फुलाचा प्रयोग - 13

  • 5.2k
  • 1.7k

‘उघड डोळे,’ सैतान म्हणाला. माधवने डोळे उघडले. कोठे आले होते ते? तेथे एक मोठा दिवाणखाना होता. तेथे खाणे-पिणे चालले होते. मोठी मेजवानी होती. कोणी लाडू खात होते, कोणी जिलेबी खात होते कोणी चिवडयावर हात मारला, तर कोणी भज्यांवर खूष होते. कोणी फळांचे भोक्ते होते, ते द्राक्षांच्या घडांवर तुटून पडत होते. काहींना संत्री, मोसंबी आवडली. हे काय? एकदम अंधारसा झाला? सैतानाने गंमत केली. दिवे विझले. लोक एकमेकांच्या हातांतील ओढू लागले. कोणाला काही दिसेना. द्राक्षे म्हणून ओढायला जात, तो कोणाच्या तोंडाला हात लागे.