच ना..." शांभवी.

"मॅडम तुम्ही भेटला नसता ...तर आतापर्यंत आम्ही वर जाऊन रसगुल्ल्यावर ताव मारला असता..."क्रिश.

वर कुठे.." महेशीला प्रश्न पडला.

"स्वर्गात म्हणून राहिले आहेत.. राव .."अदितीने मध्येच चोच टाकली.

"काय ...!! पण कस काय कशासाठी.."महेशी गोंधळली.

"सुसाईड करणार होते राव..."अदीती.

"अरे पण कशासाठी..आणि तुला कसं माहिती....?"महेशी.

"सोड ना ते... मी नाही जाते कुठं.. मी इथेच आहे...यार ...! परत परत तुम्ही मुद्यावरून भटकवू नका तर मला.."क्रिश.

"बोलं..."अदीतीने नजरेने महेशीला चुप रहा सांगितले आणि क्रिशला बोलली.

"हा तर.. आजी सांगत होत्या त्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे ....त्या नंबर विषयी माहिती मिळवण्याचा.. आणि सुवर्णाच्या वर ही एक माणूस पाळत ठेवला आहे... बघू ती कुणाला भेटते का..?.."क्रिश.

"मग अजून कळल नाही का त्यांना त्या नंबर विषयी.."महेशी.

"हम कदाचित तो पोलीस उद्या सांगेल.."क्रिश.

"बरं मला सांग शांभवी.. तुझा एक्सीडेंट ज्या ट्रकने झाला होता.... त्या ट्रक चा नंबर वगैरे काही तुझ्या लक्षात आहे का?... त्या ट्रकचा रंग काही खूण... काय लिहिलेलं ...काहीतरी लक्षात आहे का तुझ्या?..."क्रिश.

"हम एक होतं ...बुरी नजर वाले तेरा मुह काला.. "शांभवी.

"रियली ..बुरी नजर वाले तेरा मुह काला.. हा हा हा हा.. "क्रिश.

"पण शक्यतो... स्लोगन ट्रकच्या मागच्या साईडला असतात ...टक्कर तर पुढून झाली असेल ना..?हे पुढे कस काय..? अदितीला मध्येच एक धागा.. सापडला..

"हम क्रिश ..आदिती बरोबर बोलते आहे.. असले स्लोगन्स तर फक्त ट्रक च्या मागे असतात.. पुढे नाही ....म्हणजे हा ट्रक नक्की वेगळा असेल.."महेशी.

"शांभवी तुला अजून काही आठवते आहे का ..?नंबर अॅटलिस्ट स्टेट ..एम एच...का अजून काही आठवत असेल.. तर"क्रिश.

"थांबा हं..मी आठवून सांगते... "ती आठवायचे नाटक करत डोक्यावर बोट ठोकत होती.....अरे तुम्ही लोकांना काय गंमत लावली आहे का? तो ट्रक माझ्या अंगावर येत होता ...,मरणार होती मी तेव्हा ...मी त्याचा नंबर कसा बघू.."शांभवी.

"मग मगाशी स्लोगन कसा सांगितला.."क्रिश.

"नाही माहिती ..मी तो कसा वाचला ते."शांभवी.

"तुम्ही दोघेच काय बडबड करून राहिले आहात.. आम्हालाही सांगा ना... काय बोलणं चालू आहे ते..."महेशी.

" तिला काहीच आठवत नाही आहे.. ट्रक तिच्या अंगावर येत होता तर ती म्हणे मी
मी त्याचा नंबर कसा बघू.."क्रिश.

"बरोबर आहे तिचं..."महेशी.

"मग स्लोगन कसा दिसला तिला ...आदिती मध्येच पचकली .
तेव्हा क्रिशने वळून तिच्याकडे बघितलं "ही चे विचार माझ्याशी किती जुळतात.."

"अरे यार तुम्ही तीन गोप्या... मध्ये मी एकटा कृष्ण अडकून पडलो..."क्रिश.

"तू कृष्ण काय.. आम्ही गोप्या काय .."आदिती त्याला मारायला धावली.
अहो जावो वरून आता ते मुरलेल्या मित्र मैत्रिणी सारखे बोलत होते.

"अरे तुमचं चालू आहे काय ...घरात सर्वजण झोपले आहेत ..आणि एवढ्या रात्री मस्ती करणं शोभतं का तुम्हाला... चला डिस्कशन झाले असेल तर झोपा ..." महेशीने दोघांना तंबी दिली.

"अरे पण अनिकेतला हे सांगायला पाहिजे.... शांभवीच्या एक्सीडेंट बद्दल ....अदीती बोलली मधेच.

"हम मलाही तसंच वाटतं ..म्हणजे त्याचे कोणते शत्रू असतील तर त्याला समजेल तरी.."महेशी.

"मला वाटत त्याला यात नको घ्यायला ....आपण सर्व क्लिअर करू.. मग त्याच्याशी बोलू.... म्हणजे शांभवी ईथे आहे... हे जर त्याला कळलं तर तो डिस्टर्ब होईल..आणि कदाचित तो.. शांभवी तुला...नेहमीसाठी ईथ थांबयचा आग्रह करेल ....तो महेशीशी लग्न करायला तयार होणार नाही .. आधी महेशी आणि त्याच्यामध्ये थोडीफार तरी फ्रेंडशिप होऊ दे... सावीला महेशीची किती गरज आहे त्यालाही पटू दे ...म्हणजे निदान तो थोडा मनापासून ह्या लग्नाला तयार होईल..
आता तो डिस्टर्ब आहे ....त्यामुळे तो शांभवीला त्याच्यापासून दूर जाऊ देणार नाही.. होप सो तुम्हाला माझं बोलणं कळत असेल ......"क्रिश.

" हो महेशी मलाही पटलं क्रिशच रिजन...अनिकेतला अजून नको कळायला पाहिजे शांभवी बद्दल ..... तिच्या ॲक्सीडेंट बद्दल ......."अदिती.

"अगेन...अदितीला माझा विचार पटला ... "तो मनातच बोलला.

ऋतू बदलत जाती...
आंबटगोड सरी...
बरसून येती....
ऋतू बदलत जाती...

*********

सर्व जन झोपायला जात होते तर..

"आदिती तू माझ्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतेस का.??."क्रिशने मागून आवाज दिला.

"तुझ्याशी जुळवून घ्यायला मला का तुझ्याशी लग्न करायचेय...!!"अदीती बेफीकरीने म्हणाली.

तिच्या ह्या वाक्यावर महेशी आणि शाम्भवी हसायला लागल्या. क्रिश बिचारा खजील झाला.

"नाही मला तसं नव्हतं म्हणायचं ..म्हणजे बघ ना आधी तूच म्हणत होतीस की ...अनिकेत ला सांगायला पाहिजे शांभवी बद्दल.... आणि आता मी बोलल्या नंतर तू म्हणतेस की ... त्याला नाही सांगितले पाहिजे.."क्रिश.

"हे बघ.. तुझं कारण मला पटलं म्हणून मी माझं मत बदललं.. दॅट्स ईट...."अदीती.

क्रिश कसनुकसं हसला.

आदिती रूम मध्ये निघून गेली.
"क्रिश तिच बोलणं मनाला लावू नकोस ती थोडी फटकळ आहे लगेच बोलते तोंडावर.."महेशी .

" महेशी तु झोप.. दोन वाजलेत रात्रीचे.."क्रिशने विषय वाढवला नाही.

महेशीचे आणि शांभवीचे पावले मात्र अनिकेतच्या रूमकडे वळले.
अनिकेत त्याच्या रूम मध्ये सोफ्यावर बसून सावीकडे बघत एक एक पेग रिचवत होता..
ते बघून दोघींची डोळे भरून आले . शांभवी ने आशेने महेशीकडे बघितले..

"सर तुम्ही झोपले नाहीत अजून....."महेशीने धीर एकवटून त्याला विचारले .

"ओ महेशी कम.. कम इन ..सीट हिअर.. "त्याला चढलेली वाटत होती .भरपूर नशेत होता तो...

महेशी दरवाजातून आत गेली, शांभवी मात्र आल्यापावली परत फिरली, तिला आता दोघांना एकट सोडायचं होतं..

"यु नो व्हॉट... महेशी ...शांभवी होती तेव्हा ती माझ्यावर रागे भरायची ..तुम्ही सावी कडे लक्ष देत नाही..म्हणून.....मग मी तिला मस्करीत म्हणायचो.. तू आहे ना..म्हणून मी माझ्या सावीला विश्वास ठेवून तुझ्या जवळ ठेवतो... मला माहित आहे तू तिची नीट काळजी घेशील..वेडी..!! चिडायची खूप....मला म्हणायची ..'सावी काय फक्त तुझी आहे...माझी ही आहे ती आणि तू तिला माझ्याजवळ ठेवतो म्हणजे काय ती माझीच आहे म्हणून ती माझ्या जवळ आहे..'
पण बघ ना ती सोडून चालली गेली तिच्या सावीला.. "तो शांत बसला बराच वेळ.

महेशी त्याला कसं समजवू हा विचारच करत होती की....

" राधाने सांगितला आहे मला... की शांभवी तुझ्यावर विश्वास ठेवत होती.. तू सावीचा नीट सांभाळ करशील म्हणून .. महेशी तू मला शिकवशील का सावीला सांभाळायला...."अनिकेत

महेश ने फक्त मान डोलावली.
"तुला एक सांगू ...मला ना प्रश्न पडतो ..राधाला कसं माहिती शाम्भवी बद्दल.. राधा शांभवीला सावीला भेटली आहे का...??.."अनिकेत.

त्याच्या ह्या प्रश्नावर महेशी दचकली तिच्या लक्षात आले, आपण मेसेज मध्ये शांभवी विषयी लिहिले आहे, पण अनिकेतच्या लग्नानंतर राधाचा त्याच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नव्हता मग .. ? काय बोलू तिला काही सुचत नव्हते.

"तुम्ही झोपून घेता का.. !रात्र खूप झाली आहे.."महेशी.

"नाही मी नाही झोपणार ..सावी उठली तर ...! मला तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.."अनिकेत.

"तुम्ही झोपून घ्या मी आहे इथं मी लक्ष ठेवेल तिच्याकडे.."महेशी.

"खरंच तू ठेवशील ना लक्ष तिच्याकडे..??" अनिकेत.

"हो हो मी ठेवले लक्ष ..मी घेईल काळजी तीची.. तुम्ही झोपा.."महेशी.

तो उठला, त्याचा तोल जात होता ,महेशी ची ईच्छा होत होती त्याला सावरायला, पण पुढे केलेले हात तिने मागे घेतले. तो कसतरी उठत बेडवर आला.

सावीचा पाळणा घेण्यासाठी ती बेडजवळ आली.

ती वळतच होती की त्याने तिचा हात पकडला..
ती शहारली .आतापर्यंत त्याने तिच्या मनाला स्पर्श केला होता ,पण आज प्रथमच तिच्या हाताला त्याने स्पर्श केला. तिने इकडे तिकडे वळून बघितले शांभवी तर नाही..!! पण असली तरी तिला थोडी च ती दिसणार ती.. कदाचित तिला वाईट वाटेल.. महेशीने तिचा हात पटकन सोडवून घेतला.

"तू तू सांगितले नाही ..राधा सावीला कशी ओळखते."अनिकेत.

तीने निश्वास सोडला.

"कदाचित असंही असेल ती तुमच्या आसपास असेल.. तिला तुमचा बद्दल माहिती असेल.. आणि कदाचित राधा हे तिचं खरं नाव ही नसेल..." महेशी.
"होप सो उद्या त्याला हे आठवणार नाही ..."ती मनात बोलली.

" हम मलाही असंच वाटतं.."अनिकेत.

"तू करशील का मला तिला शोधायला मदत.." अनिकेत.

"हम ..तुम्ही झोपा आता खूप रात्र झाली आहे ..."महेशी.

त्याने डोळे बंद करून घेतले .तिने सावी चा पाळणा हळूहळू ढकलत आपल्या रूम मध्ये आणला .तिच्या बेडजवळ ठेवून ती बेडवर पडली.

"अनिकेतला सांगू का मी ..?? की मिच तुमची राधा आहे म्हणून...नको.. नको.. कदाचित हा धक्का त्यांना पचवणे जड जाईल ..एवढ्या जवळ असूनही मी त्यांना अजून पर्यंत सांगितलं नाही ..कदाचित ते नाराज होतील माझ्यावर....
आधीच त्यांची मनस्थिती ही अशी.. .... सर्व गोष्टी सुरळीत झाल्या की.. मग हळुच सांगेल त्यांना.. हो हेच ..योग्य आहे... आता अॅटलिस्ट ते राधाचं तरी ऐकताय ..तिच्यावर जर नाराज झाले तर तीचही ऐकणार नाही... परत सर्व वीस्कटेल..."महेशी विचार करतच झोपली.शांभवीही तिच्या जवळच लेटली होती.

***

सकाळी अनुरागला जरा उशीराच जाग आली .तो उठून बसला झाला, पण त्याचे डोके ठणकत होते. त्याने उठून इकडेतिकडे बघितले मग त्याला अचानक आठवलं." सावी.. ती .. मी तिला माझ्या सोबत वर घेऊन आलो होतो.. कुठेय ती .."तो तसाच तडक उठला , खाली गेला. सावी मस्त सोफ्यावर उशांच्या अडकणात बसून हसत होती. आजी आणि क्रिश तिच्या सोबत खेळत होते.

त्याने एक सुस्कारा सोडला. पण माझ्या रूममधून हिला कोण घेऊन गेलं विचार करतच तो किचनमध्ये गेला ,मावशीला कॉफी सांगायला..

"मावशी एक थोडी स्ट्रॉंग कॉफी करता का..?
पण तिथे मावशी नव्हत्याच..
महेशी तू तू काय करतेस इथं..??"अनिकेतने परत भुवया गोळा केल्या.

"मी सावी साठी थोडीशी नागलीची लापशी बनवत होते ...तुम्हाला कॉफी हवी आहे ना ... देते मी..."महेशी.

"नाही नको मावशी करतील.."अनिकेत.

"मावशी बाजारात गेलेल्या भाजी आणायला..."महेशी.

" महेशी ...काल रात्री सावी ला माझ्या रूम मधून तुम्हीच घेऊन गेला होत्या ना..??"अनिकेत.

"हो.. "ती त्याच्याकडे न बघताच बोलली.
गॅसवर कॉफीसाठी पातेलं ठेवलं आणि गॅस सुरू केला.

"पण का ..घेऊन गेल्या तुम्ही तिला माझ्याकडून...?? कुणी सांगितलं होतं तुम्हाला...??" अनिकेत.

"रात्री तुम्हाला तरी तुमची शुद्ध होती का ..?" गरम पातेल्यात तिने दूध टाकल तसा चरररर आवाज झाला.
त्याच्या काळजात पण तसच चरररर् झाले... पुढे तो काहीच बोलला नाही .तसाच आल्या पावली मागे फिरला, आणि डायनिंग टेबल वर डोकं पकडुन बसून राहिला.

थोडा वेळाने महेशीने लापशीची ताटली आजीच्या हातात दिली आणि डायनिंग टेबलवर त्याच्या समोर कॉफीचा कप जवळजवळ दणकन आपटला, दोन-चार थेंब आजूबाजूलाही पडले.
अनिकेतने मान वर करुन रागाने तिच्या कडे बघितले, तरी तिने पोह्यांची ताटलीही तशीच त्याच्या समोर ठेवली.

"हिला काय झालं राग राग करायला ....
हो पिली मी थोडी जास्त... माझी मर्जी मी काही पण करेल..."अनिकेत स्वतःलाच समजवत होता.

तेवढ्यात त्याच्या मोबाईल वर मेसेज आला नाव बघताच त्याच्या चेहऱ्यावर किंचित स्मित झळकले.

"गुड मॉर्निंग अनिकेत कसे आहात..?? रात्री सावीने खूप त्रास दिला का...??"राधा.

"गुड मॉर्निंग ...नाही सावी रात्री माझ्याजवळ नव्हतीच..."अनिकेत.

"का कुठे होती ती ..?"राधा.

"ती.. शांभवीची मैत्रीण.. घेऊन गेली होती तिला.. तिच्याकडे.."अनिकेत.

"अशी कशी ती तुमच्या जवळून तुमच्या मुलीला घेऊन गेली ..."राधा.

आता मात्र अनिकेतला मेसेज करायला वेळ लागत होता काय सांगू तुला..

"हा अनिकेत तुम्ही आहेत ना तिकडे.??."राधा.

"हो आहे मी.. एॅक्चुली काल थोडी शांभवी ची आठवण येत होती तर.. जरा जास्तच घेतली होती... "अनिकेत.

"म्हणून शांभवीची मैत्रिण सावीला तिच्याकडे घेऊन गेली राईट...?"राधा.

"अम .हो.."अनिकेत.

"असे कसे तुम्ही ... तुम्हाला साविला सांभाळायचे आहे हे असेच नशेत राहून सांभाळणार का तुम्ही...??"

"साॅरी..!"

" असं खचून चालणार नाही... तुम्हाला स्वतःला स्थिर ठेवावे लागेल...आणि असं ड्रिंक केल्याने तुम्ही शांभवीला विसराल का...?? आणि मी म्हणते मुळात विसरायचच कशासाठी ....?? तिच्या छान छान आठवणी उलट तूम्ही साठवून ठेवायला पाहिजेत... जर समजा शांभवी तुमच्या आसपासच असेल आणि तुम्हाला बघत असेल ..तुम्हाला असं तुटलेलं बघून तीला किती त्रास होत असेल.... ती असती तर तिने तुम्हाला ड्रिंक करू दिलं असतं ...??" राधा.

"नाही ..कदाचित नाही.. तिला तर खूप राग यायचा मी थोडी जरी घेतली तरी..."अनिकेत.

"मग उद्या मला हे रिजन नकोय... "राधा.

"यप.. पण शांभवीच्या आठवण आली की मन व्याकुळ होतं मग तेव्हा मी काय करू.."अनिकेत.

"तेव्हा तूम्ही मला मेसेज करा... आपण मेसेज वर बोलू ...तुम्हाला जे वाटत असेल ते मला सांगा.."राधा.

"ओके ..."अनिकेत.

" राधा तुला एक विचारायचं होतं ..तू सावीला कशी ओळखते...म्हणजे ...लग्नानंतर आपला काही काँन्टक नाही.."अनिकेत.

बराच वेळ झाला पण राधा चा मेसेज आला नाही..

"राधा आर यू देअर.."अनिकेत.

"सॉरी अनिकेत पण मी शांभवीला ओळखते आधीपासूनच..आणि सावी बद्दल मला माहिती आहे..."राधा.

राधाच्या वाक्यावर अनिकेतला काहीतरी आठवले, रात्री तो बरळत होता. कदाचित महेशी सोबत तेव्हा असंच काहीतरी ती बोलली होती.

"म्हणजे तू इथंच जवळपासच आहेस का माझ्या...??.." त्याला काहीतरी वाटले ,तो उठला आणि चालत हळूहळू किचनकडे गेला..

"आधी नव्हते बरेच दिवस..,.ती टाईप करत होती पुढे..की तेवढ्यात दरवाजात तीला अनिकेत येतांना दिसला , तिने तसाच मोबाईल गॅस ओट्यावर ठेवून दिला.
अनिकेतने महेशी च्या हाताकडे बघितले तिच्या हातात गाजर होते..
"मी काहीही विचार करतो ...महेशी आणि..राधा ..??"तो तसंच परत फिरला.

बराच वेळ तो पोह्यांमध्ये चमचा फिरवत होता, मेसेज ची वाट बघत .. पण परत मेसेज आलाच नाही.

तो उठला त्याने सोफ्यावरून सावीला उचललं , तिला थोडा वेळ गार्डन मध्ये फिरायला घेऊन गेला.

"शांभवी मी काय म्हणतो ..आज तु ना अनिकेत सोबत त्याच्या ऑफिसमध्ये जा... तो जिथे जिथे जातो तिथे तिथे जा ...थोडं ऑब्जर्व कर... काही संशयास्पद वाटलं तर.. ते लक्षात ठेव.. आपण घरी आल्यावर त्यावर ठिस्कस करू..
मी आज त्या पोलिसाला भेटतो... काही माहिती भेटते का... तपास करतो.. "क्रिश.

***

"काल मी महेशीशी राधा बद्दल बोललो का??.... अजुन मी काय काय बोललो असेल तिला.. डोक्याला ताण देऊन थोड आठवायचा प्रयत्न करत होता ...पण त्याला जास्त काही आठवत नव्हते..

"मला तिच्याशी थोडं बोलावं लागेल... काही विचित्र तर नाही बोललो मी तिला ?? .. म्हणूनच नंतर तिला राग आला असेल का माझा..??सांगता येत नाही.."अनिकेत सावीला गार्डन मध्ये फिरवत फिरवत विचार करत होता.

***

अनिकेत ऑफिसला निघून गेला. त्याच्यासोबत शांभवीही गेली.

महेशीने सावीला अंघोळ वगैरे घालून छान झोपवून दिले.

"आदिती मी काय म्हणतेय ...आपण हॉस्पिटलला काहीच कळवले नाही आहे ....तू एक काम करते का... तू जाऊन येतेस का तिकडे....?? आपण दोघी इकडे आहोत तर पेशंट खोळंबले असतील तिकडे.."महेशी.

"अमं महेशी राहू दे ना तीला ईकडेच ...म्हणजे तिची इकडे तेवढीच मदत होईल तुलापण... "क्रिश कचरतच बोलला.

"अरे पण तिकडे हॉस्पिटल.. ?? त्या छोट्याशा हॉस्पिटल मध्ये आम्ही तीनच जण होतो.... आम्ही दोघी इकडे आहोत तर... तिकडे सरांवर सर्व भार पडला असेल... त्यात आम्ही त्यांना काही सांगितलेही नाही..."महेशी.

"अच्छा ..!! तुम्ही मला ॲड्रेस देता का तुमच्या त्या हॉस्पिटलचा.... मी करतो काहीतरी मॅनेज... पण अदितीला असू दे इथेच..."क्रिश.

महेशीने ऍड्रेस त्याच्या मोबाईल मध्ये सेंड केला.

"मी पाठवतो तिकडे कुणाला तरी ...नको काळजी करूस.."क्रिश.

"महेशीने फक्त मान डोलवली. आदिती त्याच्याकडे बघतच राहिली.

"असं काय बघताय मॅडम... आहे माझ्या तेवढ्या ओळखी ..मी करू शकतो मॅनेज....चला येताय ना माझ्यासोबत..."क्रिश.

"कुठे.."अदीती.

"हा कुठे...?? तु..तिला माझ्या मदतीसाठी थांबवले ना??"महेशीने भुवया उंचावल्या.

त्याने केसांतून हात फिरवला.
"ठिक आहे जा तुम्ही..."महेशी गालात हसली.

"अरे पण..कुठे..."अदीती अजूनही तिथेच होती.

" त्या पोलीसांकडे...."क्रिश.

ऋतू बदलत जाती...
धागे नवीन ......
जुळत जाती....
ऋतू बदलत जाती...

क्रमक्षः..
***********

भेटूया पुढच्या भागात...

©®शुभा.