Acti v aao Sai books and stories free download online pdf in Marathi

एकटी व आओं साँईं

कथा-1

एकटी..!

राधानी घरी आल्या-आल्या नानीला फोन केले, "नानी मी आई सोबत सुखरूप घरी पोह्चले गं.., तू काळजी करू नको..!" शनीवार, रविवार नानीच्या घरी राहून आलेल्या माय-लेकी अजूनही तिथल्याच मोहपाशात बांधल्या होत्या. नानींनी सोबत दिलेला खाऊ, राधाच्या समोरच होता. काय नाही ते बाँघून दिले होते तिनी... खोबर्याच्या वड्या, काजू, बदाम, हिरवा चना, दूधमोगर्याचे दाणे, तळलेल्या साबूदाना-भगरच्या चकल्या..!

माहेरी आलेली मुलगी आणि नातीनला निरोप देताना तिचा जीव कासाविसा होत होता. पण त्यांना पाठवनंही तितकच महत्वाचं होतं. सोमवारी दोघींची शाळा होती. एक शिकायला जाते, तर दूसरी शिकवायला..! नानी आता घरी एकटी होती. नानाजीला जाऊन तीन महीनेहून जास्त झाले होते. एकटी नानी, नानाजींच्या फोटोसमोर बसून काहीतरी बोलत बसायची. तिला अशी एकटीला सोडून आलेल्या माय-लेकी परत परत तिची आठवण करीत होते. राधा, पप्पाला प्रत्येक गोष्ट सविस्तार सांगण्यात मग्न होती. पप्पाला मात्र नानीची काळजी वाटत होती, तिचं बी.पी. वाडलेला होता आणि ती अशी एकटी... कसं जमेल तिला स्वतःला सांभाळून घ्यायला..!

काही वेळानीं लगेच नानीचा पप्पाला मिस-क़ॉल आला... पप्पानी फोन लावला, तर नानी म्हणाली, “चुकून फोन लागला असेल..” तिला मुँबईला, आपल्या मुलाला फोन लावायचं होता. पण आजकालच्या नवीन आलेले स्मार्टफोन हाताळने, वयस्कर व्यक्तिंना थोडं कठीनच होतो. तरीही नानींनी लौकरच त्याच्यावर सुद्धा काबिज मिळविला होता. तिचा मुलगा, मुँबईला सरकारी नोकरीला होता. त्याच्याकडे ती एक-दोन महीने नुकते राहुन आली होती. तिथलं दमट हवामान, नानीला सूट झाला नव्ह्ता. मुख्य म्हणजे, तिला आपल्या स्वतःच्या घरी परत यायचं होतं... नानाजी सारखे तिला एकटी मुँबईला आपले प्राण सोडायचे नव्हते..! नानाजी शेवटच्या घटकेला आपल्या कुटूंबा सोबत नव्हते, ही खंत नानीला नेहमी वाटायची. मुँबईहून नानाजीच्या प्रेतासोबत परत येतानां तिच्या मनात हिच खंत होती कि ती आपल्या मुलींना, जावयांना काय उत्तर देणार..? मुँबईला जातांना दोघं सोबत होते आणि परत मात्र नानी एकटीच आली..!!

तिला आता आपलं उरलेलं आयुष्य एकटीलाच जगायचं होतं. दिवस कसंतरी निघून जातो, दिवसा लोकांचे चेहरे दिसतात... रात्र मात्र एकटीलाच काडायची असते..! नवर्याशिवाय कुठल्याच वयाच्या बाईला जगणं कठीन होतो. मुलगी तरुण असेलतर दुसरा जोडीदार भेटू शकतो... पण एका म्हातारी स्वाभिमानी बाईंनी कसं जगायचं..? कुणावर ओझं कशयाला बनायचं... नानाजींची अर्धी पेंशन आणि तिच्या नावावर एक घर होतं, मग का बरं सूनबाईचे टोमणे ऐकत, मुँबईला मुलाकडे रहायचं..? आपलेच दात आणि आपलेच ओठ... अशी नानीची मनःस्थिती झाली होती..!

नानीचं आयुष्य खूप कष्टाचं गेले होते. सोळाव्या वर्षी नानाजी सोबत तिचे लग्न झाले. गोरीपान, लांबलचक केसं, मोट्ठे मोट्ठे डोळे, खूप सुंदर दिसायची नानी. नानाजीला सरकारी नोकरी असल्यामूळे, त्यांच्या लग्नाला काहीच अडचनी आल्या नाही. अडचन मात्र लग्ना नंतरच्या सासूरवासात तिला ला. सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले, नंतर मात्र तिचे खूप हाल झाले. घरातले सगळे कामं, पाहुण्यांचा स्वागत सत्कार, सगळ्यांचे जेवणं, भांडे पासून तर टोपलं भरून धून्याचे कपडे, डोक्यावर घेऊन तिला नदीवर जावं लागे. ग्रामीण भागात असले कामांची सवय नव्हती तिला. तरीपण ती काही म्हणता, मुकाट्याने सारे कामं करायची. हळू हळू तिची तब्येत खालावल्या गेली. नानाजीनी मग तिला आपल्या सोबत, त्यांची नोकरी होती, तिथे घेऊन आले. तो भाग नक्सलप्रभावी असल्याकारणाने ती घराबाहेर नाही निघायची. मग नानाजीनी तिला वाचनासाठी काही पुस्तकं आणून दिले. आता पुस्तकच तिचा संसार..! तिला इतिहासात रस असल्यामूळे तिनी शिवाजी महाराज, वीर सावरकर, टिळक इत्यादी मान्यवरांचे बरेच पुस्तकं वाचले.

सतत वाचनामूळे तिला मानेचा त्रास उदभवू लागला, हळू हळू तिचं वाचन कमी होत गेलं. ती आता घरी लक्ष द्यायला लागली. तिचा परीवार आता मोठा होवू लागला. मुली मोठ्या झाल्या, त्यांचे लग्न, मुलांचे लग्न करून नानी आता श्वास घ्यायला मोकळी झाली नाही कि नानाजी तिला एकटीला सोडून देवाघरी निघून गेले. आता नानी आपल्या नात्वंडांमधे जगण्याचे कारण शोधित होती. सग़ळ्यांमधे राधा तिची जास्त लाडाची होती. राधा सुटीच्या दिवशी तिला भेटायला यायची... सोबत अभ्यासाचे पुस्तकं आणि नोटबूक घेऊन यायची. नानीची खास मैत्रीण होतीनं ती..! नानीला, राधाची सोबत असली कि कुठलीच भिती नाही वाटायची..! राधा आपला अभ्यास री बसायची आणि नानी तिच्यासाठी खाऊ बनविण्यात मग्न असायची. रात्री सोबत घेऊन झोपतानां तिला पौराणिक कथा सांगायची. पण मग सुटी संपली कि तेच एकटेपण तिला स्वस्थ बसू नाही द्यायचा.

एके दिवशी राधानी नानीला म्ह्टले, "नानी तू आमच्या घरी का बरं रहायला येत नाही..? तूलापण करमेल आणि आम्हालापण तूझी साथ लाभेल." नानीला ते योग्य वाटत नव्हतं. उगीच आपल्यामूळे कूणाला अडचन नको ह्वायला... असं तिला नेहमी वाटायचे. नानीच्या मूलींनी तिला समजविले, रात्री-अपरात्री बी.पी. वाडला, तब्येत खालावली तर कोण बरं लक्ष देणार तुझ्याकडे..? तू ये आमच्याकडे रहायला..! घर सुद्धा खूप दूर नाहीये, तूला दोन्हीकडे लक्ष देता येईल..! नानींनी मोठ्या मुश्किलने हो मह्टले. एक-दोन दिवसांनी राधा पप्पांसोबत नानीला घ्यायला आली. नानींनी एका पिशवीत आपले कपडे भरले आणि ओल्या अंतःकरणाने घराला कुलूप लावून निघाली. तिला अजूनही स्वतःचं घर सोडायची इच्छा होत नव्हती. गाडी सुरू झाली तशीच नानी म्हणाली, "जी... एक मिनीट, थांबा जरा, मी लगेच येते..." आणि ती खाली उतरून घरात गेली. थोड्या वेळानी ती बाहेर आली तर तिच्या हातात एक फोटोफ्रेम होता... नानाजींचा..! ती गाडीत बसली, पप्पांनी मागे वळून बघितले... नानीच्या चेहर्यावर आता एक समाधानाचे भाव होते. ती आता एकटी नव्हती... तिच्या सोबत होतं, ते तिचं आधार.., तिचं संसार.., तिचं सर्वस्व.., नानाजी..!! एका हातात नानाजींचा फोटो आणि दुसर्या हातानी राधाचा आधार घेऊन तिने समाधानाने डोळे बंद केले...! गाडी आता वेगाने नानीला, पुढच्या स्थानकाकडे घेऊन जात होती..!!!

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथा-2

आओ साँई..!

मी प्रथमच, माझ्या होणार्या बायकोला बघायला गेलो, तेव्हांची ही गोष्ट..! तिच्या बद्दल माहिती मला एका वर-वधू सूचक पुस्तकाच्या माध्यमाने मिळाली होती. संपुर्ण पुस्तकात, तिचे वधू-परिचय, मला काहिसे वेगळे वाटले. ती, एकमेव फाईन-आर्टिस्ट होती. एका नामांकित संस्थेतून तिने एम.एफ.. केले होते. मी जरी आर्टिस्ट नसलो, पण आई-बाबा दोघेही नावाजलेले आर्टिस्ट होते. म्हणु की काय, माझ लक्ष वेधणारी तिचे परिचय, मला एकदा तरी त्यांच्याकडे जायला प्रोत्साहित करित होते. फोन नं. दिलं नसल्यामुळे, मी एक सुट्टीचा दिवस (26 जानेवरी, बुधवार) गाठून सरळ त्यांच्या घरी पोहोचलो. माझ्यासाठी ती जागा नवीन असल्यामुळे, त्यांचं घर शोधायला थोडा वेळच लागला. पत्ता शोधत कसंतरी पोहोचलो. तिच्या गल्लीत शिरताच, मला एक गुलाबी रंगाचा घर दिसला. मी मनातल्या मनात म्हणालो, हाच तो घर असायला पाहिजे. आणि सरळ त्याच घरासमोर गाडी उभी केली. अँगणात, तिची आई तांदूळ निवडत बसली होती. ती कुठल्यातरी विचारात गूँग होती. तांदूळ निवडता निवडता हाताच्या बोटानी ताटात काहीतरी आकृती बनवित होती. मी चौकशी केली असता तिनी, हाच तो पत्ता.. साँगून आत यायला सांगितले.

दुपारचे तीन वाजले असेल, त्यांच्याकडे सगळे जेवणकरून आराम करीत होते. आणि आम्ही येऊन पोहोचलो...! पण त्यांनी काहिच आक्षेप घेता, यायचे कारण विचारिले. मी म्हटलं, "सॉरी... तुम्हाला सांगता आलो..., काय करणार, तुमचा फोन नंबरच नव्हता पुस्तकात...! तुम्ही, तुमच्या मुलीचं नाव पुस्तकात दिलं होतं ना..? मी त्याच बद्दल तुम्हाला भेटायला आलो आहे. जर तुम्हाला काही अडचन नसेल, तर आपण मुलगी बघण्याचं कार्यक्रम पुढे कधीतरी घेऊ..!"

तिचे बाबा म्हणाले, "हो, हे खरं आहे... पण आमची मुलगी मुँबईला एका एनीमेशन कंपनीत नोकरी करीत आहे..!" तिचं इतक्यात यायचं काही बेत नाहीये.

मी म्हटलं, "काही हरकत नाही... ती जेव्हां कधीही ये, आम्हाला तसं निरोप कळवा."

मी चहा घेता घेता सहज तिचा फोटो बघण्याचं आग्रह केला. तिचे बाबा आत गेले आणि तिच्या आईशी, आत्ताच कसं काय फोटो दाखवायचा.. या विषयावर कदाचित चर्चा करीत होते. मी निश्चिंतपणे चहाचा घोट घेत हॉलमधली सजावट बघत होतो. माझी नजर तिनी बनवलेली एका पेंटिंगवर गेली... साँईबाबाची..! मी मंत्रमुग्ध त्या पेंटिंगकडे बघतचं राहिलो. किती जिवंतपणा होता त्यात..! डोळे किती बोलके होते..! मी विचार केला, आपल्याला जर का ही पेंटिंग मिळाली तर किती बरं होईल..! खूप सूंदर होतं ते पेंटिंग..!आमच्या मुलीनेच बनविले आहे ती पेंटिंग..! तिची आई आत येत मला म्हणाली. तिच्या हातात त्यांच्या मुलीचा पासपोर्ट साईज फोटो होता. त्यांनी तो मला बघायला दिला..! मी तिचा फोटो बघितला आणि म्हणतात ना तसंच क्लिक झालं..! डोक्यात घंटी वाजायला लागली.., हो... हीच ती, जिला मी इतके वर्ष शोधित होतो..!! मी मनातल्या मनात पुटपुटलो..!छान आहे... फोटो...! मी तो ठेवू शकतो का माझ्या जवळ...? मी मोठया हिमतीने विचारले..!

मूलीकडून होकार मिळाल्यावर नक्किच ठेवा..! तिची आई म्हणाली.

थोड्या वेळानी आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि आपल्या घराकडे निघालो. तिच्या बाबांनी तिला एक पत्र लिहिले, त्यात माझा दिलेला बायो-डेटा सोबत जोडला. एक-दोन दिवसानीं तो पत्र पोस्टात टाकणार कि माझी होणारी बायको सकाळी सेवाग्रामनी घरी पोहचली..! तिच्या घरचे सगळे हैराण...!!

अगं, तू अचानक कशी आली..? सगळे तिला विचारायला लागले... सगळ ठिक आहे ना..?अरे हो हो... मला आत तर येऊ द्या...! ती म्हणाली. शनीवार, रविवार ऑफ असल्यामुळे, ऑफिस मधून सरळ रेल्वे स्टेशन गाठला आणि जनरल बोगीची टिकीट काडली, आणि आलो तुम्हाला सरप्राईज द्यायला..! काय... कसा काय वाटला आमचा सरप्राईज..! तिच्या सोबत तिची मैत्रीणपण होती..! घरचे मनातल्या मनात हासत होते..! हिलापण आपण आज एक सरप्राईज देणार आहोत.ती फ्रेश झाल्यावर, तिच्या बाबांनी तिच्या हातात पोस्ट न केलेलं पाकिट दिलं...! आता हे काय.. ती आश्चर्याने बोलली..!आमच्याकडे सुद्धा एक सरप्राईज आहे बच्चमजी..! पाकिट उघडून तर बघ..! तिचे बाबा म्हणाले.

हे काय हो बाबा... मला आताच लग्न नाही करायचे आहे..! आता कुठे मी नोकरीची सूरूवात केली आहे..! ती रूसून म्हणाली.अगं, मुलगा छान आहे, आर्किटेक्ट आहे म्हणे..! तुमचं काम एकामेकाला पुरक होईल आणि मुख्य म्हणजे त्यांना तुझ्या कलेची जाणीव आहे.., तुला पुढे तुझं काम सुद्धा करता येईल.. अशे ना ना तर्हेने सगळे तिला ‘पटवायला’ लागले. अगं आलीच आहे, तर एकदा भेटून घे... नाही आवडले तर तू तुझं निर्णय घ्यायला मोकळी आहेस् की..!

कसं तरी ती मानली, काहीही तैयारी, मेकप न करता, साद्या घरच्या ड्रेसवर ती माझ्या समोर आली. मी तर तिला आदिच पसंत केल्यामुळे, माझ्या कडून होकार होता. ते म्हणतात न, जोड्या स्वर्गात बनतात.., तसंच आमचं तीन-चार दिवसातच् साक्षगंध ही झालं आणि ती माझी एंगेजमेंट-रिंग घालून मुँबईला परत गेली... नोकरीचा राजीनामा द्याला..! एका महिन्यात लग्नही झाले, पण माझ मन मात्र त्या साँईबाबाच्या पेंटिंगमधे गुंतला होता. जेव्हांकधी मी माझ्या सासर्यांकडे जायचो, त्या पेंटिंगकडे बघत बसायचो..! माझे सासरे रोज संध्याकाळी त्या पेंटिंग जवळ अगरबत्ती लावायचे... घर कसं प्रसन्न वाटायचा.तिचे बाबा देवाघरी गेले... आणि त्या पेंटिंगकडे दुर्लक्ष होत गेला...! आता ती पेंटिंग हॉल मधून बेसरूमच्या एका कोपर्यात पडून होती..! काही दिवसा आदि माझ्या बायकोला काय वाटले, तिनी ती पेंटिंग सोबत घेऊन आली..! मी विचारलं या कापडात काय गुंडून आणले..? तिनी ती पेंटिंग काडून सोफ्यावर ठेवली..! आणि माझ्या तोंडून सहज उद्गार निघाले, आओ साँई...! देवा, तब्बल पंद्राह वर्ष वाट पाहली मी तुमची..! मनातून एक आवाज आला... श्रद्धा आणि सबुरी ठेवली कि देव सुद्धा पावतो...!!! आता मी खूप निश्चिंत झालो आहे... माझ्याकडे स्वतः देव आले आहे..! माझी बायको त्या पेंटिंगला भिंतीवर लावण्या आदि तिला परत रिपेंट करित आहे...!!!