Rutu Badalat jaati - 21 books and stories free download online pdf in Marathi

ऋतू बदलत जाती... - भाग..21



ऋतू बदलत जाती....२१

"शांभवीची इच्छा... मी राधा शी लग्न.. मी राधा शी लग्न..." आता त्याला खूप चढली होती, झोप त्याच्या डोळ्यात आली होती.. तसा सोफ्यावर तो आडवा झाला .शांभवीने एक उसासा सोडला. तिने त्याच्या केसातून हात फिरवला , त्याचे पाय सरळ करून क्रिश च्या रूम मध्ये निघून आली. तिने परत क्रिशच्या शरीराबाहेर निघण्याचा प्रयत्न केला. तिने आधी डोकं बाहेर काढले ...आणि ह्यावेळेला तिला ते जमलंही ती क्रिशच्या शरीराबाहेर निघालेली होती....

************
आता पुढे...

सकाळी अनिकेतला जाग आली, उठून बघतो तर जवळपास नऊ वाजलेले होते. तो खाडकन सोफ्यावरून उठला आणि लगेच फ्रेश होऊन , पोलीस स्टेशनला जायला निघाला, त्याने नाश्ता केला नाही म्हणून आजी मागून ओरडत होत्या ,पण त्यांच्याकडे लक्ष न देता तो तसाच बाहेर पडला.

शांभवी आणि क्रिश त्याच्या थोडावेळ आधीच पोलिस स्टेशनला निघून गेले होते.

रस्त्यामध्ये शांभवी ने क्रिशला सर्व सांगितले ,काल ती कशी त्याच्या शरीरात शिरली होती ..आणि त्या ड्रायव्हर कडून तिने कसं त्या दोघांची नावं वदलून घेतली सर्व ...

"शांभवी तू माझ्या शरीरात कसं काय शिरली ...?? मला कसं नाही समजलं ते....??"क्रिश.

"आता दाखवू का शिरून ...."शांभवी हसत बोलली, तिला क्रिश ची मस्करी करायची होती.

"नाही नको... मी असाच ठीक आहे .."क्रिश थोडा घाबरला.

ते दोघे पोलिस स्टेशनला पोहोचले ,तेव्हा विशाल घाईत गाडीत बसून कुठे तरी जात होता .क्रिशने त्याला बघितलं.

"विशाल अरे कुठे निघालास ..??"क्रिश.

"त्या दोघांचा ठीकाणा समजला आहे.. तिकडेच निघालोय ....." विशाल जास्त काही न बोलता गाडीत बसला. क्रिशनेही मग त्याची गाडी विशालच्या गाडीमागे घेतली.

तेवढ्यात अनिकेतही तिथं पोहोचत होता त्याने क्रिशला विशालच्या मागे जाताना बघितलं ,तोही त्याच्या मागे निघाला.

"क्रिश ...विशालच्या मागे काय करतोय ...???त्याचा तर ह्या सर्वांशी संबंध नाही..??..का क्रिशच आहे मेन कल्प्रिट..?? अनिकेतच्या मनात वेगळ्या शंका येत होत्या. तो सरळ क्रिला फोन करूनही विचारू शकत नव्हता.
तो तसाच त्याचा पाठलाग करत राहिला.
विशाल एका अगदी विरळ लोकवस्तीच्या भागाकडे जात होता. तिथे डोंगराळ भागात काही दहा बारा झोपड्यांचे पाडे दूर दूर अंतरावर दिसत होते.
अजून दोन चार किलोमीटर आत गेल्यावर त्यांना एक मोठंसं पण झोपडीवजा घर दिसलं..

"सर आम्ही मागच्या नाक्यावर त्यांची गाडी बघितली होती ...हा रस्ता पुढे जातो...तिथे त्या पुढच्या नाक्यावर ती क्रॉस झालेले नाही...आणि काल ह्या घराकडे ती लाल गाडी आली होती... असं ईथे पाड्यावर राहणाऱ्या लोकांनी सांगितलं... "एक पोलीस हवालदार बोलला.

"ही जागा संशयास्पद तर वाटतेय...... पण त्यांची गाडी इथं कुठे दिसत नाही ??..." विशाल ईकडे तिकडे नजर टाकत बोलला.

क्रिश त्यांचा संवाद ऐकत होता .

"मला वाटतं आपण त्या समोरच्या घरात जाऊन बघायला पाहिजे....."क्रिश.

"मिस्टर क्रिश ...तुम्ही कुठलही असं धाडस करणार नाही आहात... मी आर्म फोर्स ला बोलवलं आहे.. ते पोहोचले की मग आपण पुढचं पाऊल उचलू..."विशाल.

अनिकेतही तिथे पोहोचला अनिकेत क्रिशकडे संशयाने बघत विशाल कडे गेला.
"मिस्टर विशाल हा क्रिश इथं काय करतो आहे ...??"अनिकेत.

"काळजी करू नका सर ...ते आपल्याला मदतच करत आहेत.."विशाल.

"इथं काय सुरू आहे..?? तुम्ही इथं का थांबले आहात ...??"अनिकेत.

"मिस्टर अनिकेत... समोरच्या घरात कदाचित ते दोघं लपलेले असतील.. मी माझ्या फोर्सची वाट बघत आहे..."विशाल.

"ते दोनच आहेत ना ...!! मग आपण पुरेसे आहोत ना त्यांना..??" अनिकेत पुढे जात म्हणाला. तेवढ्यात विशालने त्याचा हात खेचून मागे ओढले.

"मिस्टर अनिकेत... ते आत मध्ये दोनच जण आहेत कशावरून ...?? आणि त्यांच्याकडे वेपन्स असले तर.. मी माझ्या माणसांचा जीव असा धोक्यात टाकू शकत नाही..."विशाल.

अनिकेतला समजलं तोही थोडा शांत उभा राहिला, पण अधून मधून त्याची नजर क्रीशकडे वळतच होती.

वीस एक मिनिटं वाट बघितल्यावर सशस्त्र फोर्स पण तिथे आली. त्यांनी त्या घराला सर्व बाजूंनी वेढा दिला. विशाल दबकत दबकत पुढे चालत होता ,तसा त्या फोर्सचा घेराही पुढे पुढे सरकत होता.
विशाल दरवाजा जवळ आला त्याने हळूच दरवाजा ढकलला आणि एक दगड आत मध्ये भिरकावला, पण आतून कसलीच हालचाल जाणवली नाही. त्याने एक पाय आत ठेवला तरीही काही हालचाल जाणवली नाही, तो पुर्ण आत मध्ये शिरला.. त्याच्या पाठी त्याचे साथीदारही आत मध्ये गेले पण तिथे कोणीच नव्हतं... ती लाल गाडी मात्र तिथेच होती, पाठिच्या मोठ्या फाटकातून तिला आत मध्ये घेतलेला असेल...

अनिकेत आणि क्रिश बाहेर गाडी जवळ उभे होते. विशाल त्या घरातून बाहेर पडला तसे ते पळतच त्याच्याकडे आले आणि त्याच्या पाठीमागे बघू लागले ,पण कुणीच नव्हते त्यांच्यासोबत...
" मिस्टर विशाल ..sss...कुठे आहेत ते ??"अनिकेत.

"दोघेजण नाहीत इथे.."विशाल.

अनिकेत आत मध्ये गेला .आत मध्ये एक लाल गाडी आणि काही खाण्याचे पॅकेट ,पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांशिवाय दुसरं काही नव्हतं.

"विशाल हि तर मानमोडी ची गाडी आहे... तो कुठे गेला आणि..??"अनिकेत.

"सर कदाचीत आपण येणार आहे याची त्यांना चाहूल लागली असेल ...ते आधीच येथून निसटले.."विशाल.

" असे कसे निसटले ते ...मि. विशाल...!! तुमच्याच डिपार्टमेंट मधून कोण तरी फितूर असेल.. नाही तर तुम्हीच दिरंगाई केली असली ईकडे यायला ....."अनिकेत चिडला होता.

" मिस्टर अनिकेत ....शांत व्हा.." क्रिशने त्याच्या खांद्यावर थोपटले ,आता अनिकेत ची गाडी क्रिशवर घसरली.

"तू काय करतोस ईथं ..?? आणि तुझा काय संबंध ह्या सर्वांशी..?? तूच तर मेन कल्प्रीट नाही ना...??.." अनिकेतने खांद्यावरचा क्रिश चा हात जोरात झटकून काढला.

"मिस्टर अनिकेत ..तुम्ही हायपर होऊ नका... असला राग केल्याने काही सोल्युशन निघणार नाही ...आपल्याला लवकरच ईथून निघावे लागेल नाहीतर ...ते जिथे आहेत तिथूनही निघून जातील...."विशाल.

अनिकेतच्या मोबाईलवर केव्हाचा आजीचा फोन येत होता पण तो उचलत नव्हता. आता क्रिशचा मोबाईल वाजू लागला ,त्याने लगेच उचलला.
फोन ऐकताना त्याचे हावभाव बदलत होते, विशाल आणि अनिकेत दोघं त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते, तो फक्त ऐकत होता . त्याच्या चेहर्‍यावर प्रचंड भीती झळकत होती.

"क्रिश काय झाले ..??"विशालने लगेच त्याला विचारले .त्याला थोडी शंका आलेली होती.

"अनिकेत..sss अनिकेत.... ते दोघं घरी आहेत त्यांनी....."क्रिश.

पुढचे ऐकायला अनिकेत थांबलाच नाही लगेच गाडीत बसला आणि त्याची गाडी सुन्न निघाली.

" विशाल आपल्यालाही जायला हवं..."
विशाल क्रिश सोबत त्याच्या गाडीत बसला. गाडी घराकडे निघाली.

" क्रिश... आजी काय बोलणत होत्या...घरी ते सुखरूप तर आहेत ना ..??" शांभवीही गाडीत होती मात्र प्रचंड घाबरलेली .. तिला घरातल्या सर्वांची चिंता लागून होती, त्यातल्या त्यात अनिकेत एकटाच तिकडे निघून गेला होता.

"क्रिश फास्ट घे गाडी .."शांभवीचे डोळे वाहत होते.

"क्रिश..sss ..सांगतोस का काय झालं तुझं आजीशी बोलनं...??"विशालने त्याचा हात हलवला.

"त्यांना ते ड्रग्स पाहिजेत.. आणि त्यांची डिमांड आहे त्यांना इथून सुखरूप देशाबाहेर पडू द्या... नाहीतर ते त्यांना जीवे मारून...."क्रिश समोर बघत...
शांभवी चा हात तोंडावर गेला ..

"क्रिश...त्यांनी.. माझी सावी... त्यांनी तिला..काही केलं तर नसेल ना.....?? क्रिश थोडी गाडी जोरात चालव ..क्रिश ... विशालला सांग त्यांना ते ड्रग्ज देऊन टाक ..... क्रिश ऐकतोस का माझं.??".. क्रिश काहीच प्रत्युत्तर देत नसल्याने सावी त्याच्यावर चिडली.

"तुझं ...तू शांत बसतेस का थोडा वेळासाठी ..मला काहीतरी विचार करू दे..."क्रिश जरासा पाठी वळत चिडून बोलला.

विशाल ने मागे वळून बघितले.

"विशाल ..तू उतर गाडीतून.."क्रिश.

"काय ...!!!"विशाल.

"तु पोलीस स्टेशनला जा आणि आणि त्या ड्रग्ज च्या बँग घेऊन निरामय बंगल्यावर ये..."क्रिश विचार करून बोलला.

"एक काम कर ...आधी फोन करून पोलीस स्टेशनला त्या बॅग काढून ठेवायला सांग.."क्रिश.

"क्रिश काय बडबड करतो आहेस तू.. तुला समजते का ..?? मी त्या कशा आणू...?? त्यांना असंच जाऊ द्यायचं का आपण...??"विशाल.

"हे बघ ..तुझ्या पोलीस स्टेशन मधून खरच कोणीतरी फितूर आहे... फक्त त्या माणसापर्यंत ही न्यूज कळायला पाहिजे की.... आपण ड्रग्ज घेऊन त्यांच्याकडे जात आहोत... आता मी जास्त बोलू शकत नाही ... तर लवकर निघ...."क्रिश

अनिकेत घरी पोहोचला पण मुख्य फाटकाजवळ रखवालदार नव्हता, फाटक उघडं होतं .. त्याची गाडी फाटक ढकलून आत मध्ये आली.तो उतरला आणि घराकडे पळाला.. तोच समोर गवतात तो रखवालदार कन्हत पडला होता, कदाचित त्याला बऱ्यापैकी मुक्कामार बसलेला असेल त्याने अनिकेतला बघितले

"साहेबsss साहेबsss... आत मध्ये ...आत मध्ये ..बघा..." अनिकेतला त्याला उचलून बसावायची इच्छा झाली पण चित्त आतमध्ये घरात गुंतलं होतं..तो त्याच्या जवळ गेला.

"साहेब मी ठीक आहे ..तुम्ही आत बघा.."रखवालदार.

" आजीsss.. आजी sss..महेशीss . महेशी... तो दरवाजातूनच आवाज देत होता, पण कुणीच समोर आले नाही.

तो सावीच्या रूमकडे जायला धावला, पण..त्याला मध्येच रस्त्यात कुणीतरी सोफ्याच्या मागून एकदम समोर येऊन फटका मारला ,तो तसाच उलटा जमिनीवर पडला. बरं त्याचं डोकं आपटण्यापासून त्याने स्वतःला वाचवून घेतलं.

"काय घाई आहे सर ..."मानमोडे हसतच बाहेर आला.

" तू... हारामखोर .... कुठे आहेत माझ्या घरातले..??"अनिकेत उठून त्याच्या अंगावर धावून गेला.
तसा मागून त्या स्टाॅक किपरने त्याच्या पाठीत काठीने वार केला.तो कळवळला.पण पुढचा वार त्याने चुकवला आणि ती काठी एका बाजूने अनिकेतच्या हातात आली.

" सर...जरा शांतीने घ्या..."मानमोडे.

"कुठे आहेत माझ्या घरातले...??सांग लवकर..."अनिकेतच्या डोळ्यातून राग बरसत होता.

"आहे ..आहे अजून जिवंत आहेत... काळजी करू नका..."मानमोडे.

"मला बघायचय त्यांना..."अनिकेत .

"एवढी काय घाई आहे सर ...आमचा माल आम्हाला भेटला की ..आम्ही तुमचा तुम्हाला परत करू...."स्टॉक किपर.

"तुमचा माल तुम्हाला परत भेटेल आधी मला त्यांना बघू दे...."अनिकेतने हातातली काठी सोडली.

" अरे धोंडे...बघू दे .. एवढं नको त्रास देऊ...आपण यांच मीठ खाल्लेल आहे ...."मानमोडे.

त्यात स्टॉक कीपरने सावीच्या रूमचा दरवाजा उघडला आत मध्ये एका माणसाने सर्वांना बेडवर बसून ठेवलेलं होतं आणि त्यांच्यावर बंदूक ताणलेली होती.. सर्व घाबरलेले होते .

"अनिकेत..sss " महेशी उठून त्याच्याकडे जायला लागली तसं तिथं उभ्या असलेल्या माणसाने बंदुकीने तिच्या दंडाला जोरात टोचलं आणि तिला बेडवर ढकललं..

"महेशी sss .."अनिकेत तिला सावरायला पुढे झाला तेवढ्यात स्टॉक किपर ने त्याच्या समोर सुद्धा बंदूक ताणली.

"अहो सर ...आपलं फक्त बघायचं ठरलं होतं ....आता बघून झालं असेल तर करता का इन्स्पेक्टर विशाल ला फोन....??"मानमोडे.

"काय पाहिजे आहे तुम्हाला ..??"अनिकेत.

"माहिती नाही का सर... का उगाच वेड्याचं सोंग घेत आहात.... त्या इन्स्पेक्टर विशाल ला कॉल करा मी सांगतो तसं सांगा..."मानमोडे.


ऋतू बदलत जाती....
ग्रीष्म संपत नाही तोवर...
वादळे येती..
झाडे कोलमडती....
...ऋतू बदलत जाती...

क्रमक्षः....

***********

भेटूया पुढच्या भागात.....

तुमच्या कमेंट च्या प्रतिक्षेत!

कथा आवडत असल्यास स्टार नक्कीच द्या!


©®शुभा.