स्पर्श - भाग 23

(28)
  • 14k
  • 8.4k

मी डोळे पुसून घेतले आणि तिच्याकडे पाहू लागलो ..ती माझ्याकडे पलटून पाहू लागली आणि मला तिला फेस करणं अशक्य झालं ..मी तिथून लगेच पळ काढत गॅलरीला पोहोचलो ..मानसिसमोर मी स्वतःच्या अश्रूंना सावरुन घेतलं असलं तरीही गॅलरीत मात्र मी अश्रूंना वाट करून दिली आणि तेही शांत नदीप्रमाणे डोळ्यातून वाहू लागले ..मागून मानसी माझ्या बाजूला येऊन उभी राहीली आणि मी अश्रू पुसून काही झालंच नाही अस वागू लागलो ..ती मला म्हणाली , " अभि माझा राग आलाय का ? ..हो येईलच ..रागाव रे पण शांत नको राहू " आणि त्याक्षणी माझ्या तोंडून निघालं , " मानसी प्लिज आज मला एकट सोडशील