Rabta - 10 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | राबता - अ क्रेझी लव्ह... - 10

राबता - अ क्रेझी लव्ह... - 10

एक व्यक्ती त्याच्या मिठीत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला बाजूला करून त्या व्यक्तीच्या कपाळावर दीर्घ किस करतो आणि परत त्या व्यक्तीला घट्ट मिठी मारतो...


थोड्यावेळाने ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या मिठीतून बाहेर येत " शुभम तुमची हालत अशी आणि तुम्ही होता कुठे , किती फोन केलेले मी तुम्ही उचलत पण नव्हता... कुठे होता तुम्ही.....आणि...."


शुभम धनश्री ( शुभम ची पत्नी...) च्या ओठांवर बोट ठेवत " श्श्श.... शांत हो ते मी नंतर सांगेन आधी आपल्याला इथून दूर निघून जावं लागेल... लवकर बॅग पॅक कर अताच्या आता निघाव लागेल लवकर...."


धनश्री प्रश्र्नार्थक नजरेने " अहो...."शुभम " धनु मला माहित आहे तुला खूप प्रश्न पडलेत पण आता सद्या ही वेळ नाही आहे.... मी सांगतो नंतर प्लीज आता मी सांगत आहे तस कर.... लवकर...."


धनश्री शुभम काही सांगणार नाही म्हणून जस तो सांगत आहे तस ती ऐकते... धनश्री पटकन बॅग पॅक करायला रूम मध्ये निघून जाते.....


इथे शुभम मनात " आता बस ते इथे येईपर्यंत आम्ही इकडून गेलो पाहिजे..."


मनात बोलून शुभम पण धनश्री ला मदत करायला रूम मध्ये निघून जातो.....


( पळालेला व्यक्ती शुभम होता.... आता शुभम ला का कीडनॅप करून ठेवलं होत ते कळेल हळू हळू....)
थोड्या वेळाने शुभम च्या बंगल्यासमोर....

तीन चार हट्टे कट्टे माणस शुभम च्या बंगल्याच्या गेट समोर उभे होते....


ते डायरेक्ट आत जाणार तर तिथे असलेल्या दोन वॉचमन नी त्यांना मध्येच अडवल....


त्यांना अडवल म्हणून मनोज ला राग आला ( हो ते मनोज आणि त्याचे साथीदार होते...जे त्यांना माहीत होत शुभम आधी त्याचाच घरी येईल....)


मनोज रागात त्या दोन वॉचमन ना " हे घुबड बाजूला हो मुकाट्याने जाऊ दे आम्हाला नाही तर बेकार हालत करेन समजल...."


त्यातला एक वॉचमन " घुबड मतलब हे तू मला शिवी दी क्या , तारी हिम्मत कैस हुइ मला शिवी देने को हा.... हे कौआ जास्त हिशियारी नाही करना नाही तो तारे को जमीन मध्ये गाढ़ेंगे समजे की नाही... "


मनोज त्याची अशी मिक्स भाषा ऐकुन पुरता वैतागला आणि चिडचिड लिमिटच्या बाहेर वाढलेली...


मनोज वैतागून " हे एक तर मराठी बोल , हिंदी बोल नाही तर यूपी बोल अस तिन्ही भाषा मिक्स करुन माझं डोक नको सटकवू समजल..."

दुसरा वॉचमन बोलतो " याला कधी कधी मध्ये असे झटके बसतात..."


मनोज प्रश्र्नार्थक नजरेने " म्हणजे...."


दुसरा वॉचमन " म्हणजे कधी शुद्ध भाषा बोलतात , तर कधी मिक्स भाषा बोलतात....."


मनोज वैतागून " मग याला शुद्ध भाषा बोलायला सांग काय हे मिक्स भाषा बोलत आहे.... ही मिक्स भाषा ऐकुन मी माझी भाषा विसरून जाईन...."


तस तो वॉचमन पहिल्या वॉचमन ला विचारतो " तू शुद्ध भाषा बोल...."


पहिला वॉचमन " कोणती...."


मनोज पटकन बोलतो " मराठी...."


पहिला वॉचमन " बोल पुत्र तुम्हाला कोणती सेवा पाहिजे?....."


मनोज मनातच कुठे फसलो म्हणून कपाळावर हात मारून घेतो....


मनोज वैतागून " मला तुमच्या मालकाशी भेटायचं आहे..."दुसरा वॉचमन " का ? ते नाहीत घरी...."


मनोज " आहेत घरी माहीत आहे तुम्ही खोट बोलत आहे...."


दुसरा वॉचमन " नाही आम्ही का खोट बोलू....आम्ही इथे यायच्या अगोदरच ते निघून गेले आता ते कुठे गेले ते माहीत नाही...."


मनोज ला तरीही त्या दोघांवर विश्वास बसत नाही " खर खर सांगा कुठे आहेत ते...."


दुसरा वॉचमन " खरच आम्हाला नाही माहीत...."


तरीही मनोज त्यांना सारखं सारखं विचारत होता....


मनोज ला अस सारख सारख प्रश्न विचारताना बघून पहिल्या वॉचमन ला खूपच राग येतो , त्यांच्या पूर्ण अंगात ज्वालामुखीचा उद्रेक होत होता....


पहिला वॉचमन ज्वालामुखीच्या रूपात मनोज ला " ये कावळ्या हा सांगत आहे ना नाही माहिती म्हणजे नाही माहिती तरीही कशाला सारखं विचारत आहेस... शहाण्या बाळासारख इथून निघा नाही तर ( वायर निघालेल्या एका मीटर कडे बोट दाखवत....) ते बघत आहात ना ती वायर तुमच्या या डोक्याच्या मधोमध घुसवेन समजल...."मनोज त्या वॉचमन चा रौद्र रुप बघून क्षणभर तो हादरला च.... त्याचा पूर्ण शरीर थरथरायला लागले होते....

मनोज मनात " शहाण्या बाळासारख निघाव लागेल नाही तर हा खरच डोक्यात ती वायर घालेल...."


मनोज त्या वॉचमन च्या अश्या बोलण्याने तो इमॅजिन करूनच त्याचे डोक सुन्न झाले होते , त्याच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता....


शेवटी मनोज काहीही न बोलता तिथून निघून गेला आणि त्याच्या पाठोपाठ त्याचे साथीदार आश्र्चर्यचकित होत तेही तिथून निघाले....


मनोज आणि त्याचे साथीदार थोड्या अंतरावर येऊन....

मनोज च्या साथीदार मधून एक साथीदार " बॉस तुम्ही अस कस तिथून निघून आलात त्यांना धमकी दिली असती तर पोपटासारख बोलले असते दोघ...."


मनोज वैतागून " हे त्या वॉचमन ची ती भाषा ऐकुन माझं मेंदू काम करण बंद झालंय आणि ते खरच त्यांनी ती वायर डोक्यात घातली असती तर , त्या वॉचमन चा रौद्र रूप बघून वाटत होत त्याने खरच ती वायर डोक्यात घातली असती....."एवढ बोलून मनोज वैतागून तिथून निघून जातो...
तस त्याचे साथीदार आपले हसू दाबत त्याच्या पाठोपाठ निघून जातात....
कारण त्यांना मनोजची अशी हालत बघून हसू येत होत त्यांनी कस तरी आपल हसू दाबल होत , नाही तर त्यांचं काही खर नव्हत....


तेज त्या अंधाऱ्या खोलीत येतो तर...

त्याच्या हाताखाली काम करणारी माणस खाली मान घालून थरथरत होते....

त्यांच्या कडे बघून समजत होत की काही तरी झाल आहे....


तेज सगळ्यांवर करारी नजर फिरवत थंड आवाजात " काय झाल असे उभे का आहात तुम्ही लोक...."


तेज च्या विचारण्याने कोणी काहीच बोलत नाही....


कोणाचं उत्तर नाही म्हणून तेज आवाज आणखी वाढतो तो जोरात ओरडत " काय झाल बोलणार आहात का ?...."त्यातला एक माणूस हिम्मत करून तेज ला उत्तर देतो....

तो माणूस एका दमात तेज ला " सर ही इस डेथ...."


डेथ शब्द ऐकून तेज चा चेहरा भयंकर तापतो...


तेज रागात " याला मारून टाकायला नाही सांगितलं होत मी.... हा एकच होता जो अन्वी पर्यंत पोहोचवणार होता.... याची शिक्षा तर तुम्हाला भेटणारच , याच्या सोबत तुम्ही पण जाणार आहात...."


तेजच्या बोलण्याने सगळ्यांचे शरीर एकदम ताठ झाले आणि डोकं एकदम सुन्न झालं....

त्यांनी मनोमन देवाला वाचवण्यासाठी प्रार्थना केली... त्यांना अस वाटत होत कोणी तरी यावं आणि या राक्षसाला थांबवाव....

आणि तसच झाल....

एक आवाज त्यांच्या कानी पडतो " थांब तेज...."

तसा तेज त्या व्यक्तीला चिडत " जिया मॅडम यांनी चूक केली आहे त्याची शिक्षा यांना भेटणार....."


तशी जिया त्याला रागानेच कानाखाली मारते....


तेज तिच्या कडे मारल त्या जागी हात ठेवून रागात " तुमची हिम्मत कशी झाली मला मारायची , हे नका विसरू मी तुमची मदत करतोय ती पण नाही करणार...."


जिया " नाही केली तरी चालेल , तुझ्या या फालतू वागण्याने अन्वी कधीच भेटणार नाही...."


तेज फालतू शब्द ऐकून आणखी तापला....

तेज रागात " मला फालतू बोलायची हिम्मत कशी झाली.... "


जिया पण तेवढ्याच रागाने तेज ला " तू आहेसच फालतू....अश्या रागाने तुझ डोकं बंद पडलं आहे समजल.... आणि तुझ्या सोबत राहून ( तिथे असलेल्या बकीच्याकडे बघत...) या लोकांचं पण डोकं बंद पडलं आहे....अन्वी आणि युग बद्दल माहिती नाही भेटली तरी त्यांचा फॅमिली ची भेटली होती तर त्यांना त्रास देऊन अन्वी आणि युग ला आपल्या कडे बोलावलं असत च ना...."जियाच्या बोलण्यावरून तेज शांत होतो.... कारण जिया बरोबर बोलत होती....तेज शांत बसलेलं बघून जिया त्याला " आता शांत का आहेस , त्रास द्यायला सुरुवात कर त्यांच्या फॅमिली ला...."


तेज " मग त्यांना कस समजेल की त्यांची फॅमिली त्रासात आहे...."जिया काही बोलणार तर कसला तरी आवाज येतो....

तसा तेज तोंडावर बोट ठेऊन सगळ्यांना गप्प राहायला सांगून तो दरवाज्याजवळ जातो आणि हळूच दरवाजा उघडून बाहेर बघतो आणि लगेच दरवाजा बंद करून जिया जवळ येतो....


तेज जियाला घाबरून " इथून पटकन निघाव लागेल आपण माझ्या बंगल्यावर जाऊन बोलू.... चला इथून पटकन.... "


जिया " अरे...."


तेज " मी सांगतो रस्त्यात ही वेळ बोलत बसायची नाही चला पटकन लवकर ( त्या मेलेल्या व्यक्ती ला बघून तिथे उभे असलेल्या साथीदारांना....) याला पण घेऊन चला पटकन...."


तेज च्या बोलण्याने सगळे पटकन मागच्या दरवाज्याने बाहेर येतात.... आणि तिथून पळून जातात....
क्रमशः


- भाग्यश्री परब