जानेवारी २०२५जानेवारीचा महिना हवेत खुप गारवा होता. रात्रीचा एक वाजले होते.अमावस्या असल्याने सभोवताली काळोख होता.अश्या वेळी गोव्यावरून एक कार मुंबईच्या दिशेने हायवेवरून जात होती.कारमध्ये एकूण पाच व्यक्ती होत्या.सुभाष कोटणीस जे स्वतः कार चालवत होते.त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी रेखा बसली होती.पाठीमागे त्यांची दोन मुले व वडील तानाजीकोटणीस बसले होते.सुभाष सोडून सारे झोपले होते.गाडी हुमरमळा या ठिकाणी आली आणि सुभाषला समोर रस्त्यावर एक स्री दिसली. केस मोकळे सोडलेली.. हिरवे लुगडं ...निळा ब्लाऊज...हातात हिरव्या बांगड्या असलेली.सुभाषने हॉर्न वाजवला.त्या स्रीच लक्षच नव्हतं.ती आपल्याच धुंदीत होती.तिला टाळण्यासाठी त्याने गाडी उजवीकडे घेतली.पण गाडी उजवीकडे न वळता कोणीतरी हात धरून स्टेअरींग वळल्यासारखी झपकन डावीकडे वळली.रस्ता सोडून गाडी.
विलक्षण - 1
विलक्षण १ जानेवारी २०२५जानेवारीचा महिना हवेत खुप गारवा होता. रात्रीचा एक वाजले होते.अमावस्या असल्याने सभोवताली काळोख होता.अश्या वेळी गोव्यावरून कार मुंबईच्या दिशेने हायवेवरून जात होती.कारमध्ये एकूण पाच व्यक्ती होत्या.सुभाष कोटणीस जे स्वतः कार चालवत होते.त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी रेखा बसली होती.पाठीमागे त्यांची दोन मुले व वडील तानाजीकोटणीस बसले होते.सुभाष सोडून सारे झोपले होते.गाडी हुमरमळा या ठिकाणी आली आणि सुभाषला समोर रस्त्यावर एक स्री दिसली. केस मोकळे सोडलेली.. हिरवे लुगडं ...निळा ब्लाऊज...हातात हिरव्या बांगड्या असलेली.सुभाषने हॉर्न वाजवला.त्या स्रीच लक्षच नव्हतं.ती आपल्याच धुंदीत होती.तिला टाळण्यासाठी त्याने गाडी उजवीकडे घेतली.पण गाडी उजवीकडे न वळता कोणीतरी हात धरून स्टेअरींग वळल्यासारखी झपकन डावीकडे वळली.रस्ता ...Read More
विलक्षण - 2
विलक्षण २येताना माझं विचार चक्र चालू होतं.त्या गुराख्याने त्या जागेच्या मूळ मालकाचे नाव "कोटणीस" सांगितले होते.मला जे कागद पुजारेंनी होते त्यात सुध्दा " कोटणीस नावाचा उल्लेख होता.या नावाभोवती गूढ वलय तयार झाले होते. आता पुन्हा एकदा ते कागद चाळले पाहिजेत असं मी ठरवले.मी बंगल्यावर आलो.पोलीस स्टेशनमधून घेतलेल्या नंबरवर मी फोन केले.अपेक्षेप्रमाणे मला सुरुवातीला माहिती मिळवताना अडचण आली.पण मी इतिहास संशोधक आहे व सरदार कोटणीस यांच्याशी निगडित असलेल्या कोटणीसांची माहिती गोळा करतोय असं सांगितल्यावर मला काही माहिती मिळाली.ही माहिती खूपच महत्त्वाची होती. अपघात झालेले तिन्ही कोटणीस या ना त्या प्रकारे सरदार कोटणीस यांच्या खानदानाशी संबंधित होते. पण ते एकदोन पिढ्यांपूर्वी ...Read More
विलक्षण - 3
विलक्षण ३सकाळी मी थोडा लवकर उठलो.पूजा आटोपून मीपुजारींना जिथे कागद सापडले होते तिथे गेलो.मी ठरवलं होतं की त्या शेजारच्या काकांना घेऊन तिथे थोडं खोदकाम करावे पण माझ्या लक्षात आलं की त्यामुळे गावात चर्चा झाली असती.वेगवेगळ्या अफवा उठल्या असत्या त्या पेक्षा मी स्वतः खोदकाम करायला सुरुवात केली.मी माझी नेहमीच हत्यारे सोबत घेऊनच आलो होतो.त्यात छोटी कुदळ..हातोडा ..छिन्नी...ब्रश...भिंगे...इ. मी ती जागा हळूहळू मोकळी केली.फूटभर खोल खोदून ही काही हाती लागले नाही.मी थोडं पुढे खोदकाम सुरू केलं.साधारण पाऊण एक फूट खोल गेल्यावर मला काहीतरी चकाकल्यासारख वाटलं.तिथे काहितरी होत हे नक्की! मी आता काळजी पूर्वक माती बाजूला करु लागलो.हळूहळू एक अर्धा फूट लांब ...Read More
विलक्षण - 4
विलक्षण भाग ४सकाळी मी सर्व कामे आटोपून पुन्हा कामाला लागलो.मला आजच ती वही पूर्णपणे वाचायची होती.माझ्यासाठी आता ती लिपी राहिली नव्हती.मी झपाझप भाषांतर करत गेलो.सुमारे दिड तासात मी सगळी वही भाषांतरीत केली.सगळा इतिहास माझ्या समोर होता.मी लताबाईंनी लिहिलेली माहिती वाचायला सुरुवात केली.....'त्या रात्री मी बेभानपणे आडवाटेने चालत पहाटेला एका गाडीतळावर पोहचले.माझ्या पायात काटे घुसले होते.हात पायावर ओरखडे उमटले होते. वाटेत एक नदीवर मी हातपाय धुतले. चादरीत गुंडाळली मुलगी आता जागी झाली होती.तिची अफूची नशा उतरली होती.ती सारखी रडत होती. मला कळत नव्हतं मी नेमकं काय कराव.तिथल्या चहावाल्या आजोबांकडून दुध घेऊन मी ते मुलीला पाजलं.सर्व्हिस गाडीतून कोल्हापूर गाठलं.तिथे माझी मावशी ...Read More
विलक्षण - 5
विलक्षण ५ त्या रात्री मी थोडा निवांत होतो.माझ्या समोर कोणतंहीकाम नव्हतं.खूप प्रवास केल्याने मी थकलो होती.पडल्या पडल्याच मला झोप .त्या रात्री मला जाग आली नाही.सकाळी सहा वाजता जाग आली ती समोरच्या शेवग्याच्या झाडावर किलबिल करणा-या पक्षांमुळे.मी उठून खिडकीची काच सरकवली. शेवग्याला छान पिवळा फुलोरा आला होता.त्यावर चिमण्या आणि बुलबुल पक्षी भिरभिरत होते. सकाळच्या या प्रहरी त्यांचा आवाज मन उत्साहित करत होता.गाणी गुणगुणत मी माझी कामे पूर्ण केली.सगळ आटोपल्यावर मी पुन्हा पुन्हा काम सुरू केले.दुपार पर्यंत रघुनाथ पुजारी येणार होते.त्या पूर्वी सगळी जुळवाजुळव करावी लागणार होती.मी टेबलावर, मूळ कागद...त्यांचं भाषांतर... बाळंत विड्याची पेटी.... आणि ते वाळे ठेवले. बाहेर स्वच्छ ऊन ...Read More
विलक्षण - 6
विलक्षण भाग ६(कोणातरी नोकराला जाग आली.वर उठणार्या ज्वाळा आणि धूर बघून त्याची बोबडी वळली.नेमक्या कुठच्या खोलीत आग लागली हेच तोंडावर हात ठेवून बोंब ठोकली.तसा सगळा वाडा जागा झाला.नोकर -चाकर, घरातली माणसं ओरडत धावली.आरडाओरड ऐकून शेजारच्या माणसांनी मदतीसाठी धाव घेतली.) अगदी त्याच वेळी पूर्णपणे जळलेल्या गौरीचा आत्मा देह सोडून बाहेर पडला.अतीशय तरल अश्या वायुरुप अवस्थेत ती हवेत तरंगत होती.समोरची धावपळ तिला दिसत होती.पण देहमुक्त झालेल्या गौरीची तडफड चालली होती ती स्वतःची मुलगी कुठे आहे ते पाहण्याची.पण त्या खोलीत फक्त राख आणि तिच्या स्वतःच्या देहाची तुटलेली हाडे...जळून खाली पडलेल्या छप्पराचे भाग दिसत होते.ती हताश झाली.साळसूदपणाचा आव आणून धावपळ करणारे विश्वंभर व ...Read More
विलक्षण - 7
विलक्षण ७(झुंबर आपल्या डोक्यावर पडले असते तर!या विचाराने तो खूप घाबरला होता.तो तिथून निघून आपल्या खोलीत गेला.)पुढे........ त्या रात्री स्वप्न पडलं दोन शुभ्र हात त्याच्या गळ्याच्या दिशेने येताहेत आणि त्याचा गळा दाबताहेत.तो घामाघूम होत जागा झाला.तो एवढा भेदरला होता की आजूबाजूला बघायचही धाडसही त्याला होईना.त्याने डोक्यावर चादर ओढून घेतली व झोपण्याचा प्रयत्न करू लागला. आपण दरवाजा खरच बंद केला का हे पाहण्यासाठी त्याने चादर दूर करत दरवाज्याकडे पाहिले.तिथे एक धूसर पारदर्शक आकृती उभी होती.तिचे हात हळुहळू त्याच्या दिशेने सरकू लागले.ते लांब झालेले हात अगदी त्याच्या गळ्यापर्यंत पोहचले.भितीने सूर्यकांत ओरडला पण त्याचा आवाज बाहेर पडला नाही.घशातच गुरगुरल्यागत आवाज आला व ...Read More