Maharashtra To Karnataka - 4 books and stories free download online pdf in Marathi

महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग ४

दोन महिन्यानंतर..........

सकाळी साडे सातच्या दरम्यान... मला रियाचा फोन आला होता. मी उचलू शकलो नाही. दिवस रात्र एक करून मी कादंबरीला विराम दिला. संपूर्ण लिहून झाली.
"माधव....! चल उठ रे...! नऊ वाजले आहेत" मॉम धक्के मारून उठवत होती. ती मला वारंवार कॉलेजला जाण्याचे सांगत होती. आज माझी तशी मनस्थितीही नव्हती. त्यात मला फादरचे मित्र रतन ह्यांनी मला प्रकाशकांचा फोन नंबर दिला होता.
त्यांना मी फोन लावून आज येतो असे सांगितले.त्यांनी मला सकाळी अकाराची वेळ दिली होती.माझ्या फोनवर पत्ता सेंड केला. साधारण दहा मिनिटात मी ताजा तवाना झालो. मॉमने मला नाश्ता म्हणून डोसा केला होता. पिवळ्या रंगाचे शर्ट व काळी पॅन्ट घातली.
"मॉम मला आता नाश्ता वगैरे काही नको कारण मला खरंच फारच उशीर झाला आहे"
"इतकं घोड्यावर तुला कोणतं काम आहे रे ?"नाश्ता बेडवर ठेवत म्हणाली.
"मला आता अंधेरीला जायचंय"
"तू जा ना ! तुला कोणी अडवलंय का ? पण नाश्ता करून जा"
तिचा शब्दांचा आदर करत मी दोन डोसे माकडासारखे खाल्ले.
"चल येतो मी !"
"सावकाश"
अकरा वाजून दहा मिनिटांनी त्यांनी पाठवलेल्या पत्यावर पोहोचलो. ऑफिस इतकेही मोठे नव्हते. वीस बाय पंधरा इतके, किमान बारा माणसे विश्रांती घेऊ शकतील. दरवाजे व चारी बाजूच्या भीती ह्या काचेचे होते, त्यात दरवाजातून आत शिरताच गणपतीची दोन फुटाची मूर्ती होती. बाहेर वाहन काढत मी नतमस्तक झालो.'सगळं काही चांगले हो...' मी मनोमन म्हणालो, दरवाजापासून उजव्या बाजूला एक मोठा सोफा होता. शेजारी दोन व्यक्ती बसतील अशी केबिन होती. तिथे वीस ते पंचवीस वर्षांचा एक तरुण टेबलावर हाताची घडी घालुन बसला होता.
"कोण पाहिजे ?" तो तरुण टेबलावरून उठत म्हणाला.
"शिवराम.... सरांना मला भेटायचे होते"
"केबिनमध्ये आहेत तुम्ही जाऊ शकता"
केबिनच्या दिशेने गेलो. दरवाजावर टकटक करत मी आत ढकलला.
"आत येऊ का सर....!"
मी त्यांना प्रथमच पाहिले. शांत बसले होते. माझ्या आवाजाने त्याचे लक्ष वेधून घेतले. त्यांचे माने एवढे लांब लचक केस होते. डोळे चष्माने झाकले होते. त्यांची मिशी पिसाऱ्यावाणी लांब फुललेली होती.
"हा आपण कोण ?"
"रतन सरांनी पाठवलं आहे"
"अरे हा ये ये" ते आदराने म्हणाले.
मी समोर असलेल्या खुर्चीवर बसलो. आम्ही आमने सामने होतो. कैकक्षण मला त्यांनी आपल्या बारीक नजरेने पाहून घेतले. असे का पाहत आहेत ? माझा चेहरा तर विद्रुप तर दिसत नाही ना ?
"आपली ओळख रतनशी कशी काय ?"
"खरं तर ते माझ्या बाबांचे मित्र आहेत त्यांनीच मला ओळख करून दिली"
"बरं तुम्ही आता काय करता ?"
"मी सध्या कॉलेज ह्या व्यतिरिक्त काही करत नाही"
त्यांनी मान हलवली.
"मला रतनने फोन करून सांगितले होते की तुम्ही येणार आहे ते आणि ते म्हणत होते की तुम्ही काही लेखन केले आहे म्हणे"
"हो अर्थातच मी एका सच्च्या कहाणीवर लेखन केले आहे आणि ती मला काही दिवसात प्रकाशित करायची आहे"
"बरं ! पण मला खूप आश्चर्य वाटत आहे तुमचे वय खूप कमी असून तुम्ही एक 'कादंबरी' लिहिलीय. काय वय आहे तुमचे ?"
"सध्या चोवीस"
"मला तुमची कहाणी वाचायला द्या त्यावर मी तुम्हाला दहा दिवसांत सांगेन"
"हरकत नाही मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेल आय डी वर पाठवतो"
आमचे बोलणे खूप लांबत चालले होते आणि त्यांचे प्रश्न पण इतके होते की मी काय बोलावे हे समजत नव्हते. मी कामाच्या मुलाखतीला आल्यासारखे वाटत होते. आता प्रश्न उरला तो फक्त पुढच्या आठवड्याचा. चला तर मग काम झालं असं समजू का ? मी स्वतःशी पुटपुटलो.
त्या रात्री मी लिहिलेल्या कादंबरीचा वाचून शेवट केला. आणखी ह्यात काही उरले तर नाही ना ? फार काळ विचार करून आणखी दोन वेळा वाचून पाहू. फादरचे येणे झाले. ते ताजे तवाने झाले. थोड्या वेळ विश्रांती घेतली. नेहमीप्रमाणे खुर्चीवर डुलत विचारत करत होते.
"कोणाशी भांडण झालं काही का ?" मी त्यांना विचारलं,
"नाही तसं काही नाही मला स्वतःला वेळ द्यायला मिळत नाही रे !"
"आता तुम्ही एवढे कामात गुरफटलेले असता तर तुम्ही स्वतःला वेळ कसा देणार ?"
"मी अक्षरशः कंटाळतो ! तू रतनने दिलेल्या व्यक्तीला भेटलास का ?"
"माझं बोलणे झाले त्यांच्याशी! ह्या आठवड्यात मी त्यांना मेल करेन"
"बरं " ते खुर्चीला जोर लावीत उठून बाहेर गेले.


वार - शनिवार, २३,एप्रिल २०१६

सकाळी आठची वेळ होती. उष्णतेचा प्रवाह पुष्कळ होता. मी कोणत्याही तासाला न बसता ग्रंथालयात बसलो होतो. ग्रंथालयात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी तरुण- तरुणी होते. मिनिटा मिनिटाला तरुणी- तरुणांची ये-जा वाढत होती. काउंटरवर वर्तमानपत्रांचा ढीग ऐकावर एक डाळून ठेवलेला होता. मी ' लोकमत' उचलत शेवटच्या खुर्चीवर जाऊन बसलो.
बातम्या पुष्कळ होत्या पण सर्वच वाच राहिलो तर दिवस नाही पूरायचा. माझ्या नेत्राने बलात्काराची बातमी टिपली. 'प्रियकरासोबत प्रियकरीन फिरायला गेले असता तिच्यावर बलात्कार' मी स्वतःला प्रश्न विचारू लागलो, ' ह्या भू-तलावर दिवसा किती बलात्कार घडत असतील ? म्हणजे स्त्रियांनी बाहेर पडायचेच नाही की काय ? माझ्या समोर एक तरुणी आली. ती काळ्या रंगाच्या भुरक्यात गढून गेली होती. तिच्या हातात जाडजूड पुस्तक होते. नेत्राच्या काठोकाठ काजळ लावलेले होते. त्या तरुणीला माझा परिचय होता. ' करिष्मा' ती माझी वर्ग मैत्रीण होती, परंतु फारसे बोलणे कधीच नाही.तिला पाहून मी वर्तमानपत्र मिटले.मला पाहून तिने दोन्ही भुवया उडवीत हास्य केले.
"कैसे हो आप ?" मी तिला विचारले,
"ठीक हु भाई आप कैसे हो ? आप तो जादा लेक्चर वगैरा अटेंड नहीं करते हो"
"अटेंड करता हुं पर जादा नहीं"
काही वेळानंतर 'रिया' ग्रंथालयात आली. तिची नजर मला शोधत होती. तिने परिधान केलेला परदेशी संस्कृतीचा गुलाबी रंगाचा 'प्लाझो' पोशाख मला पसंत पडला होता. तिच्या नजरेने मला टिपताच ती माझ्या बाजूला येऊन रेलून बसली.
"भावना मॅडम तुझी आठवण काढत होते म्हणत होते लेक्चरला आलास की हजामत होईल" ती डोळे बंद करून वर पाहत म्हणाली,
"त्यांना सांग मी 'आजारी' आहे मला ताप आला आहे त्यामुळे मी येऊ शकत नाही"
"ही तुझी आयडिया फिकी पडेल त्यांच्यासमोर"
करिष्मा तिच्याकडे पाहून माझ्याकडे पाहत होती. डोळ्याने इशारा करत म्हणाली 'ही इथे?'"
करिष्माने आपल्या हाती असलेल्या डाव्या घड्याळाकडे पाहिले. साडे आठ वाजले होते.
"मेरे भाई अभि हेल्थ सायकॉलॉजी का लेक्चर हैं ना "
" साडे नऊ बजे.... मैं भी आणेवाला हुं"
आमचे बोलणे सुरू होते. आम्हाला एका ग्रंथालयात काम करीत असलेल्या प्युन ने बोलताना पाहिले. तो आमच्यापाशी चालून आला.
"मिस्टर माधव !प्लिज आय एम रिक्वेस्ट टू यु ! तुम्ही बाहेर जा"
मला बाहेर जाण्यामागचे कारण कळलेच नाही. त्या प्युनकडे मी आवासून पाहत होतो.
रियाने डोळे उघडले.
"आम्ही बाहेर का जाऊ म्हणताय ?" ती म्हणाली,
"तुम्ही आवाज खूप करत आहात ! कृपया बाहेर जा"
निःशब्दपणे मी वर्तमानपत्र खाली ठेवत बाहेर पडलो. आमच्यामुळे त्या करिष्माला देखील बाहेर यावे लागले.
"आय एम सॉरी ! हमारे वजाह से आपको तकलीफ हुई ! क्षमा चाहता हुं मैं" मी करिष्माला म्हणालो,
"ठीक हैं भाई ! दुसरी जगा ढुंढती हूँ ।"
ती निघून गेली.
"त्या करिष्माने तुला भाऊ बनवले ?" ती माझ्याकडे प्रश्न पडल्यासारखे पाहू लागली.
"मी समानता बाळगतो !"
"अच्छा ! अजून एक तास आहे लेक्चरला आता कुठे बसूया ? रस्त्यावर ?" ती कंबरेवर हात घेत म्हणाली,
" डोन्ट व्हॅरी ! माझ्याकडे आणखी एक ऑप्शन आहे"
हेल्थ सायकॉलॉजीच्या लेक्चरला एक तास बाकी होता. तो लेक्चर आम्ही बसणारच होतो परंतु उर्वरित वेळेचे काय ? महाविद्यालयाच्या बाहेर शंभर मिटरावर असलेल्या एक सार्वजनिक उद्यानात येऊन बसलो. तिथे काही वयस्कर माणसे योगा करीत होते. कोणी उद्यानाला वर्तुळ आकारात फेऱ्या मारीत होते. अर्ध महाविद्यालय तर इथेच होते. माझा मित्र 'समन' हिरव्या गवतात संघटना घेऊन बसला होता. हातवारे करून त्यांना काहीतरी सांगत होता. त्यात चार मुली, दोन मुले होते.
"तुझे काम कुठंपर्यंत आले आहे ?"
"सगळं देवाच्या हातात आहे फक्त त्यांना मेल करायचा बाकी आहे"
"सगळं काही व्यवस्थित होईल" तिने दोन वेळा माझ्या पाठीत थोपटले.
"हीच वेळ असते भविष्याच्या मागे धावत जाण्याची पण..." माझं बोलणे अर्धवट थांबवले.
तिने ओठ फुगवले.
"पण काय....?"
"पण हल्लीची वेळ पिढी खूप वेळ वाया घालवत आहे" मी समनकडे पाहत होतो.
तिने माझ्या नजरेवर नजर टाकीत मान फिरवली.
"तू त्या समनविषयी बोलतोय का ?"
"मुळीच नाही. त्याबद्दल मला तर अभिमान आहे. तो एक उत्तम गायक आहे आणि त्याचे स्वतःच्या गाण्यांचे अल्बम काढण्याचे प्रयास सुरू आहेत. आज ना उद्या तो यशस्वी होईल"
"तुला त्या समनचे एवढं कौतुक का बरं ?"
"तो माझा मित्र आहे ! आम्ही गेले पाच वर्षे एकत्र आहोत. मित्राचे कौतुक वाटायला हवं"
"मित्रांचे वाटायला हवे आणि मैत्रिणीचे?"
"मैत्रिणीचेही वाटते"
"पण तोही विचित्र आहे"
"अर्थातच.....! समन हा चांगला मुलगा आहे पण त्याला पण बरेच धंदे करायला आवडतात"
मी जरा गोधळून गेलो. समनचा भूतकाळ हिला कसा माहीत ? आणि जर माहीत झाला तर मग त्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. नाही नाही ही बहुधा वेगळ्या विषयावर बोलत असावी.
"त्याच्या सारखा मुलगा शोधून सापडणार नाही" मी विषय पालटला.
" अरे व्वा ! तुझा मित्र आणि तुला त्याच्या बारीक बारीक गोष्टी नाही माहीत ? हे म्हणजे परीक्षेत नापास झाल्यासारखं ! नाही का ?"
माझ्याकडे तिच्यासोबत संवाद साधण्याकरिता शब्द नव्हते. आता विषय इथेच थांबवावा.
"असो मला त्याच्या आयुष्यात डोकावून पाहायचं नाही. सगळ्या बातम्या ठेवत जा"
"तू माझ्या समोर बच्ची आहेस ! इथे एकूण एक मुलाचा मी तुला इतिहास सांगू शकतो." तिच्या पाठीवर थोपटत म्हणालो,
"व्हेरी ! टॅलेंटेड बॉय ! फिदा झाले मी तुझ्यावर"
"ओssss"
बोलता बोलता काळ कधी उलटला समजला नव्हता. शेवटी चर्चेला सुरुवात झाली की थांबत नाही हेच सत्य आहे.
नऊ वाजून चाळीस मिनिटे झाली होती. आम्ही वर्गाच्या बाहेर पोहोचलो होतो. मी डोकावून पाहिले. सोया मॅडम आत आले होते. हे मला पाहून काहीतरी बोलणार असे मी मनाशी ठरवून आम्ही आत शिरलो.
"मे आय कम इन मॅडम !"
शिकवणे थांबवत माझ्यावर दृष्टी फेकली. त्या पाहून हसत होत्या मी मुखवटा लपवत आत शिरलो नि तिसऱ्या रो मध्ये जाऊन चौथ्या बाकावर पोहोचलो. वर्ग प्रचंड मोठ्याने हसू लागला होता. त्यांची दृष्टी अजून माझ्यावरची हटत नव्हती. नकळत त्यांचे हास्य पाहून मलाही हसू आले.
"ओके बडी..!" त्यांनी वर्गाचे लक्ष वेधून घेत शिकवण्यास प्रारंभ केला. त्याचा आजचा विषय होता 'मेंदू विषयी रहस्य'
१)मेंदूचे वजन १३०० ते १४०० ग्राम इतके असते.

२)लहान मुलांच्या मेंदूचा विकास हा वाचन व बोलण्याने होतो.

३) दिवसाभरात ६०,००० पेक्षा जास्त विचार आपल्या मनात येत असतात.

४) दिवसाभरापेक्षा आपला मेंदू रात्रीचा जास्त सक्रिय असतो.

अनेक तथ्य त्या सांगत होत्या. एक मेंदू मानवाच्या शरीरात किती कार्य करत असतो? तुम्हीही विचार करा.

महाविद्यालयाच्या संगणक कक्षेत बसलेलो होतो.
माझ्या कादंबरीचे अंतिम वाचन झाले आणि एक नाही तर तब्बल चार वेळा वाचली. मी त्या सरांना मेल केला.

नमस्कार सर,
मी माधव राणे.....! आपली ह्यापूर्वी भेट झाली होती. व कादंबरी प्रकाशनाविषयी आपले बोलणेही झाले होते. तर मी तुम्हाला खालील प्रमाणे एक पी डी एफ पाठवत आहे कृपया करून तुम्ही ती पाहून लवकरात लवकर मला प्रतिसाद द्यावा ही विनंती.

आपले नम्र

माधव राणे

ह्या वर त्यांनी मला लगभग एक तासाने प्रतिसाद दिला. तो असा. 'काळजी नसावी मी वाचतो मग तुला सांगतो.'
आता हे वाचतील कधी ? खरंच वाचतील का ? असे प्रश्न माझ्या डोक्यात निर्माण होऊ लागले होते. थोडे ' धाकधूकीचे' वातावरण माझ्या भोवती निर्माण झाले होते. प्रथम प्रयत्नात मी अपयशस्वी ठरलो, आता मात्र तशी वेळ पुन्हा नको यायला. तसे पाहायला गेले तर प्रत्येक व्यक्तीला अपयशाचे दिवस पाहावे लागतात.
माझ्या मोबाईल भुन ssss भुनssss करू लागला. पाहतो तर आमच्या मराठी शिकविणाऱ्या स्वाती मॅडमचा फोन. त्यांनी मला शिक्षक रूममध्ये येण्याचे फर्मावले. मी त्यांना नकार न देता दोन मिनिटात येतो असे सांगत फोन ठेवला. ग्रंथालयाजवळ गेलो. रियाच्या आजूबाजूला बऱ्याच तरुणी बसल्या होत्या. मी तिच्यापाशी गेलो.
"मी शिक्षक रूममध्ये जात आहे त्या मॅडमनी मला बोलावले आहे" मी हळू आवाजात कुजबुजलो,
"अरे मग मी पण येते ना"
"नको नको तुझा आणि त्यांचा काय संबंध ? तुला हा लेक्चर आहे का ? नाही तर गप्प बस ना"
"अरे मी तुझी बॉडीगार्ड म्हणून येते ना"
"तुझे हे कपडे पाहून त्या कोमात जातील ! मी एक काम करतो समनला घेऊन जातो"
ग्रंथालयाच्या बाहेर पडत समनला फोन केला. तो गेटवर आहे येतो असं सांगत फोन कट केला.
मला रियाला घेऊन जाण्यात काहीच गैर नव्हते पण तिने परिधान केलेला 'प्लाजो' कंबरेपासून उघड होता , पक्षांच्या पंखासारखे तिचे गुडघ्यापर्यंत लांब जॅकेट होते.हे पाहून त्या मॅडम काहीतरी गबाळ बडबड करतील म्हणून मी तिला नाकारले.
"अरे काय झालं ? मला वाटलं तुला कोणी मारायला आले की काय ? म्हणून मी धावत आलो"
"मला 'स्वाती मॅडमनी बोलावले आहे, एकटे जाण्याची हिंमत होत नाही"
"अरे ती स्वाती माझं डोकं खाईल रे ! एक तर मीही लेक्चरला बसत नाही" त्याने डोक्याला हात लावला.
मी त्याच्या बाहीला धरत पहिल्या मजल्यावर आलो.
शिक्षक कक्षेत डोकावून पाहिले. त्या स्वाती मॅडम शिक्षकांशी बोलत होत्या. केस हाता इतके लांब त्यात गुलाबाचे लाल फुल केसात रोवलेले होते, हिरव्या रंगाचे गोल साडी . उर्वरित शिक्षक आपापल्या कामात. चला थोडी मनस्थिती चांगली आहे. 'समन' बाहेर उभा राहिला. मी आत शिरलो, मॅडमपाशी सावधान अवस्थेत उभा होतो. त्यांनी माझ्यावर दृष्टी फेकली. खालपासून ते डोक्याच्या केसापर्यंत अगदी न्याहाळून पाहिले.
"माधव...! तुझी गाडी कुठे अडकली आहे ? गेले कित्येक दिवस लेक्चरला येत नाही आहेस. आणि समन पण येत नाही आहे काय चालवलं आहे तुम्ही पुढे शिकायचं आहे की नाही?" ते शांततेत म्हणाले,
आता काय बोलावे?
"थोडा अशक्तपणा आला होता मग कॉलेजला यावेसे वाटत नव्हते"
"हो.... तुला अशक्तपणा ?"
"लायब्ररीत तर तू पुस्तक वाचत बसलेला असतोस'क्षणभर थांबल्या ' "हे बघ माधव तू खूप चांगला आणि अभ्यासू मुलगा आहेस, तू लेक्चरला बसायला हवं आणि त्या समनला पण सांग"
"हो बरोबर आहे तुमचं आता मी बसेन"
"बरं आता माझा लेक्चर आहे साडे अकराला तेव्हा या पण उशिरा नाही, जा आता" त्यांनी मला बजावले.
मी पटकन बाहेर पडलो. समन मला पाहून धावत पळत खाली सुटला कदाचित त्यानेही ऐकले असावे. ग्रंथालयापाशी आलो.
"अरे मला घेऊन जाण्यापेक्षा तुझ्या आईटमला घेऊन जायचंस ना आता तिने मला एवढं सुनावलं माझे आता पुढचे दिवस ठीक जात नाही. "
"रिल्याक्स व्यवस्थित दिवसात जातील आणि ती माझी मैत्रीण आहे"
"बरं मी आता चाललोय माझ्या रोजच्या अड्ड्यावर ! माझा ग्रुप आला असेल तिथे, जमलं तर तू पण ये"
तो कुठेही न जाता उद्यानात गेला. मी ग्रंथालयात शिरलो.
"काय झालं ती काय बोलली." रिया म्हणाली,
"काय म्हणेल ! तू लेक्चरला बसत जा तू चांगला मुलगा आहेस आता साडे अकरा वाजता लेक्चर आहे तू बस"
"मग....!"
"मी घंटा जातोय ! कदाचित ती माझ्यावर लक्ष वगैरे ठेवते की काय ?"
"तुझ्यावर कशाला लक्ष ठेवेल ती ? तिला काय बाकीची कामं नाहीत का ?"
"अरे तिला सगळं माहीत आहे मी तुझ्यासोबत लायब्ररीमध्ये असतो आता एक काम करू आपण इथून निघू.....तिचा भरवसा नाही"
मी घाबरून थेट उद्यान गाठला होता. उद्यानात डाव्या बाजूला ऊन पसरलेले होते. उजव्या बाजू लगत मोठी इमारत असल्या कारणामुळे तेथे थंडावा होता. सगळीकडे महाविद्यालयाचे तरुण तरुणी बसले होते. ह्या वगळता इथे मला कोणीच दिसत नव्हते.
समनची संघटना मला दिसत होती. त्यात चार मुली आणि पाच मुले दिसत होती. सगळी गायन मंडळी.
त्यातील एक मुलगा रियाला टक लावून पाहत होता. आम्ही हिरवळ गवतात विसावलो. समन आणि त्या मुलाचे बोलणे सुरू होते.
"त्यातली कोणती पोरगी आवडली आहे का ? असेल तर सांगून टाक लगेच ओळख काढून सेटिंग लावूया" ती माझ्याकडे पाहून म्हणाली,
मी एकटक तिच्या नेत्रांकडे पाहत होतो.
"समनच्या संपत्तीवर माझी नजर कशाला ?"
समनने मला तिकडे बोलावले. तेवढ्यात तिने मला अडवले.
"तू माझ्यासोबत वेळ घालवायला आला आहेस की त्यांच्यासोबत ?" ती चिडली.
"रिल्याक्स तुला वैद्याची गरज आहे कारण असा चिडकेपणा बरा नाही"



रात्रीची वेळ होती. साधारणतः साडे आठ वाजले होते. मी इमारतीच्या 'टेरेसवर' होतो. चंद्राचा लख्ख प्रकाश पडला होता. कोणीही नव्हते मी एकांत तिथे बसलो होतो. इमारतीपासून दूरवर पसरलेल्या रस्त्यावर गाड्या सुसाट धावत होते. मला काहीच करावेसे वाटते नव्हते. माझ्या अंगात उष्णता पसरली होती. ताप वगैरे तर नाही ना ? त्या दरम्यान शिवराम सरांचा मला फोन आला होता.
" माधव....! बोलण्यासाठी वेळ आहे का ?"
"तुमच्यासाठी झोपेतूनही जागा होईन. बोला सर तुम्ही वाचली का कादंबरी"
"अप्रतिम कथानक आहे ही तुझी कादंबरी खरंच आताच्या मुला-मुलींना लागू आहे मला उद्या घरी भेटायला येशील का ?"
"सर नक्की येईन फक्त वेळ आणि पत्ता द्या"
"बरं....ठेवतो फोन"
ही रात्र हा दिवस माझ्यासाठी खूप भाग्यवान आहे. मी टेरेसहुन रूमवर आलो. मिस्टर फादर कंबरेला टॉवेल गुंडाळून टीव्ही पाहत होते.
"येस बेटा....!"
"कथेची निवड झाली उद्या त्यांनी मला बोलावले आहे"
"ही तर खुशीची बात आहे"
त्यांच्या चेहऱ्यावर खूप उत्साह दरवळत होता. मी बाहेर आलो रियाला फोन केला.
"बडी...."
"येस... लव्हर बोल..."
"कादंबरीची निवड झाली आता फक्त प्रकाशित व्हायची आहे"
"ही तर गुड न्यूज आहे"
"उद्या मी त्यांना भेटण्यासाठी जात आहे तर तू येत असशील तर' हॅलो... हॅलो....."तिने माझे बोलणे रोखले,
"मला माहित आहे उद्या मी सेक्सी ड्रेसिंग नाही घालणार"
"ओके तुमचे मी आभारी आहे" मी तिचा आदर करत म्हणालो,

२४ मे, वार- मंगळवार २०१६
स्थळ - अंधेरी, सात बंगला.
सोसायटी क्रमांक १२.
वेळ - सकाळचे ११ :२० मिनिटे.
मला रियाची कमाल वाटत होती. ती चक्क इंग्रजांच्या काळातील गुलाबी रंगाचा गाऊन घालून आली होती.
"माझ्याकडे बघ आता तुला काही उघड दिसत नाही ना"
"आता तू एक स्मार्ट मुलगी दिसत आहेस"
तिने तोंड डावीकडे वळवले.
बंगला नंबर २२० / अ, मी बेल वाजवली. मला प्रतिसाद काही न मिळाल्याने मी पुन्हा एकवार बेल वाजवली. दरवाजा उघडला. आम्हाला आत येण्यास अनुमती दिली. आत शिरलो दिवाणखान्यात प्रवेश झाला. आमच्या डोक्यावर एक हिरे जडीत झुंबर लटकलेले होते, उजव्या दिशेने लांब लचल सौम्य सोफा होता. माझ्या नजरेस एक काचेचे लाकडी कपाट नजरेस पडले त्यात किमान दोनशे ते अडीचशे पुस्तके असावी. कदाचित ह्यांचे सुद्धा वाचन असावे ? ते समोरच्या खुर्चीवर बसले.
"तुम्ही बसा !" त्यांनी सोफ्याकडे बोट दर्शवत म्हणाले.
स्वयंपाक घरातून भांड्यांचा आवाज येत होता.
"तुम्ही कॉलेजमधून आलेले दिसताय" ते हसत म्हणाले,
त्यांच्या मनात रियाविषयी कोणताही संशय होऊ नये म्हणून मी तिचा परिचय करून दिला.
"ही माझी कॉलेज फ्रेंड रिया" मी त्यांना म्हणालो,
"नमस्ते अंकल !" ती दोन्ही हात एकमेकांना जोडत म्हणाली,
"नमस्ते !"
"बरं आपण थेट आपल्या विषयावर येऊया. अप्रतिम कथानक केले आहेस. मला फार आवडले म्हणजे वाचताना ते डोळ्यासमोरून जात होते. आणि हल्लीच्या पिढीला ही तुझी कथा लागू आहे हे मात्र खरं"
"धन्यवाद सर !"
"पण ही कथा कोणी तुला दिली ?"
"ही कथा मला कोणीही दिलेली नाही पण हे सर्व एका व्यक्तीच्या आयुष्यात घडलेले आहे"
"अच्छा ! आपण फारसा वेळ न काढता टंकलेखनाला देऊ कादंबरीचे शीर्षक काय ठेवायचे ? तुझ्या डोक्यात जर काही कल्पना असेल तर मला कळव"
"द मेंटलीटी ! पण माफ करा ह्याचे इन्कम कसे असेल?"
"जशी आवृत्ती जाईल तसे इन्कम"
"ओके" मी मान हलवली.
"स्वयंपाक घरातून एक महिला एका ट्रेमधून चहा व बिस्कीट घेऊन आली. तीन कप चहा होता. त्या थोड्या वयस्कर होत्या. चेहऱ्यावर किंचितशा सुरकुत्या पडलेल्या होत्या. मी ट्रे मधून चहाचा कप उचलत रियाच्या हाती दिला. दुसरा कप उचलला. ह्या चहाची चव इतर चहापेक्षा मजेदार होती. त्यांचा चहा झाला. मी रिता झालेला कप खाली ठेवला.
"ये मी तुला माझ्याजवळ असलेली पुस्तके दाखवतो कदाचित तुला ती आवडतील"
बसलेल्या ठिकाणी त्यांच्या मागे कपाट होते. ते उघडले मी एक एक पुस्तक डोळ्यासमोरून घालवीत होतो.
"तुझे वाचन सुरू ठेव ते थांबता कामा नये."
"तू खूप मोठा लेखक होशील ! मला कौतुक वाटत आहे तुझं की तू इतक्या लहान वयात कादंबरी लिहिली आहेस"
मला अभिमान वाटला. जवळपास पंधरा मिनिटे पुस्तक चाळली. त्याचा निरोप घेत मार्गस्थ झालो.

एक वाजून गेला होता.
"यार तू मला ही कथा वाचायला द्यायला पाहिजे होती. असं काय आहे ह्या कथेत की त्यांना ती कथा आवडली. त्या व्यक्तीच्या आयुष्यात असे काय घडले आहे ? लेखक महाशय मला जरा सांगता का ?" तिने माझ्या खांद्यावर हात टाकला.

आम्ही रस्त्याच्या पादचारी मार्गे चालत होतो. रस्त्यावर चालणाऱ्या वर्दळीची नजर आमच्यावर पडत होती.
"प्रदर्शित होण्यापूर्वीच मी तुला कथेचा सगळा उलगडा नाही करू शकत"
"फक ऑफ यार ! मी तुझी बेस्टी आहे सगळं तू शेअर करू शकतो"
"मला जरा थंड वातावरणात बसावेसे वाटत आहे आणि माझ्या पोटात कावळे आरडाओरड करत आहेत तर आता त्यांची भूक भागवण्याकरिता मला भोजन करावे लागेल." मी इकडे तिकडे पाहत म्हणालो,
आम्ही मध्यम वर्गीय भोजन करतील अशा रेस्टॉरंटमध्ये आलो होतो. आणि त्या रेस्टॉरंटमध्ये आमचे भाग्य असे उघडले की चारी बाजूला माणसे बसलेली हाती आणि मध्यभागी जागा रिक्त होती.
टेबलावरचे मेनू कार्ड हातात घेतले. मला त्यातील कोणती डिश घ्यावी ?कोणती नाही ? असे झाले होते. वेटर आमच्यापाशी आला.
"चिकन राईस फुल" मी त्याला म्हणालो,
"फुल एग राईस" ती म्हणाली,
वेटर ऑर्डर ऐकून आपल्या कामाला लागला.
"आपण कोठे होतो !" ती म्हणाली,
"माहीत नाही"
"अच्छा मला फक्त इतकेच सांग की ती कथा कशाशी निगडित आहे."
मी हाताची घडी घालून टेबलाला रेलून बसलो.
"तुला वाचण्याची आवड राहणार नाही"
"ओSSSSSS हो SSSSS ! मी आता खरंच वेडी होईन"
"सांगतो ! ही कथा एका एका व्यक्तीवर आधारित आहे"
"तिने डोळे इतके मोठे केले की तिच्या डोळ्यांच्या बुबुळामध्ये माझे प्रतिबिंब दिसू लागले होते.
"एका व्यक्तीवर ? ते मला पण समजलं ! ही कोणाची कथा आहे ? साला मला काय कळतंच नाही" तिने ओठावर बोट ठेवले.
"एक चिकन राईस और एक एग राईस " त्याने म्हणत टेबलावर डिश ठेवले. कैकक्षण ती स्मरण करत राहिली.
"सांग ना !"
"माझ्या कथेत खलनायक वगैरे कोणीही नाही पण एक इच्छा होते आणि नायक फोनवरून एका मुलीला बोलावून घेतो"
" बाप रे ! मग काहीतरी इंटरेस्टिंग आहे रे वाचायला हवं पण त्या व्यक्तीच्या आयुष्यात खरंच असं घडलं का ?"
"घडलं तर आहेच पण त्यात विचार करण्याची गोष्ट ही आहे की आपल्या वयाच्या मुले मुलीसुद्धा विचित्र मार्गे जात आहेत आणि त्या व्यक्तीला योग्य योग्य मार्गावर आणण्याचे काम मात्र मी केले आहे"
किमान त्या त्या व्यक्तीचे वय २५ असावे. समन च्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी होऊन गेल्या. सुरुवात 'सोशल मीडिया साईटवरून होते.