३२ वर्षीय रोहित समुपदेशकांच्या दवाखान्यामध्ये बसला होता. त्याचे लग्न होऊन तीन वर्षे झाली होती. तो उत्तम नोकरी करत होता, पण त्याच्या डोळ्यांमध्ये प्रचंड मानसिक थकवा दिसत होता.> डॉक्टरांनी विचारले, "तुमची सर्वात मोठी समस्या काय आहे?"> रोहित म्हणाला, "मला स्वतःचा तिरस्कार वाटतो. मी खूप वेळा प्रयत्न केला. उद्यापासून बंद करीन असे ठरवले. पण काही दिवसांनी पुन्हा त्याच सवयीकडे वळतो. आता मला माझ्यावरच विश्वास राहिलेला">