पत्र सुमने. खाद्य जीवन

(1)
  • 30
  • 0
  • 1.9k

प्रिय सोना.. आपली खाद्य यात्रा भाग 1 तुझ्या खाण्याच्या आवडी पेक्षा त्यात दिसणारा तुझा चोखंदळ स्वभाव या विषयी बरेच लिहिता येईल तसे तर खाण्यात अमुक असावे तमुक नसावे अशी तुझी कधीच मागणी नसायचीसगळेच पदार्थ तुला आवडायचे घरी असो वा बाहेर ताटात कोणत्याही चवीचा पदार्थ असो तुझे ताट जेवणानंतर एकदम स्वच्छ असे जणू आरशा सारखा त्यात चेहरा बघून घ्यावा ताटात कधी काही टाकल्याचे मला आठवत नाही अन्न टाकायचे नाही हा नियमच होता तुझा माझ्याकडून मात्र तो काही वेळा मोडला जायचा तेव्हा संपत नसेल तर वाढून कशाला घेतेस आधी थोड घ्यावं मग आवडलं तर आणखीन उगाच हाव नको करू असे तू मला दटावायचाशक्यतो गोड पदार्थ तू टाळत असे मी मात्र थोडी गोडा कडे झुकणारी असले तरी मी सुद्धा ते लिमिटेड खावे असा तुझा कटाक्ष असायचा सकाळचा नाश्ता प्रोटीन युक्त असावा असा मात्र तुझा आग्रह होता मग कधी टोमॅटो आम्लेट.

1

पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1

प्रिय सोना..आपली खाद्य यात्रा भाग 1तुझ्या खाण्याच्या आवडी पेक्षा त्यात दिसणारा तुझा चोखंदळ स्वभावया विषयी बरेच लिहिता येईलतसे तर अमुक असावे तमुक नसावे अशी तुझी कधीच मागणी नसायचीसगळेच पदार्थ तुला आवडायचेघरी असो वा बाहेर ताटात कोणत्याही चवीचा पदार्थ असोतुझे ताट जेवणानंतर एकदम स्वच्छ असेजणू आरशा सारखा त्यात चेहरा बघून घ्यावाताटात कधी काही टाकल्याचे मला आठवत नाहीअन्न टाकायचे नाही हा नियमच होता तुझामाझ्याकडून मात्र तो काही वेळा मोडला जायचा तेव्हा संपत नसेल तर वाढून कशाला घेतेसआधी थोड घ्यावं मग आवडलं तर आणखीनउगाच हाव नको करू असे तू मला दटावायचाशक्यतो गोड पदार्थ तू टाळत असेमी मात्र थोडी गोडा कडे झुकणारी असले ...Read More

2

पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 2

प्रिय सोनाआपले खाद्य जीवन भाग २चायनिज सुद्धा तू उत्तम करायचा त्यासाठी लागणारे नूडल्स चे पाकिट आणून ठेवणेगाजर,कोबी, सिमला मिरची,लाल मिरच्या, कांदा , चिली सॉस, टोमॅटो सॉस ही सर्व तयारी करून ठेवायचाहा प्रकार नाश्त्याला बनवायचा असल्याने सकाळीच तू नूडल्स गरम पाण्यात शिजवून त्या एका चाळणीत काढून त्यावर गार पाणी ओतायचा व दोन चमचे तेल टाकायचा म्हणजे नूडल्स मोकळ्या होतातएका बाजूला सगळ्या भाज्या उभ्या उभ्या पातळ कापून घेतलेल्या असतनंतर पसरट पॅन मध्ये तेल टाकून लाल मिरची घालून सर्व भाज्या तू हलक्या हाताने हलवून अर्धवट शिजवून घ्यायचाआता त्यावर नूडल्स टाकून चांगले मिसळून आवश्यक तेवढा चिली आणि टोमॅटो सॉस घालून छान परतून घ्यायचा ...Read More

3

पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 3

पत्र सुमनेप्रिय सोनाआज तुझ्या लाल गाडीतले सगळे साहित्य काढले होतेआपल्या गाडीची आता बिदाई करायची वेळ झालीयती आता दुसऱ्या घरी राहायलातुझ्या जाण्यामुळे आपल्या सोबतचा तिचा सहवास संपला आहेतुझ्या इतके तिचे लाड मी नाही पुरवू शकणार रेसगळच माझ्या आटोक्या बाहेरचे आहेम्हणून तर तिच्या बिदाई चा निर्णय घ्यायला लागतोयतुझ्या सोबत गाडीतून फिरलेले अनेक प्रसंग मनात कोरलेले आहेतगाडीत कायम सेंट स्प्रे, कॉटन रुमाल जो तुला गाडी चालवताना हाताला आलेला घाम पुसायला लागत असे, कोल्ड वेट टॉवेल्स, समान आणायला वेगवेगळ्या पिशव्या, एक बिस्कीट पुडा,मोबाईल चार्जर, तुझा एक डोक्याचा बँड, गाडीची काच पुसायला चुना, छोटी साखरेची डबी, घरच्या आवळा सुपारीची एक डबी, वेगवेगळ्या ठिकाणी जायचे ...Read More

4

पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 4

प्रिय सोनाआपले खादय जीवन भाग ४दाल फ्राय मात्र खास तुझा हातखंडा होताबारीक कांदा बारीक लसूण घालून तू इतकी खमंग असे आणि त्याला थोडा smok देत असेसोबत मी मस्त खुसखुशीत बंगाली पराठा करीत असेतोंडी लावायला कांदानॉनव्हेज प्रकार तू पूर्वी खायचा पण हल्ली सोडून दिला होतामी केलेली अंडा करी आणि आले लसूण लावलेला पिवळा भात तुझा अतिशय आवडतातो खाताना तुझा चेहरा खुलून जात असेडबल ऑमलेट ब्रेड किंवा पोळी पण प्रिय होती तुलाबाकी नाश्ता प्रकारात..डोसा पारंपरिक असो वा मूग डाळीचा असोत्याचे पीठ भिजवण्या पासून त्यासाठी चटणी करण्यापर्यंत सगळे तुझे कामगरम गरम डोसा करून मला पहिला तयार करून घालणं हे ही तुझे आवडते ...Read More