×

त्या देशात नुकतीच राज्यक्रांती झाली होती. नवीन राजा गादीवर आला होता. तो राजा तरुण होता, उदार होता. आपला देश भरभराटावा, सुखी व्हावा असे त्याला वाटत होते. इतर देशांचे कारभार कसे आहेत, त्या त्या देशांतून काय काय विशेष गोष्टी आहेत, ...Read More

त्याचे नाव होते फुला. फुलांचे त्याला वेड. त्याचे वय फार नव्हते. पंचवीस-तीस वर्षांचे असेल. फुलाने लग्न केले नव्हते. त्याने आपले लग्न फुलझाडांशी लावले होते. तो शिकला होता. शास्त्रांचा त्याने अभ्यास केला होता. विशेषत: वनस्पतीशास्त्राचा त्याने अभ्यास केला होता. त्यातल्या ...Read More

एके दिवशी फुला नित्याप्रमाणे आपल्या प्रयोगालयात काम करीत होता. इतक्यात गावात टापटाप असे घेडयांचे आवाज घुमू लागले. एक, दोन, तीन-किती हे घोडेस्वार! खंद्या घोडयावर शिपाई बसलेले होते. त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रे होती. ते धिप्पाड होते. क्रूर दिसत होते. गावातील लोक घाबरले. ...Read More

फुलाचा तो शेजारी गब्रू राजधानीत आला होता. फुलाला फाशीची शिक्षा झाल्याचे त्याला कळले. फुलाच्या अंगरख्याच्या खिशात ती कलमे आतील, ते प्रयोग असतील परंतु कसा मिळावावयाचा तो अंगरखा? फुलाला त्याच्या कपडयांतच फाशी देतील का? सरकार स्वत:चे कपडे कशाला खर्च ...Read More

फुलाला राजधानीतील तुरुंगात ठेवणे धोक्याचे होते. केव्हा लोक बिथरतील त्याचा नेम काय? राजाने समुद्रकाठच्या एका दूरच्या तुरुंगात फुलाची रवानगी केली. फुलाची खोली एकान्त होती. त्या खोलीला एकच खिडकी होती. फुला उडी मारी व त्या खिडकीतून उचंबळणारा समुद्र बघे. समुद्राच्या ...Read More

त्या दिवशी उजाडत ढब्बूसाहेब फुलाच्या कोठडीजवळ एकदम आले. शिपायाने कोठडी उघडली. साहेब आत शिरले. ते खोलीत पाहू लागले. तेथे मडक्यात तो वेल वाढत होता. संशयी साहेब त्या वेलाकडे टक लावून पाहू लागले. ‘हा कसला वेल? हा वेल वाढवून खिडकीतून खाली ...Read More

तो पाहुणा फुलाची कुंडी घेऊन प्रदर्शनाच्या गावी गेला. तेथे नाना देशांतून फुले आली होती, शास्त्रज्ञ आले होते, परंतु संपूर्णपणे कोणाचाच प्रयोग यशस्वी झाला नव्हता. कोणाच्या एकाच पाकळीवर सोनेरी छटा उठली होती. कोणाची पुसट होती, परंतु या पाहुण्याने जे फूल ...Read More

वृध्द आत्या घरी होती. एक दिवस सारे चांगले होईल हया आशेवर ती जगत होती. फुलाच्या बागेची काळजी घेत होती आणि एके दिवशी फुला घरी आला. एकटा नाही आला, तर त्याच्या बरोबर कोणी तरी होते. ‘आत्या, ओळखलेस का मला?’’ फुला पाया ...Read More

परमेश्वर आपल्या दिव्य सिंहासनावर बसला होता. देवदूत स्तुति-स्तोत्रे गात होते. इंद्र, चंद्र, सूर्य, वायू सारे हात जोडून उभे होते.  ‘देवा, तुझा महिमा किती वर्णावा? हे अनंत विश्व तू निर्माण केलेस. इंद्राल पाऊस पाडायला लावलेस सूर्याला तापावयास सांगितलेस. तुझ्या आज्ञेने ...Read More

तो गाव फार मोठा नव्हता. फार लहानही नव्हता. समुद्रकाठी होता तो परंतु गावाची हवा बिघडली होती. जिकडे तिकडे दलदली झाल्या होत्या. त्यामुळे बेसुमार डास झाले होते. गावात हिवतापाच्या साथीचा कहर होता. घरोघर अंथरूणे पसरलेली होती. माणसांचे सापळे झाले ...Read More

परंतु सर्वज्ञ माधव आज असमाधानी होता. इतक्या वर्षात असे असमाधान त्याला कधी वाटले नव्हते. तो नेहमी पुस्तकांत रंगलेला असावयाचा परंतु आज पुस्तके नि:सार वाटत होती. जी पुस्तके वाचता-वाचता इतकी वर्षे तो घामाघूम झाला, त्या पुस्तकांत काडीमात्र राम नाही ...Read More

निराशेला खोल दरीत भिरकावून माधव तेथे बसला होता. ‘अस्तास जातानाही सूर्य लाल आहे, मरतानाही झगडत आहे. मलाही झगडू दे -’ असे त्याच्या मनात आले. आता जरा अंधार पडला परंतु थोडया वेळाने चंद्र वर आला. सुदर चांदणे पडले. माधव ...Read More

‘उघड डोळे,’ सैतान म्हणाला. माधवने डोळे उघडले. कोठे आले होते ते? तेथे एक मोठा दिवाणखाना होता. तेथे खाणे-पिणे चालले होते. मोठी मेजवानी होती. कोणी लाडू खात होते, कोणी जिलेबी खात होते कोणी चिवडयावर हात मारला, तर कोणी भज्यांवर ...Read More

माधव जे पेय प्यायला, त्याचा एक विशेष परिणाम होत असे. ते पेय प्यायल्यावर जी स्त्री प्रथम दिसेल तिच्यावर प्रेम जडायचे असे होत असे. माधव व सैतान जात होते. माधवाच्या मनात आज निराळयाच भावना उचंबळत होत्या. तो आज नवीन झाला ...Read More

‘आईला देऊ हे औषध?’ मधुरीने विचारले ‘दे. पेलाभर पाण्यात हया बाटलीतील  चमचा दोन चमचे औषध घाल. गाढ झोप लागेल. खोकला उसळणार नाही. तू येशील ना रात्री?’ ‘हो.’ मधुरी औषधाची बाटली घेऊन गेली. ‘आज रात्री गंमत आहे एकूण!’ सैतान म्हणाला. ‘चूप. खबरदार असे काही ...Read More

सैतान व माधव हवेतून दौडत येत होते. त्यांनी आपली गती जरा मंदावली. ‘ठक ठक’ आवाज कानावर आला. कोठून येत होता तो आवाज? ठक ठक. कोण काय ठोकीत होते? कोण काय दुरुस्त करीत होते? इतक्यात माधवाला दोनचार माणसे दिसली. ती ...Read More

सैतानाने माधवाला एका दूरच्या देशात नेले. त्या देशाच्या राजधानीतून ते हिंडत होते. त्यांच्या मूर्ती सर्वाच्या डोळयांत भरतील अशा होत्या. जो तो त्या दुकलीकडे बघे. जशी भीमार्जुनांची जोडी परंतु सरकारी अधिकार्‍यांना त्यांचा संशय आला. पोलिसांनी त्यांना पकडून नेले. राजासमोर ...Read More

माधवाच्या घरी म्हातारा भय्या होता. तो आपल्या धन्याची रोज वाट बघत असे. तो दिवाणखाना झाडून ठेवी, अंगण झाडून ठेवी. रोजच्याप्रमाणे भय्या उठला व अंगण झाडायला गेला. तो अंगणात कोण निजले होते? तो तर धनी. माधव तेथे पडला होता. त्याला ...Read More

‘करार नीट पाहा. हा क्षण सुंदर आहे, किती पवित्र आहे. हा क्षण माझ्या जीवनात अमर होवो असे त्याने म्हटले खरे परंतु ज्या विचारांत मग्न असता हे शब्द उच्चारले गेले, ते विचार तुमचे आहेत का? तुमच्या पोतडीत तसले विचार ...Read More