माळवं

  • 5k
  • 1
  • 1.5k

माळवं आज रविवार होता. डयुटीला सुट्टी असली तरी घरातली बरीचशी कामे करावी लागत होती. त्यात आज गावचा बाजार होता. अमितला माळवं आणण्यासाठी बाजारात जाण्याचा खुप कंटाळा आला होता. पण आईनं सकाळपासूनच त्याच्या मागे बाजार करुन ये, म्हणून भूणभूण लावली होती.दुपारचे दोन वाजले होते. अमित नाराजीनेच बाजारात आला. मो माळव्याच्या आळया फिरुन माळवं घेवू लागला.तितक्यात त्याला माळव्याच्या चौथ्या अळीला एक सतरा-अठरा वर्षाची गोरीपान मुलगी माळवं विकताना दिसली. एखाद्या चित्रपटातील नटीलाही लाजवेल असं सौंदर्य होतं तिचं. त्याला आश्चर्य वाटलं. जी मुलगी फुलांच्या पाकळयात अलगद जपून ठेवावी इतकी नाजूक,सुंदर आणी कोमल होती ती अशा रणरणत्या उन्हात माळवं विकत बसली होती. तिच्या