ऋतू बदलत जाती... - भाग..4

  • 5.5k
  • 3k

ऋतू बदलत जाती....४ शांभवी तिच्या जवळ जाऊन रडत होती. "बाळा मी असं कोणाचं काय बिघडलं होतं की.. त्यांनी मला तुझ्यापासून दूर केलं..."तीचे हुंदके वाढतच होते. आता पुढे.... नाशिक मधल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेत एका छोट्याशा खेड्यात ती म्हणजे महेशी राहत होती. आज ती श्रावण सोमवार निमित्त त्रंबकेश्वर येथे आलेली ,लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात भुरभुर पाऊसही पडत होता ,तरीही ती शिवभक्त तिथे उभी होती गेल्या चार तासांपासून.. "महेशी चार तास झाले ...माझे पाय दुखायला लागलेत.."अदिती "परमेश्वराचे दर्शन घ्यायला.. एवढा त्रास तर आपण सहन करूच शकतो ना ...!"महेशची. "हो पण सवय नाही यार..."अदीती. "कित्येक महान साधू संतांनी.. कित्येक तपं केली तेही