Rutu Badalat jaati - 18 books and stories free download online pdf in Marathi

ऋतू बदलत जाती... - भाग..18


ऋतू बदलत जाती...१८.

"नाही ती नॉर्मल वाटतेय..पण तु असं का विचारतेस..??"क्रिश गोंधळला.
.
"हुश्श..!!"महेशीने मनातच देवाचे आभार मानले बरं झालं शांभवीला काही दिसले नाही ते...

पण शांभवी ने या दोघांची कुसूरफुसूर ऐकली होती तिने हळूच नजर उंचावून वर अनिकेतच्या रूमकडे बघितले आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू उमटले.

***********

आता पुढे...

"हा विशाल मी येतोच..."क्रिश.
क्रिशला विशालचा फोन आलेला.

"हे क्रिश कुठे जातोय ... " शांभवीने त्याला अडवले.

"पुलीस स्टेशन...."क्रिश.

"हम्म चल मी पण येते.."शांभवी.

"काल महेशी तुला काय विचारत होती..?"शांभवी.

"तुझ लक्ष होतं तर.." क्रिश गाडी चालवत चालवत तिच्याशी बोलत होता.

"अनिकेतला समजले आहे महेशीच राधा आहे ते..."शांभवी.

"काय ..!! कधी..!! कसं समजलं त्याला हे..".क्रिश.

"काल अनिकेत ने महेशी ला हग केले होते.."शांभवी कारमधून दूर बाहेर बघत बोलली.

क्रिश ला आता समजत होते महेशी काल असं का विचारत होती.

"तुला वाईट वाटत असेल ना..??"क्रिश.

"हो वाईट तर वाटते आहे ..फारच वेगळी फिलिंग येतेय.. त्या दोघांसाठी चांगले पण वाटतेय आणि जलसही फिल करतेय..लवकरात लवकर हे संपावं असं वाटतयं...."शांभवी.

"हम लवकरच संपेल... शांभवी मला सांग तुला कुणाच्या अंगात वगैरे शिरता येता का ..??तशी पाॅवर आहे का तुझ्याकडे..??." तो सहज विषय बदलावा यासाठी बोलला.

"हाहा..क्रिश.. ट्राय नाही केल अजून पर्यंत... तुझ्या अंगात शिरून बघते मग...."शांभवी.

"ये नाही ह.."क्रिश.

" नाही आता मी शिरणारच..तु गेला..क्रिश... हा हा हा" शांभवी मुद्दाम हुन त्याला घाबरवत होती.

शांभवी मुद्दाम त्याच्या जवळ जात होती..

"हे नाही नाही.. नाही बघ.. गाडीचा तोल जातोय.. माझा ॲक्सिडेंट होईल बघ...तु आधीच वर गेलेलीए मला नाही जायचयं अजून...अदीती..!!"त्याने डोळे गच्च मिटून घेतले .

"हा..हा..हा..अदीती?सिरीअसली?" ती लांब होवून हसत होती.

"ओ भूतनी जीव घेशील ना माझा..."क्रिश.

"तू तर आधी सुसाईडच करणार होता ना ..?? मग आता काय झालं... आणि हे आदिती काय मॅटर आहे..हं.हं..हं ...सांग.." शांभवी त्याच्या हाताला बारीक-बारीक चिमटे काढत होती.

"ओके ओके.. सांगतो.. तू आधी चिमटे काढणे बंद कर ...आदिती इज द रीजन.." क्रिश थोडा लाजत बोलला.

"ओहो वाटलंच म्हणून ईतका वेळ सोबतच असता दोघं.." मग तिने सांगितलं का तू सांगितलं तिला.

"अजून कोणीच कोणाला काही सांगितलं नाही .. हे सर्व निरवले.. की मग सांगेल तिला..."क्रिश.

" अरे यार मी गेल्यावर कशाला ..मी असतांनाच सांग ना..."तिचे डोळे भरून आले ,ती थोडी भाऊक झाली.

"शांभवी प्लीज ...आपण मस्करी करत होतो ना?? नको भाऊक होवू यार... "क्रिश थोडा उदास झाला.

"नाही होत चल.. पोलीस स्टेशन पण आलं..." शांभवीने त्याला गाडी थांबावायला सांगितली.
दोघे आत मध्ये गेले.

"हा विशाल येऊ का आत ..??"क्रिशने दरवाजावर टकटक करत विचारले.

"हा ये ..क्रिश बस तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचं होतं... मला तुझी थोडी हेल्प लागत होती.."विशाल.

"कसली हेल्प..??" क्रिश .

"मला असं वाटतं ट्रक ड्रायव्हर ची फॅमिली कदाचित त्या ॲक्चुअल गुन्हेगाराने लपवून ठेवली आहे कुठेतरी... आणि त्या भीतीने तो बोलत नाही तर ...त्याला बोलतं करायला मला तुझी आणि शाम्भवी ची मदत लागेल .."विशाल.

"शांभवीची ..?? ती कशी मदत करेल..??"क्रिश.

"अरे ती भूत आहे ना... मग थोडा घाबरवू आपण त्याला.."विशाल.

"अरे ती कशी डेंजरस भुत नाही आहे... प्युओर सोल..ए ती..."क्रिश.
"अरे पण..."विशाल.

"तुझा पोलिसी खाक्या दाखव जरा ...एकदा त्याच्या समोर गन पकड ... ते मूव्ही मध्ये किती साऱ्या ट्रिक्स दाखवतात कुठली तरी युज कर... " इतके दिवस होऊनही विशाल त्या ड्रायव्हर कडून काही वदवून घेऊ शकला नव्हता, म्हणून क्रिश जरा वैतागलेला.

"अरे मूवी आणि रियल मध्ये फार फरक असतो..."विशाल.

" काय फरक असतो.. किती दिवस झाले तुझ्या हातात माणूस आहे.. तरी त्याच्या कडून काढून घेऊ शकत नाहीस...." क्रिश थोडा चिडला होता .

"एकच केस नाहीये मिस्टर क्रिश माझ्याकडे, अजूनही बऱ्याच केसेस आहेत ..तुमच्यासारखे अजूनही बाकीचे लोक इथे येतात.. त्यांची केस आधी पुढे सरकवा म्हणून.... सर्व बघाव लागत आम्हाला ...वरतून प्रेशर असतं ते वेगळंच..तुम्ही काय कामचुकार म्हणून मोकळे होतात.. पण रात्रंदिवस आम्हाला इतर राबावं लागतं ..ड्युटी करावी लागते ..खाण्यापिण्याची शुद्ध नसते, बरेच वेळा तर घरीही जाता येत नाही...." आता विशाल हि भडकला होता.

शांभवीने क्रिशला शांत थांबायला सांगितले.

"हा बोला काय प्लान आहे तुमचा.??." क्रिश

"म्हणजे हे बघा.. आपल्याला असं दाखवायचा आहे की.. शांभवी मॅडम तुमच्या अंगात शिरलेल्या .. आणि तुमच्याकडून त्या बदला घ्यायचा प्रयत्न करत आहेत.. त्या ड्रायव्हरला मारायला त्या जेलमध्ये आलेल्या.. असच काहीसं चित्र आपल्याला उभा करायचय .."विशाल.

क्रिशने शांभवीकडे बघितले ,ती खुसुर पुसुर हसत होते.

"अरे यार हे हाॅन्टींग बिंटींग पेक्षा दुसरे काही उपाय नाही आहेत का तुमच्याकडे..."?? गाडीमध्ये शांभवी ने फारच घाबरवले होते कदाचित त्याला.

"हे बघा क्रिश तुम्हाला फक्त ड्रामा करायचा आहे... त्या खरोखर तुमच्या अंगात थोडीच शिरणार आहेत... पण तुम्हाला त्या दिसतात ...तुमच्याशी त्या बोलतात.. त्या तुम्हाला सर्व काही नीट सांगू शकतील..."विशाल.

"अरे त्याला लगेच समजेल.. आपण ट्रिक करतोय काहीपण... तुझे डोके कुठल्याकुठे चालते..यार जरा पोलिसाचा डोक्याने विचार कर ना...
मला सांग त्याची फॅमिली कुठे आहे..?? फॅमिली बऱ्याच जणांचा विक पॉईंट असतो.. "क्रिश.

"त्याची फॅमिली मुंबईमध्ये आहे ..पण त्याच्या घरी कोणीच नाही भेटले.. मला वाटतं त्या गुन्हेगाराने याने तोंड उघडू नये म्हणून कुठेतरी त्यांना लपवलेलं असेल.."विशाल.

" एक काम कर.. मला त्या ड्रायव्हरजवळ घेऊन चल... मी बघतो कसं नाही बोलत तो..??"क्रिश.

"क्रिश हे असं नियमाच्या बाहेर आहे ..मी तुला असं नाही घेऊन जाऊ शकत त्याच्याकडे.."विशाल.

"तुला वरतून परमिशन पाहिजे आहे का..?? ती पण भेटून जाईल ..मला घेऊन चला त्याच्याकडे डोन्ट वरी तुला काहीच ट्रबल होणार नाही.."क्रिश.

हो-नाही करत करत विशाल क्रिशला त्या ड्रायव्हर कडे घेऊन गेला .त्याने हवालदाराला बाहेर थांबायला सांगितले,शांभवी ही त्यांच्यासोबत आत मध्ये गेली.
शांभवी ने त्या ट्रकवाल्या कडे बघितलं तिला तो चेहरा कुठेतरी बघितल्या सारखा वाटला.

" साहेब मी तुम्हाला आधीच सांगितले आहे आणि आताही तेच सांगतो...। ऍक्सीडेन्ट... ऍक्सीडेन्ट होता चुकून वळणावरती मला नाही लक्षात आलं... तुम्ही माझा जीव घेतला तरी ..मी हेच सांगणार ..." विशालने विचारायच्या आधीच तो ड्रायव्हर बोलला जणू काही त्याने निश्चय केला होता ह्या व्यतिरिक्त दुसरं काहीच न बोलण्याचा.

"मला माहित आहे तू हे सर्व का बोलत आहेत पण जर तुझी फॅमिली सेफ राहिली तर तू खरं बोलशील..??" क्रिशने त्याला एक प्रश्न केला.

"मी खरच बोलतोय साहेब.." त्या माणसाचा हा पोलिसावर बिलकुल विश्वास नव्हता.

"विशाल तुझी बंदूक दाखवत रे .." क्रिश.

विशाल देवू की नाही देवू असं करत होता ,त्याला भीती वाटत होती ,हा क्रिश काही गडबड ना करे..

"देतोस ना विशाल.." क्रिशने त्याच्याकडे रोखून बघितले.विशाल जाणून होता क्रिश कोण आहे ते..

विशालने घाबरतच त्याच्या हातात बंदूक ठेवली. "कोणती ट्रिक करतोय काय माहिती..?? बाबा क्रिश गोळी नको चालवू प्लिज....मला एका एका गोळीचा हिशोब द्यावा लागतो..." तो मनातच बोलत होता.

"हे बघ माझ्या हातातील बंदूक बघतोस का..?? जर मी एक गोळीच मारली... तर तू वर जाशील... आम्ही तुझ्यावर नाही नाही ते गुन्हे टाकून तुझा एन्काउंटर केला असं दाखवू...तुझी फॅमिली वनवन करत भटकेल मग..." क्रिश.

"साहेब मला मरणाची भीती नाही ..तुम्ही खुशाल चालवा ती गोळी माझ्यावर .."तो ड्रायव्हर टस कि मस झाला नाही .विशाल ला हसू फुटलं पण त्याने तोंडावर हात ठेवून बळेच कंट्रोल केलं.
" आला मोठा मूव्ही मधल्या ट्रिक्स वापरणारा..."विशाल ओठातच पुटपुटला.

क्रिश त्याचं हसू बघून अजून जास्तच चिडला, त्याने ड्रायव्हरच्या कानाखाली मारली, तरीही तो न घाबरता तसाच बसलेला होता , शांभवीलाही बिचार्‍या क्रिशची दया आली.

"मी ट्राय करू का..?" शांभवीने विचार केला.ती क्रिशच्या अंगात शिरायला त्याच्या पाठीमागे गेली आणि ती पाठीमागून क्रिशला धडकली.

"काय करतेस शांभवी..?? जरा थांब ना .."क्रिश.

"शांभवी मॅडम पण इथेच आहेत..??" विशाल घाबरत बोलला.

" हो ती पण इथेच आहे..."क्रिश.

ड्रायव्हर मात्र हसत होता त्याला वाटलं अजून कुठलीतरी नवीन ट्रिक हे करून राहिले आहेत.

"काय साहेब..!!; आता शांभवी मॅडमचं भूत सांगून मला घाबरणार आहात का..??"ड्रायव्हर.

"घाबरत नाही आहे.. त्या आहेत खरच ईथं.." विशाल बोलला.

शांभवी अजूनही मागून त्याला धडक देत होती.

"शांभवी तू काय करण्याचा प्रयत्न करतेय.. ??शांत बस ना जरा..." क्रिश वैतागून बोलला.

अखेर शांभवीने तिचं डोकं त्याच्या डोक्याला मागून मारलं आणि त्याबरोबर काहीतरी फरक झाला क्रिश क्रिश उरला नव्हता.

" येयेये .क्रिश... क्रिश बघ मी करून दाखवलं ऐससस...मी करून दाखवलं ..मी..अंगात घुसली माझ्याकडेही पाॅवर आहे क्रिश येसऽऽ येसऽऽऽ..." क्रिश विचित्रपणे ओरडत होता विशालची अजूनच फाटत होती .

"क्रिश ! नाही... नाही ..मॅडम..!! ड्रायव्हरशी बोलतात ना तुम्ही..."विशाल.

"ओ.. हो मिस्टर विशाल..! ड्रायव्हर कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही मला उडवलं तुमच्या त्या विचित्र ट्रकने..."क्रिश.

"अरे बाबा छान ॲक्टींग करता तुम्ही ..पण जरा कॉमेडी नाही वाटत का ती ..??.मी घाबरलो नाही बुवा .."ड्रायव्हरही फारच मुरलेला माणूस होता.

क्रिशने विशाल कडे बघितले ,विशाला मात्र भीती वाटत होती.

"आठव शांभवी आठव ...काहीतरी असा काही तरी..आठव त्याच्यामुळे त्याला खरं वाटेल की तूच आहे जिला त्याने मारलं होतं..." ती विचार करत होती.

"कितीला विकलं गेलं होतं ते डायमंड मंगळसूत्र... जे त्या दिवशी तु माझ्या गळ्यातून ओरबाडून काढलं होतंस... रक्ताळलेल्या त्या छिन्न विछीन्न देहाची जराही किव नाही आली का रे तुला... ??क्रिश उठला आणि त्याने ड्रायव्हरची कॉलर पकडली आणि त्याच्या गालात एक लगावली....
" माझा हात कापलास ..हातातून सोन्याच्या बांगड्या काढल्या तुने... ऐवढी हैवानियत करताना तुला तुझ्या आया बहिणींचा चेहराही समोर नाही आला का रे.. "परत त्याने त्याच्या कानाखाली मारली..." माझी सहा महिन्याची पोर घरी रडत होती.. तुला तुझ्या मुलांची पण आठवण नाही आली का रे ?एवढा नीच कृत्य करताना...!!!!" आता तो ड्रायव्हर थरथर कापत होता, त्याला कळलं होतं ही शांभवी च आहे.. कारण एवढ्या रात्री तिथे कोणीच नव्हतं...

मघासपासून वाटत होतं मी तुला कुठेतरी बघितलं आहे.. मी जेव्हा माझ्या देहातून उठले ना ...तेव्हा मी हेच बघितलं होतं.. आता तरी सांगशील कोण आहे तो.."क्रिश...

"मॅडम ..मॅडम.. मी सांगतो मला काही करू नका त्यांनी माझ्या फॅमिलीला कोंडून ठेवलय कुठेतरी ..."ड्रायव्हर.

"तू त्यांची नाव सांग.. आम्ही त्यांना सेफली सोडवू.. माणूसकी तू जरी विसरला असला तरी आम्ही विसरणार नाही..."क्रिश.

त्याने विशालला त्या माणसांची नावे सांगितली.


ऋतू बदलत जाती...
कोवळ्या उन्हात.
दाट धुक्यातले चेहरे...
दृष्टीस येती....
ऋतू बदलत जाती....

क्रमक्षः..

भेटूया पुढच्या भागात...

©® शुभा.