फुलाचा प्रयोग - 14

  • 5.5k
  • 2.1k

माधव जे पेय प्यायला, त्याचा एक विशेष परिणाम होत असे. ते पेय प्यायल्यावर जी स्त्री प्रथम दिसेल तिच्यावर प्रेम जडायचे असे होत असे. माधव व सैतान जात होते. माधवाच्या मनात आज निराळयाच भावना उचंबळत होत्या. तो आज नवीन झाला होता. ती पाहा एक मुलगी देवळात जात आहे. हातात पूजेचे ताट आहे. तिच्या अंगावर अलंकार नाहीत. साधे पातळ आहे. गरिबाची आहे वाटते ती?