Patra Sumne Khadh Jivan - 1 in Marathi Letter by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1

Featured Books
  • వెంటాడే నీడలు - 6

    వెంటాడే నీడలు ( ఏ క్రేజీ హాట్ రొమాంటిక్, సైకలాజికల్ అండ్ పార...

  • THE GHOST - 2

    **రామ్** బైక్‌పై వెళుతూ ఉంటే, సడన్‌గా కొంతమంది రౌడీలు వచ్చి...

  • వెంటాడే నీడలు - 5

    వెంటాడే నీడలు ( ఏ క్రేజీ హాట్ రొమాంటిక్, సైకలాజికల్ అండ్ పార...

  • ఎవరు....? - 11

    Part - 1102-జులై-2018మద్యాహ్నం 2:10 గంటలునిత్యం పర్యాటకుల సం...

  • యంత్రం వెనుక మనసు - 13

    "ఇంకేం చేస్తాం అమ్మ.. ఈ అర్ధరాత్రి పూట ఎవరు తింటారు? తీసుకెళ...

Categories
Share

पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1

प्रिय सोना..

आपली खाद्य यात्रा भाग 1

तुझ्या खाण्याच्या आवडी पेक्षा त्यात दिसणारा तुझा चोखंदळ स्वभाव या विषयी बरेच लिहिता येईल तसे तर खाण्यात अमुक असावे तमुक नसावे अशी तुझी कधीच मागणी नसायचीसगळेच पदार्थ तुला आवडायचे घरी असो वा बाहेर ताटात कोणत्याही चवीचा पदार्थ असो तुझे ताट जेवणानंतर एकदम स्वच्छ असे जणू आरशा सारखा त्यात चेहरा बघून घ्यावा ताटात कधी काही टाकल्याचे मला आठवत नाही अन्न टाकायचे नाही हा नियमच होता तुझा माझ्याकडून मात्र तो काही वेळा मोडला जायचा तेव्हा संपत नसेल तर वाढून कशाला घेतेस आधी थोड घ्यावं मग आवडलं तर आणखीन उगाच हाव नको करू असे तू मला दटावायचाशक्यतो गोड पदार्थ तू टाळत असे मी मात्र थोडी गोडा कडे झुकणारी असले तरी मी सुद्धा ते लिमिटेड खावे असा तुझा कटाक्ष असायचा सकाळचा नाश्ता प्रोटीन युक्त असावा असा मात्र तुझा आग्रह होता मग कधी टोमॅटो आम्लेट, ढोकळा, वाटली डाळ, मिक्स पिठाचे थालीपीठ, मसूर डाळीचा डोसा , मिक्स मोडाचे आप्पे असे प्रकार मी करीत असे सोया चँक्स आणि मसूर डाळ कटलेट मी केलेले तुला फार आवडायचे नाश्ता सोबत एक वाटी दही हवेच आणि संत्रे किंवा दुसरे एखादे फळ असायचेच खाण्यात Three C म्हणजे Curd,Cow ghee, आणि citrus fruit हवे असे तू म्हणायचा नाश्ता व्यवस्थित झाला की तुला कॉफी लागत असे कॉफी घेऊन तू तुझे आवडते पेपर वाचनाचे कामं सुरू करायचा नाश्त्यात पोहे हा तुझा आवडता प्रकार दडपे पोहे, कांदे पोहे, बटाटे पोहे, टोमॅटो पोहे असे अनेक प्रकार मी करीत असे बटाटे पोहे मला आवडत पण तुला बटाटा फारसा नको असायचा आमच्या आईची खासियत टोमॅटो पोहे मात्र तुला आवडायचे दही मितकूट पोहे अतिशय प्रिय..दडपे पोहे मात्र स्वतः करण्याकडे तुझा कल असायचा दडपे पोहे बेत असेल तर फिरून आले की फोडणीत सगळे साहित्य घालून ठेवायचे आणि अंघोळ झाली की ऐन खायच्या वेळेआधी दडपून ठेवायचे व नंतर खायचे सोबत दही असे सिस्टिमॅटिक तुझे चालत असे संकष्टी करणे आपण खूप वर्षी पूर्वी सोडले होते पण त्या दिवशी बटाटे घालून खिचडी आणि दही हा आपला नाश्त्याचा बेत असे त्यासाठी तू आदल्या रात्री तुझ्या पद्धतीने साबुदाणा भिजवत होतास कधी कधी मी साबुदाणा वडे आणि दाण्याच्या कुटाची मिरची कोथिंबीर घालून चटणी करीत असे संकष्टी दिवशी आपण जेवणात उकडीचे मोदक सुद्धा करीत असू तुला तो मोदकाचा घाट घालणं फारसे आवडत नसे पण मीच हाताला सवय असावी म्हणून करीत असे तुझे म्हणणे चार मोदक विकत आणुन खा कशाला दमायच. खरे तर साबुदाणा खिचडी मोदक वगैरे एकदम हाय कॅलरी होत असे मग कधी कधी त्यातला एक पदार्थ आपण रद्द करीत असू इडली सांबार कधी केले तर सांबार अगदी पारंपरिक पद्धतीने करायला तुला आवडायचे चिंचेच्या कोळात भाज्या शिजवून नंतर त्यात डाळ घोटून घालणं चांगली उकळी आली की सांबार मसाला आणि लाल मिरची कढीलिंब फोडणी मी कधी केले सांबार तर ते तुला फार पसंत पडायचे नाही कसे झालेय असे विचारले की ठीस (ठीक) आहे असे उत्तर असे मग आपण ओळखायचे नाही आवडले तसेच व्हेज सँडविच करणे तुझा आवडीचा प्रकार खायला आणि करायला दोन्ही आवडायचे फारसा कधी ब्रेड ना आवडणारा तू आदल्या दिवशी सँडविच ब्रेड आणणार सकाळी अंघोळ झाली की कांदा टोमॅटो काकडी उकडलेला बटाटा (हा मात्र मला आवडायचा) गाजर किस हे सगळे चोपिग बोर्ड वर व्यवस्थित चिरून कोथिंबीर पुदीना आले मिरची घालून चटणी करायची अमूल बटर आधीच बाहेर काढलेले असायचे ब्रेडच्या एका स्लाइस ला चटणी दुसरीकडे बटर लावून मध्ये सर्व केलेले भाज्यांचे स्लाइस रीतसर लावून वर गजर किस पसरून दुसरा बटर लावलेला स्लाइस वर ठेवून तू धारदार सुरीने त्याच्या कडा कापायचा मग छान चौकोनी तुकडे करून बशीत अलगद सर्व्ह करायचा प्रत्येक तुकड्यावर एकेक टोमॅटो सॉस चा थेंब पहिला सँडविच मलाच तोपर्यंत मी पण कॉफी करायला ठेवलेली असे कर तू खायला सुरवात असे म्हणायचा तुम्ही पण या असे म्हणून मी कॉफी सँडविच चा आस्वाद घ्यायचे सँडविच करणे तुझ्या सोबत आपल्या नातीला सुद्धा आवडायचे ती कधी कोल्हापूरला आली की दोघांची सँडविच मैफल छान जमत असे मला भाज्या घातलेले ग्रील सँडविच आवडायचे कधी कधी ते पण असे नाश्त्याला मिसळ आणि सँडविच दोन्ही तु उत्तम बनवायचा एक रविवार तू खास स्वतः मिसळ करणारं आहे असे आदल्या दिवशीच तू declare करायचा फरसाण, मोडाची मटकी, आणून ठेवलेले असायचे ब्रेड सुद्धा संध्याकाळी आणत असू सकाळी इकडे चहा ठेवला की दुसरीकडे तू कुकर मधे बटाटे, मटकी लावायचा मी म्हणायचे इतकी काय गडबड आहे आधी चहा घ्या पण नाही आपण फिरून येई पर्यंत सगळे गार व्हायला हवे असे तुझे म्हणणे फिरून आल्यावर थोड सेटल झालं की तू अंघोळी ला जायचा जे पदार्थ तू करायचे त्यात प्लेट सजवणे आणि खाणे यायतिरिक्त तू कधीचं मला कोणते काम द्यायचा नाही कारण तुला नेहेमीच तुझे काम सिस्टीम प्रमाणे करायचे असे बटाटे मटकी बाहेर काढली मी बटाट्याची साले काढून भाजी साठी त्याचा फोडी करत असे भाजी आणि मटकी ची साधी उसळ फोडणीला टाकली की ती काढून ठेवून मी पोहे करून घेत असे ही कामे मात्र माझी ठरलेली असत पलीकडे तू कांदा कोथिंबीर चिरत असे उभा कांदा आणि बारीक फोडीचा कांदा मिसळ साठी अगदी बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर वरून घेण्यासाठी सोबत लिंबाच्या फोडी मिसळ च वाटण म्हणजे ओले खोबरे, आले, लसूण चांगले गंधा सारखे वाटून आधीच तयार असे आता तुझे खरे काम सुरू होई मोठ्या पातेल्यात थोडे जास्त तेल घेऊन कांदा फोडणीला टाकायचा कांदा थोडा फुटला की त्यात वाटणं परतून घ्यायचे वाटण चांगले परतले की कांदा लसूण मसाला आणि थोडे साधे तिखट घालून परतले की नेहेमीच अंदाजाने पाणी घालायचाआता हे मिश्रण छान उकळू लागून घरभर त्याचा वास सुटू लागे हा मिसळीचा कट तयार झाला का तुझा चेहरा प्रसन्न होई मग तू आपल्या खुर्चीवर जाऊन बसे आता पुढले काम माझे खोलगट डिश मध्ये आधी पोहे, मग उसळ, बटाटा भाजी आणि मग फरसाण घालून त्यावर कट वरती बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर सोबत लिंबूतुला गरम गरम कट आवडे मग कटाचे पातेले गॅस वर उकळत ठेवायचे आणि लागेल तसा कट घ्यायचा मिसळ खाताना सुद्धा तुझे मला सांगणे असे पाव फक्त दोन खा जास्त खाऊ नकोस पाव भाजीवर तर तुझी मास्टरी सगळ्या भाज्या आणून बारीक चिरून कुकरला लावून त्या मॅश करून अमूल लोण्यात तू स्वतः तयार करायचा पाव भाजणे इतकेच काम माझ्याकडे असायचे फार लगदा न झालेली चवदार खडी पावभाजी असायची तू केलेली पाव जरा कमी खा भाजी जास्त खा अशाही सूचना मला असायच्या मैदा शक्यतो कमी वापरायचा असा तुझा कल असे आपल्याकडे आठवड्यातून एक दोन वेळच पाव आणला जात असे मला मात्र पाव खूप आवडत असे तेव्हा तुझा नेहेमीच डायलॉग असायचा आज तुम्ही पाव खाताय उद्या हाच पाव तुम्हाला खाईलतेव्हा मी म्हणायचे उद्या खाईल ना खाऊ दे मला आणि हा पाव तर मी आधीच खाल्लाय मग तो कसा परत मला खाईल बरे?यावर तुझे फक्त स्मित असे ज्यामध्ये तुझा अभिप्राय दडलेला असे